डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वैचारिक ग्रंथ पुरस्कार : साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश 
मनोगत । आनंद तेलतुंबडे 

‘साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश’ हा आनंद तेलतुंबडे यांच्या अपींळ खाशिीळरश्रळीा रपव अपहळश्रळरींळेप ेष उरीींशी या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. उपरोक्त दोन्ही संज्ञांसंबंधी जागतिकीकरणाच्या काळात आणि संदर्भात नवे चिंतन प्रकट करतानाच त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूी, त्यात झालेले विविध बदल आणि आजचे वास्तव यांचे अतिशय ससंदर्भ विवेचन त्यांनी केले आहे. साम्राज्यवादासंबंधीची विस्तृत मीमांसा केल्यानंतर लेखक भारतातील ऐतिहासिक वास्तव उलगडून दाखवितो. या ऐतिहासिक वास्तवामध्ये एकोणिसाव्या शतकातील राजकीय आणि सामाजिक वास्तव कोणते होते याचा विस्ताराने आढावा घेतला आहे. भारतात साम्राज्यशाहीचा विरोध करावयाचा असेल तर प्रथमत: जातिव्यवस्था संपवलीच पाहिजे, ती टिकवून साम्राज्यशाही नष्ट होऊ शकणार नाही, हे या ग्रंथाचे मुख्य प्रतिपादन आहे. किंबहुना हे प्रमेय सिद्धांताच्या पातळीवर मांडले गेले आहे.

मला साहजिक प्रश्न विचारले जातात की आता कुठले पुस्तकं लिहायचं ठरवलंय? एरवी मला मान्य आहे की पुस्तक लिहिणं परियोजनेच्या परिभाषेत मोडेल इतके जटिल काम आहे आणि म्हणून ते सुनियोजितपणे लिहिले जाणे जास्त योग्य पण जीवनातील बऱ्याच गोष्टी अनायासे घडून जातात. त्यांच्या प्रतिसादासाठी नियोजन जरी वांछनीय असले तरी ते होण्याची शक्यता ठरत नाही. एखाद्या झोपडपट्टीवर अचानक डिमॉनिशन स्क्वा:डची धाड पडली वा एखाद्या मोर्चावर आकस्मितपणे पोलिस तुटून पडले तर काय होणार? प्रतिसाद तर अटळ आहे, पण त्यात नियोजनाचा अंश असण्याची शक्यता मात्र नगण्य.

माझ्या लिखाणाचा उद्‌भव सुद्धा याच प्रकारचा प्रतिसादात्मक असतो. आपल्या कार्यविश्वातील, घडामोडीमधून एखादा अहं प्रश्न उफाळी मारून वर येतो आणि त्याच्या सैद्धांतिक समाधानाशिवाय पुढची कृती असंयुक्तिक वाटायला लागते, त्यावेळी मी पुस्तक लिहायला लागतो. माझं लिखाण याप्रमाणे माझ्या सक्रियतेचं अविभाज्य अंग असते. माझी अशी ठाम धारणा आहे की विचाराला कृतीचा आधार असल्याशिवाय तो विचार ठरत नाही आणि कृतीला विचारांचं पाठबळ असल्याशिवाय ती कृती ठरत नाही; ते निरर्थक उर्जास्खलन असते. या निष्ठेनुसार माझी पुस्तके माझ्या कृतीशिलतेचा भाग असतात. समकालीन जनसंघर्षांना संभ्रमित करणाऱ्या विचारकृतीविरुद्ध माझ्या संघर्षाचा ते भाग असतात. 

प्रस्तुत पुस्तकाला 2004 मध्ये मुंबईत होऊ घातलेल्या वर्ल्ड सोशल फोरमला खराखुरा साम्राज्यवादविरोधी जनतेचा पर्यायी मंच म्हणून आम्ही आयोजिलेल्या ‘मुंबई रेझिस्टंस, 2004’ (मुंबई प्रतिरोध, 2004) चा गडद संदर्भ आहे. दृष्य रुपाने साम्राज्यवादी जागतिकीकरणाविरुद्ध ‘दुसरं जग शक्य आहे’ या घोषवाक्याने जनप्रतिरोध आकारण्याचा आव आणणाऱ्या या चळवळीबद्दल एव्हाना बरीच माहिती उपलब्ध होती. नवउदारमतवादाने पुरस्कृत केलेल्या एनजीओंच्या (अशासकीय संघटनांच्या) या महोत्सवाला वित्तीय मदतीचे स्त्रोत हे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे, साम्राज्यवाद्यांशी संबंधित असतांना त्याच्या साम्राज्यवादविरोधाविषयी शंका घेण्यात येत होत्या. खरे तर या फोरमची सुरुवात नोव्हेंबर 1999 मध्ये अमेरिकेतील सिएटलला वर्ल्ड ट्रेड आर्गनायझेशनच्या (जागतिक व्यापार संघटना) सेंलनाविरुद्ध उत्स्फूर्तपणे घडलेल्या निषेध व प्रतिरोधात्मक उठावामुळे झालेली स्पष्टपणे पहाता येते.

विविध देशांतून आलेल्या विविध वैचारिकतेच्या पन्नास हजारांवर कार्यकर्त्यांनी केवळ जागतिकीकरणास नकार व्यक्त करण्यासाठी हा उठाव घडवून आणला होता. श्रीमंत अर्थव्यवस्थांच्या हितसंबंधाच्या विवादांनी ग्रस्त हे सेंलन अचानक रस्त्यावर उफाळलेल्या जनक्षोभामुळे पूर्णत: भंग झाले होते. जनतेला त्यातून आकस्मिकपणे जागतिकीकरणाच्या विरोधाचे तंत्र गवसले होते. जवळपास दिड वर्षावर जगभर जागतिकीकरणाला प्रतिरोध करण्यासाठी या तंत्राचा उपयोग झाला. जानेवारी 2000 मध्ये दाओसला झालेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (जागतिक आर्थिक मंच) ची बैठक, एप्रिल 2000 मध्ये वॉशिंग्टनमध्ये आय.एन.एफ वर्ल्ड बँकेची बैठक, सप्टेंबर 2000 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलंबर्नला झालेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक, त्याच महिन्यात आय.एम.एफ - वर्ल्ड बँकेची प्रागमध्ये झालेली बैठक, डिसेंबर 2000 मध्ये नाइस येथे युरोपियन युनियनची बैठक, जानेवारी 2001 मधली दाओसची बैठक, एप्रिल 2001 मध्ये क्युबेकला झालेली अमेरिकेची आर्थिक बैठक, जून 2001 मध्ये गोथेनबर्गला झालेली युरोपियन युनियनची बैठक, जूलै 2001 मध्ये झालेली साल्झबर्ग येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक, त्याच महिन्यात जनोआला झालेली जी-8 ची वर्ल्ड इकॉनॉमिक बैठक - या सर्व बैठकांना या तंत्राची झळ सोसावी लागली. या जनक्षोभाला वळण देण्यासाठी जणू साम्राज्यवादी संस्थांनी ‘वर्ल्ड सोशल फोरम’चा तोडगा काढला होता.

भारतात आश्चर्यकारकपणे ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. प्रकाश करातांनी एनजीओ वर साम्राज्यशाहीचे हस्तक म्हणून टिकास्त्र डागले होते, तो पक्ष इतर एनजीओंच्याबरोबर ‘वर्ल्ड सोशल फोरम’च्या आयोजनात अग्रस्थानी होता. या आयोजन प्रक्रियेत झालेल्या पहिल्या वहिल्या बैठकीतच वर्ल्ड सोशल फोरमच्या उद्दिष्टांवर व तिच्या 
या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतातील बहुतेक भाषांध्ये त्याची भाषांतरे झाली. विदेशातील अनेक विद्यापीठांतून त्यावर चर्चा झाली आणि आशियायी अभ्यासक्रमात त्याला ‘रेफरंस टेक्स्ट’ म्हणून मान्यता मिळाली. पण या पुस्तकात इतके गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत की त्यांचे स्पष्टीकरण कदाचित पुस्तकाच्या मर्यादेत होऊ शकले नाही. त्यातील उणिवांची मला तीव्र जाणीव आहे. बरेच वाचक त्यातील मुद्यांचा त्यांच्या परीने अर्थ घेताना पहातो तेव्हा मला स्वाभाविकत: वाईट वाटते. त्याचे पुनर्लेखन करण्याची भारी आवश्यकता आहे.

ढोंगी साम्राज्यवादविरोधी भूमिकेवर वादळ उठले. दुसरा प्रश्न उठला तो भारतातील क्रांतीकारी संघटनांच्या सहभागासंबंधी वर्ल्ड सोशल फोरमच्या आयोजकांचा त्यांच्या सहभागावर आक्षेप होता. या बैठकीतच आम्ही या फोरममध्ये भाग घ्यायचा नाही याचा निर्णय झाला आणि पुढे जाऊन जनतेसमोर तिचा पर्दाफाश करण्यासाठी पर्यायी मंचाचे आयोजन करण्याचे ठरले. वर्ल्ड सोशल फोरम हे साम्राज्यवादाने पुरस्कारिलेला जनक्षोभाला पोकळ घोषणा व वांझ भाषणबाजीत रुपांतरित करून जनतेच्या ऊर्जा स्खलनासाठी योजिलेले एक कारस्थान आहे, त्यातून जनताप्रवण क्रांतिकारी परिवर्तन येणे अशक्य आहे हे दाखवून आमचा पर्यायी मंच या सर्व उणिवांवर मात करून लोकांसमोर एक ठोस साम्राज्यावादविरोधी क्रांतीकारी कार्यक्रम ठेवील हे त्यात अपेक्षित होते. त्यानुसार ‘मुंबई रेझिस्टंस 2004’ (मुंबई प्रतिरोध 2004) मध्ये जागतिकीकरणामुळे जनतेवर ओढवलेल्या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करून त्याच्या निराकरणासाठी एक कार्यक्रम आणि त्याच्या कार्यान्वयासाठी एक नवे जनसंघटन बनविणे हे त्यामध्ये गृहितक ठरले. मुंबई रेझिस्टंसचे आयोजन अनपेक्षित प्रमाणावर यशस्वी झाले. त्यात 370 वर जनसंघटना आणि बऱ्याच पुरोगामी व्यक्ती जुळल्या होत्या.

आमच्या तुटपुंज्या संसाधनांनी आम्ही गोरेगावला वर्ल्ड सोशल फोरमच्या विरुद्ध बाजूला आपला तळ ठोकला होत आणि देशी-विदेशी माध्यामंना आपल्याकडे आकर्षित केले होते. मात्र, जरी हा कार्यक्रम सुरळितपणे पार पडला असला तरी त्याच्या शेवटी एक ठोस कार्यक्रम आणि त्याला कार्यान्वित करण्यासाठी जनसंघटन तयार करण्याचे जे प्रयोजन होते, ते आनिर्णितच राहिले. मुंबई रेझिस्टंसच्या सांगतेनंतर थातूरमातूरपणे त्याच्या पाठपुराव्याखातर काही प्रश्नांवर बैठका घेण्याचे ठरले. या प्रश्नांध्ये अर्थातच जातीचा प्रश्न हा एक होता. त्यावर मला एक प्रातिनिधिक पेपर लिहायला सांगण्यात आले. त्याच्या भूमिकेबाबतचा सुप्त वाद शमण्याआधीच नागपूरला झालेल्या प्रारंभिक बैठकीत त्याचा स्फोट झाला. तिथे झालेल्या काही जणांनी सनातनी कम्युनिस्टांच्या क्रांतिवादाची दुहाई देत जातीच्या प्रश्नाला दुय्यम मानून त्याची अवहेलना केली. अर्थातच आलेल्या दलित प्रतिनिधीनी बैठकीतून वॉक आऊट केले.

मला या घटनेचा खूप मनस्ताप झाला. क्रांतीच्या बाता करणाऱ्या लोकांना या देशातील वैगुण्याची अजूनही जाणिव होत नाही; आपल्या दयनीय स्थितीकडे पाहून आपले काही तरी चुकले असावे याची शंका वाटत नाही, याचे आश्चर्य वाटले. या देशातील अनन्य असे जात-वर्ग हे द्वंद्व (र्ऊीरश्रळीूं) हे कम्युनिस्टांच्या ब्राह्मणी प्रवृत्तीमुळे निर्माण झाले आणि ते त्यांच्यात हेकटपणामुळे अजूनही जिवंत आहे, हे एक कटू ऐतिहासिक सत्य आहे. वर्गसंघर्षासाठी वर्गविश्लेषण हे विद्यमान ठोस परिस्थितीत करायचे असते. जाती जर भारतीय समाजाच्या व्यापक अंग असतील, तर वर्ग विश्लेषण त्यांना वेगळे ठेवून होऊच शकले नसते. पुढे जाऊन कम्युनिस्टांनी कॉमिनटर्नच्या आदेशावरुन साम्राज्यवादाचे बुजगावणे पुढे आणले आणि मुळ मार्क्सच्या मांडणीतील वर्गसंघर्षालाच बगल दिली. आज मार्क्सवादांच्या वर्तुळात वर्गसंघर्षाची भाषा अपरिचित झाल्याची वाटते. मार्क्सवाद हे प्रवाही विज्ञान आहे, त्यात कालपरत्वे बदल अपेक्षित आहेत, हे तत्व कम्युनिस्टांच्या आचरणात मात्र कधीच प्रतिबिंबित होत नाही. मार्क्स वा लेनिनच्या सिद्धांतानंतर जगात आलेल्या प्रचंड गुणात्मक बदलांविषयी ते कमालीचे अनभिज्ञ असतात. त्यांचा स्वभाविक कल एखाद्या कट्टर धर्मउपासकांसारखा आपल्या पंथात चिरकालीन सत्य दिलेलं आहे, असं मानणारा बसतो. या सर्व वैगुण्यामुळेच भारतासारख्या सर्वहारा बहुल देशात त्यांना ही अवकळा आली हे त्यांना अजूनही उमजत नाही.

या विचारांच्या पार्श्वभूीवर प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण झाले आहे. जातीचा प्रश्न या देशातील अहं प्रश्न आहे; तो भारतीय उपखंडातील समाजाच्या साम्राज्यवादी संरचनेचाच भाग आहे. या ठोस अंतर्विरोधाचा विचार न करता एखाद्या अमूर्त साम्राज्यवादाला आपले लक्ष्य बनविणे कसे मुर्खपणाचे आहे; हे त्यात दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. या पुस्तकातून तथाकथित क्रांतिकाऱ्यापुढे असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्याचवेळी जाती अंताचा कार्यक्रम जैविक रित्या क्रांतिकार्याशी कसा अनन्यपणे जोडता येईल, याचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे. या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचे भारतातील बहुतेक भाषांध्ये भाषांतरे झाली. विदेशातील अनेक विद्यापीठांतून त्यावर चर्चा झाली आणि आशियायी अभ्यासक्रमात त्याला ‘रेफरंस टेक्स्ट’ म्हणून मान्यता मिळाली. जवळपास सर्वच मान्यवर नियतकालीकांतून, प्रमुख वृत्तपत्रांतून त्याची परीक्षणे प्रकाशित झाली. त्यातील जवळपास सर्वांनीच त्याबाबत प्रशंसापर उद्‌गार काढले. पण या पुस्तकात इतके गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत की त्यांचे स्पष्टीकरण कदाचित पुस्तकाच्या मर्यादेत होऊ शकले नाही. त्यातील उणिवांची मला तीव्र जाणीव आहे. बरेच वाचक त्यातील मुद्यांचा त्यांच्या परीने अर्थ घेताना पहातो तेव्हा मला स्वाभाविकत: वाईट वाटते. त्याचे पुनर्लेखन करण्याची भारी आवश्यकता आहे. 

Tags: महाराष्ट्रा फौंडेशन पुरस्कार वैचारिक ग्रंथ पुरस्कार आनंद तेलतुंबडे साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके