डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोतवालवाडी ट्रस्ट आदिवासी वसतिगृह, नेरळ, या संस्थेच्या मित्रांनी व आश्रयदात्यांनी आत्यंतिक सामाजिक जाणीव व मानवतेवरील उत्कट प्रेमामुळे वसतिगृहाला गेल्या शैक्षणिक वर्षांत उदार हस्ते मदत केली व वसतिगृहाचा प्रपंच 13 जून 1993 पासून सुरू झाला व आजतागायत तो सुव्यवस्थितपणे चालू आहे हे कृतज्ञतापूर्वक आम्ही या ठिकाणी नमूद करीत आहोत.

कोतवालवाडी ट्रस्ट आदिवासी वसतिगृह, नेरळ, या संस्थेच्या मित्रांनी व आश्रयदात्यांनी आत्यंतिक सामाजिक जाणीव व मानवतेवरील उत्कट प्रेमामुळे वसतिगृहाला गेल्या शैक्षणिक वर्षांत उदार हस्ते मदत केली व वसतिगृहाचा प्रपंच 13 जून 1993 पासून सुरू झाला व आजतागायत तो सुव्यवस्थितपणे चालू आहे हे कृतज्ञतापूर्वक आम्ही या ठिकाणी नमूद करीत आहोत. प्रगतीतील पुढचे पाऊल म्हणून आम्ही 1994-95 या शैक्षणिक वर्षात वसतिगृहात एकूण 35 मुलांना प्रवेश दिला आहे. (गेल्या वर्षी 22 मुले या वसतिगृहात होती हे आपणास माहीत आहेच). वसतिगृहातील उत्तम देखभाल व चांगले चाललेले काम पाहून या वर्षी पंचक्रोशीतील आदिवासींनी आपल्या मुलांना वसतिगृहात दाखल करण्याकरिता गर्दी केली होती. परंतु एकूण परिस्थिती पाहता आम्ही फक्त 35 होतकरू मुलांनाच प्रवेश देऊ शकलो.या मुलांना अत्यंत साधा पण सकस आहार , वैद्यकीय सेवा व योग्य त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे व आकाशास भिडलेल्या महागाईमुळे वसतिगृहाचा सरासरी मासिक खर्च हा आता रु. 15000/ च्या घरात पोचला आहे. काही हितचिंतक व विश्वस्तांनी सुरुवातीसच जवळजवळ वर्षभराची देणगी (म्हणजे रु. 2400/- ते 5000/-) दिल्यामुळे व आम्हीही अतिशय काटकसरीने व योग्य तोच खर्च करीत असल्यामुळे गाडा अजूनपर्यंत व्यवस्थित चालू शकला, परंतु हा न संपणारा प्रवास असल्यामुळे व सतत वाढत्या महागाईमुळे आश्रयदात्यांनी उदार हस्ते व जाणीवपूर्वक दिलेली देणगीही आता पूर्णपणे खर्ची पडली आहे.

भावी काळात या वसतिगृहात किमान 100 आदिवासी मुलांची सोय करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे व त्याकरिता कोतवालवाडीवर येत्या 2 ऑक्टोबर 1994 पासून म्हणजे गांधीजयंतीपासून एका नवीन इमारतीच्या बांधकामास आम्ही सुरुवात करणार आहोत व या ठिकाणी वसतिगृह, वाचनालय, कुटुंब सुरक्षा केंद्र, व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षणाची शाळा, पर्यावरणावरील शिक्षणाची शाळा व इतर अनेक आदिवासी विकास कामांचे केंद्र स्थापन करणार आहोत.

2 वर्षानंतर वसतिगृहास अपुरे का होईना परंतु काही सरकारी अनुदान मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी वसतिगृहाच्या दैनंदिन खर्चासाठी व इतर विकास कामांसाठी निधीची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे.

आतापर्यंत आमच्या आश्रयदात्यांनी व हितचिंतकांनी वसतिगृहाला दिलेले सहकार्य व द्रव्यसाहाय्य फार मोठे व मोलाचे आहे. त्याचा अत्यंत कृतज्ञापूर्वक उल्लेख करून व त्यांचे मनःपूर्वक आभार मानून 'साधना’ परिवारातील सर्वांना नम्र आवाहन व विनंती करीत आहोत की त्यांनी हे सहकार्य असेच पुढे चालू ठेवावे व वसतिगृहाकरिता व नवीन होणाऱ्या इमारतीकरिता उदार हस्ते देणग्या पाठवाव्या.

या देशात 7/8 टक्के आदिवासी आहेत व त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे. एक प्रकारे वंचित व अतिशय निकृष्ट दर्जाचे जीवन ते जगत आहेत. अज्ञानात बुडालेल्या या आदिवासींना गर्तेतून बाहेर काढण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच ती तुमची- आमचीही आहे, नव्हे ते एक कर्तव्य आहे.

नवीन इमारतीचा आराखडा पाहण्यासाठी व वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी आपण वेळात वेळ कातून, पूर्वसूचना देऊन कोतवालवाडीला भेट दिल्यास आम्हाला व वसतिगृहातील मुलांना अतिशय आनंदच होईल.

देणगीचे धनादेश कोतवालवाडी ट्रस्ट, अकाऊंट-होस्टेल (Kotwalwadi Trust A/c Hostel) या नावाने पाठवावे.

बाळ बर्वे
वसतिगृह संचालक 24 सहवास, 
कीर्ती कॉलेज जवळ,
दादर , मुंबई 400 028 
दूरध्वनी : 4375243

पुणे संपर्क 
श्री. आप्पासाहेब फडणीस 
गुजरात कॉलनी, आत्रेय सोसायटी
बिल्डिंग 'डी' कोथरूड,
पुणे 411 029 
दूरध्वनी : 369106

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके