डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सुरंजन सुधामय दत्त. वय वर्षे - 34. राहणार- ढाका. व्यवसाय - बेकार.. दुर्गुण म्हणाल तर समग्र मानवजातीस माणूसच मानतो. शाळेत मित्रांकडून शिव्या शिकतो. वेळप्रसंगी हा देखील ताकदीनं शिव्या परतवतो. "तूच कुत्रा, डुक्कर, हिंदू !"

सुरंजन सुधामय दत्त. वय वर्षे - 34. राहणार- ढाका. व्यवसाय - बेकार.. दुर्गुण म्हणाल तर समग्र मानवजातीस माणूसच मानतो. शाळेत मित्रांकडून शिव्या शिकतो. वेळप्रसंगी हा देखील ताकदीनं शिव्या परतवतो. "तूच कुत्रा, डुक्कर, हिंदू !" आपल्यालाच हिंदू ही शिवी का, हे विचारून वडिलांसमोर हमसाहमशी रडतो. डब्यात खाऊ म्हणून डुकराचे मांस मिळते. खाण्यावर सगळे मित्र फेर धरून 'बाटला, बाटला' म्हणत हिणवतात. 'आपण परके मानले जातोय' याचे कारणही न समजून, दोस्तांच्या वागण्याने सुरंजन कोलमडून गेला आहे. वय वाढत जाते. सोबतच्या वातावरणाचे वागणे क्रमशः हिंसा होत आहे. परकेपणा, उपरेपणा तुटलेपणा क्षणोक्षणी अनुभवत आहे. पण विचार , अतिशय वाईट! वडिलांपासून घेतलेले आदर्श या जगात जगू इच्छित आहे, सुरंजन!

डॉ. सुधामय दत्तांचे तरी काय, 1947 साली पाकिस्तान झाले. तेव्हा सतरा वर्षांचे त्यांचे वय होते. सोबतचे सगळे मित्र म्हणाले, हे मुसलमानांचे होमलॅंड आहे, चल निघून जाऊ. सुधामयबबूंनी खणखणीत आवाजात सांगितले, "वाडवडिलांचे घर, माडा- सुपारीच्या बागा, भात-शेती सोडून निर्वासित होणार नाही. सुरंजनने हे पाहिलेले नाही. जातीय फाळणी, पन्नासचा वणवा त्याला माहीत नाही. पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दूच असणार' वा जीनांच्या निर्णयाविरुद्ध बंगाली तरुण खवळले. तेव्हा रफीक सलामच्या खांद्याला सुधामयबाबूंचा खांदा होता. एकूणसत्तरमध्ये अयूवखानने बंगाली राष्ट्रभाषेची मागणी करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, त्या वेळीही सुधामय दत्त रस्त्यावरच होते. हे मात्र सुरंजनने अनुभवले आहे. पाक सैन्याने तरुणांना चिरडायला सुरुवात केली. ढाक्याला वेढा घालून टिपणे चालू, जमाल, रशीद शहर सोडून, पाश तोडून जात आहेत. हया तरणावांड पोरांना ते शोभतंय ? सुधामयबबू, तेरा वर्षांचा सुरंजन, सहा महिन्यांची माया आणि पत्नी किरणमयी यांना फैजुलच्या घरी सोडून निघाले आहेत. हिंदूंना पकडून मारणे चालू आहे. गल्लीतले सगळेच सर्व सोडून भारताकडे पळत आहेत आता किरणमयीला बांगड्या, कुंकू काढून फातमा अख्तर व्हावे लागले आहे. तर सुधाबाबूंना धोतर सोडून पायजमा चढवावा लागला आहे. त्यांनी मुलांना मुस्लिमद्वेष शिकवला नाही. सगळे धर्म ते सारखेच मानतात. पण मुस्लिम ओळख सांगून जीव वाचवणे हेच त्यांना आगळे, अमानुष वाटत आहे. फ्ण त्या विचारांना कोण हिंग लावणार? नाक्यावरच सैन्याच्या तिघांनी अडवले. नाव विचारल्यावर आवाज कापत उत्तर आले, "सिराजउद्दीन हुसेन'. दंड घट् पकडले. म्हणाले "लुंगी सोड,पाहू " पहिली लाथ पोटात बसली. कँपमध्ये घेऊन गेले. त्यांना ती आठवण नेहमीच असहय होते. डोक्यापर्यंत कळ जाते . युद्धावर काही जाताच आले नाही. संगीनींनी टोचून-टोचून छळ करत ते विकट हसत होते. रायफलच्या दस्त्यानं उजवा पाय मोडून टाकला. आणखी एक अवयव कापून काढला. लंगडत, ओलीकच्च लुंगी येऊन फुलपूरला आले.

हे ऐकून सुरंजनला कलकत्ता आपले वाटत नाही. त्याची प्रेयसी परवीन म्हणते, 'मुसलमान हो. लग्न करते. ' त्याला धर्म बदलायची गरजच समजू शकत नाही. नव्वदमध्ये पुन्हा निर्लज् दंगा ! जीव वाचवून हिंदू पळत आहेत. हा अनुभव जुना होत नाही तोच 6 फेब्रुवारी 1992 रोजी बाबरी मशीद पडतेय. बांगला देशात मुस्लिमांना भारतात हिंदूंना उन्मादाने ग्रासून टाकले आहे. सुरंजनचे जीवाभावाचे दोस्त हैदर, कमाल, अल्ताफ, रतीफ, बेलाल आहेत. त्याची घसट असीम, काजल, अर्थनाशी नव्हती. पण आज गल्लीतली पंधरा वर्षांची पोरे घराभोवती अर्वाच्य घोषणा देत आहेत. 'एखाद दुसरा हिंदू धरा, सकाळ-दुपार नाश्ता करा'. वातावरणात विचार भरत चाललाय. अशीच एक काळवंडून गेलेली दुपार सुरंजन हिंडून घरी परततोय, सताड उघडा दरवाजा. अस्ताव्यस्त अवतार घराचा झाला आहे. त्याच्या कानात पडणारा सुधावायूंचा कण्हणारा आवाज़ त्याला गारठवून टाकतो. “पोरंटोरं येऊन हे करून गेली. मायाला घेऊन गेलेत." सुरंजन हैदरकडे जातो. घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी आक्रंदत म्हणतो, "तुम्ही आमची माया देऊन टाका.”

एकेक दिवस जात आहे. जाताना अधिकच लाचारवाणे. दीनवाणे करीत आहे . कुणातही सहन करण्याचे प्राण उरलेले नाही. गलितगात्र झाले आहेत. अशाच एके दिवशी बंगाल संस्कृतीवर अपार प्रेम करणारे दोन पिढीतले सुरंजन आणि सुधाबावू एकमेकांना साथ द्यायला उरलेले पिता-पुत्र ठरवत आहेत, "आता जाऊया - इंडियाला.”

6 डिसेंबर 1992 ला शरयू-तीरावर अयोध्येत हिंदू जमावाने बाबरी मशीद उद्ध्वस्त केली आणि भारतीय उपखंडातील बांगला देशात याचा बदला तिकडच्या हिंदूंवर घेण्याचा नेहमीचा उपक्रम चालू झाला. 21 फेब्रुवारीला भाषा दिवसाचा मुहूर्त पकडून तसलीमा नसरीन यांनी छोटी कादंबरी प्रकाशित केली. शरम' ही कादंबरी वाचकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात बुडून गेली. एप्रिलपर्यंत पाच आवृत्त्या निघाल्या. आता मराठी, इंग्रजी, हिंदीत 'लज्जा' आले आहे. प्रस्तुत अनुवाद दै. महानगरने दिवाळी अंकासोबत दिला. अनुवाद केला आहे ख्यातनाम अभ्यासक समीक्षक अशोक शहाणे यांनी. त्यांना बंगालीची उत्तम जाण असल्याने मूळ पुस्तकाचा हा मराठी अनुवाद लेखिकेचा भावनिक उद्रेक त्याच तीव्रतेने वाचकांपर्वत पोचवतो 'लज्जा' ही समकालीन विषयावरील कादंबरी सादर करताना लेखिकेने त्या काळातील वृत्तपत्रांतील रिपोर्टस् घेऊन सतत वातावरणातील धग तेवत ठेवली आहे.

ही कथा सुरंजनचीच नाही. ढाक्यातीलही नाही. ती आग्रा, कानपूर बर्लिन, जेरुसलेम कुठेही घडू शकते. धर्म म्हणून ती गरज कुठलाही धर्म पार पाडू शकतो. खरे तर ही कादंबरी सुजाण माणूस विरुद्ध बेभान, बेलगाम झंड या संघर्षाची आहे. 1970 साली कै, इस्मत चुगताई यांनी फाळणीनंतर आलेल्या भीषण अनुभवांवर ‘गर्म हवा' लिहिली. 1971 मध्ये एम. एस. सय्युंनी त्याचा चित्रपट केला होता. भारतावर अतोनात प्रेम असणाऱ्या सलीम मिर्झा (चित्रपटात बलराज सहानी) ह्या आग्र्यातील चप्पल कारखानदाराची ती कथा होती. दोन्ही कादंबऱ्यांचे साम्य हेच की केवळ धर्मामुळे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कुटुंबास अपमानित होऊन जगावे लागते. सगळे सगे-सोयरे सोडून जाताना हे खंबीरपणे राहतात. शेवटी विजय विचारांचा होऊ शकत नाही. झुंडीसमोर टिकाव अशक्यच आहे हेच तसलीमा नसरीन आणि इस्मत चूगताई सुचवतात. चुगताईंच्या 'गर्म हवा मध्ये सलीम मिर्झा शेवटच्या क्षणी परतून जात-धर्म नसणाऱ्या लाल बावटयाच्या मोर्च्यात सामील होतात. त्यांचा मुलगा अर्थातच आधीच पुढे गेलेला असतो. मात्र 1942 , 1970 आणि 1992 मध्ये तसेच भारत-बांगला देश यांत नक्कीच फरक आहे. 1992 मध्ये धर्माच्या नावावर बाबरी मशीद तोडणारे, मायाला पळवणारे खरे एकाच धर्माचे आहेत. सुरंजनला प्रश्न पडलाय, 'माया चा दोष काय? तर ती हिंदू आहे. हाच दोष औरंगाबाद, कंपनी अमृतसरच्या बाईचा असू शकतो. दंगल, युद्ध काही असो. बायांचे हाल सारखेच, त्यांचा दोष हाच की त्या मादी आहेत. विचार करणारा सुरंजनसुद्धा मायाचा बदला घेण्यासाठी एकोणीस वर्षाच्या शमीम अख्तरला घरी आणून हिंस्रपणे उपभोगतो. ही कसली प्रतिक्रिया ? आणि कुणाला? लिंग, धर्म, राष्ट्र यांनी ठरवलेलेच स्थान महत्त्वाचे आहे तर ! कितीही वर्ष संस्कार (?) केले तरी 1992 असेच दिसणार या सगळ्या नग्न सामाजिक सत्याधी जाणीव 'लज्जा’ ने दिली आहे.

"लज्जा नंतरचा तसलीमा नसरीन यांचा लढा वृत्तपत्रे देत आहेतच. त्यांना लाज वाटत आहे अमानुष झुंडीची. पण त्याला से धर्म, राष्ट्र म्हणत सलमान रश्दीप्रमाणेय तसलीमालाही खलास करू पाहत आहेत.

काही वर्षापूर्वी कुणीही असे भाकीत करू शकते नसते, "मुस्लिम देशात 31 वर्षाची डॉक्टर तरुणी, जीव धोक्यात घालून असले काही लिहील. " 'लज्जा 'ला मिळणारा अपूर्व प्रतिसाद ध्यानात घेतला तर.. पुढे होऊ घातलेल्या बदलाची नांदी म्हणूनच मुस्लिम देशांकडे पाहता येईल. सोव्हिएत युनियनमध्ये सगळी आबादी-आबाद आहे म्हणताना आर्थर कोस्लरनी 'डार्कनेस अट नून 'मधून पोलादी पडदा चिरला होता. कम्युनिस्ट जगातील बंदिस्त मने झेक, जर्मन हंगेरियन चित्रपटांतूनही व्यक्त व्हायची. प्रत्यक्ष राजवट कोसळायला पुढे अनेक वर्षे लागली. बीजं मात्र संवेदनशील कलावंतांनी हेरली होती. तसलीमाच्या वादळाने 'लज्जा' आणि नंतर बांगला देशातच नाही तर जगभर धर्मांध शक्तीला तडाखे लगावले आहेत. [मुस्लीमांवर कोरडे ओढल्याने भाजप व संघ परिवाराने काही काळ तसलीमाला पांचजन्य', 'ऑर्गनायझर' मुखपत्रातून डोक्यावर घेतले खरे पण तसलीमाचे स्त्रियांसंबंधीचे रोखठोक, सुस्पष्ट मानवी विचार ऐकल्यावर भाजपने तसलीमाचे नाव टाकले. दिवसेंदिवस तिला जगभर पाठिंबा मिळतच आहे. 7 ऑक्टोबर 1993 ला तिला धर्मवेड्यांनी मृत्युदंड ठोठावला आहे. आज तो भूमिगत आहे. युरोपीय देश कधीही आश्रय देण्यास तयार आहेत. बांगला सरकारही तिला हात लावायला धजणार नाही, इतपत सज्जड दम आंतरराष्ट्रीय पातळीवर सुजाण विचार करणाऱ्यांनी भरला आहे.

जगभर वर्णभेद संपल्यावरही दक्षिण आफ्रिकेला जाग यायला इतकी वर्षे लागी. तोवर मंडेलांना हाल सहन करावे लागले. पण जग त्यांच्या पाठीशीच होते. धर्मांधतेचे डबकेही असेच. त्यातल्या बेडकांना ते समुद्रच वाटणार पण एक नक्की, तसलीमाला ठार मारायचे ठरवून त्यांनी तिच्या विचारांचा प्रभाव आणि स्वतःचा पराभव मान्य केला आहे. ह्यातच 'लज्जा’ ची ऐतिहासिक बंडखोरी सिद्ध होते.

'लज्जा'
लेखिका : तसलीमा नसरीन
अनुवादक : अशोक शहाणे
प्रकाशक : दै. महानगर दिवाळी अंक, 1993

Tags: बांगलादेश  ग्रंथ परिचय पुस्तक परीक्षण तस्लिमा नसरीन लज्जा Traslated Books Muslim Islam Bangladesh Taslima Nasrin Lajja Book review #Books weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके