डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुंबईतच लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांच्याकडे दलितत्वाचं रडगाणं मुळातच नव्हतं. नामदेव ढसाळ ज्याप्रमाणे दलित रडगाणं न मांडता थेट कवितेला भिडले त्याप्रमाणे ऐनापुरेसुद्धा कोणत्याही दलित वस्त्राचा आधार न घेता कथेला भिडले ते केवळ मार्क्सवादी दृष्टीच्या प्रभावामुळेच. ढसाळ जसे आंबेडकरवादी प्रेरणेला मार्क्सवादी दृष्टीने ग्लोबल (वैश्विक) बनवितात, तसेच कथे ध्ये ऐनापुरे मराठी कथेला ग्लोबल दृष्टीकडे वळवितात. रिबोट ही कादंबरी केवळ गिरणगावापुरती मर्यादित राहत नाही, तर मुंबई धील सर्व प्रकारच्या पोटसंस्कृतीला सुद्धा स्पर्श करीत राहते.

ऐनापुरेंच्या लेखनाची सुरुवात आणि आजवर त्यांना मिळालेले साहित्यिक यश मला फार चमत्कारिक वाटते. कारण ऐनापुरे हे एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्यानंतर त्यांना कविता, सिनेमा आणि नाटकाचे तर फारच वेड आहे. कविता, सिनेमा, नाटक आणि चित्रकला या विषयांवरसुद्धा त्यांनी बरेच लेख लिहिलेले आहेत. ते सुद्धा अगदी चकित करणारे असेच आहेत. या क्षेत्रातही ते मोठी कामगिरी करू शकले असते, पण ते काही घडले नाही. का कुणास ठाऊक? याला आर्थिक परिस्थितीसुद्धा जबाबदार आहेच म्हणा किंवा आपले कलावंतांसाठीचे असणारे भारतीय पर्यावरणसुद्धा जबाबदार असेल. शहराकडे चला किंवा खेड्याकडे चला यातलं काय खरं आणि काय खोटं याचा मागमूसही नसताना ऐनापुरे M.Sc.(zoology)ची डिग्री घेऊन, एका मोठ्या आजाराने त्रस्त होऊन, चांगदेव पाटलाप्रमाणे, कवठे महांकाळ (जिथं अजून पाणीसुद्धा प्यायला मिळत नाही) इथं कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

दरम्यान त्यांच्या कथा ‘हंस’ या मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. आनंद अंतरकर यांनी त्यांच्या ह्या सुरुवातीच्या कथा (एवढ्या लहान वयात) छापण्याचे कौतुक आणि धाडस करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या कथा अगदी जी.ए. कुलकर्णींच्या दिशेने जाणाऱ्या होत्या. कवठे हांकाळच्या पर्यावरणात ऐनापुरे यांनी तेरावा महिना (शब्दालय, दिवाळी 98) ही कथा जेव्हा लिहिली तेव्हापासून ते जी.ए. कुलकर्णींपासून सावध झाले. तरी त्यांचा कथालेखनाचा सपाटा चालूच राहिला आणि सत्यकथा बंद पडले असले तरी त्यांचा वारसा चालविणारे अनुष्टुभ सुद्धा जी.के. ऐनापुरेंच्या कथा छापू लागले. आणि ऐनापुरेंना कथालेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात मान्यता मिळाली. इथवरच्या त्यांच्या कथालेखनाच्या प्रवासात मला त्यांची कथालेखनाची दृष्टी निखळ कलावादीच होती असे नोंदवावेसे वाटते. मात्र आत्मचरित्रात्मक फापटपसारा ही कथा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी मनस्ताप सहन करावा लागला. अर्थात याच काळात भालचंद्र नेमाडे यांनी कथा वाङ्‌मय प्रकाराविषयी, लघुकथा संस्कृतीविषयी जी विधानं केली त्याबद्दल ऐनापुरे नेहमी चिंताग्रस्त असायचे.

आपण चांगल्या कथा लिहूनच नेमाडेंच्या कथेविषयीच्या विधानांना उत्तर देऊ असे मनो मन ठरवून त्यांनी आजवर जवळजवळ 70-80 कथा लिहिल्या आहेत. पण कथासंग्रह त्यांच्या नावावर फक्त दोनच आहेत. कथा या वाङ्‌मयप्रकारात ऐनापुरे यांनी आपले स्थान भक्कम केले असले तरी ऐनापुरे यांनी एका मुलाखतीमध्ये (व्यवस्थेच्या दारावर लेखक टाचा घासून मेला पाहिजे, मुलाखत, 2005) असे म्हटले आहे की ‘समाजजीवन एवढं गुंतागुंतीचं आहे की त्यामध्ये तुम्ही समाजजीवनाला कथेतून भाषिक कृतीच्या अंगाने parallel (समांतर) राहू शकत नाही. त्यासाठी कादंबरी हा फॉर् च योग्य आहे.’ ऐनापुरे यांनी अवकाश (1997) ही पहिली कादंबरी अस्तित्ववाद आणि वास्तववाद यांचा आशय आणि शैलीशी ताळमेळ घालत एका सामान्य कलावंताच्या संघर्षाची कहाणी म्हणूनच मांडली.

जाईच्या-घरी जाई ही कादंबरी त्यांनी साधारणत: 1986-87च्या दरम्यान लिहिली. पण ती दुर्दैवाने 2010 साली प्रसिद्ध झाली. यानंतर अभिसरण (2002) ही कादंबरी लिहिताना मात्र त्यांच्याकडे कादंबरी लेखनाची ठोस भूमिका होती. जातीपलीकडे जाणे किंवा de caste होणे ही खरेतर कोणत्याही भारतीय लेखकाची मूळ गरज आहे. हे नमूद करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जी.के. ऐनापुरे यांचे मूळ नाव गौतम कृष्णाजी कांबळे. भारतीय जातीयतेच्या वणव्यात ऐनापुरे यांना कांबळे आडनाव फेकून द्यावे लागले याचे कारण म्हणजे त्या आडनावाचा कुणी फायदा अगर गैरफायदा घेऊ नये किंवा समज अथवा गैरसमज करून घेऊ नये.

अर्थात, मुंबईतच लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांच्याकडे दलितत्वाचं रडगाणं मुळातच नव्हतं. नामदेव ढसाळ ज्याप्रमाणे दलित रडगाणं न मांडता थेट कवितेला भिडले त्याप्रमाणे ऐनापुरेसुद्धा कोणत्याही दलित वस्त्राचा आधार न घेता कथेला भिडले ते केवळ मार्क्सवादी दृष्टीच्या प्रभावामुळेच. ढसाळ जसे आंबेडकरवादी प्रेरणेला मार्क्सवादी दृष्टीने ग्लोबल (वैश्विक) बनवितात, तसेच कथे ध्ये ऐनापुरे मराठी कथेला ग्लोबल दृष्टीकडे वळवितात. रिबोट ही कादंबरी केवळ गिरणगावापुरती मर्यादित राहत नाही, तर मुंबई धील सर्व प्रकारच्या पोटसंस्कृतीला सुद्धा स्पर्श करीत राहते. उदा. धारावीसारखी झोपडपट्टी, दादरसारखी ब्राह्मणपुरी, बेहरामपाड्यासारखा मुस्लिम समूह, मलबार हिल अशा अनेक पोटसंस्कृती आहेत की ज्यांच्या त्यांच्या एकमेकां धील गुंतागुंतीचा ताळमेळ लागत नाही, पण त्या पोटसंस्कृती एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

ऐनापुरे यांनी कादंबरीमध्ये निवडलेला प्रदेश म्हणजे डिलाईड रोड, बी.डी.डी. चाळ आणि हा प्रदेश म्हणजेच रिबोट चा खरा नायक किंवा प्रतिनायक आहे. या बी.डी.डी. चाळींमधील लोक अठरा पगड जातींचे असल्यामुळे बी.डी.डी. चाळी ह्या सेक्युलर (no religion) अशा स्वरूपाच्याच आहेत. इथं माणसाची De caste होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि वर्ग किंवा class मध्ये रूपांतरित होते. ऐनापुरेसुद्धा हे बी.डी.डी. चाळ संस्कृतीमधून डी कास्ट झालेले लेखक असल्याने त्यांच्या भाषिक कृतींमधून कधी जातीयतेचा स्पर्श होत नाही म्हणून ते जन्माने दलित असले तरी साहित्याच्या संदर्भात त्यांना दलित लेखक म्हणून कदापिही मोजता येणार नाही. गिरणगावातील समूहाचे जीवन गिरणी संपामुळे उद्‌ध्वस्त होणे, एवढीच या कादंबरीची कहाणी नाही किंवा ही कादंबरी केवळ समूहनिष्ठच आहे असे म्हणता येणार नाही. कारण रिबोट च्या अंतरंगामध्ये मुख्यत: वायदेशी पांड्या ह्याची कहाणी सर्व गिरणबाबूंचे प्रतिनिधित्व करते आणि या सर्व गिरणबाबूंचीच काय तर अन्य मुंबईकरांची शहरी बकालीमध्ये झालेली उद्‌ध्वस्त अवस्थासुद्धा अधोरेखित करते. हे उद्‌ध्वस्त झालेलं जीवन ऐनापुरे यांनी कादंबरीच्या शेवटी ज्या नजरबंदीने केले आहे ती वाचकाची सुद्धा नजरबंदी करते. या कादंबरीत ऐनापुरे यांनी जादू य वास्तवाचा (magical realism) प्रयोग केला आहे. 

रिबोट चा आशय समृद्ध करताना ऐनापुरे बी.डी.डी. चाळ आणि मुंबईतील अन्य पोटसंस्कृतींतील प्रदेशाची वर्णने अगदी एमिल झोला या कादंबरीप्रमाणे तंतोतंत देताना दिसतात. पण हा तपशिलाचा भाग रिपोर्ट म्हणून येत नसून कथानकाची गरज म्हणून येतो. बी.डी.डी. चाळ म्हणजे झोपडपट्टी नव्हे आणि फ्लॅट सिस्टीमही नाही. याच्यामधीलच विचित्र व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे तपशील म्हणून हे सगळं येत राहतं. त्यामध्ये गोकुळाष्टमी हा तर बी.डी.डी. चाळीचा अविभाज्य घटक. त्याचे सर्व तपशील चकित करणारे आहेत. त्याचप्रमाणे गणपती उत्सवाचे तपशीलसुद्धा महत्त्वपूर्ण असे टिपले आहेत. या तपशिलांच्या अनुषंगाने मुंबईतील लोकगीते आणि लोकनृत्येसुद्धा ऐनापुरे गरजेप्रमाणे कादंबरीभर पेरत राहतात. बी.डी.डी. चाळ, एकूण मुंबईचे तपशील देत असताना ऐनापुरे ग्रामीण भागाचे, की ज्या गावां धून हे लोक मुंबईला आलेत, तिथलेसुद्धा तपशील ग्रामीण वास्तवाशी निगडित असेच देतात. कारण ऐनापुरे यांची ग्रामीण आणि नागर या दोन्ही संस्कृतींशी नाळ जोडलेली आहे. बी.डी.डी. चाळीची बोली ही स्वतंत्रच आहे. म्हणजे मुंबई धील इतर पोटसंस्कृतींच्या हिंदीमिश्रित बंबय्या बोलीहून वेगळी. या बी.डी.डी. चाळीच्या बोलीमध्ये घाटी आणि कोकणी बोलीचे मिश्रण आहे. ऐनापुरे यांनी ज्या त्या पात्राच्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक पार्श्वभू ीवर या बोलींचा उपयोग केलेला 

गिरणगावातील समूहाचे जीवन गिरणी संपामुळे उद्‌ध्वस्त होणे, एवढीच या कादंबरीची कहाणी नाही किंवा ही कादंबरी केवळ समूहनिष्ठच आहे असे म्हणता येणार नाही. कारण रिबोट च्या अंतरंगामध्ये मुख्यत: वायदेशी पांड्या ह्याची कहाणी सर्व गिरणबाबूंचे प्रतिनिधित्व करते आणि या सर्व गिरणबाबूंचीच काय तर अन्य मुंबईकरांची शहरी बकालीमध्ये झालेली उद्‌ध्वस्त अवस्थासुद्धा अधोरेखित करते. हे उद्‌ध्वस्त झालेलं जीवन ऐनापुरे यांनी कादंबरीच्या शेवटी ज्या नजरबंदीने केले आहे ती वाचकाची सुद्धा नजरबंदी करते. या कादंबरीत ऐनापुरे यांनी जादूय वास्तवाचा (ारसळलरश्र ीशरश्रळीा) प्रयोग केला आहे.
आहे. तरीपण बी.डी.डी. चाळीच्या बोलीला जो वेगळा बाज आहे तो साहित्यात खरं तर पहिल्यांदाच उमटलेला दिसतो. नाही तर भाऊ पाध्ये यांची भाषा (वालपाखाडी बोली) सुद्धा अनेक वेळा अभिजन क्लासला भावणारी आहे. पण ऐनापुरे यांनी बी.डी.डी. चाळीतली बोली अस्सल रीतीने वापरली आहे. एके काळी बी.डी.डी. चाळींमधल्या वाचकांना भाऊ पाध्ये आणि अण्णाभाऊ साठे हे लेखक आणि त्यांची भाषा फार आवडायची. कारण ते दोन्ही लेखक गंभीर आणि लोकप्रिय असे होते. पण ऐनापुरे यांनी वापरलेली बोली खास करून बी.डी.डी. चाळीचीच आहे की ज्यामधून कोणत्याही जातिधर्माची केवळ भाषेवरून ओळख पटत नाही, की अमका माणूस ह्या ह्या जातीचा किंवा धर्माचा किंवा पंथाचा असावा. फक्त एवढं कळू शकतं की हा घाटी असावा की कोकणी असावा.

अर्थात, हे सुद्धा लोक जुन्या पिढीतलेच म्हणून ओळखतात. कारण जुन्या पिढीतल्या लोकांनी बी.डी.डी. चाळीत त्यांची त्यांची भाषा (बोली) जपून ठेवलेली आहे. पण तरुण पिढीमध्ये मात्र हा भाषिक बदल केवळ बी.डी.डी. चाळीचा म्हणूनच येतो. कॅरमच्या खेळामध्ये Rebound (रिबोट) मारताना रिबोट मारणाऱ्याचा निर्णय हा आत्मनिष्ठ (subjective) असतो पण रिबोट मारल्यानंतर त्याचा परिणाम मात्र वस्तुनिष्ठ (objective) असाच असतो. ऐनापुरे यांची विचारसरणी रिबोट मारताना आत्मनिष्ठ स्वरूपाची वाटली तरी रिबोट मारल्यानंतर (कादंबरी संपल्यानंतर) त्याचा एकत्रित परिणाम (cumulative effect) मात्र वस्तुनिष्ठ असा झालेला आहे. तरीही रिबोट मारताना ऐनापुरे यांच्या विचारप्रणालीमध्ये ‘ज्या कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थशास्त्र या गिरणधंद्यावर होतं त्याला एक प्रकारची ओहोटीच लागली.

त्याचा परिणाम सांस्कृतिक देवाणघेवाणीइतका मर्यादित नसून माणसाचं माणूसपण संपुष्टात आणण्याच्या स्तरापर्यंत पाझरला आहे.’ मुंबई ध्ये नजरबंदीचा खेळ फार लोकप्रिय आहे आणि तिथले लोकसुद्धा या नजरबंदीवर विश्वास ठेवतात. एरवी कोणताही जादूगार सुद्धा असेच नजरबंदीचे रूप देतो. (खरे तर नजरबंदी हा केवळ बनाव आहे, ती फक्त हातचलाखी असते.) तशा प्रकारे उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकीकरण (LPG Formula) ही या विश्वाचीच केलेली नजरबंदी आहे, हा या कादंबरीचा एकत्रित परिणाम (cumuliative effect) थक्क करणारा आहे. ऐनापुरे यांनी चरसळलरश्र ठशरश्रळीा वापरला आहे म्हणून ही कादंबरी वैश्विक होत नाही तर LPG च्या वैश्विक नजरबंदीमुळे ही कादंबरी वैश्विक होऊ शकते. (जेव्हा या कादंबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर होईल तेव्हाच, अन्यथा नाही.) आंबेडकरांची शहराकडे जाण्यामधली डी कास्ट होण्याची भूमिका आणि गांधीजींची जीवनशैली विषयक भूमिका यां धील युक्तिवादशास्त्र (dialectic) तपासण्याचे काम ऐनापुरे यांनी वाचकांवर सोपवले आहे. तरीही रिबोट चे अंतरंग असे सांगते की गांधी आणि आंबेडकर एकच बोगदा दोन विरुद्ध दिशांनी खणत होते. गांधी आणि आंबेडकर या दोघांचीही दृष्टी माणसाला माणूसपण मिळवून देण्याची होती. ऐनापुरे यांचीही जीवनदृष्टी रिबोट मध्ये याच स्वरूपाची आहे. 

Tags: रिबाऊंड रिबोट महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार2011 जी. के. ऐनापुरे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके