डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

समाजकार्य : विशेष पुरस्कार 
मनोगत । चंद्रकांत केळकर 

अर्थशास्त्राचे अध्यापन आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काही मूलभूत मांडणी करणारे लेखन करणाऱ्या चंद्रकांत केळकर यांचा अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीत मोलाचा सहभाग राहिला आहे. वैचारिक व रचनात्मक या दोनही प्रकारच्या कार्यासाठी आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टकडे असताना त्याची यशस्वी कार्यवाही करून या पुरस्कारांना प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हा विशेष कार्य पुरस्कार देण्यात येत आहे.

माझ्या विशेष कार्याकरता महाराष्ट्र फाऊंडेशनने देऊ केलेला पुरस्कार मी विनम्र भावनेने स्वीकारत आहे. समाजाकडून आलेला पैसा समाजाकडेच परत जावा असे मी मानतो; हे पुरस्काराच्या संदर्भात मी सांगू इच्छितो. खरे पाहता महाराष्ट्र फाऊंडेशनने आजपर्यंत ज्या व्यक्तींना त्यांच्या परिवर्तनशील कामाबद्दल सन्मानीत केले त्याचा विचार करता मी केलेले काम काठावर उभे राहून केलेल्या कामासारखे आहे. फाऊंडेशनने सन्मानीत केलेल्या अनेकांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले अवघे आयुष्य झुगारून दिले. त्यांच्या अशा कार्याचा विचार करता, माझे काम सुरुवातीची बाँबे पोर्ट ट्रस्टमधील नोकरी करून व त्यानंतर प्राध्यापकी करूनच मी करीत आलो आहे. निवृत्तीनंतरची माझी गेली 20 वर्षे मात्र मला माझा पूर्णवेळ देऊन सामाजिक काम करता आले. माझ्या लेखनाचा विचार करता, अर्थसंवाद किंवा पत्रिकेसारख्या वैचारिक नियतकालिकातील माझ्या सुरुवातीच्या लेखनाचे, किंवा अलीकडच्या माझ्या ‘नाणेनिधी’ व ‘पर्यायी लोकवादी व्यवस्था’ या पुस्तकांत मी घेतलेल्या भूमिकेकरता आवश्यक असलेली दृष्टी मला माझ्या समाजकार्यानेच दिली असे मी म्हणेन. विशेषत: महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्था निश्चित करताना त्या त्या व्यक्तीच्या कामाचा जो परिचय होत गेला, त्यातून माझी वैचारिक दृष्टी अधिकाधिक स्पष्ट होत गेली. माझ्या मते, त्यामुळे मी माझ्या अलीकडच्या लेखनात समाज परिवर्तनाच्या नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. महाराष्ट्र फाऊंडेशनचे काम करताना मीही ‘वाढलो’. हे मी सांगणे मला गरजेचे वाटते. हे काम करीत असताना आज आपल्यात नसलेला माधव साठे सध्या मुंबईच्या पाटकर महाविद्यालयात असलेला प्रा.रवी देवगडकर यांच्याशी होत गेलेल्या चर्चाधून हे होत गेले असे मला वाटते.

वैचारिकदृष्ट्या मी लोहियावादी आहे. शू ाकर यांच्या ‘स्मॉल इज ब्युटिफुल’मधील विचार मी मानतो. एकोणिसशे सत्तरीमध्ये गालब्रेथ यांच्या ‘इंडस्ट्रियल स्टेट’ या ग्रंथाच्या निमित्ताने लिहिलेला किंवा ‘क्लब ऑव्ह रो ’च्या ‘लिमिटस्‌ ट्रु ग्रोथ’ या अहवालावर भाष्य करणाऱ्या माझ्या लेखातून माझी लोहियांच्या विचारांशी असलेली बांधिलकी व्यक्त झालेली आहे. किंवा गेल्या मे महिन्यामध्ये प्रकाशित झालेले ‘दुसरे जग शक्य आहे : पर्यायी लोकवादी व्यवस्था’ या माझ्या पुस्तकामध्येही मी हीच वैचारिक दृष्टी ठेवली आहे. भारतातील आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नवीन आर्थिक धोरणानंतर भारतातील सामान्य जनता एक प्रकारे देशी वसाहतवादाला तोंड देत आहे. देशभर उभे राहणारे एस.सी.झेड, खाणी, अणुऊर्जा किंवा औष्णिक वीज प्रकल्प यांतून निर्माण होणारे मनुष्य वस्तीचे विस्थापन व पर्यावरणीय नाश यांच्या रूपाने हा देशी वसाहतवाद प्रकट होत आहे. परंतु त्या विरोधात उभे राहणारे लढे मात्र विखुरलेले, वेगवेगळ्या राहुट्यांध्ये विभागले असल्याचे दृश्य दिसते. त्यामुळे एका बाजूला, शासनाची दंडशक्ती व धनदांडग्यांचे संपत्तीचे बळ, तर दुसऱ्या बाजूला विखुरल्यामुळे विरोधामधील जाणवणारा क्षीणपणा, असे सध्याच्या भारतातील सामान्य माणसाच्या लढ्याचे चित्र दिसते. दक्षिण अमेरिकेधील व्हेनिझुएला, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील यांसारख्या देशात लक्षावधी लोकांच्या उठावातून गेल्या 10 वर्षांत झालेले राजकीय बदल पाहता भारतातील राजकीय आर्थिक लढ्यांधील विखुरलेपण खूपच जाणवते. अशा प्रकारचे विखुरलेपण आपल्या देशात नसते तर नर्मदा बचाव आंदोलन किंवा दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूमध्ये होणारी जनआंदोलने परिणामांच्या दृष्टीने अधिक व्यापक व यशस्वी झाल्याचे चित्र दिसले असते, किंवा सध्याचे उदाहरण घ्यायचे तर जैतापूरच्या प्रकल्पाचा प्रश्न किमानपक्षी 

माझ्या लेखनाचा विचार करता, अर्थसंवाद किंवा पत्रिकेसारख्या वैचारिक नियतकालिकातील माझ्या सुरुवातीच्या लेखनाचे, किंवा अलीकडच्या माझ्या ‘नाणेनिधी’ व ‘पर्यायी लोकवादी व्यवस्था’ या पुस्तकांत मी घेतलेल्या भूमिकेकरता आवश्यक असलेली दृष्टी मला माझ्या समाजकार्यानेच दिली असे मी म्हणेन. विशेषत: महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्था निश्चित करताना त्या त्या व्यक्तीच्या कामाचा जो परिचय होत गेला, त्यातून माझी वैचारिक दृष्टी अधिकाधिक स्पष्ट होत गेली. माझ्या मते, त्यामुळे मी माझ्या अलीकडच्या लेखनात समाज परिवर्तनाच्या नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. महाराष्ट्र फाऊंडेशनचे काम करताना मीही ‘वाढलो’.

संपूर्ण कोकणाचा झाला असता. कदाचित राजकारण व लोककारण यामध्ये आपल्या देशामध्ये झालेली फारकत हेही त्याचे कारण असावे. माझ्यामते या विखुरलेपणाची तीन कारणे असावीत. एक- भारतीय समाजातील जातीव्यवस्थेध्ये अशी एक अंगभूत शक्ती आहे की, जिच्यामुळे संघर्षाकरता आवश्यक असलेली एकजूट, सहोदरी जाणीव, निर्माणच होत नसावी; या शक्तीमुळे फुटून निघण्याची मानसिकता, अलगपणाची जाणीव अधिक प्रबळ होत असावी. दुसरे कारण- सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीकरता बांधलेल्या संघटनांध्ये वापरली जाणारी श्रेणीबद्ध संरचना. ही श्रेणीबद्ध रचना साधारणपणे कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठत्वाशी असते. तिसरे- ‘ज्येष्ठांचे ऐकावे’ या मंत्राचे भारतीयाला मिळणारे बाळकडू हे बाळकडू नवीन विचार निर्माण होऊ देत नाही; व तो झालाच तर त्याला हे बाळकडू मूर्त स्वरूप येऊ देत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी उभ्या राहणाऱ्या संस्था/संघटना व्यक्तीकेंद्री बनत असाव्यात, असे मला वाटते. थोडक्यात, ज्या प्रागतिक विचारांची मी माझ्यापुरती जपणूक करण्याचा प्रयत्न केला, त्या विचारांना भारतात आज बरे दिवस नाहीत. याचे कारण ज्या व्यक्तींनी राजकीय किंवा सामाजिक कामाचे पुढारपण केले त्यांनी आपले काम प्रवाही ठेवले नाही व त्यामुळे त्यांच्या कामाकरता उभ्या केलेल्या संस्था/संघटना हे त्यांचे मठ बनले. माझ्या मते प्रागतिक विचारांच्या सर्व छटांच्या संस्था/संघटनांविषयी हे खरे आहे. सहकारी ग्राहक संस्था, ग्रामीण विकास, ट्रेड युनियन, शिक्षण संस्था या क्षेत्रात मी काम करत असताना अशा मठांचे अस्तित्व माझ्या अनेक वेळा अनुभवाला आले आहे. माझ्या मनातील ही बोच जाहीरपणे व्यक्त केल्याशिवाय मला राहवत नाही. कारण मी व्यक्त करीत असलेल्या व्यथेचा डाव्या चळवळीच्या हिताशीच थेट संबंध आहे. असो. धन्यवाद. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके