डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या वर्षीचा समारंभही नेहमीप्रमाणे दोन टप्प्यांत झाला. पहिल्या टप्प्यात (दुपारी दोन ते चार या वेळेत) तीन ग्रंथपुरस्कार, तीन कार्यकर्ते पुरस्कार आणि एक नाट्यपुरस्कार अशा एकून सात पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. दुसऱ्या टप्प्यात (सायंकाळी पाच ते साडेसात) तीन पुरस्कारप्राप्त व्यक्तींची भाषणे झाली. 

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून साहित्य व समाजकार्य या दोन क्षेत्रांतील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. गेल्या सहा वर्षांपासून या पुरस्कारांची कार्यवाही साधना ट्रस्टकडून केली जाते. या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ १० जानेवारी २०१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या दीर्घ मुलाखती असलेला विशेषांक साधनाचा (याआधीचा) १७ व २४ जानेवारी असा जोडअंक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्या मुलाखतींमधून त्या-त्या व्यक्तींच्या विचारांची व कार्याची झलक पाहायला मिळते. 

या वर्षीचा समारंभही नेहमीप्रमाणे दोन टप्प्यांत झाला. पहिल्या टप्प्यात (दुपारी दोन ते चार या वेळेत) तीन ग्रंथपुरस्कार, तीन कार्यकर्ते पुरस्कार आणि एक नाट्यपुरस्कार अशा एकून सात पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. दुसऱ्या टप्प्यात (सायंकाळी पाच ते साडेसात) तीन पुरस्कारप्राप्त व्यक्तींची भाषणे झाली. निखिल वागळे यांना डॉ. दाभोलकर स्मृतिपुरस्कार प्रदान करण्यापूर्वी, डॉ. दाभोलकर यांच्या मुलाखतीतील साडेसहा मिनिटांचा भाग पडद्यावर दाखवण्यात/ऐकवण्यात आला. 

निखिल वागळे यांनी २०१० मध्ये ‘आयबीएन-लोकमत’ या वृत्तवाहिनीवर ‘ग्रेट-भेट’ या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीतील तो भाग होता. मुलाखतीचा तो भाग पाहिल्यानंतर उपस्थित प्रेक्षक हेलावून गेले होते. निखिल वागळे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले, ‘‘मी सहसा भावनावश होणारा माणूस नाही, पण आज तसे झाले आहे खरे.’’ त्यानंतर प्रसारमाध्यमे, राजकारणाचे बदलते वारे आणि धर्मांधतेचे आक्रमण या अनुषंगाने १५ मिनिटांचे छोटेसे पण तडाखेबंद भाषण त्यांनी केले. त्यानंतर श्याम मनोहर यांना ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते लिखित भाषण इतके उत्कृष्ट आहे की, ‘हे भाषण साधनात छापा’ अशी आग्रहाची सूचना कार्यक्रम संपल्यावर अनेक वाचकांनी केली. (त्याप्रमाणे, पुढील अंकात ते भाषण प्रसिद्ध करीत आहोत.) 

त्यानंतर पुष्पा भावे यांना ‘समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला गेला आणि मग त्यांचे भाषण झाले. पुष्पाताई सध्या सभोवतालच्या देश-काल-परिस्थितीचे जे काही विश्लेषण करीत आहेत, ते इतके महत्त्वाचे आहे की, त्यासंदर्भात त्यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करा अशी सूचना त्या कार्यक्रमाच्या आधी व नंतरही अनेकांनी केली आहे. (पुढील महिन्यात त्यांची दीर्घ मुलाखतही प्रसिद्ध करणार आहोत.) साधना ट्रस्ट व महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने प्रास्ताविक करणारी भाषणे अनुक्रमे हेमंत नाईकनवरे व सुनील देशमुख यांनी केली. 

स्टिव्ह मिल्स व माधव चव्हाण हे दोघे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. अल गोर यांच्याबरोबर पर्यावरणविषयक जागृतीचे काम करणाऱ्या स्टिव्ह मिल्स यांनी पर्यावरणाच्या प्रश्नांची दाहकता अधोरेखित केली आणि थहू, थहू पेीं? ही अडीच मिनिटांची फिल्म दाखवली. माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’च्या कामाच्या अनुभवाचा संदर्भ देत, सध्याच्या काळातील भारतीय शिक्षण आणि आवश्यक कौशल्ये या अनुषंगाने मांडणी करून, होत असलेल्या बदलांचा व आव्हांनाचा सामना करण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून लोक आले होते. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचे काही लोकही आले होते. साधारणत: सात-आठशे लोक सभागृहात उपस्थित होते... 

कार्यक्रम संपल्यावर पर्यावरण व शिक्षण या दोन विषयांच्या संदर्भात अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे अनेकांना प्रकर्षाने जाणवले. 
 

Tags: संपादकीय श्याम मनोहर पुष्पा भावे निखील वाघळे अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार साधना ट्रस्ट महाराष्ट्र फाउंडेशन editorial Dahakta aani Ishara Shyam Manohar Pushpa Bhave Nikhil Waghale Anukarniy yogdanasathi purskar Sadhana trust Maharashtra Faundation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके