डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रिकेट क्रिकेट क्रिकेट !

राष्ट्रीय पक्षी मोर तसा आमचा राष्ट्रीय खेळ आहे किरकिट! क्रिकेटपुढे शाळा तुच्छ. त्याच्या नावे कॉलेजला, ऑफिसला दांड्या. बिजिनेस थप्प! 'साहेब मी उद्या तापाने आजारी पडणार आहे' अशी चिठी साहेबाला खरडून अख्खा दिवस मॅच बघत बसण्याची आम्हांस पूर्ण मुभा असते. 

अंग्रेज बहादुरांनी भारतावरील आपल्या अधिसत्तेला सोडचिठी दिली, पण दोन गोष्टींचा ठिय्या असा काही जाम बसवला की त्यांना अजाबात धक्का बसला नाही. इंग्रजी भाषा आणि क्रिकेट. भले कोणी नावे ठेवोत, क्रिकेट हा साम्राज्यशहा इंग्रजांचा खेळ आहे. आपण गुलामांनी तो विनाकारण डोक्यावर घेतलेला आहे. खरी गोष्ट अशी आहे की एक वेळ क्रिकेटची त्याच्या माहेरघरातून हकालपट्टी होईल पण भारतात मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत जयघोष होत राहील - क्रिकेट क्रिकेट क्रिकेट! 

आपण किती क्रिकेटवेडे आहोत! स्वयंपाक घरातील पाट किंवा कचरा टाकायचा डबा अशा अभिनव स्टंपांसमोर मिळेल त्या फळकुटाने आणि हाती येईल त्या चेंडूने आपण क्रिकेट खेळत राहू. पाच दिवसांची टेश्ट मॅच, एक दिवसीय सामने, रबरी चेंडू आणि फळकुटे हा सरंजाम घेऊन रंगवलेल्या स्पर्धा, डबल विकेट - सिंगल विकेट असले मुलखावेगळे सामने. मॅच मैदानात असो की सुटीचा दिवस साधून ती रस्त्यात रंगो - आपण बेहोषीत आरडाओरडा करीत चिकीखाऊ अंपायरला शिव्या मोजीत आणि कचित यष्ट्या उपसून काढून पेटवलेल्या लढाईत आम्ही सारे धुल्ला घुल्ला ऐवजी क्रिकेट क्रिकेट हाच घोष घुमवत राहू. 

राष्ट्रीय पक्षी मोर तसा आमचा राष्ट्रीय खेळ आहे किरकिट! क्रिकेटपुढे शाळा तुच्छ. त्याच्या नावे कॉलेजला, ऑफिसला दांड्या. बिजिनेस थप्प! 'साहेब मी उद्या तापाने आजारी पडणार आहे' अशी चिठी साहेबाला खरडून अख्खा दिवस मॅच बघत बसण्याची आम्हांस पूर्ण मुभा असते. 

पण अलीकडे होतंय काय, आपले हीरो खेळाडू पार ढेपाळलेले आहेत. ऐन वेळी त्यांचा अवसानघात होतो. भारतीय संघ हग्या मार खातो. सीरीज हमखास हरतात. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजसारखे जबरदस्त मैदानमारे असोत; न्यूझीलंड, लंका यांसारखे कानामागून येऊन तिखट झालेले प्रतिस्पर्धी असोत किंवा पाकिस्तानसारखा कायम मनोवैग्यानिक दबाव आणणारा जीवघेण्या वैऱ्यांचा तांडा असो, आमची शेपूट आपली दोन पायांत जाऊन लपते. गेली काही वर्षे आपण पाहातो आहोत - क्रिकेट म्हणजे हटकून हार, दणकून मार आणि घरोघरी हाहाकार! खैर! आम्ही डट्के लढणार! जाणत नाही माघार ! यंदा जिंकलो नाही तर नेक्स्ट इयर यार! आमच्या भाग्याची रत्नगुंफा खुलेलच खुलेल! बॅटी पिचून जावोत, चेंडू चेपले जावोत - आमचा परवलीचा मंत्र राहील क्रिकेट क्रिकेट क्रिकेट!

Tags: ब्रिटीश व्यंगात्मक क्रिकेट भारतीयांचा खेळ satire indian's favouriate game lalit cricket weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके