आज ठिकठिकाणी दलितांवर वाढते, अमानुष व सर्रास असे अत्याचार सर्वत्र पडताना आपणास दिसताहेत ह्याचे हे मूलगामी कारण होय. आर्थिक संघर्ष तीव्र बनत आहेत, ते हिसात्मक रूप धारण करण्याच्या बेतात आहेत. सामाजिक समतेची लढाई नव्या दमाने लढण्याच्या जिद्दीने चळवळी उभ्या ठाकत आहेत हा गोष्टीचे एक बळकट मूळ येथे सामावलेले आहे.
भोग व उपभोग
स्वातंत्र्य आधी की सामाजिक समता प्रथम, हा झगडा महाराष्ट्राइतका इतरत्र कोठेही लढला गेला नाही. 19 व्या शतकाच्या अखेरीस व 20 व्या शतकाच्या सुरुवातीला हा दृष्टीने महाराष्ट्रात जे मंथन झाले त्याच्या परिणामांचा भोग व उपयोग आजही जे ते घेत आहेत.
पुनश्च हरि: ॐ!
स्वातंत्र्य आले. मोरूचा बाप दसरा उजाडल्यागत मोरुला म्हणाला, 'चल, नवी टोपी घाल, दास्यमुक्तीचे सोने लुटायला जाऊ या.' पण दास्यमुक्ती झाली होती कोठे? 'उजाडले पण सूर्य आहे कोठे?' ह्या ठेक्यात 'पुनश्च हरिः ॐ' म्हणायची पाळी मोरुवर आली!
शोकान्तिका
स्वकीयांच्या हाती सत्ता आली. परकीय चालते झाले. पण दलितांना अस्पृश्यांना, पीडितांना हे 'स्वकीय' आपले समजत होते काय 'तुम्हांला मिळणारे स्वातंत्र्य म्हणजे अखेरीस आम्हांला गुलाम बनवण्याचे, छळण्याचे स्वातंत्र्य ठरेल अशा अर्थाचा इशारा बाबासाहेब बांबेडकर देत असत. तो संपूर्णतः खरा ठरू पाहात आहे. 1923 साली त्यांनी म. गांधीना सांगितले, 'Gandhiji, I have no home-land' (गांधीजी, मला मातृभूमी नाही). आज 47 वर्षांनी त्यांचा मजसारखा एक अनुयायी आतंरवाने ज्या वेळी ह्या देशाला तोच प्रश्न विचारतो की, देश बोधवहो, आम्हांला मातृभूमी नाही, त्यावेळी दास्यमुक्तीच्या चळवळीच्या शोकांतिकेची ढळढळीत ग्वाही मिळते.
स्वातंत्र्याचा आशय
'आम्ही ज्या वेळी स्वातंत्र्य मागत होतो त्या वेळी म. फुले, बाबासाहेब आंबेडकर हे त्या स्वातंत्र्याचा आशय काय असावा है सुनवत होते.' असी प्रांजळपणे कबुली श्री. यशवंतराव चव्हाणांसारखे धुरीण या वेळी देतात त्या वेळी राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक समता ह्या प्रश्नाच्या निरगाठीवर ते बचूक बोट ठेवतात.
प्रलयंकारी अवस्था
मानीव अस्पृश्यांचा- दलितांचा प्रश्न हा काही तरी शिवाशिवीचा प्रश्न आहे असे समजले गेले. परंतु मूलतः हा प्रश्न जित व जेते ह्यांचा होता. हा दस्तूंचा दास्याचा प्रश्न होता. त्यांना सर्व दुष्टीने नागवून, त्यांचे जय (Broken Men) बनवून हर ठिकाणी ते अल्पसंख्य परावलंबी लाचार राहतील अशी योजनाबद्ध व्यवस्था करून त्यांना डांबून ठेवण्यात आले. ते वर डोके काढीत आहेत असे दिसताच त्यांना ठेचायचे, चेचायचे, असा पायाभूत सामाजिक नियम बनला. ही अवस्था व्यवस्था आज तरी बदलली आहे काय? शिक्षण, प्रौढ मतदान पद्धती, औद्योगीकरण- शहरीकरण, आर्थिक समस्येच्या सामाजिक न्यायाच्या चळवळी, दलितांचा मुक्तिसंग्राम आदी कारणांमुळे ह्या व्यवस्थेवर काही तडाखे बसले आहेत हे खरे असले तरी तिचा मूळ ढाचा, चाल ह्यांत विशेष फरक पडलेला नाही. उलट 'जेत्यांच्या हाती अत्याचाराची दडपण्याची- दास्यत्व लादण्याची व टिकवून ठेवण्याची अपूर्व हत्यारे साधने, लोकशाही- विकेंद्रीकरण आर्थिक विकास सहकारी अर्थव्यवस्था आदी मार्गानी, आयतीच येऊन पडल्यामुळे, माकडाच्या हाती नव्हे तर राक्षसाच्या हाती कोलीत नव्हे तर अष्टभुजा देवीच्या हातातील सर्व शस्त्रे अशी प्रलयंकारी अवस्था झाली आहे!
एक बळकट मूळ
आज ठिकठिकाणी दलितांवर वाढते, अमानुष व सर्रास असे अत्याचार सर्वत्र पडताना आपणास दिसताहेत ह्याचे हे मूलगामी कारण होय. आर्थिक संघर्ष तीव्र बनत आहेत, ते हिसात्मक रूप धारण करण्याच्या बेतात आहेत. सामाजिक समतेची लढाई नव्या दमाने लढण्याच्या जिद्दीने चळवळी उभ्या ठाकत आहेत हा गोष्टीचे एक बळकट मूळ येथे सामावलेले आहे.
....असे नसते तर!
ह्या देशातला गोरगरीब समाज धार्मिक वृत्तीचा (Pious) नसता, येथील तत्त्वज्ञानांची व मी (Myths) ची शिकवण व्यक्तिवादी व पारलौकिक नसती, दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची हिकमत यशस्वी झाली नसती, जातिव्यवस्थेच्या रोगाने खुद दलितांमध्येही घर करून फूट पाडली नसती, साधुसंत ते गांधीजी ह्या प्रभावळीने ही शक्ती 'दयाभोळी बनवली नसती, आणि क्रांतीची बंडखोरीची मशाल हाती घेऊनही लोकशाहीची- बुद्ध शिकवणुकीची काल बाबासाहेब आंबेडकरांनी जर देशहितासाठी- मानवतेसाठी- शाश्वत कल्याणासाठी धरली नसती तर भारत देश मागच पेटून आगडोंब बनला असता, बेचिराख झाला किंवा केला गेला असता.
अश्वमेधाचा वारू
ग्रामीण गावगाड्यांची बलुतेदारीची-आर्थिक पद्धती ही सामाजिक विषमतेचे, जन्मजात जातिव्यवस्थेचे आश्रयस्थान बनली हे खरे असले तरी ती गुलामगिरीची पण निश्चित अशी उदरभरण व्यवस्था पददलितांसाठी करत होती. महात्मा फुल्यांच्या बाबासाहेबांच्या नावाने, सामाजिक समतेच्या शिक्षणाच्या चळवळी बनवत्तर बनवून, औद्योगीकरण शहरीकरण ह्यांच्या प्रगतीमुळे ही गाव गाड्याची आर्थिक पद्धती आपण उद्ध्वस्त केली हे चांगले झाले. पण त्यामुळे ज्या सामाजिक सक्ती मोकळ्या झाल्या, जे दलित वर्गीय निर्वासित बनून सैरावैरा हिंडु लागले, शहरांची वाट पुसत झोपड्यामध्ये डेरेदाखल झाले, महार - मांगवाड्याऐवजी गटारीकाठी व गलिच्छ वस्त्यांच्या नरकात येऊन पडले, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न शिल्लक राहिलेल्या व तीव्रतर बनलेल्या प्रश्नाच्या जोडीला शहरी भागातील हा नवा उग्र एकवटलेला असा प्रश्न येऊन उभा राहिला. घरचे झाले थोडे, त्यात व्याह्याने धाडले पोडे असे घडले! बरे, घोडेही मोकळे झालेले, दावा व लगाम तोडलेले, धवाधवा एकत्र जमल्याने पुष्ट बनलेले, आनुवंशिक राग (Ancestral Rage) माथी भडकल्याने बेछूट बनू पाहणारे, आणि अश्वमेधाच्या वारूसारखे जेत्याच्या मुद्रेत व पवित्र्यात उभे ठाकलेले असे आहे.
एक जातीय संस्था
शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि खुद राजकीय क्षेत्रातही एक जातीय संस्था' (One Caste Institutions) असे स्वरूप सार्वजनिक संघटनांचे बनत आहे. समाजाची ही शक्तिस्थाने (Levers of power) जाति व्यवस्थेची पिळवणुकीची नवी आश्रयस्थाने बनत आहेत. जातीच्या वाघाच्या तोंडी सत्तेच्या रक्ताची घट लागत आहे. विषमतावादी समाजव्यवस्था तशीच ठेवून तिच्यावर संसदीय लोकशाही, नियोजनबद्ध अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण, विकेंद्रीकरण आदी नवी मूल्ये व व्यवस्था वरून (लादण्याचा Super impose) करण्याचा जो प्रयोग चालू आहे त्यामुळे भलतेच 'हायब्रीड'- संकरित पीक उपजत आहे. दास्यमुक्तीची ही साधने दास्यत्व लादण्याची व टिकवून धरण्याची पाजळती हत्यारे बनत आहेत.
दास्यत्वाचे विराट रूप
स्वतंत्र भारतातील दास्यत्वाचा प्रश्न आपल्या विराट रूपाचे दर्शन आज घडवत आहे. दास्यमुक्तीला बांधलेल्या साऱ्या राष्ट्रवाद्यांना, स्वातंत्र्यपूजकांना तो आव्हान देत आहे. राजकीय व कदाचित आर्थिक क्रांतिकारकांना (Political and even Economic Radicals), सामाजिक भ्रांतिकारक (Social Tories) ठेवणारी अशी ही आपली भूमी आहे. राजकीय क्रांतिकारक है सामाजिक क्रांतिकारकही बनण्यासाठी आघाडीवर येतात की नाही हे आता बघायचे. काळ मात्र त्यांच्यासाठी थांबायला तयार नाही.
Tags: साधना दास्यमुक्ती विशेषांक 1970 यशवंतराव चव्हाण महात्मा गांधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य दलित दा. ता. रुपवते Sadhana Dasyamukti Special Issue 1970 Yashwantrao Chavan Mahatma Gandhi. Dr. Babasaheb Ambedkar Independence Dalit D. T. Rupate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या