डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दरवेळी काहीतरी वेगळं करायला मला आवडायचं. स्वतःतल्या लपलेल्या शक्यता जाणून घ्याव्यात, असं वाटायचं. 'शापित' नाटकात एका सत्प्रवृत्त मराठीच्या प्राध्यापकाची भूमिका मी केली होती. (माधव मनोहरांना हा साधा सरळ प्राध्यापक फारच आवडला-भावला होता. त्यांनी 'सोबत साप्ताहिकातल्या त्यांच्या 'पंचम' सदरात त्यातील बारकाव्यांची आणि लकबींची एक परिच्छेदभर केलेली स्तुती वाचून मी सुखावलो होतो!) आणि मग 1972 साली आम्ही 'प्रेमकहाणी' नाटक केलं.

माझं पहिलं नाटक जरी रंगायन' सारख्या मातब्बर प्रायोगिक नाट्यसंस्थेत (तेही तेंडुलकरांचं) केलं होतं तरी नंतर मतकरींच्या बालनाट्यांमध्ये माझा चांगला जम बसला होता. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा परिणामकारक रीतीने वठवण्यात मी यशस्वी झालो होतो. धांदरट, चष्मीस, राक्षस-चष्मासूर, देवांचा राजा इंद्र, कडक शिस्तीचे पण भाबडे मारकुटे मास्तर आणि पाताळयंत्री खलनायिका चेटकी अशी भिन्नभिन्न कॅरेक्टर्स केल्यानंतर आणि आमच्या नाटकांच्या प्रेक्षकांना ती खूप आवडल्यानंतर जेव्हा मतकरींच्याच 'सूत्रधार' संस्थेतर्फे (आधी 'शापित' आणि नंतर) प्रेमकहाणी' नाटक करायचं ठरलं,तेव्हा खूप उत्साहाने तालमींना सुरुवात झाली. 

दरवेळी काहीतरी वेगळं करायला मला आवडायचं. स्वतःतल्या लपलेल्या शक्यता जाणून घ्याव्यात, असं वाटायचं. 'शापित' नाटकात एका सत्प्रवृत्त मराठीच्या प्राध्यापकाची भूमिका मी केली होती. (माधव मनोहरांना हा साधा सरळ प्राध्यापक फारच आवडला-भावला होता. त्यांनी 'सोबत साप्ताहिकातल्या त्यांच्या 'पंचम' सदरात त्यातील बारकाव्यांची आणि लकबींची एक परिच्छेदभर केलेली स्तुती वाचून मी सुखावलो होतो!) आणि मग 1972 साली आम्ही 'प्रेमकहाणी' नाटक केलं. एका मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, बुजऱ्या, शरद गोडबोले नामक बँकेतल्या कारकुनाची ती कहाणी होती. लेखक-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी स्वतः नाटककाराच्याच भूमिकेत होते. शिवाय माझी प्रेयसी ललिता - प्रतिभा मतकरी, घरच्यांच्या इच्छेने केलेल्या लग्नाची बायको मंगला - जयश्री बांगर आणि रूमपार्टनर मुकुंदाच्या भूमिकेत रवी पटवर्धन अशी प्रमुख नटमंडळी होती. हा प्रयोग आम्ही राज्य नाट्यस्पर्धेसाठी सादर केला. पण त्याआधी चिंतामणराव कोल्हटकर नाट्यंपर्धेत या नाटकाचा प्रयोग आम्ही केला. 'झीरो परफॉर्मन्स' करावा तसा. तिथे काही अंदाज आला नाही.

माझ्यावर जरा दडपण होतं. बालनाट्यातल्या भूमिकांची शैली, प्रेक्षकांशी संवाद साधण्याची पद्धत जरा वेगळी होती. मुलांच्या उसळत्या प्रतिसादाला सरावलेल्या माझ्यातल्या नटाला संयत आणि नैसर्गिक अभिनयासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवण, व्यक्तिरेखेच्या मागणीप्रमाणेच तिला आदिष्कारित करणं, अतिरेकी अभिनयाचा वापर न करता, मिताभिन्नयाने भूमिका जास्तीत जास्त परिणामकारक करण्याचा प्रयल करणं या गोष्टी अंगी बाणवायच्या होत्या.

'रंगायन मधल्या तेंडुलकरांच्या 'लोभ नसावा ही विनंती', या माझ्या पहिल्या नाटकानंतर अभिनयाचा घाट अलीकडे केलेल्या नाटकांच्या मागणीनुसार आणि प्रेक्षकांच्या रिस्पॉन्समुळे बदलता असण्याची शक्यता होती. 

तालमींमध्येही काही अंदाज घेत नव्हता, कारण नाटकाचा फॉर्म वेगळा होता. म्हटलं तर एका साध्या माणसाची साधी प्रेमकहाणी होती. आयुष्यात योग्य वेळी योग्य ते बोलण्याचं धारिष्टय नसलेल्या एका सशाच्या काळजाच्या तरुणाची कहाणी. पण सादरीकरणाची पद्धत फार वेगळी आणि नवी होती. स्वतः नाटककारच  लोकांसमोर येऊन ती कहाणी मांडत होता. त्याच्याच नाटकातल्या पात्रांशी बोलत होता. त्यांना कधी काही सुचवत होता; तर प्रसंगी त्यांचे निर्णय त्यांनाच घ्यायला मुभा देत होता.

रवींद्र नाट्यमंदिरामध्ये राज्य नाट्यस्पर्धेत गच्च भरलेल्या नाटयगृहात प्रयोग सादर करतेवेळी मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून रत्नाकर मतकरी आणि मी दचकलोच! हा असा आणि एकता प्रतिसाद जरा अनपेक्षित होता.

त्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत 118 नाटकं झाली. 'मेम विदाऊद शॅडोज' ला  पहिलं तर 'घाशीराम कोतवाल' का दुसरं बक्षीस देण्यात आठ, पण वैयक्तिक बक्षीसांची बरसात प्रेमकहाणी' वर  होती. मला उत्कृष्ट अभिनयाच्या रौप्यपदकाबरोबरच मामा पेंडसे  पुरस्कृत सर्वोत्कृष्ट हौशी कलावंताच गणपतराय भागवत  पारितोषिक मिळालं, वृत्तपत्रांमध्येही नाटकाबद्दल, अभिनयाबद्दल बरंच लिहून आलं. पुष्पा भावेंनी कासव' आणि पासव' नाटकातल्या माधव  वाटवेंची आठवण होते', असं लिहिलं होतं. माधव वाटवेंना  (माझ्यासकट) अनेक जण मानायचे. त्यामुळे हे परीक्षण वाचून  छाती फुलली होती! या कौतुकाच्या बाबतीतला अलिप्तपणा त्या वेळी नव्हता. (तो नंतर हळूहळू येत गेला.) त्यामुळे परीक्षणं जवळच्या माणसांना, मित्रांना दाखवणं यात एक आनंद असायचा.

पण एवढं  की, या गोष्टींमुळे माझा आत्मविधास वाढला. बालनाट्याप्रमाणे मोठ्यांच्या नाटकातसुद्धा आपली प्रेक्षकांवर पकड आहे; संचादफेकीचं, मोठयांसाठीच्या विनोदाचं जे टायमिंग असतं ते मला जमतंय; असा विश्वास  वाटू लागला. बालनाटय ते मोठ्यांची नाटकं या प्रवासामधला दोन नाट्यप्रकारांतता बदल, प्रेक्षकांमधला बदल, अभिनयशैली, संवाद साधण्यातला बदल आणि प्रतिसादातमा बदल, पचनी पाडू घेणं गरजेचं होते. हे  त्या वेळी आपोआप झालं, "चेटकी करत असतानाच मी 'शरद गोडबोले' करत होतो. या दोन भूमिकांत काही म्हटल्या काहीही साम्य नव्हतं. आवाजापासून रूप आणि व्यक्तिमत्त्वा पर्यंत  पूर्णपणे दोन वेगळी करेक्टर्स  होती. अगदी दोन वेगळ्या नटांनी (किंवा एका नटाने आणि नटीने) करावीत तशी. 'आता मी शरद गोडबोले  करतोय. इथे संयत अभियन करायचाय.  घेंगळ्या प्रेक्षाकांपर्यंत वेगळ्या प्रकारे पोहोचायचंय.' अशी गणितं मी त्या वेळी जाणीवपूर्वक मांडल्याचे आता आठवत नाही, ते आपोआप झाली होत गेलं. त्यावर विचार नंतर झाला असणार.

माझ्या दृष्टीने माझ्या कारकिर्दीत 'प्रेमकहाणी' नाटकाला विशेष स्थान असण्याचं आणखी एक कारण आहे. ' प्रेमकहाणी ' मध्ये मी पहिल्यांदा, एकाच  नाटकात एकपेक्षा जास्त रोल्स केले. म्हणजे 'मल्टिपल बेअरिंग' चा  प्रयोग यात तीन शब्द होते. वेगवेगळ्या वयाचे, गोडबोले, गोखले आणि गोडसे, तरुण, मध्यमवयीन आणि वृद्ध. (पुढे 'वासूची सासू' आणि 'कलम 302 मध्ये मी दोन भिन्न भूमिका केल्या. 'हसवाफसवी' मध्ये तर तपशीलवार ठरवून सहा संपूर्णपणे वेगवेगच्या व्यक्तिरेखा साकारल्या.) पहिला शरद  गोडबोले नाटकाचा नायक  पूर्ण नाटक व्यापणारा हा रोल वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा, बिनकण्याचा, टिपिकल मध्यमवर्गीय तरुण कारकून, 'अरे' ला 'कारे'   करू न  शकणाऱ्या  माणसांच्या जातीतला, त्याच्या ऑफिसमधल्या ललितेवर  जिवापाड प्रेम करणारा. कोकणात राहणाऱ्या  वडिलांच्या आग्रहाखातर तो ललितेचा  मनोभंग करून रत्नागिरीच्या मंगलेशी लग्न करतो. म्हणजे पत्रिका जुळते म्हणून घरच्यांच्या  इच्छेप्रमाणे त्याला करावं लागतं; आणि  त्याच्या आयुष्याची परवड  सुरू होते. दुसरा शरद गोडबोंले  हा एक सर्वसामान्य प्रेक्षक, नाटक सुरू असताना मध्येच रंगमंचावर येतो आणि 'हे माझ्या मित्राच्या आयुष्यावरचं नाटक आहे. त्याच्या वैयक्तिक भाव-भावनांची लक्तरं तुम्ही चारचौघांत वेशीवर टांगू शकत नाही. मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरेन' असा वाद  लागतो. नाटककार (म्हणजे रत्नाकर मतकरी) त्याला कसंबसं समजावून, 'नाटकाचा शेवट बघा आम्ही कसा करतो,' वगैरे सांगून प्रेक्षकांत पाठवतो. नाटकाचा पहिला  शेवट झाला. (मंगलाचा आजारात मृत्यू आणि शरद-ललिताचं लग्न ) की  हा  प्रेक्षक परत रंगमंचावर येतो  आणि ललिता-शरद याचं पुनर्मिलन झाल्याबद्दल  आनंद व्यक्त करतो. स्वतःची प्रेमात निराशा झाली, पण रंगमंचावर सफल प्रेम पाहून जणू आपलंच प्रेम सफल  झालंय असं समाधान त्याला वाटतं. तो एक्झिट घेतो: व  काही क्षणांत एक वयस्कर प्रेक्षक रंगमंचावर येतो आणि तावातावाने नाटककाराशी वाद  घालू  लागतो. हा शरद गोडसे, याची तक्रार शरद  गोखलेंच्या विरुद्ध असते. त्याचं  म्हणणं असं की, 'तुम्ही आंबून जाणून शेवट बदसतास, शोकांतिकेली सुखांतिका केलीत. मंगलाला मारलंत, ललिताच्या भवाला करारी केलंत, आणि नायक-नायिकेचं मिलन पासून आणत... पण प्रत्यक्ष आयुष्य तुमच्या या परीकथेसारखे  सोपं नसतं. सुंदर नसतं. 'अस म्हणून तो त्याच्या दुर्दैवी कहाणी सांगतो. त्याच्या कहाणीतील खर तर आयुष्यातली ललीता अॅनिमिया  होऊन इस्पितळात हालहाल होऊन मरते. त्याची मंगला जगते. शरदचा मानसिक चालू राहतो. जो नाटककाराला आव्हान देतो की, 'दाखवा, छाती असेल तर असलं नाटक करून दाखवा तुमच्या प्रेक्षकांना. नुसत्या प्रेमाच्या गुळमुळीत कहाण्यापेक्षा ही छाती फाडणारी कहाणी पाहू दे त्यांना. आणि मग शरद गोडसेंच्या आव्हानाचा मान राखून  नाटककार दुसरा वास्तवादर्शी  आणि दु:खद शेवट घडवून आणतो. 'प्रेमकहाणी' नाटकाला असे दोन शेवट होते.

नाटकाच्या शेवटी मामी बरीच धावपळ व्हायची, प्रेशकांतल्या शरद गोखले  आणि शरद गोडसे यांच्या एण्ट्री-एक्झिट्स, त्यांची बेअरिंग्ज, वेगळे आवाज, वेगळे  कपडे आणि जवळजवळ लगेच स्टेजवर ते ते शेवट सादर होताना, त्या शेवटांमधल्या शरद  गोडबोले या नावाचा रोल... एकदा ललिताबरोबर लग्न करून  खोलीत प्रवेश करणारा नायक तर एकदा ललिताच्या हॉस्पिटल बेडपाशी असहापपणे तिला मरताना पाहणारा.

नाटकात शरद गोडबोलेच्या भूमिकेतमागे बरेच प्रवेश होते. आणि दर प्रवेशासणिक कपडयांचे बदली खूप होते. माझी कामाची पद्धत. व्यवस्थितपणा, काहीशी शिस्त या. साऱ्यांचा इथे उपयोग झाला. (काळजी करण्याचा स्वभाव, टेन्शन घेण्याची सवय, हीही कामी आली असावी.) तालमींच्या वेळी  मी माझ्यासाठी एक 'फोल्डर' बनवलं  होतं. (लग्नाच्या आमंत्रणपत्रिका असतात, त्या पेपरचं  आणि त्या आकाराचं.) त्यात अंक आणि प्रवेशाप्रमाणे वेळोवेळी कपड्यात होणारे बदल लिहून  ठेवलेले  असायचे. म्हणजे अंक पहिला,प्रवेश चौथा पिवळा चौकडीचा बुशशर्ट-ब्राऊन पॅण्ट-हातात बॅग-चपला काळ्या. प्रवेश पाचवा-पॅण्ट तीच-बुश शर्ट पांढरा,चप्पला  काढलेल्या खिशात चिठ्ठी... अशा प्रकारे नोंदी असायच्या. हल्ली  सिनेमात असिस्टेंट डायरेक्टर्स 'कस्टम कॉन्टिन्यूइटी' लिहितात तसं. माझ्या दोन प्रवेशांच्या मधल्या वेळात  मी बँककस्टेजला विंगच्या लाकडी पट्टीत खोचून ठेवलेल्या त्या  नजर फिरवत असे.

सध्या आपण काय 'कस्टम' घातलाय ते 'चेक' करत असे. रंगमंचावर सुरक्षित वाटावं, अभिनय सुरक्षीत व्हावा, व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित करता यावं, यासाठी हे उद्योग असत! ऐनवेळी, भराभर प्रवेशागणिक कपडे बदलताना आपण बरोबर कपडे घातलीत  ना',या शंकेची पाल चुकचुकायची  नाही. ही वेशांतर  स्वतःची  स्वतःच करायची असत. पुढे 'हसवीफसवी' नाटकात अगदी कमी वेळात पूर्ण वेगळीच व्यक्तिमत्व एकापाठोपाठ एक केली.  पण त्या वेळी  सगळा 'साज' चढवायला कपडेपट आणि रंगभूषेचे कसलेले लोक होते. म्हणजे  माझ्या स्वभावाचा परिणाम माझ्या कामावर झाला.  रलाकर मतकरी फोल्चरबद्दल, कामाच्या पद्धतीबद्दल इतर कलाकारांना सांगत असे. अगदी काल- परवापर्यंत ते फोल्डर माझ्याजवळ जपून ठेवलं होतं.

एखादी नवी  भूमिका मिळाली की तालमींच्या काळात ती कशी साकारली जाणार आहे. याचं टेन्शन असतंच. पहिल्या प्रयोगाच्या- किंवा सिनेमा असेल तर प्रत्यक्ष शूटिंग सुरू व्हायच्या - आधीच्या दिवसांमध्ये मी  खूप अस्वस्थ असतो. (हे वरून अजिबात दिसत नाही.) मनात, डोक्यात एक प्रकारची निश्चितता, शंका, काळजी, ताण,व्यक्तिरेखा उभी करण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी राहून गेल्याची खंत... अशी अनेक  चक्रं  फिरत-घुमत, भिरभिर असतात. अशा वेळी ही अस्वस्थता कमी करण्यासाठी, काही वाटा सापडण्यासाठी, विचारांना शब्दरूप देऊन, काही मिळतंय का पाहण्यासाठी मी  नोंदी करतो. 

म्हणजे  त्या व्यक्तिरेखेबद्दलची माझी मतं, सादरीकरणातले काही आडाखे, अभिनयातल्या काही हेरून ठेवलेल्या जागा, व्यक्तिरेखेची स्वभाववैशिष्टय, तालमींच्या दरम्यान पडलेले  काही प्रश्न, शंका असं काहीबाही मी नाटकाच्या स्क्रीप्टवर, कार्डावर, छोट्या डायरी विपरीत लिहून ठेवतो. त्या भूमिकेत शिरणं सोप जावं, ती 'परकाया', उलगडावी  स्वत:ला  जरा स्थेर्य, शांतता लाभावी यासाठी सगळं असतं- असावंच. 'प्रेमकहाणी'च्या वेळी ती  स्क्रिप्ट, ते नोंदी -- टिपणार्थ कार्ड सतत माझ्याजवळ असे.

या नाटकातल्या एका प्रवेशात लग्नानंतर शरद त्याच्या बायकोला घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जायला निघतो. (त्याला जायचं असतं हनीमूनसाठी माथेरानला पण बायकोचा आग्रह अंबाबाईचं दर्शन घेण्याचा!) तेव्हा रेल्वेच्या डब्यातला एक सीन होता- शरद नव्या बायकोशी सूर जुळवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या कलानं घ्यायचा प्रयत्न करतोय, पण ती मुळातच भयंकर तुसडी आहे. या संपूर्ण दृश्यात आम्ही चालत्या गाडीत बसल्याचं 'मायमिंग' करायचो. दृश्य सुरू होण्याआधीच्या ब्लॅक आऊटमध्ये बॅकस्टेजची मंडळी स्टेशनवरचं सामान उचलून आत न्यायची. रेल्वे डब्याच्या प्रवेशासाठी आम्हांला फक्त बाक असे. मी आणि जयश्री (मंगला) आगगाडीत आपण जसं हलतो तसं हलत अख्खा प्रवेश करायचो. गाडीच्या गतीचं, बदलत्या वेगाचं, खडखडाटाचं भान ठेवून. मधेच मी वरच्या बर्थवरून सामान काढतोय, तोल जातोय, झोकांड्या खातोय, मधेच खिडकीबाहेर बघतोय. मनातल्या भासामधल्या ललिताशी बोलतोय. (मागच्या लेव्हलवर ललिता अंधुक उजेडात उभी असायची.) मंगला फटकून वागतेय... असं सगळं मायमिंगने सादर केलं होतं. प्रॉपर्टी किंवा रेल्वे डब्याचा सेट नसताना. असा प्रकार यापूर्वी कधी नाटकात पाहिल्याचं आठवत नाही' असं एका ज्येष्ठ नाट्यसमीक्षकाने लिहिलं होतं.

'प्रेमकहाणी' मधली धावपळ, नायकाच्या भूमिकेबरोबरच करायच्या असलेल्या आणखी दोन व्यक्तिरेखा हे कमी होतं म्हणून की काय, या नाटकात मी माऊथ ऑर्गन वाजवायचो! तेसुद्धा चोरून. ती एक गंमत होती.

[क्रमशः]

Tags: शरद गोडसे  घाशीराम कोतवाल मेन विदाउट शॅाडोज लोभ नसावा ही विनंती शरद गोडबोले प्रतिभा मतकरी रंगायन दिलीप प्रभावळकर shard godse ghashiram kotval men without shadows lobh nasaavaa hi vinati shrad godbole pratibha matkari rangayan premkahani dilip prbhavalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दिलीप प्रभावळकर,  मुंबई

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके