डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"दुष्काळ हटवू : माणूस जगवू" पदयात्रा का, कशासाठी?

पदयात्रा का, कशासाठी?
भूक' ह्या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतला आहे?
उपास नाही, भूक?
आतडं पिळवटून टाकणारी भूक ?
इच्छा म्हणून उपास करणं वेगळे, आणि नाईलाज म्हणून मुकेलं राहाणं
फार वेगळं.
आपल्याला शरम वाटावी अशी गोष्ट आहे.
महाराष्ट्रात एक कोटी लोक भुकेनं व्याकूळ आहेत: उपाशी आहेत. 
माणसं जेव्हा उपाशी असतात तेव्हा फक्त अन्नाचा तुटवडा असतो असं नाही. पाणी नसतं,
हाताला काम नसतं, न्याय नसतो.
दुष्काळानं उभं राहण्याची शक्ती नसते. 
लाज वाटावी अशी ही गोष्ट आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात मान खाली घालावी अशीच ही परिस्थिती आहे.

दारिद्र्याचे दुष्टचक्र

महाराष्ट्रात एक कोटी लोक भुकेले आहेत, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच लाज आणणारी आहे. एक कोटी लोकांना वर्षात 200 दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरेसं जेवायला मिळत नाही, असा त्याचा अर्थ आहे.

ही 'भूक' का आहे ?

शेती एका विलक्षण संकटात आहे. उत्पादनखर्च आणि विक्री यांचा मेळ लागत नाही. कर्जबाजारीपणा वाढतो आहे. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळत राहील ह्याची शाश्वती नाही.

पाण्याची बोंब आहे. सततच्या उपशान जमिनीतील पाण्याची पातळी खाली चालली आहे. त्यामुळे पाणी उपसून शेतीसाठी वापरणं परवडणारं नाही.

पिण्याच्या पाण्याचंही तसंच आहे. वस्ती तेथे शुद्ध पाण्याचा पुरवठा नाही. अशुद्ध पाणी प्याल्यानं आरोग्यावरचा खर्च वाढतो. आधीच तुटपुंजी कमाई, पण त्यालाही त्यामुळे भोक पडतं.

शेतीच संकटात तर खाणार काय? खरं म्हणजे महाराष्ट्रात रोजगाराची हमी दिली आहे. पण तरीही लाखो लोक रोजगाराच्या शोधार्थ बायका-मुलांसह वणवण फिरतात.

आणि ह्या अवस्थेत एखादं वर्ष कमी पावसाचं गेलं की संपलंच.

भूक, गरिबी आणि बेरोजगाराच्या दुष्टचक्रात महाराष्ट्रातील एक कोटी लोक सापडले ते असे. माणुसकीला काळिमा फासणारी तर ही बाब आहेच, पण हा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे ही चिंतेची गोष्ट आहे.

करायचं काय?

ह्या प्रश्नाला जे उत्तर शोधायचं ते व्यापक असलं पाहिजे आणि स्थानिक गावपातळीवर सुयोग्य आणि नेमकं असायला हवं. दारिद्रय निर्मूलनाचे काम फक्त सरकारचं नाही. 

पण हे करणार कोण?

प्रत्येक गावागावांत, वस्ती-तांड्यावर शहाणी माणसं आहेत. त्यांना काय करायचं माहीत आहे. त्यांना शोधायचं, ओळखायचं आणि जोडायचं. त्यांचं ऐकायचं, त्यांच्याशी मैत्री करायची; नियोजन करायला मदत करायची; शासकीय योजनांशी जोडून द्यायचं; तंत्रज्ञानाचं, नव्या माहितीचं साहाय्य करायचं.

पण, ही माणसं, ही गार्व सापडणार कशी?

एखादा आदेश काढून किंवा पत्रक काढून ह्या गावांशी आपली ओळख होणार नाही. त्याकरिता त्यांच्याकडेच गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे, त्यांच्याबरोबरच रहायला पाहिजे. म्हणून पदयात्रा. 

पण, पदयात्राच का?

लोकांमध्ये जास्तीत जास्त राहण्यासाठी पदयात्रा. गाडीत बसलं की लोकांचा संपर्क तुटतो. रहायला दुसरीकडे गेलं की निवांत बोलणं होत नाही, म्हणून पदयात्रा.

शिवाय, सामान्य माणूस चालतो. पाच-पाच किलोमीटवरवरून बाई पाणी आणते, ती ही चालतच, चालण्यानं पाय जमिनीवर राहतात. मुलं शाळेत जातात चालत. बेरोजगार काम शोधत वणवण फिरतात तेही चालतच. आई आजारी मुलाला कडेवर घेऊन दवाखान्यात चालतच जाते. चालणं प्रकृतीला चांगलं. चालणं नैसर्गिक, वाहनं आत्ता आली, त्यागोदर माणूस चालतच होता. चालण्यात माणूसपण आहे. म्हणून पदयात्रा.

पदयात्रा कधी, कुठे आणि कशी निघणार?

  • पदयात्रा 1 जानेवारीला बीड जिल्ह्यातील आष्टीजवळच्या कासारी गावातून निघेल.
  • नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्यकिरणाला साक्षी ठेवून आणि दोन महिने सलग चालून 28 फेब्रुवारीला सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे संपेल.
  • एकूण 9 जिल्ह्यांतील 58 गावांत पदयात्रेचा मुक्काम असेल. सुमारे 900 किलोमीटर अंतर पदयात्रा पूर्ण करेल आणि रोज 15 ते 20 किलोमीटर चालणं राहील.
  • साधारण योजना अशी आहे की, पहाटे पाचला चालणं सुरू करून दहा वाजेपर्यंत चालायचं आणि जिये पडाव टाकायचा, त्या गावात पोचायचं. मग दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत त्याच गावात मुक्काम. 

पदयात्रा काढतंय कोण? संयोजन कोण करत आहे?

पदयात्रा कुठल्याही एका माणसाची नाही. एका संस्थेची किंवा संघटनेची नाही. पदयात्रा लोकांची आहे. लोकांचीच राहील. जे जे ह्यात सामील होऊ इच्छितात, त्यांचे स्वागत करेल.

गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही संस्था-संघटनांनी एकत्र येऊन 'महाराष्ट्र दुष्काळ फोरम'ची स्थापना केली आणि 'दुष्काळ हटवू : माणूस जगवू' ही मोहीम सुरू केली. ती प्रक्रिया पदयात्रेच्या पाठीशी आहे.

पदयात्रेत काय असणार आहे?

पदयात्रेच्या अगोदर एक अभ्यासगट दोन-तीन दिवस आधीच गावात पोचेल आणि गावातल्या प्रश्नांचा तेथील गावकऱ्यांसोबत अभ्यास करील, हात अन्नसुरक्षा, शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि स्त्रियांचे प्रश्न ह्यांचा समावेश असेल. त्यानंतर पदयात्रा पोचेल.

पदयात्रा गावात काही गोष्टी करेल. ग्रामपंचायतीसमोर वैठक घेईल. महिलामंडळ, बचतगट यांना भेटेल. शिवारफेरी करेल, ग्रामसभा घेईल; अभ्यासगट त्यांचे निष्कर्ष मांडेल, त्या दिवशी जे पाहुणे असतील त्यांचे भाषण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय करायचं, हे ठरवलं जाईल. 

पुढे काय करायचं हे ठरवल्याशिवाय पदयात्रा हलणार नाही पदयात्रा काय होणार नाही?

ही पदयात्रा म्हणजे उत्सव नाही. आनंदसोहळा नाही, की इन्व्हेंट नाही. त्यामुळे स्वागत, सत्कार, हार, गुच्छ असणार नाही. सर्वत्र एक साधेपणा असेल.

पदयात्री काँटवर, बाजेवर झोपणार नाहीत, खुर्चीवर बसणार नाहीत, बाहनात पाऊल ठेवणार नाहीत. लोकांनी दिलेलंच खातील, धाब्यावर-हॉटेलात जेवणार नाहीत. गाव सोडून राहणार नाहीत. 

पदयात्रेत कुणाला सहभागी होता येईल?

कुणालाही सहभागी होता येईल. किंबहुना जास्तीत जास्त लोकांचे स्वागत आहे, फक्त त्यांना पदयात्रेचे नीती-नियम मान्य हवेत.

फक्त सामाजिक कार्यकत्यांनीच यात सहभागी व्हावं असं विलकूल नाही. विद्यार्थी, शिक्षक-प्राध्यापक, उद्योजक, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, पत्रकार सर्वास्वांनी द्यात यावं.

महाराष्ट्रातील भूक हा शहरात राहणान्यांचादेखील जिव्हाळ्याचा विषय होऊ शकतो. 

पदयात्रेत आणि नंतर आपण कसे सहभागी होऊ शकतो?

  • पदयात्रेत प्रत्यक्ष चालून ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबांच्या समस्या स्वतःहून समजावून घेता येतील. त्यासाठी दोन महिने चालण्याची गरज नाही. 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस जसे दिवस काढता येतील तसे येता येईल. (तसे पत्राने किंवा ई- मेलने कळवता येईल)
  • तुम्ही स्वतः, तुमचा एखादा गट एखाद्या गावाचे मित्र बनू शकता. त्या गावाशी सतत संपर्कात राहून पैशाची, तंत्रज्ञानाची किंवा व्यवस्थापनाची मदत उभी करू शकता. एखाद्या अभ्यासगटात काम करू शकता.
  • तुमचे गांव ह्या कामाला जोडू शकता. गावात नियोजन करून दुष्काळ कायमचा हटवता येईल, म्हणून प्रयत्न करू शकता.
  • 'महाराष्ट्र विकास निधी उभा करू शकता.
  • साहित्यनिर्मिती, प्रशिक्षण, संशोधन, लेखन, फोटो डॉक्युमेंटेशन यांसारख्या कामांत स्वयंसेवक म्हणून काम करू शकता.

चला, चालू या, पदयात्रेत सहभागी होऊ या.

समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू या. 

'दुष्काळ हटवू : माणूस जगवू'

असंख्य व्यक्ती, संस्था, संघटना यात सहभागी असल्याने सर्व नावं इयं समाविष्ट करणं कठीण आहे. मात्र संपर्क साधण्यासाठी, ई-मेल पाठवण्यासाठी अथवा पत्र टाकण्यासाठी काही नावे, फोन नंबर्स देत आहोत. कौस्तुभ देवळे : (9423002056) प्रफुल्ल शिंदे (9833518717 ) मधुकर धस : (07230-227537) चंद्रकांत देवकर : (2423465628) जयश्री शिदोरे, पुणे (9860008129) Email - grnearth@vsnt.com

पत्रव्यवहारासाठी पत्ता...

श्री. बापू कुलकर्णी  / मंजुषा तोकले 'दुष्काळ हटवू : माणूस जगवू' सेवा-स्मृती निवास, सद्भावना नगर, राजीव गांधी चौक, लातूर 434 140 फोन : 02382-394872/932507897

Tags: पदयात्रा का कशासाठी दुष्काळ हटवू : माणूस जगवू weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके