डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अभ्यासू व नि:पक्ष वृत्तीसाठी...

आतापर्यंत पत्रकारदिन अशासकीय स्तरावरच लहान-मोठ्या उपक्रमांद्वारे पाळला जात होता, पण या वर्षी महाराष्ट्र सरकारने 6 जानेवारीच्या अनेक वृत्तपत्रांतून अर्धे पान जाहिरात तर प्रकाशित केली, विशेष म्हणजे त्या जाहिरातीत बाळशास्त्रींच्या कार्याचे भरपूर तपशील दिले आहेत. ही जाहिरात सरकारने विचारपूर्वक व पुरेशा गांभीर्याने दिली असेल तर त्याचा एक अर्थ, बाळशास्त्रींविषयी नव्या पिढीला फारसे माहीत नाही, ते माहीत व्हावे असा होतो. जाहिरातीतील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक वाचले तर दुसरा अर्थ असा निघतो की, महाराष्ट्र सरकार, बाळशास्त्रींकडे केवळ ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ म्हणून पाहत नाही तर ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणूनही पाहत आहे. हे दोनही अर्थ खरे असतील तर आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीविषयी अभ्यास व आस्था असलेल्या लोकांनी पुढाकार घेऊन पुढील वर्षभरात शासकीय व अशासकीय स्तरावर काही ठोस कार्यक्रम-उपक्रम घडवून आणले पाहिजेत.

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मद्विशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. 6 जानेवारी 1812 रोजी जन्मलेल्या आणि 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करणाऱ्या बाळशास्त्रींना ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ असे तर संबोधले जातेच, पण त्र्यं.शं.शेजवलकर या इतिहासकाराने त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ असेही संबोधले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून  बाळशास्त्रींचा जन्मदिवस व दर्पणचाही जन्मदिवस असलेला 6 जानेवारी हा पत्रकारदिन म्हणून पाळला जात आहे.

आतापर्यंत पत्रकारदिन अशासकीय स्तरावरच लहान-मोठ्या उपक्रमांद्वारे पाळला जात होता, पण या वर्षी महाराष्ट्र सरकारने 6 जानेवारीच्या अनेक वृत्तपत्रांतून अर्धे पान जाहिरात तर प्रकाशित केली, विशेष म्हणजे त्या जाहिरातीत बाळशास्त्रींच्या कार्याचे भरपूर तपशील दिले आहेत. ही जाहिरात सरकारने विचारपूर्वक व पुरेशा गांभीर्याने दिली असेल तर त्याचा एक अर्थ, बाळशास्त्रींविषयी नव्या पिढीला फारसे माहीत नाही, ते माहीत व्हावे असा होतो. जाहिरातीतील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक वाचले तर दुसरा अर्थ असा निघतो की, महाराष्ट्र सरकार, बाळशास्त्रींकडे केवळ ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ म्हणून पाहत नाही तर ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणूनही पाहत आहे. हे दोनही अर्थ खरे असतील तर आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीविषयी अभ्यास व आस्था असलेल्या लोकांनी पुढाकार घेऊन पुढील वर्षभरात शासकीय व अशासकीय स्तरावर काही ठोस कार्यक्रम-उपक्रम घडवून आणले पाहिजेत.

बाळशास्त्रींच्या कार्याचा व योगदानाचा विचार दोन स्तरावर करावा लागेल. एक म्हणजे पेशवाईचा अस्त 1818 मध्ये झाल्यानंतर ब्रिटिश राजवट मुंबई प्रांतात स्थिरावत होती, त्या पहिल्या पाव शतकात बाळशास्त्रींचे कर्तृत्व बहरले होते. दुसरे म्हणजे अवघे 34 वर्षे आर्युान लाभलेल्या बाळशास्त्रींनी जेमतेम 14 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात बरीच बौद्धिक मजल मारली होती आणि अनेक सार्वजनिक संस्थांचा पाया घालण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावला होता. या दोनही स्तरांवर विचार करून बाळशास्त्रींचे योगदान तपासता आले तर त्यात आजच्या काळाला सुसंगत असे काही निश्चितच सापडू शकेल. आजकाल इतिहासकालीन व्यक्तींचे वाढदिवस व स्मृतिदिवस साजरे करण्याला औपचारिकतेचे व कर्मकांडाचे स्वरूप येत चालले आहे, त्यामुळे बाळशास्त्रींच्या जन्मद्विशताब्दी वर्षांत फार काही घडून येईल अशी अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. पण ज्या कोणी व्यक्ती व संस्था आपापल्या क्षमतेनुसार काही करू इच्छितात त्यांना या निमित्ताने प्रोत्साहन दिले पाहिजे, शक्य ती मदत केली पाहिजे.

या पार्श्वभूीवर, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र व वयाच्या 28 व्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू करणाऱ्या बाळशास्त्रींनी पत्रकारितेची काही मूलतत्त्वे मांडली होती, काही मूल्ये मानली होती त्याचा आजच्या मराठीतील तरुण पत्रकारांनी व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी वेध घ्यावा यासाठी काही संस्थांनी उपक्रम राबवायला हवेत. पेड न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज यांच्या गदारोळात हे फार आवश्यक आहे. दुसरे म्हणजे बाळशास्त्रींचा काळ व त्यांचे कार्य तरुण पिढीपर्यंत अतिशय जलद व सुलभ पद्धतीने पोचवायचे असेल तर बाळशास्त्रींवर एक मराठी सिनेमा बनवण्याचे आव्हान कोणीतरी स्वीकारायला हवे. सिनेमाला आवश्यक असलेले सर्व काही बाळशास्त्रींच्या चरित्रात व कार्यात आहे. गेल्याच वर्षी, ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक संबोधले जाते त्या दादासाहेब फाळके यांच्या जीवनातील झपाटलेल्या कालखंडावर परेश मोकाशी या तरुण दिग्दर्शकाने ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा मराठी सिनेमा बनवला आहे. दहा वर्षांपूर्वी अमोल पालेकर यांनी र.धों.कर्वे यांच्यावर ‘ध्यासपर्व’ हा उत्तम मराठी आणि ‘कल का आदमी’ हा हिंदी चित्रपट बनवून र.धों.चे जीवनकार्य तरुण पिढीसमोर उत्कृष्ठ पद्धतीने ठेवले आहे. 1944 साली नि:स्पृह सिनेमा आला आणि ‘रामशास्त्री’ बाणा जनसामान्यांना अधिक चांगला माहीत झाला. आता ‘बाळशास्त्री’ हा सिनेा आला तर अभ्यासू व नि:पक्ष वृत्ती अंगी बाणवण्याची प्रेरणा काही तरुण पत्रकारांना मिळेल.

Tags: पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर संपादकीय journalist day journalism patrakar din balshastri jambhekar editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके