डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यंदा, 30 जानेवारी हा शंकररावाचा जन्मदिवस आणि महात्माजींची पुण्यतिथी. त्या दिवशी त्यांच्या इष्टमित्रांनी व सहकाऱ्यांनी सासवड आश्रमात एकत्र जमून ज्या तत्त्वांवर शंकररावांची निष्ठा होती त्या तत्त्वांवर व ज्या राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केले त्या क्षेत्रातील विचार करावा असे ठरवले.

महाराष्ट्राची राजकीय व सामाजिक घडण, जी स्वातंत्र्यपूर्वकाळात घडत गेली, ती घडवण्यात श्री. शंकरराव देव यांचा फार मोठा वाटा होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून त्यांनी आपले सहकारी जमवले होते. कोठलीही साधने किंवा सत्ता हाती नसताही ही माणसे त्यांनी जोडली-राखली व गांधीवादी तत्त्वनिष्ठा व कार्यपद्धती महाराष्ट्रात मोठ्या प्रयासाने रुजवली.सासवड ही त्यांची विसाव्याची जागा. त्यांचे शेवटचे दिवसही या आश्रमातच गेले. ते असताना त्यांचे निकटचे सहकारी त्यांच्या जन्मदिनी एकत्र जमत व तो दिवस परस्परांच्या सहवासात विचारविनिमयात आनंदात जाई. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व इष्ट मित्र सासवडला जमले व त्यांनी एक स्मारक निधी उभा करून त्याद्वारे शंकररावांचे लिखाण उपलब्ध असेल ते प्रकाशित करावे व आधुनिक महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक इतिहास संशोधनपूर्वक तयार करवून घ्यावा, असा संकल्प केला. त्याप्रमाणे त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी दादा धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांच्या ‘देव देते व कर्म नेते’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. दुसऱ्या वर्षी त्यांच्या स्फुट लेखांचे संकलन प्रसिद्ध केले. तिसऱ्या वर्षी ‘लोकशाहीचा पुरुष' हार त्यांचा विचारसमृद्ध प्रबंध प्रसिद्ध झाला. आता इतिहासाच्या संशोधनास सुरुवात झालेली आहे.

यंदा, 30 जानेवारी हा शंकररावाचा जन्मदिवस आणि महात्माजींची पुण्यतिथी. त्या दिवशी त्यांच्या इष्टमित्रांनी व सहकाऱ्यांनी सासवड आश्रमात एकत्र जमून ज्या तत्त्वांवर शंकररावांची निष्ठा होती त्या तत्त्वांवर व ज्या राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केले त्या क्षेत्रातील विचार करावा असे ठरवले. त्या दृष्टीने त्या दोन्ही क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती जुना ऋणानुबंध स्मरून या समारंभासाठी पू. दादा धर्माधिकारी हे गांधीविचारांचे भाष्यकार आणि ज्या पार्लमेंटरी क्षेत्रात शंकररावांनी महाराष्ट्राला एक निश्चित मानाचे स्थान मिळावे म्हणून सतत प्रयास केले त्या त्यांच्या कर्मयोगातले त्यांचे घनिष्ठ सहकारी काकासाहेब गाडगीळ यांचे कर्तबगार व वडिलांचे काम पुढे चालवून महाराष्ट्राची प्रतिमा ज्यांनी उजळ ठेवली आणि आपल्या साक्षेपी अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक आगळी प्रतिमा लोकांच्या मनात ठसवली आहे, ते श्री. विठ्ठलराव गाडगीळ या पवित्र दिवशी या ठिकाणी आले. सासवडमधील सर्वच माणसे आश्रमाबद्दलच्या आस्थेने आणि शंकररावांबद्दल त्यांना वाटणाऱ्या जवळिकीच्या भावनेने आणि श्री. प्रेमाबाईंबद्दलच्या प्रेमादराने जमली होती. ता. 30-31 ला पू. विनोबाजींच्या आदेशाप्रमाणे आश्रमात गोरक्षेसाठी चाललेले चक्री उपवास करणारे व्रतस्थही सभेला आले होते. श्री. दादा धर्माधिकारी यांनी नि:शस्त्र प्रतिकाराचा अर्थ विशद करून सांगितला. शंकररावांच्या ‘लोकशाहीचा पुरुष' या प्रबंधात त्याचेच विवरण केले आहे. शासन लोकानुवर्ती व्हावे. लोकांत दुर्बलता असली म्हणजे परदेशी धन व शस्त्रे यांचे आकर्षण वाटते.

श्री. विठ्ठलरावांनी स्वातंत्र्योत्तर काळातील विचारप्रवाह थोडक्यात व्यक्त केले. शंकररावांच्या सहनशीलतेचे एक उदाहरण देऊन त्यांनी आजच्या जीवनातील गांधींच्या फोटोखाली बसून सर्वनाशक शस्त्राच्या खरेदीचा निर्णयही घ्यावा लागतो, तर समर्थ-संपन्न म्हणवणाऱ्या देशांतील असुरक्षित जीवनाचे चित्रहीं श्रोत्यांच्यासमोर उभे करून शेवटी बेविनने लंडनच्या लोकसभेत आपल्याकडे अणुशस्त्रे नसली तर 'आय विल गो नेकेड इन द वर्ल्ड' असे म्हटले होते. त्याला उत्तर म्हणून विकी या व्यंगचित्रकाराने दुसऱ्या दिवशी पंचा नेसून जाणाऱ्या गांधीजींचे एक चित्र काढून त्याखाली लिहिले, 'ही वेंट नेकेड इन द वर्ल्ड !' याचा परिणाम म्हणजे वेबिनचा मजूर पक्ष निवडणुकीत पडला. हा गांधीजींचा प्रभाव किती परिणामकारक आहे हे सांगितले. डॉ. चपलाबाईंनी आभार मानले. शेवटी प्रेमाबाईंनी गोरक्षेविषयी चार शब्द सांगून भजनाने पूर्णाहुती केली.

Tags: जन्मदिन सोहळा शंकरराव देव सासवड आश्रम birthday ceremony shankarrao dev saswad aashram weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके