डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्रद्धांजली - महात्माजी गेले तेव्हा

.

महात्माजी गेले तेव्हा

अहिंसेला घेरी आली,

सत्य लोळे गडबडा

माणुसकी ओशाळली ॥ 

महात्माजी गेले तेव्हा

ऐक्य भावना निमाली,

हिंदू मुस्लिम भावांची

एक झोपडी भंगली ॥

महात्माजी गेले तेव्हा

त्याग हवेत विरले,

स्वदेशी हो वेडीपिशी,

राष्ट्र पोरके जाहले ॥ 

महात्माजी गेले तेव्हा

चरख्याची सरे शक्ती,

'सबै झूट' बदे खादी

ओसरली देशभक्ती ॥  

महात्माजी गेले तेव्हा...

महात्माजी गेले तेव्हा ... 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके