आम्ही दोघे आणि ते असे तिघे सायकलवरनं निघालो. वाटेत मधेच एका शेतात शिरलो. तिथल्याच एका खोपटातनं तिघांच्या हॅवरसेंक्स हातबांबने भरल्या. सायकलला पिशव्या लावल्या. हैदराबाद चळवळीसाठी आम्ही हा मसाला अशा प्रकारे पुण्यापर्यंत आणला.
श्री लालजी कुलकर्णी यांना माझ्या स्मरणाप्रमाणे 1945 साली राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर मी प्रथम पाहिले.
महाराष्ट्र कटातला प्रमुख आरोपी आणि हातात तपकिरीची चिमूट धरावी इतक्या सहजपणे हातबांब धरणारा धाडसी तरुण असा त्यांच्याविषयीचा ठसा माझ्या मनावर उमटलेला होता आणि तो अखेरपर्यंत तसाच राहिला.
शहरप्रमुख या नात्याने त्यांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही वागत असू. पण त्यातही लालजींनी जिव्हाळा निर्माण केला होता.
एकदा मला आणि केशव पांदरेला लालजी म्हणाले, 'दोन हॅवरसेंक्स घेऊन या. देहूहून यायचंय्.'
आम्ही दोघे आणि ते असे तिघे सायकलवरनं निघालो. वाटेत मधेच एका शेतात शिरलो. तिथल्याच एका खोपटातनं तिघांच्या हॅवरसेंक्स हातबांबने भरल्या. सायकलला पिशव्या लावल्या. हैदराबाद चळवळीसाठी आम्ही हा मसाला अशा प्रकारे पुण्यापर्यंत आणला.
लालजी सांगतील ते करावे ही आमची भावना, तर सांगू ते काम आम्ही बिनबोभाट पार पाडू असा त्यांना विश्वास होता.
सार्वजनिक जीवनातली महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सर्वात प्रथम लालजींनीच सोपवली.
लालजी पुष्कळदा कठोर नव्हे तर लागट बोलत. पण ते व्यक्तिनिरपेक्ष असे, हे त्यांच्या अगदी जवळ वावरणाऱ्यांच्याच लक्षात येई. त्यामुळे त्यांच्या मनात कुणाहीविषयी द्वेष अथवा मत्सर नसे.
त्यामुळेच मृत्युसमयी लालजींचे कोणीही हितशत्रू नव्हते. होते ते सर्व मित्र आणि हितचिंतक.
पदाची लालसा न धरता, त्यांच्या त्या ऐतिहासिक सायकलीप्रमाणे ते यंत्रासारखे काम करत राहिले.
आयुष्यात लालजींचा एकदाच पष्ठ्यद्विपूर्तीचा समारंभ झाला आणि तोच अखेरचा ठरला!
कदाचित लालजींना गौरव सहन झाला नसावा!
वरून कठोर भासणारे लालजींचे व्यक्तिमत्त्व अंत:करणात किती हळुवार होते त्याचा अनुभव मिळणे ही आयुष्याला मिळालेली केवडी मोलाची देणगी होती हे मला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनाच ठाऊक!
Tags: महाराष्ट्र हैदराबाद चळवळ देहू राष्ट्र सेवा दल Maharashtra.लालजी कुलकर्णी Hyderabad Movement Dehu Rashtra Seva Dal Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या