हे नाटकाचे सूत्र आहे. 'शॉर्टकट' हे नाटक सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात नोकरीत, बढती मिळवायची असेल तर त्यासाठी 'शॉर्टकट' म्हणजे गुणवत्ता नसून चापलुसी आहे हे दर्शविते. चापलुसी म्हणजे वरिष्ठांना केवळ मस्का मारणे, त्यांची घरगुती कामे करणे एवढेच नसून त्यांच्या अनैतिक मागण्यांच्या पूर्तीसाठी मदत करणे हे पण आहे. त्यात स्त्रियांचे शोषणही आपोआप होतेच, परंतु हे सर्व करताना जेव्हा त्यात निखळ प्रेमाची अनुभूती लाभते, तेव्हा फसव्या, भ्रष्ट जीवनाचा मोह आपोआपच सुटतो आणि जीवन उजळून निघते, हे नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधत साधत दर्शविले जाते व प्रेक्षकांनाच या आनंदात सामील करून घेतले जाते. शेवटचे नाटक होते, "घासीराम कोतवाल". या नाटकाचा परिचय पुणेकरांना आहेच, खुद्द नाना फडणीस पुणेरी माणूस.
22 ते 26 सप्टेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड या कामगार नगरीत आनंदाच्या पर्वणीचा लाभ झाला. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' या दिल्लीच्या मातब्बर संस्थेतील मातब्बर कलाकारांची रंगयात्रा अत्रे रंगमंदिरात अवतरली; आणि त्यांनी पाच नाटकांचे प्रयोग विनामूल्य सादर केले. सदर गयात्रेचे उद्घाटन डॉ. श्रीराम लागू या बुजुर्ग आणि नटसम्राट या नावलौकिकाने ओळखल्या जाणाऱ्या सिने आणि रंगमंच कलावंतांच्या हस्ते झाले. सर्व नाटके होती हिंदी भाषेत; पण नाटकांचे विषय होते हृदयाला भिडणारे. 22 सप्टेंबरचे पहिले नाटक होते 'जानेमन' हिजड्यांच्या जीवनावरील हे नाटक सुरुवातीला सर्वसामान्यांच्या मनात असलेली हिजड्यांची प्रतिमाच उजागर करते. त्यांची ती विशिष्ट शारीरिक प्रकृती, चालणे, अचकट विचकट वाटणारे हावभाव, पण जसे जसे नाटक पुढे सरकते, तसतसे लक्षात येऊ लागते की यांचे जगणे, मरणे किती वेदनामय असू शकते.
हिजड्यांमध्येही तीन प्रकारची खानदाने असतात हे सुरुवातीला, ही खानदाने जणू संगीतातील खानदानांप्रमाणे अभिमानाची आहेत, असे भासविणारी हिजड्यांतील 'मासी' (मावशी) त्यांतल्या फोलपणाची जाणीव होऊन शेवटी आतून कोसळते. सर्वसाधारण लोकांमध्ये हिजड्यांविषयी असलेल्या प्रचंड गैरसमजांची जाणीव हे नाटक करून देते. त्याचबरोबर हिजडे झालेले पुरुष, हे बालपणी त्यांच्यावर मोठ्या माणसांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराचे बळी असू शकतात, हेही तथ्य पुढे आले. बालवयात मुलींवर जेव्हा लैंगिक अत्याचार होतात, तेव्हा त्यावर कमीत कमी चर्चा तरी होते, मुलींना सांभाळून राहण्यासाठी वारंवार सूचना होतात. परंतु मुलांचे लैंगिक शोषण जेव्हा मोठ्या पुरुषांकडून होते, तेव्हा ती बालमनाला हादरवून टाकणारी गोष्ट असते, त्याची वाच्यता होत नाही. कारण असे होते, होऊ शकते, याची चर्चाच नसल्याने बालमन स्वतःतच शारीरिक दोष असल्याच्या कल्पनेने भेदरून जाते, किंवा स्वतःला मुलगीच समजू लागते. त्यातून घरातून पळून हिजड्यांच्या वस्तीकडे जाऊ शकते. तेही तथ्य या नाटकाद्वारे पुढे येते. 'अनामदासकी पोथा' हे एक हलके फुलके, गीत व नृत्यांवर आधारलेले, पुराणकाळातील ऋष्यशृंगाच्या कथेचा आधार घेतलेले नाटक होते.
नृत्य आणि गीत या तालांवर असलेल्या या नाटकाने जे उत्कृष्ट कथाबीज फुलवत नेले, त्याचा आशय होता, जीवनाचा शोध घेताना आत्मा म्हणजे काय, ब्रह्मतत्त्व म्हणजे काय, विवाहात सुख आहे का, मुळात विवाह म्हणजे काय असावे बरे, ही चर्चा करता करताच एका सुंदर तत्त्वाची मांडणी त्या नाटकात केली आहे. ती म्हणजे या सर्व गोष्टी चिंतनायोग्य आहेत. पण जीवनाचे मूलतत्त्व आहे, जगातील दुःखितांचे अश्रू पुसणे; प्रत्येक व्यक्तीला सुखी जीवनाचा हक्क आहे याला मान्यता असणे वगैरे... 'चुकायेंगे नहीं' हे नाटक, वंचितांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे होते. अत्यंत हसत खेळत पद्धतीने सादर केलेले हे नाटक चक्क व्हिएतनामी लोकांनी दिलेल्या लढ्याशी, दारिद्याने पिडलेल्या लोकांची नाळ जोडते. सर्वसामान्यांना अन्न वस्त्रासाठी तीव्र संघर्ष करावा लागत असताना सुपर मार्केटमध्ये कुत्र्यांसाठी शांपू, खास बिस्किटे असतात याची कल्पनासुद्धा येथील गरीब अडाणी जनतेला नसते. सुपर मार्केटमध्ये एकाएकी उसळलेल्या गर्दीचा व त्यातून झालेल्या लुटालुटीचा भाग म्हणून या वस्तू कामगारांच्या वस्तीत येतात. आता आपल्यावर चोरीचा आळ येऊन पोलीस पकडायला येणार, तेव्हा त्यांना चुकविण्यासाठी जो हास्यमय गोंधळ स्टेजवर घातला जातो त्यात प्रेक्षक रंगून गेले. शेवटी पोलीससुद्धा या वंचित समाजाचाच एक भाग आहे आणि आपण जे सामान सुपर मार्केटमधून पळविले ती चोरी होऊच शकत नाही. तेव्हा त्याची किंमत 'चुकाएंगे नहीं' हे ओघानेच येते.
हे नाटकाचे सूत्र आहे. 'शॉर्टकट' हे नाटक सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात नोकरीत, बढती मिळवायची असेल तर त्यासाठी 'शॉर्टकट' म्हणजे गुणवत्ता नसून चापलुसी आहे हे दर्शविते. चापलुसी म्हणजे वरिष्ठांना केवळ मस्का मारणे, त्यांची घरगुती कामे करणे एवढेच नसून त्यांच्या अनैतिक मागण्यांच्या पूर्तीसाठी मदत करणे हे पण आहे. त्यात स्त्रियांचे शोषणही आपोआप होतेच, परंतु हे सर्व करताना जेव्हा त्यात निखळ प्रेमाची अनुभूती लाभते, तेव्हा फसव्या, भ्रष्ट जीवनाचा मोह आपोआपच सुटतो आणि जीवन उजळून निघते, हे नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधत साधत दर्शविले जाते व प्रेक्षकांनाच या आनंदात सामील करून घेतले जाते. शेवटचे नाटक होते, "घासीराम कोतवाल". या नाटकाचा परिचय पुणेकरांना आहेच, खुद्द नाना फडणीस पुणेरी माणूस. नाटक हिंदीत असल्याने मूळ मराठी बाज त्याला नव्हता. त्यातून नाना फडणीस ही भूमिका करणाऱ्या नटाचे, नाना फडणीसांच्या, पुणेकरी मनात असलेल्या प्रतिमेशी काहीच साम्य नव्हते.
थोडेसे लुकडे, उभट चेहऱ्याचे नाना फडणीस कोठे आणि गोल गरगरीत शरीरयष्टीचा, गोलाकार चेहऱ्याचा नाटकातील नाना फडणीस कोठे.नाटकातील भूमिकेत असलेले नाना फडणीसांचे धूर्त, रंगेल, तुडतुडीत व्यक्तिमत्त्वही कोठे दिसत नव्हते. ही तुलना कदाचित डॉ. मोहन आगाशे यांनी साकारलेल्या नाना फडणीसांच्या भूमिकेशी होत असेल, एकूण सादरीकरण चांगले होते, पण पकड घेणारे नव्हते. या रंगयात्रेला भरभरून प्रतिसाद मात्र मिळाला नाही. कारण या 'रंगयात्रेची' माहितीच विशेष कोणाला नव्हती. त्यातुन दिवस गणपतीचे, सजावटीचे, आराशीचे, पुणे फेस्टिवल, गणेश फेस्टिवलचे. तशात पिंपरी चिंचवडचाही प्रेक्षक वर्ग, आता आतापर्यंत सिनेमा, ऑर्केस्ट्रा, हलकीफुलकी नाटके यांच्याशीच परिचित असल्याने ही 'रंगयात्रा' दाराशी येऊनही माणसाच्या वेदनेशी, सुखाशी, दुःखाशी भिडू पाहणाऱ्या या रंगयात्रेचा आस्वाद परिपूर्णतेने घेतला गेला नाही असे वाटत राहिले.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या