डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काळाच्या हातची ती नुसती कळसूत्री बाहुली आहेत! देशाच्या व्यापक हिताचा विचार करून नव्हे, परिस्थितीला काही विशिष्ट वळण देण्याची जिद्द अथवा हिंमत मनात आहे म्हणूनही नव्हे, तर नाइलाज झाला म्हणून ते एकत्र आलेले आहेत. किती केविलवाणी कबुली आहे ही!

लोकदलाचे अध्यक्ष श्री. चरणसिंग आणि काँग्रेसचे (जे) चे अध्यक्ष जगजीवन राम यांची हिस्सार येथे संयुक्त जाहीर सभा 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी या दोन महान नेत्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, तेव्हा साहजिकच असा प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही दोघे एकत्र, एका व्यासपीठावर आला हे कसे घडले? आणि त्याचा परिणाम काय होईल असे तुम्हांला वाटते? आणखीही बरेच प्रश्न पत्रकारांनी विचारले आणि त्यांची उत्तरेही त्यांनी दिली. पण आताच उल्लेखलेल्या दोन प्रश्नांच्या उत्तरांवरून त्यांची देशातील परिस्थिती आकलन करण्याबाबतच्या वकुबाची आणि त्यांना स्वत:च्या सामर्थ्याविषयी काय वाटते त्याची उत्तम प्रकारे कल्पना करता येते. 

पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून दोघांनीही सांगून टाकले की परिस्थितीने आम्हांला एकत्र आणले आहे! है त्यांचे उत्तर सत्य स्थितीला धरूनच आहे; पण ते सत्य किती दारुण आहे, हे पन्नास पन्नास वर्षे राजकारणात उच्च स्थानावर राहिलेले, केवढातरी अनुभव गाठीशी असलेले हे दोन पुढारी जेव्हा ‘परिस्थितीने आम्हां दोघांना एकत्र आणले आहे’, असे सांगतात तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही काय की त्यात त्यांचा काहीच पुरुषार्थ नसून केवळ प्रवाहपतिताप्रमाणे ते वागत आहेत. काळाच्या हातची ती नुसती कळसूत्री बाहुली आहेत! देशाच्या व्यापक हिताचा विचार करून नव्हे, परिस्थितीला काही विशिष्ट वळण देण्याची जिद्द अथवा हिंमत मनात आहे म्हणूनही नव्हे, तर नाइलाज झाला म्हणून ते एकत्र आलेले आहेत. किती केविलवाणी कबुली आहे ही!

दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर याहून वेगळे असून ते दोघांचाही घमेंडखोरपणा दाखवते. अशी एकत्र आल्यामुळे विजेचा प्रवाह सुरू व्हावा तसा परिणाम घडणार आहे असे त्यांनी सांगितले, स्वतःच्या सामर्थ्याविषयी केवढी भरमसाट कल्पना आहे पाहा. विजेचे ऋण व धन प्रवाह एकत्र आले की असा प्रकाश पडतो आणि ते वेगळे झाले की जसा अंधार पसरतो त्याप्रमाणे हे दोन महापुरुष एकत्र आले की देशातली जनता उठणार आणि वेगळे झाले की ती कोलमडणार! ज्यांचे राजकारण कोणत्याही व्यापक भूमिकेवरून न चालता अशा व्यक्तिकेंद्रित भूमिकेवरून चालते त्यांच्याकडून देशातील जनतेने कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाची अपेक्षा करावी? जनतेला काही सूझबूझ नाही, ती जड अचेतन आहे. तिला चैतन्य मिळणार ते चरणसिंगांकडून आणि जगजीवन रामांकडून, असल्या भ्रमात त्यांगी न राहिलेले बरे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके