डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकदा एका आठअंकी संख्येचा दुसऱ्या आठअंकी संख्येशी गुणाकार करून दाखवत असताना हसतमुख, चुणचुणीत शकुंतलादेवी पाच पुरुषांच्या पॅनेलसमोर म्हणाल्या की- तुम्हाला उत्तर डावीकडून उजवीकडे सांगू, का उजवीकडून डावीकडे? त्यांच्यातील कुशाग्रता, विनोदबुद्धी, प्रसंगावधान यामुळे आश्चर्यचकित झालेले पॅनल आणि प्रेक्षक यांचे सहज बदललेले भाव पाहणं अतिशय रंजक आहे. शकुंतलादेवींचा मृत्यू 2013 मध्ये गुंतागुंतीच्या विविध आजारांनी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जन्मदिवशी गुगलने त्यांच्या सन्मानार्थ डुडल प्रसिद्ध केले. प्रो.जेन्सननी म्हटल्याप्रमाणे या चार्मिंग लेडीच्या आयुष्यावरील चित्रपटाने त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या निमित्ताने एकंदर गणिताबद्दल पुन्हा नव्याने उत्तेजन निर्माण होईल, असे वाटते. 

श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्माची 125 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 22 डिसेंबर 2012 पासून हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच, 2012 हे वर्षदेखील गणित वर्ष म्हणून साजरे केले गेले. ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ (The man who knew infinity) हा रामानुजन यांच्या आयुष्यावर आधारित हॉलीवुडपटदेखील आला, ‘रामानुजन’ याच नावानं तमिळ भाषेतही सिनेमा आला. गणितज्ञ, शास्त्रज्ञ यांच्याभोवती असणाऱ्या विद्धत्तेच्या वलयाचे आकर्षण समाजाला कायमच वाटत असते. त्यामागे मुख्यतः गणित विषय अत्यंत किचकट- आव्हानात्मक असणे, ही जी त्या विषयाबद्दलची प्रतिमा आहे, हे मुख्य कारण आहे; त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींसाठी गणितज्ञ लोकांचं जीवन हे अनोळखी, असामान्य आणि म्हणून कुतूहल असणारं आहे. 

अलीकडेच विद्या बालन मुख्य भूमिकेत असणारा शकुंतलादेवी- (ह्युमन कॉम्प्युटर) नावाचा सिनेमा येऊ घातला आहे, त्याचा टीझर सगळीकडे गाजत आहे. 60-70 च्या दशकाला शोभेल अशा पेस्टल रंगाच्या साडीत, केसांचा बॉबकट आणि आत्मविश्वासाने हसत सामोरी जाणारी विद्या बालन या जाहिरातीतून शकुंतलादेवी म्हणून लक्ष वेधते आहे. अशा पेहरावातल्या, अशा काळातली स्त्री गणितासारख्या विषयाशी जोडलेली आहे, हे पाहताना अचंबाही वाटतो आणि आनंदही. या वर्षीचा राष्ट्रीय गणित दिवस, शकुंतलादेवींवर येणारा सिनेमा या सगळ्या निमित्ताने शकुंतलादेवी आणि एकंदरीतच स्त्रियांचे गणिताशी असलेले नाते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. 

शकुंतलादेवीचा जन्म 1929 मध्ये कर्नाटकातल्या ब्राह्मण कुटुंबात झाला. ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवींच्या अंकगणिताच्या अफाट कौशल्याचा समावेश 1982 मध्ये जागतिक गिनीज रेकॉर्डध्ये करण्यात आला. यामधला 50 वर्षांचा काळ आणि त्यामध्ये घडलेले शकुंतलादेवींचे आयुष्य रंजक व जाणून घेण्यासारखे आहे. त्यांच्या वडिलांनी स्वतः पौरोहित्य करण्याचे नाकारले आणि तेव्हाच्या समाजाला अजब वाटेल अशी सर्कशीतील नोकरी पत्करली. सर्कशीत कसरतपटू म्हणून काम करत असतानाच आपल्या तीन वर्षांच्या मुलीला पत्त्यांची युक्ती शिकवत असताना आपली मुलगी विलक्षण प्रतिभा असणारी आहे, हे त्यांच्या लक्षात आले. आश्चर्यकारक पद्धतीने संख्या लक्षात ठेवण्याची तिची क्षमता त्यांच्या लक्षात आली. पाच वर्षांची होईपर्यंत या छोट्या मुलीला अनेक संख्यांचे घनमूळ काढता येत होते. साधारण याच वेळेस म्हैसूर विद्यापीठातील गणिताच्या अध्यापकांना तिने चकित करून सोडले आणि हे सर्व कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना! 

साधारण दहा वर्षांची असताना कॉन्व्हेंट शाळेत घातलेल्या शकुंतलाला तीनच महिन्यांत शाळेतून काढून टाकण्यात आले. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने शाळेची फीसुद्धा भरणे तेव्हा शक्य झाले नाही. वडिलांनी यादरम्यान सर्कस सोडली आणि आपल्या मुलीच्या अंकगणिताच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारे रोड शो करायला सुरुवात केली. बेंगळुरुमधल्या निम्न आर्थिक स्तरातल्या वस्तीत-कुटुंबात शकुंतलाकडे असणारे संख्यांच्या मैत्रीचे बळ फुलत गेले. 1944-45 च्या सुारास या प्रतिभावान मुलीला घेऊन वडिलांनी इंग्लंडची वाट धरली. पुढची अनेक वर्षे संपूर्ण युरोपभर त्यांनी दौरा केला. क्लिष्ट गुणाकार, भागाकार, संख्यांची मूळ शोधण अशा करामती काही सेकंदांत करून दाखवत, हळूहळू त्या सगळे जग फिरल्या. त्यांनी 1976 मध्ये न्यूयॉर्क शहरात स्वतःचे कौशल्य सादर केले. 1977 मध्ये सदर्न मेथाडिस्ट विद्यापीठातल्या सादरीकरणात 201 आकडी संख्येचे 23 वे मूळ 50 सेकंदांत काढून दाखवून त्यांनी सगळ्या उपस्थितांना चकित करून सोडले. 546,372,891 हे ते उत्तर तेव्हाच्या UNIVAC 1101 संगणक प्रणालीने बरोबर असल्याचा दुजोरा दिला. असे गणितीय प्रश्न सोडवण्यासाठी किचकट असे प्रोग्राम विशेषकरून लिहावे लागत असत. तर 1980 मध्ये इंपीरियल कॉलेज, लंडन इथे यादृच्छिकपणे (randomly) निवडलेल्या दोन 13 अंकी संख्यांचा गुणाकार त्यांनी काही सेकंदांत करून अनेकांना चकित केले. 

तल्लख बुद्धिमत्ता, गणिते सोडवण्याचा अचाट वेग, उपजत असलेली विनोदबुद्धी या साऱ्यांनी अंकगणिताच्या बाबतीत तर त्यांनी जगभरात मान्यता मिळवलीच; तसेच व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे सहज आकर्षित व्हावे, अशी त्यांची छबी तयार झाली. कॅलिफोर्नियाश्रीनिवास रामानुजन यांच्या जन्माची 125 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 22 डिसेंबर 2012 पासून हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच, 2012 हे वर्षदेखील गणित वर्ष म्हणून साजरे केले गेले. ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ (The man who knew infinity) हा रामानुजन यांच्या आयुष्यावर आधारित हॉलीवुडपटदेखील आला, ‘रामानुजन’ याच नावानं तमिळ भाषेतही सिनेमा आला. गणितज्ञ, शास्त्रज्ञ यांच्याभोवती असणाऱ्या विद्धत्तेच्या वलयाचे आकर्षण समाजाला कायमच वाटत असते. त्यामागे मुख्यतः गणित विषय अत्यंत किचकट- आव्हानात्मक असणे, ही जी त्या विषयाबद्दलची प्रतिमा आहे, हे मुख्य कारण आहे; त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींसाठी गणितज्ञ लोकांचं जीवन हे अनोळखी, असामान्य आणि म्हणून कुतूहल असणारं आहे. 

अलीकडेच विद्या बालन मुख्य भूमिकेत असणारा शकुंतलादेवी- (ह्युमन कॉम्प्युटर) नावाचा सिनेमा येऊ घातला आहे, त्याचा टीझर सगळीकडे गाजत आहे. 60-70 च्या दशकाला शोभेल अशा पेस्टल रंगाच्या साडीत, केसांचा बॉबकट आणि आत्मविश्वासाने हसत सामोरी जाणारी विद्या बालन या जाहिरातीतून शकुंतलादेवी म्हणून लक्ष वेधते आहे. अशा पेहरावातल्या, अशा काळातली स्त्री गणितासारख्या विषयाशी जोडलेली आहे, हे पाहताना अचंबाही वाटतो आणि आनंदही. या वर्षीचा राष्ट्रीय गणित दिवस, शकुंतलादेवींवर येणारा सिनेमा या सगळ्या निमित्ताने शकुंतलादेवी आणि एकंदरीतच स्त्रियांचे गणिताशी असलेले नाते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. 

शकुंतलादेवीचा जन्म 1929 मध्ये कर्नाटकातल्या ब्राह्मण कुटुंबात झाला. ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवींच्या अंकगणिताच्या अफाट कौशल्याचा समावेश 1982 मध्ये जागतिक गिनीज रेकॉर्डध्ये करण्यात आला. यामधला 50 वर्षांचा काळ आणि त्यामध्ये घडलेले शकुंतलादेवींचे आयुष्य रंजक व जाणून घेण्यासारखे आहे. त्यांच्या वडिलांनी स्वतः पौरोहित्य करण्याचे नाकारले आणि तेव्हाच्या समाजाला अजब वाटेल अशी सर्कशीतील नोकरी पत्करली. सर्कशीत कसरतपटू म्हणून काम करत असतानाच आपल्या तीन वर्षांच्या मुलीला पत्त्यांची युक्ती शिकवत असताना आपली मुलगी विलक्षण प्रतिभा असणारी आहे, हे त्यांच्या लक्षात आले. आश्चर्यकारक पद्धतीने संख्या लक्षात ठेवण्याची तिची क्षमता त्यांच्या लक्षात आली. पाच वर्षांची होईपर्यंत या छोट्या मुलीला अनेक संख्यांचे घनमूळ काढता येत होते. साधारण याच वेळेस म्हैसूर विद्यापीठातील गणिताच्या अध्यापकांना तिने चकित करून सोडले आणि हे सर्व कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना! 

साधारण दहा वर्षांची असताना कॉन्व्हेंट शाळेत घातलेल्या शकुंतलाला तीनच महिन्यांत शाळेतून काढून टाकण्यात आले. घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने शाळेची फीसुद्धा भरणे तेव्हा शक्य झाले नाही. वडिलांनी यादरम्यान सर्कस सोडली आणि आपल्या मुलीच्या अंकगणिताच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारे रोड शो करायला सुरुवात केली. बेंगळुरुमधल्या निम्न आर्थिक स्तरातल्या वस्तीत-कुटुंबात शकुंतलाकडे असणारे संख्यांच्या मैत्रीचे बळ फुलत गेले. 1944-45 च्या सुमारास या प्रतिभावान मुलीला घेऊन वडिलांनी इंग्लंडची वाट धरली. पुढची अनेक वर्षे संपूर्ण युरोपभर त्यांनी दौरा केला. क्लिष्ट गुणाकार, भागाकार, संख्यांची मूळ शोधण अशा करामती काही सेकंदांत करून दाखवत, हळूहळू त्या सगळे जग फिरल्या. त्यांनी 1976 मध्ये न्यूयॉर्क शहरात स्वतःचे कौशल्य सादर केले. 1977 मध्ये सदर्न मेथाडिस्ट विद्यापीठातल्या सादरीकरणात 201 आकडी संख्येचे 23 वे मूळ 50 सेकंदांत काढून दाखवून त्यांनी सगळ्या उपस्थितांना चकित करून सोडले. 546,372,891 हे ते उत्तर तेव्हाच्या UNIVAC 1101 संगणक प्रणालीने बरोबर असल्याचा दुजोरा दिला. असे गणितीय प्रश्न सोडवण्यासाठी किचकट असे प्रोग्राम विशेषकरून लिहावे लागत असत. तर 1980 मध्ये इंपीरियल कॉलेज, लंडन इथे यादृच्छिकपणे (randomly) निवडलेल्या दोन 13 अंकी संख्यांचा गुणाकार त्यांनी काही सेकंदांत करून अनेकांना चकित केले. 

तल्लख बुद्धिमत्ता, गणिते सोडवण्याचा अचाट वेग, उपजत असलेली विनोदबुद्धी या साऱ्यांनी अंकगणिताच्या बाबतीत तर त्यांनी जगभरात मान्यता मिळवलीच; तसेच व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे सहज आकर्षित व्हावे, अशी त्यांची छबी तयार झाली. कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातील आर्थर जेन्सन या मानसशास्त्राच्या प्रोफेसरांनी 1988 मध्ये शकुंतलादेवीच्या या कौशल्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. विविध ज्ञानात्मक, आकलनात्मक पातळ्यांवरील प्रश्न त्यांना सोडवण्यासाठी देण्यात आले. 61,629,875 या संख्येचे घनमूळ आणि 170,859,375 या संख्येचे सातवे मूळ काढण्याचे प्रश्न त्यांना दिले गेले. तेव्हाची नोंद म्हणून प्रो.जेन्सन लिहितात की, ‘‘मी प्रश्न वहीत उतरवून घ्यायचेही पूर्ण झाले नव्हते, त्याआधीच 395 आणि 15 ही दोन्ही उत्तरे शकुंतलादेवींनी देऊन टाकली होती. एकीकडे काही सोप्या चाचण्यांध्ये शकुंतलादेवींची कामगिरी सर्वसाधारण आढळून येत होती, तर गणितीय आणि अंकगणितीय चाचण्यांमध्ये त्या नवे विक्रम प्रस्थापित करत होत्या. 

प्राथमिक माहितीवर प्रक्रिया करण्याच्या मेंदूच्या क्षमतेवर, मेंदूच्या दीर्घकाळच्या स्मरणशक्तीबरोबरच्या संबंधांबद्दल या साऱ्या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला. (Intelligence)) या नियतकालिकातून 1990 मध्ये ही मांडणी व निष्कर्ष जेन्सन यांनी मांडले, अभ्यासपूर्ण मांडणीत ते इतरही काही निरीक्षणे मांडतात ते म्हणतात- ‘‘गणितज्ञ, संख्यांच्या विश्वात रमलेल्या व्यक्तींची जी प्रतिमा मुख्य प्रवाहातले सिनेमे, चरित्र यांधून पुढे येते ती व्यक्ती स्वतःच्या कोशात रमलेल्या, गणित विषय सोडून इतर कशाचेही फारसे सोयरसुतक नसणाऱ्या, काहीशा तुसड्या स्वभावाची असते- असे आपल्या मनावर ठसलेले असते. शकुंतलादेवी मात्र मनमोकळ्या बोलणाऱ्या, वावरण्यात सहजता असणाऱ्या आणि भाषेवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या होत्या. इतर अनेक भाषांबरोबरच त्यांची इंग्रजीची जाण नोंद घेण्यासारखी आहे.’’ 

अगदी लहान वयापासून व्यासपीठांवरून कलाकार म्हणून स्वतःचे गणिती कौशल्य प्रस्थापित करणाऱ्या शकुंतलादेवी आत्मविश्वास असणाऱ्या, स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण अंदाज असणाऱ्या, संभाषणात समोरच्याने सहज गुंतून जावे अशा प्रकारे ठामपणे स्वतःला सादर करत होत्या, असेही जेन्सन नोंदवतात. ते म्हणतात, “To all appearances, the prodigious numerical talent resides in a perfectly normal and charming lady." त्यांच्या शोधनिबंधाच्या शेवटाकडे ते म्हणतात की, अशा प्रकारच्या अचंबित करणाऱ्या कौशल्यसंचामागे ‘जन्मजात’ हुशारी किंवा अतुलनीय एकाग्रता ही कारणे आहेत, असे आपण मान्य करायचे  ठरवले, तरी शकुंतलादेवींच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या प्रेरणेचे मूळ अमान्य करता येत नाही. इतक्या लहान वयापासून त्या संख्यांच्या किचकटपणाशी हातमिळवणी करण्याची सहजता का जोपासत आल्या? कुठल्याही चाचण्यांमधला त्यांचा उजवेपणाबरोबरच स्वयंप्रेरणेचा उजवेपणा खरा वाखाणण्यासारखा आहे; त्याची आपण नोंद घेतली पाहिजे, असं जेन्सन म्हणतात. 

तीन-चार वर्षांच्या असल्यापासून या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि स्वयंप्रेरणेच्या बळावर व्यासपीठ जिंकणाऱ्या शकुंतलादेवी 14-15 वर्षांच्या वयातच स्वतःचा सांभाळ स्वतः करत होत्या. जगभर सफर करून पैसा मिळवत होत्या. असे खरोखरी आश्चर्य वाटायला लावणारे, त्या काळच्या भारतीय समाजाच्या जडणघडणीशी विसंगत असे व्यावसायिक यश स्त्री म्हणून मिळवलेल्या शकुंतलादेवींचे व्यक्तिगत आयुष्यही नोंद घेण्यासारखे आहे. साठच्या दशकात (नेमकी नोंद नाही) परितोष बॅनर्जी या बंगाली आयएएस अधिकाऱ्याशी त्यांचे लग्न झाले. काही काळाने त्यांना मुलगी झाली. मात्र 1979 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बॅनर्जी स्वतः समलैंगिक होते. हे लग्न जरी टिकले नाही तरी याकडे घृणेने, नकाराने न पाहता शकुंतलादेवींनी The world of homosexuals या नावाचे पुस्तक लिहिले. भारतातील समलैंगिक पुरुषांच्या मुलाखती आणि कॅनडातल्या समलिंगी जोडप्यांशी केलेल्या चर्चेतून हे पुस्तक आकारास आले. “For straights only” (2001) या माहितीपटामध्ये शकुंतलादेवींनी यावरील आपले भाष्य प्रथमच व्यक्त केले. हा विषय समजून घेण्याबद्दलच्या प्रेरणा आणि त्यामागील कष्ट याबद्दल त्या बोलतात. त्या म्हणतात की, हे पुस्तक लिहिण्यासाठीची माझी एकमेव पात्रता म्हणजे मी स्वतः मनुष्यमात्र आहे. 

या सगळ्यांव्यतिरिक्तही इतर अनेक कारणांसाठी त्या चर्चेत राहिल्या. दक्षिण मुंबई आणि आंध्र प्रदेश (आता तेलंगणा)मधील मेडकमधून 1980 मध्ये इंदिरा गांधीविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवणे असो अथवा ज्योतिष विषयात त्यांनी दाखवलेला रस असो, स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात त्या सक्रियपणे प्रसंग हाताळत आणि निर्णय घेत राहिल्या. समलैंगिकतेवरील पुस्तकाबरोबरच गणितातल्या गमती- जमती, कोडी तसेच लहान मुलांना गणितात रसनिर्माण व्हावा, गणित त्यांच्यासाठी सोपे व्हावे याकरितादेखील त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. प्रत्येक बालकामधील गणिताप्रति असलेली उत्सुकता जागृत व्हावी, टिकवली जावी हा त्यामागील हेतू होता. त्या म्हणत, ‘‘संख्या म्हणजे नुसती कागदावरील चिन्हे नव्हेत, त्यांना स्वतःचे प्राण असतात.’’ त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, मी माझ्या क्षमता दुसऱ्या कुणा व्यक्तीमध्ये टाकू शकत नाही, मात्र इतरांची अंकगणितीय आणि गणिती क्षमता विकसित करण्याचे मार्ग मोकळे करून देऊ शकते. 

या बाबतीत मात्र आजही काळजीपूर्वक विचार व्हायला हवा. गणिताची इतकी जबर भीती शाळांच्या अभ्यासक्रमांनी का घालून दिली आहे? मुलींचे-स्त्रियांचे गणिताकडे करिअर म्हणून पाहण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प का? फिल्डमेडल (गणिताचे नोबेल) मिळवू शकणारी इराणची मरियम मिर्झाखनी जगभरात एकटीच का? या सर्व स्त्रिया आजच्या घडीला भारतीय गणितज्ञ म्हणून ओळखल्या जातात, त्यातील 90 टक्क्यांहून अधिक जणी पदवी किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेऊन भारताबाहेरच करिअर घडवत असतात, असे का? 

यावर उहापोह करताना 2005 च्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याच्या (National curriculum framework - 2005) गणिताच्या शिक्षणासंबंधीच्या लेखात अनेक बाजूंवर प्रकाश टाकला आहे. मुलगे हे गणितामध्ये मुळातूनच अधिक प्रवीण असतात, या गैरसमजाचे अनेक तोटे व्यवहारात दिसून दिसून येतात. एकीकडे वर्षानुवर्षे शाब्दिक गणितांमध्ये हिशोब चुकणाऱ्या स्त्रिया येत राहतात, तर दुसरीकडे ‘मुलींना काय किचकट गणित समजणार?’ या भ्रमात असलेले अनेक शिक्षक वर्गात गणित शिकवत असताना मुलींना उद्देशून बोलतही नाहीत, गणिताच्या तासाला मुलींची अनेकदा दखलही घेतली जात नाही, असे विविध अभ्यासांधून समोर आले आहे. गणिताचा खरा विद्यार्थी कायम मुलगा वा पुरुष असतो, हे पुन:पुन्हा अनेकांच्या मनात छोट्या-छोट्या कृती, संभाषणांतून ठसवले जाते. या सगळ्यातून गणिताबद्दल मुली निराश न होतील, तरच नवल वाटायला हवे. अर्थात, अलीकडच्या काळात गणिताची पाठ्यपुस्तके (NCERT आणि राज्य शासनाचीही) नव्या धाटणीची जास्त विद्यार्थीभिमुख करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गणिताचा बागुलबुवा अनेक मुला-मुलींच्या मनात आजही घर करून आहे. ‘तो का?’ या प्रश्नाचे उत्तर आणखी खोलवर जाऊन शोधायला हवे. 

एकदा एका आठ अंकी संख्येचा दुसऱ्या आठअंकी संख्येशी गुणाकार करून दाखवत असताना हसतमुख, चुणचुणीत शकुंतलादेवी पाच पुरुषांच्या पॅनेलसमोर म्हणाल्या की, तुम्हाला उत्तर डावीकडून उजवीकडे सांगू, का उजवीकडून डावीकडे? त्यांच्यातील कुशाग्रता, विनोदबुद्धी, प्रसंगावधान यामुळे आश्चर्यचकित झालेले पॅनल आणि प्रेक्षक यांचे सहज बदललेले भाव पाहणे अतिशय रंजक आहे. शकुंतलादेवींचा मृत्यू 2013 मध्ये गुंतागुंतीच्या विविध आजारांनी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जन्मदिवशी गुगलने त्यांच्या सन्मानार्थ डुडल प्रसिद्ध केले. प्रो.जेन्सननी म्हटल्याप्रमाणे या चार्मिंग लेडीच्या आयुष्यावरील चित्रपटाने त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या निमित्ताने एकंदर गणिताबद्दल पुन्हा नव्याने उत्तेजन निर्माण होईल, असे वाटते. 

Tags: मरियम मिर्झाखनी. फिल्डमेडल इंदिरा गांधी परितोष बॅनर्जी आर्थर जेन्सन बर्कले कॅलिफोर्निया इंपीरियल कॉलेज सदर्न मेथाडिस्ट विद्यापीठ न्यूयॉर्क युरोप इंग्लंड म्हैसूर कर्नाटक शकुंतलादेवी- ह्युमन कॉम्प्युटर विद्या बालन द मॅन हू न्यू इन्फिनिटी राष्ट्रीय गणित दिवस श्रीनिवास रामानुजन अपर्णा दीक्षित गणितज्ञ शकुंतलादेवी गणितदिन विशेष UNIVAC 1101 Intelligence For straights only The world of homosexuals maryam mirzakhani Paritosh Banerjee Field Medal Indira Gandhi arthur jensen Imperial College southern methodist university Vidya Balan Human Computer Aparna Dixit Shakuntaladevi The man who knew infinity Shrinivas Ramanujan Mathematics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके