डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड इतकी महत्त्वाची आहे का?' असा प्रश्न विचारणं सूज्ञपणाचं ठरत नाही. मात्र असा प्रश्न विचारणायानंही आग्रह धरला आहे की वाडवाईची निबड करताना कोणते निकष लावले हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. विश्वकोश हे ज्ञानसंचयाचे एक महत्त्वाचं साधन आहे'. माहितीयुगाचे गोडवे गाणाच्यांना या प्रकल्पाचं महत्त्व का समजू नये? माहिती तंत्रज्ञानाची जोड या प्रकल्पाला मिळावी हे काम अधिक गतीनं व्हावं असं वाटत असेल तर या कामाची सूत्रे बौद्धिकदृष्ट्या, प्रगल्भ व्यक्तीकडे जातील हे पाहाणं महत्त्वाचं आहे. विजया वाड यांच्या बौद्धिक क्षमतेविषयीच संशय असल्यानं हे आक्षेप घेतले जात आहेत.

विश्वकोश मंडळाच्या नव्या अध्यक्षा डॉ.विजया वाड यांचा स्वतःच्या बौद्धिक आणि साहित्यिक प्रगल्भतेविषयी आत्मविश्वास कौतुक करण्याजोगा आहे.

विश्वकोश मंडळाच्या सर्वोच्च पदासाठी आपण पात्र आहोत, असं त्यांनी स्वतः 'लोकसत्ता'च्या वार्ताहरला सांगितलं. रामदासस्वामींनी स्वप्रशंसा करणाच्या व्यक्तीविषयी जे काही म्हणून ठेवलं आहे, ते विजयाबाईंना ठाऊक नसेल असं नाही. पण 'समजतं पण उमजत नाही,' अशी त्यांची सध्याची स्थिती असावी. जे इतरांनी म्हणायला हवं ते त्या स्वतःच म्हणताहेत.

आपली विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच महाराष्ट्रात इतकं वादंग का माजावं, अध्यक्षपदाच्या निवडीमागचे निकष कोणते,' अशी विचारणा जाणकारांच्या वर्तुळातून का व्हावी, याचा विचार विजया वाड यांना करावासा वाटत नाही. 'आपल्याविषयी आपण म्हणतो तेवतं खरं' असं त्यांना वाटावं हे समाजाच्या दृष्टीनेही दुर्दैवाचं आहे. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा न ओळखणं यासारखं अज्ञान नाही.

विजयाबाईंनी लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली आहेत आणि मोठ्यांसाठीही पुस्तकं लिहिली आहेत. ती सगळी एकत्र मिसळली तर त्यातील लहानांसाठीची पुस्तकं कुठली आणि मोठ्यांसाठीची पुस्तकं कोणती, हे म्हणे ओळखता येत नाही. वाडबाईंच्या नेमणुकीवर अशाप्रकारचे विनोद आता ऐकू येऊ लागले आहेत. पदावर काम करायला विनम्रपणे नकार देऊन वाडवाईंना हे टाळता आलं असतं. याडवाईची नेमणूक कुणी कशी केली, याची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. आपल्या नेमणुकीवर संशय व्यक्त केला जातो आहे हे कुणा स्वाभिमानी साहित्यिकाला रुचेल?

या निवडीच्या वादात 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपादकांनी थोडा वेगळा सूर लावला आहे. ते म्हणतात, 'विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी कोण असावा, हा मुद्दा खरंच इतका महत्त्वाचा आहे का?... 99 टक्के जनतेला असं काही मंडळ आहे आणि ते विश्वकोश नावाची ग्रंथाची मालिका प्रसिद्ध करते, हेही ठाऊक नाही... सामान्यजनांच्या दृष्टीनं या मंडळाला कुणी अध्यक्ष असला कार्य किंवा वाडबाई त्या खुर्चीत बसल्या काय, त्यामुळे फरक पडत नाही. अशा पदाच्या वादात जनतेला काय स्वारस्य ?" 

महाराष्ट्र टाईम्सकारांचं खरं आहे. विश्वकोशाच्या अध्यक्षापेक्षा 99 टक्के जनतेला क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत. यात अधिक स्वारस्य आहे. 99% जनतेला माहीत नाहीत किंवा माहीत करून घेण्यात मतलब वाटत नाही, अशा इतरही काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण आहे? हे मंडळ काय काम करते? जागतिकीकरण म्हणजे काय? त्याचे आपल्या देशावर कोणते परिणाम होणार आहेत? जागतिक बैंक म्हणजे काय? या बँकेनं कोणत्या जाचक अदी देशावर घातल्या आहेत?

सुदैवानं, एखाद्या संस्थेचं आणि त्या संस्थेसंदर्भातल्या नव्या निर्णयाचें महत्त्व 99 टक्के लोकांना त्यात स्वारस्य आहे. किंवा नाही, यावर ठरत नाही. अंधश्रद्धाविरोधी विधेयकात बन्याच सुधारणा करून विधानसभेनं ते मंजूर केलं आहे. या दुरुस्त्या कोणत्या किंवा प्रस्तावित विधेयकात काय होतं ? 99% लोकांना हे जाणून घेण्यात स्वारस्य नाही. वास्तविक या कायद्याचा लक्षणीय परिणाम समाजजीवनावर होणार आहे; पण समाजाला याचं नीटसं भान नाही.

विश्वकोश है ज्ञानसंचयाचें एक महत्त्वाचं साधन आहे. माहितीयुगाचे गोडवे गाणाच्यांना या प्रकल्पाचे महत्त्व का समजू नये ? माहिती- तंत्रज्ञानाची जोड या प्रकल्पाला मिळावी हे काम अधिक गतीनं व्हावं, असं वाटत असेल तर या कामाची सूत्रं बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ व्यक्तीच्या हाती जातील, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदार्थी निवड इतकी महत्त्वाची आहे का?' असा प्रश्न विचारणं म्हणूनच सूज्ञपणाचें ठरत नाही. मात्र असा प्रश्न विचारणान्यानंही आग्रह धरला आहे, की वाडवाईची निवड करताना कोणते निकष लावले हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. विजया वाड यांच्या बौद्धिक क्षमतेविषयी संशय असल्यानं हे आक्षेप घेतले जात आहेत. त्या कदाचित आपली क्षमता सिद्ध करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊही शकतील.

पण आज विजया वाड यांना अध्यक्षदावर नेमलं, उद्या मुरलीमनोहर जोशी, के.सुदर्शन किंवा नरेंद्र महाराज यांच्या जातकुळीतल्या व्यक्तीला शासनानं विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी बसवलं तर? 99 टक्के लोकांना या नेमणुकीचं सोयरसुतक नाही म्हणून गप्प बसायचं?

या सगळ्या वादाच्या निमित्तानं विश्वकोश मंडळाची आर्थिक दैन्यावस्या, नोकरशाहीमुळे मंडळाच्या प्रशासनात येणारे अडथळे इत्यादी मुद्दे पुन्हा चव्हाट्यावर आले. साधनांच्या आणि मनुष्यशक्तीच्या अभावामुळे रा.ग.जाधव सरांसारख्या विद्वानांना अध्यक्षपद सोडावं लागलं.

नेमणुकीवद्दल ओरड करणाच्यांनी याबद्दल ओरड करायला हवी. व्यक्ती कितीही कर्तबगार असली तरी अशा बकाल वातावरणात ती आपली सक्षमता कशी काय सिद्ध करू शकणार?

विजयाबाईच्या बौद्धिक कुवतीवर शेरेवाजी करणारे या दुरवस्थेवह्दल आवाज उठवताना आढळत नाहीत. अशावेळी सर्वसाधारण बाङ्मय- प्रेमिकांवर सर्व जबाबदारी येऊन पडते. तेव्हा, तात्कालिन समस्यांचं भांडवल करून वादंग माजवणाच्या प्रसारमाध्यमांवर विसंबून न राहता साहित्यप्रेमींनी विश्वकोश मंडळाच्या कामकाजात आमूलाग्र सुधारणा करण्याची मागणी लावून धरली पाहिजे.

मध्यम वकूबाची माणसं आज अनेक क्षेत्रात उच्चपद भूषविताना दिसतात. या  मंडळींना पुढंपुढं करायची सवय असते, हे त्याचे एक कारण झालं. चांगल्या बकूबाच्या मंडळींना मागं मागं राहण्याची सवय असते, हे त्याचं दुसरं कारण आहे. अनेक राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री होण्याऐवजी विरोधी पक्षाचा नेता बनून शासकीय निर्णयावर सतत हल्ला चषवणं अधिक आवडतं. साहित्यक्षेत्रातही जबाबदारीची भूमिका टाळून आजन्म टीकाकार म्हणून राहणे बरेचजण पसंत करतात. टीका आणि शेरेबाजीपेक्षा विधायक सूचनांची आज गरज आहे.

अध्यक्षपदासाठी व्यासंगी साहित्यिकांची नेमणूक करून कार्याध्यक्ष म्हणून उत्साही ग्रंथप्रेमीची निवड केली तर कोशनिर्मितीला चालना मिळू शकेल. रूपारेल महाविद्यालयावे ग्रंथालयप्रमुख प्रदीप कर्णिक, संदर्भव्यवस्थापन, सूची- प्रकाशनशास्त्रात पारंगत मानले जातात. त्यांचे किंवा त्यांच्या तोडीच्या इतर कुणाही कर्तबगार व्यक्तीचे नाव या पदासाठी सुचवता येईल.

आजच्या जमान्यात स्वतःच्या कर्तबगारीविषयी कमी बोलणारी माणसं अध्यक्षपदासाठी शोधणं कष्टाचं काम आहे, पण हे कष्ट शासनाला घ्यावे लागतील.

अर्थात विश्वकोश मंडळाच्या कामकाजाचं आधुनिकीकरण, कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा यांसारख्या गोष्टी होणार नसतील तर, मंडळाच्या अध्यक्षपदी व्यासमुनींना नेमले काय किंवा डॉ.विजया वाड यांना नेमले काय, फरक काहीच पडणार नाही.

नाहीतरी 99 टक्के जनतेला अशा गोष्टींचं सोयरसुतक नाही. सौरव गांगुलीला संधात घेताहेत की घेत नाहीत, याकडे तिचे डोळे लागले आहेत.

Tags: अवधूत परळकर व्यासमुनी अवतरले तरी… विश्वकोश मंडळ डॉ.विजया वाड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके