आई, तू माझा वाढदिवस केलास. सर्वांना बोलावलंस. मला खूप मजा आली. छान वाटलं. आई, मला तू खूप आवडतेस. तू आणि बाबांनी किती तयारी केली. मी फक्त बसले होते. सॉरी, पुढच्या वेळेस मीपण तुला मदत करीन.
आई, तू कधी येशील मला सांग. आई, मला तुझी खूप आठवण येत आहे. आई, मला तुझा फार राग आला, आता मी तुझ्याशी बोलणार नाही. पण तुझ्याशी नाही बोलले तर माझं कसं होईल म्हणून बोलावं तर लागेलच; पण हे करता येईल का गं? तू ऑफिसमधून लवकर येऊ शकत नाही का? खरंच. मी रविवारची वाट पाहत आहे. त्यादिवशी तू कुठेच जात नाही. माझ्यासोबतच खेळते.
आई, तू माझा वाढदिवस केलास. सर्वांना बोलावलंस. मला खूप मजा आली. छान वाटलं. आई, मला तू खूप आवडतेस. तू आणि बाबांनी किती तयारी केली. मी फक्त बसले होते. सॉरी, पुढच्या वेळेस मीपण तुला मदत करीन.
आई, माझ्या शाळेतली मुलं मला तनवी म्हणतात. आमचे सर दारू पितात, तंबाखू खातात. मला अजिबात आवडत नाही. मी शाळेत जात नाही. काहीच शिकवत नाहीत. तू मला शाळेत कशाला पाठवतेस? त्यापेक्षा मी घरीच अभ्यास करते. काय गं आई, मग मी जाऊ की नाही ते सांग नं.
Tags: गडचिरोली तन्वी खोरगडे अभ्यास तंबाखू शाळा दारू सर वाढदिवस रविवार ऑफिस आई Gadchiroli Tanvi Khoragade Study Tobacco School Liquor Sir Birthday Sunday Office Aai #Mom weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या