डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्र अंनिसला शुभेच्छा!

याचा प्रत्यक्षातील परिणाम म्हणजे, साधना व अंनिस पूर्णपणे स्वतंत्र राहूनही परस्परांना त्याचा फायदाच झाला. सर्वांत आश्चर्यकारक व महत्त्वाचा विशेष हा आहे की, साधना हे वैचारिक नियतकालिक आहे आणि अंनिस ही लढाऊ संघटना आहे, त्यामुळे दोहोंच्या कार्यशैलीत करावयाच्या फरकाचे त्यांचे भान कधीच सुटले नाही. या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण अंक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातील जादूटोणाविरोधी कायद्यावर केला आहे. अर्थात, डॉक्टर हयात असताना हा कायदा झाला असता तरी असा संपूर्ण अंक कायद्यावर काढण्याबाबत आग्रह आम्ही धरला असता आणि त्यांनी तो मान्य केला असता.

साधना साप्ताहिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात म्हणजे 1 मे 1998 रोजी साधना साप्ताहिकाच्या संपादकपदावर डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची नियुक्ती झाली. तेव्हा अनेकांनी असे भाकीत केले होते की, आता साधना साप्ताहिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र बनणार! पण त्यानंतर पंधरा वर्षे संपादकपदावर राहिलेल्या डॉ.दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित एकही वार्तापत्र किंवा लेख साधनात प्रसिद्ध केला नाही. त्यांनी या काळात जवळपास 300 संपादकीय लेख लिहिले, त्यात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाशी संबंधित संपादकीय लेखांची संख्या 15 पेक्षा जास्त नसेल. म्हणजे वर्षातून जेमतेम एक लेख एवढे प्रमाण त्या विषयाला साधनात मिळाले आहे.

साधनाच्या संपादकपदावर येण्यापूर्वी 10 वर्षांहून अधिक काळ ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पूर्णवेळ करीत होते आणि अंनिसचे प्रवर्तक अशीच त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झालेली होती. मात्र साधना व अंनिस यांच्या कामासाठी त्यांनी आपल्या वेळेची व कार्यशैलीची अशा प्रकारे विभागणी केली होती की, दोन्हींचा परस्परांशी थेट संबंध अजिबात येणार नाही. म्हणूनच अंनिसच्या कामासाठी आलेल्या माणसाकडे साधनाचा विषय ते स्वत:हून अजिबात काढत नसत आणि उलटही तितकेच खरे होते.

याचा प्रत्यक्षातील परिणाम म्हणजे, साधना व अंनिस पूर्णपणे स्वतंत्र राहूनही परस्परांना त्याचा फायदाच झाला. सर्वांत आश्चर्यकारक व महत्त्वाचा विशेष हा आहे की, साधना हे वैचारिक नियतकालिक आहे आणि अंनिस ही लढाऊ संघटना आहे, त्यामुळे दोहोंच्या कार्यशैलीत करावयाच्या फरकाचे त्यांचे भान कधीच सुटले नाही. या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण अंक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातील जादूटोणाविरोधी कायद्यावर केला आहे. अर्थात, डॉक्टर हयात असताना हा कायदा झाला असता तरी असा संपूर्ण अंक कायद्यावर काढण्याबाबत आग्रह आम्ही धरला असता आणि त्यांनी तो मान्य केला असता.

कारण आता हा कायदा महाराष्ट्र सरकारचा झाला आहे! सरकारने कायदा केला आहे, त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या स्तरावर त्यांच्या गतीने व पद्धतीने होत राहील. पण हे असे क्षेत्र आहे, जिथे राजकीय पक्षांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष ममत्व वाटणार नाही. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र अंनिसला मोठ्या धडाडीने प्रबोधन, संघर्ष, रचना ही त्रिसूत्री मोहीम चालूच ठेवावी लागेल. त्यासाठी अंनिसच्या पाठीमागे दाभोलकरांचा वारसा तर आहेच, पण त्यांनी अंनिसला प्राप्त करून दिलेली वैचारिक बैठक निर्दोषत्वाच्या जवळ जाणारी आहे. डॉक्टरांची 12 पुस्तके हे संचित तर फारच मूल्यवान आहे, कारण अंनिसच्या चळवळीतून ते जमा झाले आहे.अशा प्रकारची चळवळ भारतात अन्यत्र कुठेही नाही. त्यामुळे भारतातील अन्य कोणत्याही भाषेत या प्रकारची पुस्तके आलेली नाहीत. हे लक्षात घेतले तर महाराष्ट्र अंनिसला करण्यासाठी ‘स्काय इज द लिमिट’ असेच म्हणावे लागेल.

अंनिसकडे असलेले तळागाळातील प्रामाणिक व तळमळीच्या कार्यकर्त्यांचे बळ पाहिले, तर डॉक्टरांना इतके सिन्सिअर कार्यकर्ते मिळतात तरी कुठून, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात असे. तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘मी मिळवीत काहीच नाही, चांगली माणसं/कार्यकर्ते अंनिसला जोडून घेतात.’ हे जोडून घेण्याचे सामर्थ्य आपोआप येत नाही, त्यासाठी बरीच साधना करावी लागते. नवीन वर्षात व नव्या पर्वात प्रवेश करताना अंनिसचे हे सामर्थ्य वृद्धिंगत होत राहो यासाठी आमच्या शुभेच्छा!

Tags: जादूटोना विरोधी कायदा चळवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती संपादकीय Movment Editoral Dr. Narendr Dabholkar Chalwal Mans Sampadkiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके