डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना साप्ताहिकाचा 2008 चा स्वातंत्र्यदिन विशेषांक भारताचे शेजारी या विषयाला वाहिलेला होता, त्याचे संपादन राज्यशास्त्राच्या प्राध्यापक व दक्षिण आशियाई देशांच्या अभ्यासक मनीषा टिकेकर यांनी केले होते. त्या विशेषांकात अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव आणि चीन या देशांच्या राज्यसंस्था व राज्यव्यवस्था यांच्यावरील मान्यवर अभ्यासकांनी लिहिलेले लेख होते. त्या विशेषांकात भारताशी संबंधित आणखी दोन लेखांची भर टाकून साधना प्रकाशनाने ‘भारत आणि भारताचे शेजारी’ हे पुस्तक प्रकाशित केले होते, त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने, पुस्तकाच्या संपादक मनीषा टिकेकर यांनी गेल्या दोन वर्षांतील शेजारी देशांतील प्रमुख घडामोडींचा आढावा व त्यावर भाष्य करणारी प्रस्तावना लिहिली आहे. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर ती प्रस्तावना प्रसिद्ध करणे औचित्यपूर्ण वाटते. - संपादक  

15 दोन वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या ‘भारताचे शेजारी’ या विशेषांकात, दोन लेखांची भर टाकून गेल्या वर्षी साधना प्रकाशनाने ‘भारत आणि भारताचे शेजारी’ हे पुस्तक प्रकाशित केले होते; त्या विशेषांकाचे आणि पुस्तकाचे संपादन मनीषा टिकेकर यांनी केले होते. पुढील महिन्यात त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहिलेल्या प्रस्तावनेत मनीषा टिकेकर यांनी, मागील दोन वर्षांतील भारताच्या शेजारी राष्ट्रांतील महत्त्वाच्या व प्रमुख घटना-घडामोडींची नोंद घेऊन त्यावर अतिशय माफक पण नेके भाष्य केले आहे.

‘भारताचे शेजारी’ या विशेषांकाचे उपशीर्षक ‘अस्थिर राज्यव्यवस्था, अस्वस्थ समाज’ असे दिले होते आणि त्या विशेषांकाची जाहिरात करताना एक वाक्य आम्ही सातत्याने वापरले होते, ते असे : ‘स्वातंत्र्य उपभोगणारा समाज आणि लोकशाही राबवणारी राज्यव्यवस्था, ही आहे भारताच्या वाटचालीची दिशा... पण याबाबत आपल्या शेजाऱ्यांची अवस्था कशी आहे, याचा शोध घेणारा विशेषांक.’ कारण भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची लोकशाही यांच्यावर शेजारी देशांतील सततच्या अस्वस्थतेचा, अस्थिरतेचा खोलवर परिणाम होत असतो.

 गेल्या दोन वर्षांत भारत व शेजारी राष्ट्रांतील आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विशेषत: दक्षिण आशियाच्या राजकारणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या घडामोडींची जाण आणि वस्तुस्थितीचे भान ‘नागरिक’ म्हणवणाऱ्या प्रत्येक भारतीयाला असणे आवश्यक आहे! दिवाळीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला भेट दिली. त्या भेटीची वैशिष्ट्ये व महत्त्व अनेकांनी अनेक प्रकारे सांगितले आहेत. पण ओबामांनी भारताच्या संसदेत केलेल्या भाषणातील एका विधानाकडे मात्र फारसे कोणी लक्ष वेधले नाही. ओबामा म्हणाले होते, ‘‘भारताने लोकशाही असूनही प्रगती केलेली नसून, लोकशाही असल्यामुळेच प्रगती केली आहे.’’ ओबामांचे हे विधान भारताचा गौरव करणारे तर आहेच, पण चीनला सूचक इशारा देणारेही आहे. 

Tags: भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी 61 वर्ष प्रजासत्ताक संपादकीय 26 January indian republic 60 years republic editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके