आपण जेवढे करू अशी नेल्सनची समजूत होती, त्यापेक्षा तो बरेच काही करू शकतो याची पुन्हा एकदा प्रचीती त्यालाच आली होती. 'तुझ अडविणारी एकच गोष्ट आहे!' नेल्सनला ते म्हणाले, 'ती म्हणजे तुझे डोके आणि जर तू त्या डोक्यातच एखादी गोष्ट घेतलीस, तर तुला काहीही अशक्य नाही.
पोहण्याचे कोच, जलतरणपटू ख्रिस मार्टिन हे एक भयंकरच प्रकरण होते. त्यांची पद्धत : 'आता कामच होणार नाही, अशी मरणाची अवस्था येईतो धुणे बडवल्यासारखे रोज काम केले पाहिजे आणि सपशेल आडव्या झालेल्या शरीरात पुन्हा धुगधुगी येताच उठून कामाला भिडले पाहिजे! मरणाची ढोर मेहनत केलीत, तरच दिवे लावाल, ध्यानात ठेवा पोट्ट्यानो." खण्णकन ठेवून द्यावी तसे त्यांनी भरती करायला आणलेल्या त्या पोराकडे पाहिले आणि गचांडी धरणाऱ्याकडे मांजराने बघावे तसा नेल्सन डायवेल त्यांच्याकडे पाहू लागला. नेल्सन फार व्रात्य, खोडया काढणारा मुलगा होता. त्याची पीडा घरात नको म्हणून आईवडिलांनी त्याला शाळेत अडकवला आणि काही दिवसांतच, त्याला शाळेतून हाकलावे यासाठी शिक्षकांनी एकमुखाने संप पुकारला. दर चार महिन्यांत शाळा बदलत, मोठ्या मिनतवारीने बाळ नेल्सन सात आठ स्टैंडर्डसपर्यंत पोचला. त्याच्या आई-वडिलांनी त्या सुमारास घटस्फोट घेतला होता. आता मुलगा बेगुमान पिऊ लगा. मॉज्यूनाचे दम मारू लागला, अनंत खटपटींनंतर एका बोर्डिंग स्कूलने त्याला प्रवेश दिला.
न्यू जर्सीमधील पेडी स्कूलला या पोरात काहीतरी दिसले. प्रत्येक विद्यार्नेथ्या अँथलेटिक्समध्ये आणि अभ्यासक्रमाबाहेरील एका विषयात भाग घेतलाच पाहिजे अशी शाळेची अट होती. या विद्यार्थ्याला बाहेरच्या भानगडीतच गोडी होती, त्यामुळे जुळले. अर्जावर त्याने पोहणे असा विषय लिहिला आणि ख्रिस मार्टिन या शिक्षकाशी त्याची गाठ पडली. 'पेडी स्कूल’ च्या संचालकांनी, नेल्सनबद्दल मार्टिन ख्रिसना शिफारस केली : त्याच्यात काही चमक दिसते. तुम्ही त्याला पत्करणार असाल, तर आम्ही प्रवेश देऊ! 'पहिली गोष्ट तू लक्षात घ्यायची आहेस ती ही : मार्टिननी नेल्सनला सांगितले, 'मी फार छळवादी, राबायला लावणारा मास्तर आहे.' मग त्याला दिनक्रम सांगून शेवटी बजावले, "तू जर माझ्याकडे राहणार असलास तर मी सांगतो तेच, मी सांगेन तेव्हा, मी सांगेन तसेच तुला वागावे लागेल.
रेघभर इकडेतिकडे चालणार नाही, हे लक्षात ठेव!' काय असेल ते असो, सरांच्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या प्रभावात नेल्सन सापडला आणि त्याने सरावास येण्याचे कबूल केले. पोहण्याची तशी गोडी त्याला कधीच नव्हती. जाऊ दोन आठवडे आणि देऊ सोडून - म्हणून तो यायला तर लागला. परंतु कोर्स सोडून बाहेर पडण्याचे मार्टिनपाशी तो बोलला मात्र, त्याच्या अंगावर धावून जात त्यांनी नेल्सनला बजावले, 'मी ठारच मारीन तुला. लक्षात ठेव : तुझ्यातून मला ऑलिंपिक चैंपियन घडवायचा आहे. सोडीत नाही तुला त्याशिवाय.' सरांच्या पंजातून कॉलर सोडवून घेत निमूटपणे नेल्सन सुतासारखा सरळ आला आणि रोज सरावाला लागला.
एक दिवस त्याने तलवार एक बढाई मारली. 90 मीटर्सचे अंतर ब्रेस्ट स्ट्रोकने पार करण्याचे शाळेचे रेकॉर्ड 58.5 सेकंदांचे होते. त्यात काय एवढे? आपण ते केव्हाच तोडून टाकू : नेल्सनने नाकाला जीभ लावली (नुकतीच त्याने यासाठी 1 पूर्ण मिनिट, 8 सेकंद लावल्याची नोंद झाली होती.) प्रत्येकजण हसू लागला आणि नेल्सन खवळला. हसले नाहीत, एकटे कोच मार्टिन ख्रिस. पुढे अनेक आठवडे ते लोकांच्या हसण्याची त्याला वारंवार आठवण करून देत राहिले आणि त्याचबरोबर हलकेच सांगत राहिले, 'परंतु वाटेल ते शक्य असते पठ्ठया : तू शड्डू ठोकून त्याच्या मागेच लागलास, तर!" नेल्सनला मग उठता बसता, जागेपणात, झोपेत, 58.5 हा आकडा तेवढा दिसू लागला होता. कुठेतरी वाजवायची' खुन्नस त्याच्या डोक्यात भिनली होती.
दोन महिन्यांत नेल्सन 1:05 पर्यंत आला आणि त्यानंतर 1:04.6 वर. इथून मात्र काही केल्या त्याला वेळ कमी करता येईना. किती जीव तोडला, तरी 1 मिनिट आणि 4.6 सेकंद हा वेळ 90 मीटर्ससाठी त्याला लागतच राहिला. एक दिवस यापुढे एकही स्ट्रोक मारता येणार नाही इतका सराव केल्यावर नेल्सन धापा टाकीत पडून राहिला, तेव्हा त्याने घडयाळाकडे नजर टाकली : 1 मिनिट, 03 सेकंद. दीड सेकंद कमी करण्यात तो यशस्वी झाला होता! आता वाढत्या उत्साहाने तो आठवड्यात 40 तास पोहू लागला. कोच मार्टिन ख्रिस त्याला म्हणत, 'तू राष्ट्रीय लढतीपर्यंत पोचणारच नाहीस कारण चैम्पियन होण्यासाठी तू शिकतच नाहीस. नेल्सन केवळ दात आवळून घेई. दुसऱ्या दिवशी अधिक जोमाने हात चालवी. आणखी दोन आठवडे.
अखेर त्याने लागणारा वेळ 1 मिनिटावर आणण्यात यश मिळविले एप्रिलमध्ये ज्युनियर नॅशनल स्पर्धेत त्याने पहिल्या उत्साहासरशी 59 सेकंदांत ते अंतर तोडले. तो पाचव्या क्रमांकाचा विजेता ठरला, तेव्हा आपल्याला काहीतरी जमले, असे त्याला वाटू लागले. मार्टिन ख्रिसनी त्याची वाखाणणी केली आणि तो अधिक प्रगती करू शकतो याची आठवणही दिली. ‘पेडी स्कूल मध्ये आठवड्यात रोज 2 तास स्वस्थ, शांत बसण्याचा अभ्यास- कार्यक्रम असे. नेल्सनला ते कधीच साधेना. त्याची प्रवृत्ती अतिशय बंडखोर, चंचल होती. एक दिवस मार्टिननी त्याच्या खोलीत प्रवेश केला. दहा डॉलर्सची एक नोट डेस्कवर ठेवली. नेल्सनला सूचना केली, "तिथे 15 मिनिटे शांत बैस आणि मग ती नोट उचल, नाहीपेक्षा तुला दहा डॉलर्स मला द्यावे लागतील.
दारात खुर्चीवर मार्टिन वाचीत बसून राहिले. चळवळ्या नेल्सनला सेकंदे युगांसारखी वाटू लागली. ते दहा डॉलर्स मिळविण्याऐवजी अनेक दिवस त्याला दहा डॉलर्स गमवावे लागले. पुढे सरावात परिपक्वता येत गेली तसेच त्याला एका जागी स्थिर बसणे साधू लागले. अभ्यासाची बैठक जमत गेली. भीती होती कठोर मार्टिन ख्रिसची, त्या वर्षी 100 आणि 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये नेल्सन जिंकला. ऑलिंपिकसाठी तो पात्र ठरला. आता मात्र त्याला नक्की वाटू लागले - आपण विश्वविजेता होऊ शकतो. - तसे मलाच वाटले, तर! आता त्याला बार्सिलोना, स्पेन येथे व्हावयाच्या ऑलिंपिक्सशिवाय काहीही सुचेना. तो इतका उत्तेजित झाला की आता तर त्याला एका जागी बसणेच अशक्य होऊ लगले.
पोहण्याचा तलाव हेच त्याचे जग झाले होते. फावल्या वेळात 'जीवरक्षका’ ची ड्युटी तो करी. विश्रांतीच्या वेळीही तो पाण्यात उडी येऊन पडून राहणेच पसंत करायचा! एका दुपारी त्याने अशीच झेप घेतली आणि त्याचा पाय घसरका. त्याने हातांनी आधार घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रेलिंगवर आपटून तो सरळ पाण्यात कोसळला, आणखी दोन विद्यार्थी व कोच मार्टिन खिस धावत आले. अरे देवा! मेला तर नाही?' मार्टिन सरांनी भीतीने त्याच्या हातांचे एक्सरे फोटो पाहिले, तो आता कधीच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरू शकणार नाही - त्यांना दिसून आले. त्याचे दोन्ही हात जबर जायबंदी झाले होते. त्याच्या हातांमध्ये पिना आणि उजव्या मनगटात धातूचे स्क्रू बसविण्यात आले. नेल्सन शुद्धीवर आला तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितले, 'साठ टक्क्यांहून अधिक सांगितले हालचाल तुझ्या हातांनी होणार नाही. ऑलिंपिक विजेता होण्याच्या त्याच्या स्वप्च्यानाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या झाल्या होत्या.
ख्रिस मार्टिननी नेल्सन आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमधून घरी नेले. गाडी पार्क केली आणि थंडपणे नेल्सनला बजावले, 'हे औषध, यातून सुटलास की तू सरळ परत यायला हवास. मी तुझा छळच करणार आहे. आणि तू राष्ट्रीय विजेताच होणार आहेस! यात काहीही तडजोड नाही. आणि तुला हे सोडूनच द्यायचे असेल तर तू आताच निघून जाऊ शकतोस.' आठ आठवड्यांनी प्लॅस्टर, बडेजेस काढण्यात आली तेव्हा नेल्सनचे हात इतके आखडले होते, जड झाले होते की आता पोहणेच काय, साध्या हालचाली करणेही त्याला अशक्य वाटत होते. ख्रिस मार्टिननी त्याला पाय हलविण्याची सूचना दिली. रोजच्या सरावात खंड पडू न देण्याचा आग्रह आणि हेका सोडला नाही.
एका संध्याकाळी नेल्सन तलावात पोहण्याचा सराव करीत असताना पायाचा व्यायाम घेत धडपडत होता. वेळ संपल्याची सूचना आली आणि मार्टिननी सर्व शिड्या उचलून घेऊन दिवे बंद करण्यास फर्मावले, सुमारे वीस मिनिटांनंतर पुन्हा दिवे प्रकाशित झाले तेव्हा ज्या नेल्सनला आधी एक फूटभरही पुढे जाणे शक्य नव्हते, तो प्राणसंकटात टिकून राहण्याचे शिकलेला दिसला.
बाल्कनीतून मार्टिन त्याच्यावर लक्ष ठेवून होते. आपण जेवढे करू अशी नेल्सनची समजूत होती, त्यापेक्षा तो बरेच काही करू शकतो याची पुन्हा एकदा प्रचीती त्यालाच आली होती. 'तुझ अडविणारी एकच गोष्ट आहे!' नेल्सनला ते म्हणाले, 'ती म्हणजे तुझे डोके आणि जर तू त्या डोक्यातच एखादी गोष्ट घेतलीस, तर तुला काहीही अशक्य नाही. पाच महिन्यांनंतर नेल्सनने 180 मीटर्सचे विजेतेपद मिळविले. पुढे मार्चमध्ये, जवळजवळ सततच्या सरावानंतर, 100 मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोकचा उच्चांक त्याने सकाळी स्थापन केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी फायनल्समध्ये तो मोडून नवा गाठला. जुलैमधल्या त्या रात्री बार्सिलोना स्टेडियमवरील टैंकवर प्रखर प्रकाशशोतात आठ जागतिक जलतरणपटू उभे राहिले. त्यांमध्ये नॉर्बर्ट रोझा (हंगेरी) हा तोपर्यंतचा अजिंक्य जगज्जेता होता. नेल्सनचा खरा प्रतिस्पर्धी तोच होता नेल्सन आला. शांत, निश्चिंत.
'इथला प्रत्येकजण अस्वस्थ दिसतो!' मार्टिन ख्रिस स्वतःशी म्हणाले, 'एकटा नेल्सन सोडला तर!" बंदुकीची इशारत झडली आणि डिमिट्री व्होल्कॉव्हने (रशियन) आघाडी घेतली. नंतर रोझा व्हेंसिली इव्हानोच्ह नेल्सन तिसऱ्या कक्षेत होता. वळणावर तो व्हंसिलीच्या पुढे गेला आणि शेवटच्या 15 मीटर्समध्ये रोझाशी अटीतटीची झुंज दिल्यावर नेल्सनने पुढे मुसंडी मारली : मारली! विजेत्याचे पदक गळ्यात पडले तेव्हा मात्र या दिग्विजयी विजेत्याचा स्वर किंचित कंपित आला. 'हे पदक जेवढे माझे आहे, त्याहून कैक पटींनी माझे कोच मार्टिन ख्रिस यांचे आहे.' नेल्सन म्हणाला, 'त्यांनी मला जे दिले आहे, ते आता इतरांना देत राहण्यानेच मी त्यांचा उतराई होईन!
Tags: हंगेरी नॉर्बर्ट रोझा नेल्सन ख्रिस मार्टिन जलतरणपटू अरुणश्री Hangeri Nobrat Rojha Nelsan khris Martin Swimmer Arunshri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या