डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लेखकाची माहिती :


भाई वैद्य - |

 (22 जून 1928 - 2 अप्रैल 2018)

त्यांचे मूळ नाव भालचंद्र वैद्य. स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री. शालेय जीवनातच १९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या आंदोलनात त्यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना तब्बल २५ वेळा कारावास भोगला होता. शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.

अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके