ब्राह्मणको शूद्रका नींद में पैर लगना आणि मग दस्तानायक म्हणू लागला, आम्ही जर उठलो नसतो, तर याने त्याला जीवे मारले असते. दस्तानायकाच्या या वाक्याने मी बेचैन बनलो. लालताला विचारले, क्या हुआ बेटे! तेव्हा रागाने लाल झालेला लालता म्हणाला, गुरुजी मैं जब जाग उठा तो ये हरामीका पैर मेरे पैरको स्पर्श करता था। हमारे पैरको सब हाथ लगाते हैं। और ये कमीनेका पैर लगा।
मध्यप्रदेशात रीवाला राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात मध्यरात्री शिबिर कचेरीचा दरवाजा खटखटला गेला, नि गुरुजी अशी काहीशी भेदरलेल्या आवाजातील हाक कानी आली. कंदिलाची वात वर केली. घड्याळाचा काटा 2 वर होता. दार उघडले. दस्ता नं. 6 चा दस्तानायक 2 सैनिकांना धरून आत घुसला नि म्हणाला, गुरुजी! ये लालता प्रसाद बढीके सीनेपर बैठकर जुसको बेरहमी से मार रहा था। तब बहीने मुझे चिल्लाकर पुकारा। हम सब सैनिक जाग उठे। पहले लालता प्रसादको सर्वाने हटाया, बद्री बिलकुल बेचैन हुआ था। कुछ क्षणके बाद बदीसे पूछा, क्या हुआ? असने कहा, कुछ नहीं, मैं नींदमें ही था, तब लालता प्रसाद मेरे सीनेपर बैठकर मुझे मार रहा था। सब अच में आ गये। तब लालता प्रसादको पूछा, क्या हुआ ? तब असने गुस्सेसे कहा - ये हरामी शुद्रेने नींद में मेरे पैरको पैर लगाया। तब हमारे समझमें आया कि ब्राह्मण लालता प्रसादको नींद में बढीका पैर लग गया यह उसका गुनाह था।
ब्राह्मणको शूद्रका नींद में पैर लगना आणि मग दस्तानायक म्हणू लागला, आम्ही जर उठलो नसतो, तर याने त्याला जीवे मारले असते. दस्तानायकाच्या या वाक्याने मी बेचैन बनलो. लालताला विचारले, क्या हुआ बेटे! तेव्हा रागाने लाल झालेला लालता म्हणाला, गुरुजी मैं जब जाग उठा तो ये हरामीका पैर मेरे पैरको स्पर्श करता था। हमारे पैरको सब हाथ लगाते हैं। और ये कमीनेका पैर लगा। मी त्याला म्हटले, अरे त्याने मुद्दाम नाही लावला, झोपेतच लागला ना! तेव्हा तो चिडून म्हणाला, ये शूद्र नींद क्यों लेते हैं! मी सर्दच झालो. म्हटले, कुठे पाय लागला! त्याने पोटरीची जागा दाखविली. ती जागा दस्तानायकाला पाण्याने धुवायला सांगितली, तेव्हा लालता प्रसाद जरा शान्त झाला.
त्याला ब्राह्मण, शुद्ध, व सेवा दल समाजावले. नाइलाज म्हणून त्याने मानले नि तो निवासस्थळी गेला. सेवा दलाला नवसमाज निर्मिती करताना किती दिव्यातून जावे लागेल याची कल्पना आली. बद्रीला माझ्याजवळ घेऊन झोपलो. खूपच भेदरला होता तो. म्हणत होता, गुरुजी, मेरी बहुत बड़ी गलती हुई. मुझे माफ करो। मी त्याला समजाविले, अरे, तुझा काहीही दोष नाही. तरीही तो म्हणत होता- मी शूद्र आहे-
मनात आले- कुठे स्वातंत्र्य!
कुणा स्वातंत्र्य!
शिबिरातील हा अनुभव आहे.
Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 राष्ट्र सेवा दल मध्यप्रदेश शूद्र निफाड बा. य. परीट Dasyamukti Special Issue 1970 Rashtra Seva Dal Madhya Pradesh Shudra Niphad B. Y. Parit weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या