डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारत जोडो अभियान : मुक्काम पुणे

...

पुणे येथे ! ‘भारत जोडो' अभियानाचे आगमन 5 फेब्रुवारीस झाले. यवतहून हडपसर येथे ते आले, तेव्हा सर्वश्री महापौर दत्ता एकबोटे, उपमहापौर सुरेश नाशिककर, ज्येष्ठ नेते एस. एम्. जोशी, नानासाहेब गोरे भाई वैद्य, नगरसेवक, पत्र प्रतिनिधी, प्रभुतींनी त्यांचे स्वागत केले.

हडपसरच्या डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात जाऊन श्री. आमटे यांनी वृक्षारोपण केले. अभियानातील सायकलपटूंसमवेत उघड्या जीपमधून मुक्कामासाठी जाताना हजारो पुणेकरांच्या उत्स्फूर्त स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.

पोलिस परेड ग्राउंडच्या विद्यार्थी सहायक समितीच्या युवक मेळाव्यात बोलताना श्री. आमटे यांनी, 'जनजीवन प्रत्यक्ष पाहून युवकांत अस्वस्थता निर्माण झाली व त्यांनी एकादे कार्य घेतले, तर अभियानाचा उद्देश सफल झाला असे मी समजेन' असे हृद्गत व्यक्त केले. बँक ऑफ बडोदाच्या अधिकारी संघटनेतर्फे यावेळी अभियानास पाचशे एक रु. ची देणगी देण्यात आली.

सायंकाळी शनिवारवाडयावर पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन श्री. आमटे यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांतर्फे गांधीजींनीच आपल्याला अभयसाधक' म्हणून गौरविले आहे. आनंदवनातले हिरवेगार लावण्य आणि त्यामा गील परिश्रमाची झेप पाहिली की, धट्याकट्यांनाही शरमून जायला होते. आपण जी स्वप्ने पाहिलीत, ती साकार करण्यास पुरुषार्थाचा श्रमयज्ञ मांडलात, त्यामध्ये आपला हबिर्माग देण्यास सगळे कुटुंबीयाच आपल्यामागे उभे राहिले... (मानपत्रातून)

यावेळी 75 हजार रुपयांचा निधी श्री. आमटे यांना अर्पण करण्यात आला. तसेच ज्योतिषी कैं. नीलकंठ शिवराम गोखले यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पुतणे श्री. नाना गोखले यांनी 25 हजार रु. ची देणगी दिली. 

राष्ट्रीय एकात्मतेचा विचार समाजात खोलवर रुजावा म्हणून 'भारत जोडो अभियानानंतर युवाग्राम, कृतिकेंद्र यांच्या व्यापक योजना आखण्याचा मानस श्री. आमटे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (अभियानाची खास वार्तापत्र श्रो. यदुनाथ थत्ते यांच्या रसील्या शब्दांत आपण वाचीत आहोतच. आपल्या हार्दिक शुभेच्छा!)

Tags: आनंदवनातले हिरवेगार लावण्य आणि त्यामा गील परिश्रमाची झेप पुणे भारत जोडो अभियान Anandvanatale Hirvegar Lavanya Pune #Bharat Jodo Abhiyan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके