धक्कादायक संख्येत आत्महत्या करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडणाऱ्या आजच्या अंधकारमय परिस्थितीत मार्ग काढून संजीवन देणाऱ्या शेतीचा नमुना उभा आहे. अस्मानी व सुलतानी या दोहोंच्या जुलमापासून दिलासा देणारी शेतीची एक पर्यायी वाट बनली आहे. कोरडवाहू अडीच एकरांचा लहान शेतकरीसुद्धा आजच्याच साधनसामग्रीच्या आधारे व स्वतःच करू शकेल असा हा नमुना आहे. हे असे नव्या शेतीचे प्रात्यक्षिक वर्ध्याच्या चेतना-विकास संस्थेच्या शेतावर उभे आहे. ते बघण्याकरिता सर्वांना जाहीर आवाहन व निमंत्रण शेवटी नमूद केल्याप्रमाणे आहे. हे प्रात्यक्षिक गेल्या पाच वर्षांपासून चाललेल्या प्रयोगाचे फळ असून आजच्या चालू शेतीपेक्षा कोणताही जास्तीचा खर्च न करता, उलट खर्चात बचत करून गरीब शेतकऱ्याजवळही असणाऱ्या साधनांच्याच भरवशावर ही जीवन-हमी बिना ओलितानेसुद्धा कोणत्याही कोरडवाहू शेतकऱ्याालाही उभी करता येते.
प्रिय महोदय,
विषय : भेटीकरिता निमंत्रणसमाजातील हत्यासत्रातून व मृत्युसत्रातून सोडवणुकीकडे जीवनदायी वाटचाल.
या पत्रासोबत आपल्याला एक निमंत्रण पाठवीत आहे. एक प्रात्यक्षिक शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याकरिता आणि चुकीच्या व्यवस्थेला छेद देण्याकरिता, दोन्ही पैलू एकाच वेळी साधण्याचा आशय असलेले प्रात्यक्षिक. ते अभ्यासून त्यावर समालोचनात्मक चर्चा करून त्याचा व्यापक उपयोग करून घेता यावा, या उद्देशाने हे निमंत्रण पाठवीत आहोत. नव्या शेतीची तीन आगळीवेगळी वैशिष्ट्ये - 1. संपूर्णपणे कोरडवाहू, ओलिताचा एकही थेंब न वापरता शक्य. 2. केवळ एक हेक्टरसारख्या थोड्याशा व अगदी सामान्य जमिनीवर शक्य. 3.गरीब, सर्वसामान्य, लहान शेतकऱ्यांच्या साधनसामग्रीवरच आधारित पद्धती व तंत्रे.
आत्महत्या, कुपोषणाचे बालमृत्यू की संजीवक शेती? पर्याय उपलब्ध
धक्कादायक संख्येत आत्महत्या करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडणाऱ्या आजच्या अंधकारमय परिस्थितीत मार्ग काढून संजीवन देणाऱ्या शेतीचा नमुना उभा आहे. अस्मानी व सुलतानी या दोहोंच्या जुलमापासून दिलासा देणारी शेतीची एक पर्यायी वाट बनली आहे. कोरडवाहू अडीच एकरांचा लहान शेतकरीसुद्धा आजच्याच साधनसामग्रीच्या आधारे व स्वतःच करू शकेल असा हा नमुना आहे. हे असे नव्या शेतीचे प्रात्यक्षिक वर्ध्याच्या चेतना-विकास संस्थेच्या शेतावर उभे आहे. ते बघण्याकरिता सर्वांना जाहीर आवाहन व निमंत्रण शेवटी नमूद केल्याप्रमाणे आहे. हे प्रात्यक्षिक गेल्या पाच वर्षांपासून चाललेल्या प्रयोगाचे फळ असून आजच्या चालू शेतीपेक्षा कोणताही जास्तीचा खर्च न करता, उलट खर्चात बचत करून गरीब शेतकऱ्याजवळही असणाऱ्या साधनांच्याच भरवशावर ही जीवन-हमी बिना ओलितानेसुद्धा कोणत्याही कोरडवाहू शेतकऱ्याालाही उभी करता येते.
वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या सुदूर भागातील गावोगावच्या प्रयोगशील निवडक निमंत्रित शेतकऱ्यांच्या अभ्यास भेटीचा व चर्चासत्राचा कार्यक्रम चेतना विकासमध्ये नुकताच आयोजित केला होता. संख्येच्या मर्यादेमुळे या दिवशी फक्त पूर्वनिमंत्रित शेतकरीच सहभागी होते. परंतु इतर इच्छुकांनाही सर्वांना संधी मिळावी म्हणून जाहीर निमंत्रण शेवटी दिलेल्या तपशीलाप्रमाणे चेतना विकासतर्फे देण्यात येत आहे. आजपावेतो शेकडो शेतकरी व काही नामवंत व शेतीतज्ज्ञ यांनी या प्रात्यक्षिकास भेट देऊन वाखाणणी केली, त्यात जिल्हा, प्रांत व देशभरातूनही आलेल्या मंडळींचा समावेश आहे. या अडीच एकर कोरडवाहू शेतीतून एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबाला लागणाऱ्या सर्व तन्हेच्या व विविध, तीसपेक्षा जास्त खाद्यान्न गरजा 80% पर्यंत भागून शिवाय नगदी उत्पन्न पुरेपूर मिळते.
पैशात हिशोब लावल्यास दहा हजार रुपयांचे वैविध्यपूर्ण खाद्यान्न मिळते व शिवाय कापूस इत्यादी नगदी पिकांचे उत्पन्न विकून साडेनऊ हजार रुपये रोख मिळतात. शिवाय बाहेर मजुरी काम करण्यास शेतकरी कुटुंब मोकळे राहतेच; व त्याचे साडेसहा हजार रुपये मजुरीचे उत्पन्न मिळते. सर्व गोळाबेरीज केल्यास या पद्धतीने अडीच एकर कोरडवाहू शेतकरी वर्षाला जवळपास वीस हजार रुपयांची निव्वळ कमाई करू शकतो. प्रत्येक खर्चाच्या व उत्पन्नाच्या बारीकसारीक नोंदी ठेवलेल्या आहेत. छोटे व मोठे, दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकणारी ही वाट आहे. या शेतीनमुन्याची महत्त्वाची काही लक्षणीय घटक सूत्रे अशी आहेत; संपूर्णपणे सजीव शेती, रासायनिक खते व औषधे इत्यादींना पुरेपूर फाटा, प्रचलित सर्व पिके (कापूस, सोयाबीन, पेरीव धान, ज्वारी, तुरी) यांचा पुरेपूर समावेश व परस्परपोषक विविध मित्रपिकांची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शास्त्रीय लागवड, मातीचा पोत व उत्पादकता सेंद्रीय पद्धतीने वाढवीत जाणे, प्रतिकारक वाणांची लागवड करणे, या सर्वांचा परिणाम म्हणून कीड व रोग नियंत्रण साधणे.
शिवाय एका छोट्याशा शेतावरही शेत आधारित पाणलोट विकास कामे शेतकऱ्यानेच करून माती व पाणी जपण्याच्या हातोटीची आगळीवेगळी पद्धतसुद्धा येथे बघायला मिळते. कितीही प्रतिकूल हंगाम व मोसम आला तरी पिकांच्या मैत्रीपूर्ण समुदायातून काही पिके हातची गेली तरीही उरलेल्यांनी ती जागा भरून हमखास उत्पन्न दिलेले आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जोखीम व "टेन्शन नसलेली" ही शेतीपद्धती म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हाती राहणारा विमा आहे. या वर्षाच्या अतिशय प्रतिकूल हंगामातही एकच पेरणी साधलेले, मजबूतपणे टिकाव धरलेले व फोफावत असलेले पिकांचे हे प्रात्यक्षिक शेतकऱ्याला नव्या आत्मविश्वासाची वाट दाखविणारे ठरले आहे. बाहेरील सामुग्रीचा कमीत कमी वापर, व अंतर्गत सामग्रीसंपदा उभारणीवर भर या तत्त्वावर आधारलेली तंत्रे वापरल्यामुळे कर्जाच्या जीवघेण्या विळख्यापासून सोडवणूक होते.
कुपोषणाच्या बालमृत्यूंच्या थैमानातून सोडवणूक
दर वर्षाला वाढत्या संख्येत ग्रासणाऱ्या बालमृत्यूंना मुख्य कारण आहे कुपोषण. या समस्येने समाज व सरकार दोन्ही हतबल होताहेत. पण कुपोषणामुळे उद्भवलेल्या या समस्येतून सोडवणूक करण्याचे सामर्थ्यही या पथप्रदर्शक प्रात्यक्षिकात व त्यातील दिशेमध्ये आहे. पोषणाकरिता पुरेशा प्रमाणात खाद्यान्न मिळणे हे गरजेचे असले तरी केवळ तेवढे पुरेसे नसून त्यांचा प्रकार जास्तीत जास्त विविधता असलेली खाद्यान्ने मिळण्याचा असणे अनिवार्य असते. अशा हमीची 30 प्रकारच्या विविध पिकांची घरोघरी खाद्यान्ननिर्मिती शेतावरच करण्यामुळे पोषणाची हमी, आरोग्याचा विमा व कुपोषणाच्या विळख्यातून सोडवणूक होण्याची महत्त्वाची किल्लीसुद्धा या प्रात्यक्षिकांत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांशिवाय अभ्यासक, वैज्ञानिक, नियोजनकर्ते, धोरणे आखणारी मंडळी व सामाजिक कार्यकर्ते इत्यादी सर्व तहेच्या विविध मंडळींनी हे प्रात्यक्षिक बघावे असे आवाहन आहे. शेतमालाला उचित बाजारभावाची जोड मिळावी हे तर फार महत्त्वाचे व गरजेचे आहेच व ते झाल्यास ही फायद्याची शेती पद्धती आणखीनच जीवनदायी ठरू शकते.
मातीची हत्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यापेक्षा वेगळी वाट
मातीची हत्या व शेतकऱ्यांची आत्महत्या अशा प्रकारे चाललेल्या आजच्या हत्यासत्रांना पर्याय देऊन वेगळी वाट दाखविणारे हे मार्गदर्शक प्रात्यक्षिक स्वतः करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील काही सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. इतरांनाही प्रयोग बघण्याकरिता, समजून घेण्याकरिता व चर्चा करण्याकरिता स्त्रिया व पुरुष सर्वांना जाहीर निमंत्रण दिलेले आहे व त्याबाबत खालील आवश्यक माहिती अशी आहे.
Tags: शेती वर्धा निरंजना मारू अशोक बंग Agriculture Wardha Niranjana Maru Ashok Bang weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या