डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

प्रबोधक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी

म.गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, तुकडोजी महाराज ही त्यांची दैवते होती. महाराष्ट्र सरकारने दारूबंदीला प्रोत्साहन देणारा कायदा संमत केला. त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. परंतु तो क्षणिक ठरावा असा दुसरा आदेश सरकारने काढला. तो असा होता की, बाहेरून मद्यार्क आणून दारूनिर्मिती करता येईल. ‘त्यातून महसूल वाढेल, त्यातून लोकांचा विकास होईल.’ असा तिरकस युक्तिवाद सरकारने केला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी त्वरीत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र लिहिले की, ‘पैशासाठी मुक्तपणे दारू सुरू करायची, तर वेश्या व्यवसायाला उत्तेजन देऊन महसुल वाढवण्याचा सरकारचा विचार आहे काय?’ ते प्रत्यक्ष सत्याग्रह किंवा चळवळीत सहभागी नसले तरी सत्याग्रही, आंदोलनकर्त्यांना त्यांचे नैतिक बळ मिळायचे. 

म.गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, तुकडोजी महाराज ही त्यांची दैवते होती. महाराष्ट्र सरकारने दारूबंदीला प्रोत्साहन देणारा कायदा संमत केला. त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. परंतु तो क्षणिक ठरावा असा दुसरा आदेश सरकारने काढला. तो असा होता की, बाहेरून मद्यार्क आणून दारूनिर्मिती करता येईल. ‘त्यातून महसूल वाढेल, त्यातून लोकांचा विकास होईल.’ असा तिरकस युक्तिवाद सरकारने केला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी त्वरीत त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र लिहिले की, ‘पैशासाठी मुक्तपणे दारू सुरू करायची, तर वेश्या व्यवसायाला उत्तेजन देऊन महसुल वाढवण्याचा सरकारचा विचार आहे काय?’ ते प्रत्यक्ष सत्याग्रह किंवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक, सामाजिक जीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे 3 जानेवारी 2019 रोजी हृदयविकाराने निधन झाले. काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचे जगणे समाजाला आवश्यक, गरजेचे असते. अशांमध्ये न्यायमूर्ती धर्माधिकारी एक होते. वयोमानापरत्वे मृत्यू हा अटळच असतो, शिल्लक राहतात त्या कार्याच्या स्मृती. 
सन 1972 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये गुरेघर या ग्रामदानी गावी युवकांसाठी एका श्रमशिबिराचे आयोजन आम्ही केले होते. त्यामध्ये आचार्य दादा धर्माधिकारी यांचे ‘क्रांतिवादी तरुणांची दिशा’ या विषयावर व्याख्यान होते. त्यांच्यासोबत चंद्रशेखर व त्यांच्या सहचारिणी ताराबाई होत्या. त्या वेळेपासून सर्वोदयाच्या कार्याच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी सततचा संपर्क राहिला. आचार्य दादा धर्माधिकारींच्या जीवनवृत्तीचा आविष्कार न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यामध्ये जसा दिसतो, तसा तो दादांच्या तिसऱ्या पिढीमध्ये मुंबई हायकोर्टाचे विद्यमान न्यायमूर्ती सत्यरंजन, नागपूरचे प्रसिद्ध वकील आशुतोष व दादांची नात डॉ.सौ.अरुणा यांच्यामध्ये दिसतो. 
आय.सी.एस.ला जाणारे दादा कॉलेजमधून स्वराज्यवाल्या जंगम कॉलेजवाल्या गांधींकडे वळले आणि लढ्याच्या वेळी तुरुंगाची वाट चालू लागले. त्यांचा संसार संन्याशाचा बनला. वर्ध्याजवळील सेवाग्राम, विनोबांचे पवनार, जमनालालजींची (गांधीजींचे पाचवे मानसपुत्र) बजाजवाडी. दादा लिहितात, या बजाजवाडीत त्यांचे कौटुंबिक जीवन अधिक व्यापक, विशाल व मांगल्यमय झाले. बजाजवाडी म्हणजे भारतीय राष्ट्रीयत्व, जी-जी दिव्य तत्त्वे, जे-जे कल्याणकारक भाव होते त्या सर्वांचे पुण्यक्षेत्र! 
या पुण्यक्षेत्रात चंदूभय्या वाढले. या क्षेत्रात बरेच कर्मयोगी होते आणि त्यामध्ये एक महात्मा होता. हा महात्मा सकाळ-सायंकाळी सेवाग्रामहून फिरायला निघाला म्हणजे बजाजवाडीतून त्यांची पावले फिरत उमटत असत. त्यांच्या एका हातात काठी व दुसरा हात कुणाच्या तरी खांद्यावर असे. चंदूभय्याच्या खांद्याने किती तरी वेळा त्या हाताचा स्पर्श अनुभवला होता. तो हात कृश होता, पण साधा नव्हता; तो साम्राज्यशाहीला ‘चले जाव’ म्हणून हादरा देणारा होता. दु:खी-कष्टी माणसाची अपार करुणेने उस्तवारी करणारा होता. जाडी-भरडी खादी, चरख्याचे संगीत, स्वातंत्र्याचे वारे, अशा चैतन्याने तो परिसर भरून गेला होता. मातीच्या भिंती, मातीची कौले असे साध्या आश्रमीय घरात दादांचे वास्तव्य होते. दादांनी आपल्या मुलांना येथेच जन्म दिला, पण लौकिक अर्थाने पितृत्व केले नाही. आई कृष्णाबाई हिने भरपूर मातृत्व दिले. गांधींच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या टिळक विद्यालयात दादांनी मासिक 30 रुपये पगारावर लोकशिक्षणाचे कार्य केले, कोठेही हात न पसरता. 
दादांचा बहुतेक वेळ सत्याग्रह व जेलमध्ये जायचा. अशा वेळी तिने मुलांचे संगोपन धैर्याने केले. सुरुवातीला सन 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहामध्ये तिने तुरुंगवास भोगला. बबन आणि चंदू या दोन मुलांसोबतच बजाजवाडीतील सर्व मुलांच्या त्या आई झाल्या. दादा देशभर फिरून स्वातंत्र्याची ज्योत जनमानसात प्रज्वलित करीत होते. चंदूभय्या आपल्या बाललीलांनी माता-पिता, शेजाऱ्यांचे मन रिझवीत होता. त्याने आपल्या वयाच्या कुमारांना घेऊन ‘घनचक्कर क्लब’ काढला होता. खेळ, वक्तृत्व, स्पर्धा, भेंड्या, अभ्यासवर्ग अशा प्रवृत्ती या ‘घनचक्कर क्लब’तर्फे चालायच्या. 1942 च्या चले जाव संग्रामात अनेकांना जेल भोगावा लागल्यामुळे गांधींच्या राष्ट्रीय शाळा बंद पडल्या. 
उगवत्या पिढीचे शिक्षण बंद पडू नये म्हणून, काही शिक्षकांनी खासगी शिक्षणवर्ग सुरू केले. त्यामध्ये अनेकांसोबत चंदूभय्यांनी प्रवेश घेतला. पुढे वकिलीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. वर्ध्याहून त्यांचे वास्तव्य नागपूरकडे गेले. ते उत्तम आणि प्रसिद्ध वकील म्हणून नावारूपाला आले. त्यातून ते समाजसुधारक झाले. विवाहाचे वय होत होते. वडील दादांचा आदर्श, समाजसुधारणेची ओढ यातून ते लग्नाच्या बोहल्यावर चढले. केवळ 22 रुपयांमध्ये त्यांचे लग्न झाले. 
नागपूर हे औद्योगिक शहर. येथे गिरणी कामगारांवर अन्याय व्हायचे. अत्यंत कमी फीमध्ये, अनेकदा फुकट खटले चालवून वकील चंद्रशेखर त्यांना न्याय मिळवून द्यायचे. पुढे 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. ‘कोर्टाचा बहिष्कार’ ही काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळीतील नीती कालबाह्य झाली होती. स्वतंत्र भारतामध्ये न्यायाधीशपद भूषवणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. मात्र वकीलपेशाच्या तुलनेत न्यायाधीशांचे वेतन कमी असायचे. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर आला असेल. मनामध्ये चलबिचल झाली असेल; पण त्यांचे वडील दादांचा त्याग व देशसेवेचे व्रत त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला. एकूण 17 वर्षे ते हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते. काही काळ त्यांनी मुख्य न्यायमूर्ती म्हणून पद सांभाळले. पुण्यातील विद्यार्थी-युवकांनी केलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडाचा त्यांनी निर्भयपणे दिलेला निवाडा, शोषितपीडित- वंचित- महिला- आदिवासींसंबंधींचे निवाडे, सन 1975 च्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांचा जगण्याचा हक्क घटनात्मक व मूलभूत अधिकार आहे हे सांगणारे त्यांचे निकालपत्र व अन्य अनेक निवाडे लोकशाही व मानवतेचे रक्षण-संवर्धन करणारे होते. 
न्यायमूर्ती धर्माधिकारी हे म.गांधी विचारांचे असे प्रवक्ते, प्रबोधक भाष्यकार होते की, त्यामुळे गांधीजींच्या संस्था, संघटना, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. भूदान, ग्रामदान, खादी ग्रामोद्योग, गोरक्षा, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, कुष्ठरुग्ण सेवा, आदिवासी सेवा, स्पृश्यास्पृश्य भेद निवारण हे त्यांचे आवडीचे विषय होते. म.गांधी, विनोबाजी, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, तुकडोजीमहाराज ही त्यांचे दैवते होती. 
महाराष्ट्र सरकारने दारूबंदीला प्रोत्साहन देणारा कायदा संमत केला. त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. परंतु तो क्षणिक ठरावा असा दुसरा आदेश सरकारने काढला. तो असा होता की- बाहेरून मद्यार्क आणून दारूनिर्मिती करता येईल. ‘त्यातून महसूल वाढेल, त्यातून लोकांचा विकास होईल.’ असा तिरकस युक्तिवाद सरकारने केला. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी त्वरित तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जळजळीत पत्र लिहिले की- पैशासाठी मुक्तपणे दारू सुरू करायची, तर वेश्याव्यवसायाला उत्तेजन देऊन महसूल वाढवण्याचा सरकारचा विचार आहे काय? ते प्रत्यक्ष सत्याग्रह किंवा चळवळीत सहभागी नसले, तरी सत्याग्रही आंदोलनकर्त्यांना त्यांचे नैतिक बळ मिळायचे. 
जमनालाल बजाज फाउंडेशन, गांधी रिसर्च फाउंडेशन, शांतिवन (पनवेल), साने गुरुजी कथामाला, सेवाग्राम आश्रम- सर्वोदय आश्रम- नागपूर, गांधी विचार परिषद, गोपुरी आश्रम कणकवली, गोशाळांचे फेडरेशन, गीता प्रतिष्ठान, आंतरभारती, आचार्य कुल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांचे ते अध्यक्ष, विश्वस्त, तर काही सरकारी समित्यांचे अध्यक्ष वा मार्गदर्शक होते. वाणीमध्ये सरस्वती, मस्तकात शांती, हृदयात क्रांती होती. आपल्या भाषणाने ते श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त करायचे. रोटरी क्लब, लायन्स क्लबपासून अनेक सामाजिक-शैक्षणिक संस्था त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्‌घाटक म्हणून बोलावीत असत. साहित्य, राजकारण, अर्थकारण, कला, शिक्षण अशा विषयांवर ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. यदुनाथ थत्ते म्हणायचे की, ‘ज्यांनी बालगंधर्वांचे गाणे ऐकले नसेल त्यांनी धर्माधिकारींचे भाषण अवश्य ऐकावे.’ 
न्यायमूर्ती धर्माधिकारींपासून प्रेरणा घेऊन अनेक संस्था, संघटना, व्यक्ती सामाजिक कार्य करीत आहेत. मुंबई सर्वोदय मंडळ, गांधी रिसर्च फाउंडेशन, अ.भा.साने गुरुजी कथामाला या संस्थांतर्फे न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाने 10 वर्षांमध्ये सुमारे 75 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींना, जेलमधील बंदिजनांना गांधीविचार परीक्षा आणि साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या विषयावर संबोधित करून परीक्षा देऊन संस्कारित केले आहे. सेवाग्राम आश्रम, नई तालीम समिती, सर्व सेवा संघ यांच्या पुढाकाराने म.गांधी-कस्तुरबांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचे सन 2016 पासून राष्ट्रीय स्तरावर ‘गांधी 150’ अभियान त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. 
सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला पूर्णपणे समर्पित केले होते. त्यांच्या सुविद्य सहचारिणी सौ.ताराताई या महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत मोठ्या अधिकारी पदावर होत्या. त्यांच्या घरी नेहमीच संस्था, संघटनांच्या लोकांची ये-जा असायची. या लोकांचा सौ.तारातार्इंनी कधीही कंटाळा केला नाही. त्या प्रसन्न हसतमुखाने येणाऱ्यांचे स्वागत करायच्या. अहमदनगरला अच्युतराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या सर्वोदय संमेलनाला सर्वोदय कार्यकर्त्यांच्या भेटी होतील, म्हणून त्या आस्थेने आल्या होत्या. तिथून घरी परतल्यावर त्या असाध्य अशा कॅन्सरच्या व्याधीने ग्रस्त झाल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायमूर्ती खचून गेले. दु:ख विसरण्यासाठी त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय केले. आम्हा सर्वोदय परिवाराचे असे भाग्य की, त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे सर्वोदय परिवाराशी उत्तम सख्य आहे. 
जगभरातील आजच्या स्थितीकडे पाहताना जाणवते की, आपल्या देशाचीच नव्हे तर साऱ्या जगाची वाटचाल भेदाभेद व हिंसेच्या दिशेने होताना दिसत आहे. राष्ट्रवाद, देशभक्ती, जात, धर्म, वंश यांचा आधार घेत परस्पर द्वेष, हिंसेचे राजकारण सर्वत्र थैमान घालत आहे. एकीकडे केंद्रीकरण करणारे राजकारण, तर दुसरीकडे लोकशाहीची जागा आकुंचित करणारे समाज-संस्कृतीकरण यांना कसे तोंड द्यायचे, हा सर्वांना पडलेला पेच आहे. लोक अगतिक आणि हैराण झालेले आहेत. अशा वेळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यांवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी विचारमंथनासाठी एकत्र येण्याची आत्यंतिक गरज आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना खरी श्रद्धांजली होऊ शकते. 
चळवळीत सहभागी नसले तरी सत्याग्रही, आंदोलनकर्त्यांना त्यांचे नैतिक बळ मिळायचे. 

Tags: obituary joshi-abhyankar case sarvoday pariwar justice chandrashekhar dharmadhikari जोशी-अभ्यंकर निवाडा सर्वोदय परिवार न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयवंत मठकर,  वर्धा


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा