भूदान यज्ञ आंदोलनासंबंधीचे साहित्य आता बरेच प्रसिद्ध होत आहे परंतु त्याच्या प्रचाराची कार्यक्षम योजना करणे ही पुस्तके प्रकाशित करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ह्या पुस्तिका सर्वत्र मिळू शकतील अशी सोय केली पाहिजे.
भूदान यज्ञ आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता जसजशी वाढत आहे तसतसे त्यासंबंधी वाङ्मयही अधिकाधिक प्रकाशित होत आहे. श्री. सुरेश रामभाई यांनी आपल्या छोट्या पुस्तिकेत सोप्या हिंदीत भूदान यज्ञासंबंधी रसाळपणे माहिती सांगितली आहे. पुस्तिकेची वर्षभरात तिसरी आवृत्ती निघाली आहे यावरून तिच्या लोकप्रियतेची कल्पना येते. जागजागी विनोबाजीच उद्गार गुंफलेले असल्याने भूदानयज्ञाची भूमिका त्याच्याच शब्दात समजते. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ही पुस्तिका विशेष लोकप्रिय ठरली आहे.
भूदान यज्ञ: शंका समाधान ही पुस्तिका मराठीत आहे. आरंभी भूदानयज्ञ आंदोलनाचा संक्षिप्त इतिहास दिला असून नंतर भूदानासंबंधी ज्या ज्या शंका वेगवेगळ्या लोकांकडून उपस्थित केल्या जातात त्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. उत्तरे शक्य तेथे विनोबांची अवतरणे देऊनच दिलेली असल्याने त्यातून आंदोलनाची अधिकृत भूमिका व्यक्त होते. तात्विक व व्यावहारिक अशा उभयविध शंकाना उत्तरे दिलेली आहेत. संपत्तीदान यज्ञाची माहिती अखेरीस दिलेली आहे. शेवटची दोन परिशिष्ठे महत्त्वाची आहेत. महाराष्ट्रातील लोकसंख्या व जमीन आणि महाराष्ट्रातील लागवडीखालच्या जमिनीची विभागणी ही कोष्टके महाराष्ट्रात भूदान यज्ञ आंदोलनाला असलेल्या अवकाशाची कल्पना देतात.
भूदान यज्ञ आंदोलनासंबंधीचे साहित्य आता बरेच प्रसिद्ध होत आहे परंतु त्याच्या प्रचाराची कार्यक्षम योजना करणे ही पुस्तके प्रकाशित करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ह्या पुस्तिका सर्वत्र मिळू शकतील अशी सोय केली पाहिजे.
.............
भूदानासंबंधी दोन पुस्तिका
नाव : विनोबाका संदेश
लेखक : सुरेश रामभाई
किंमत : 2 आणे
प्रकाशक : हिंदभूमी प्रकाशन, मुठीगंज, इलाहाबाद
नाव : भूदान यज्ञः शंका समाधान
किंमत : 2 आणे
प्रकाशक : महाराष्ट्र सेवा संघ, 661 सदाशिव पेठ, पुणे-2
Tags: Bhoodan Movement Bhoodanayagya भूदान आंदोलन भूदानयज्ञ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या