डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजवादी, गांधीवादी विचारांचे निष्ठावान अनुयायी रघुनाथ गोपाळ ऊर्फ आबा करमरकर (वय 86 वर्षे) यांचे 2 सप्टेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 'कार्यकर्त्यांचा आधारवड गेला', अशा शब्दांत अंत्यविधीनंतर झालेल्या सभेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

समाजवादी, गांधीवादी विचारांचे निष्ठावान अनुयायी रघुनाथ गोपाळ ऊर्फ आबा करमरकर (वय 86 वर्षे) यांचे 2 सप्टेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 'कार्यकर्त्यांचा आधारवड गेला', अशा शब्दांत अंत्यविधीनंतर झालेल्या सभेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

1942 मध्ये त्यांचा राष्ट्रीय चळवळीतील समाजवादी नेत्यांशी संबंध आला. मधु लिमये, केशव(बंडू) गोरे, राममनोहर लोहिया, अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन इत्यादी भूमिगत नेत्यांना त्यांनी स्वतःच्या घरात आश्रय दिला होता. 1956 ते 65 मध्ये ते समाजवादी पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. युवक क्रांतीदल, शहाद्यातील आदिवासी चळवळ, ग्रामायन, यांसारख्या अनेक संस्था-संघटना-चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध होता. केशव गोरे स्मारक ट्रस्टचे ते अखेरपर्यंत विश्वस्त होते. 72 ते 76 मध्ये पालघर तालुक्यातील दामखिंड परिसरात भूमिपुत्र प्रतिष्ठान' स्थापन करून भूमिसेनेबरोबर आदिवासींच्या विकासाचे कार्य त्यांनी केले.

1984-85 मध्ये त्यांनी पनवेलजवळील शांतिवन येथे कुष्ठरोग निवारण केंद्रात शेतीव्यवस्थापनाची घडी बसवून दिली. 1985 मध्ये 'नवनिर्माण न्यास' ही विश्वस्त संस्था स्थापन करून पारगाव सालोमालो ता. दौंड येथे शेतकरी, शेतमजूर, दलित, महिला या सामाजिक घटकांत कार्य केले. आर्थिक सामाजिक स्तरातील सुमारे 100 विद्यार्थ्यांसाठी पारगाव येथे उत्कृष्ट वसतिगृह त्यांनी चालविले. तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात वर्ताळा येथे पाणलोट क्षेत्र विकासाधारित आदर्श गाव योजनेची उभारणी केली.

जमीन सत्याग्रह, नामांतर चळवळीत त्यांना तुरुंगवास घडला होता. आपले व्यक्तिगत जीवन व सार्वजनिक जीवन यांत त्यांनी समान मूल्यांचा आग्रह धरला. सामान्य शेतकऱ्यांना शेती परवडावी यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. ग्रामीण भागात काम करणारे कार्यकर्ते घडविले व अनेक कार्यकर्त्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत केली. 

समाजवादी चळवळीचे मुखपुत्र 'चौखंबा’चे ते अनेक वर्षे संपादक होते. भातशेती लागवड, आमची कैफियत, गलिच्छ वस्त्यांचा प्रश्न आणि बृहन्मुंबईचा विकास, अशा पुस्तिका व ‘संघर्षाच्या नव्या वाटा' या रोजनिशीवर आधारित पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे.

त्यांच्या स्मृतीला 'साधना'चे प्रणाम.

Tags: जमीन सत्याग्रह आबा करमरकर रघुनाथ गोपाळ गांधीवादी विचारांचे निष्ठावान अनुयायी समाजवादी Zamin Satyagraha Aba Karmarkar Raghunath Gopal loyal followers of Gandhian thought Weekly sadhana Socialists weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके