डिजिटल अर्काईव्ह

काही संपादकीये (12 ऑगस्ट 2006)

'साने गुरुजींची 'साधना' त्यांच्याबरोबर संपली' या रावसाहेबांच्या विधानातले मर्म पुष्कळांनी ओळखलेच नाही. नव्या अमदानीत साधनाचा वैचारिक दर्जा सतत वाढत राहिला. रावसाहेब तसे खाष्ट होते: अल्पसंतोष त्यांना माहीत नव्हता. प्रत्येक लेखाची आणि प्रत्येक अंकाची निर्भीड छाननी करावी, स्वयंतुष्ट अहंमन्यता कधीच धारण करू नये, एखाद्या सदा असंतुष्ट कलावंताप्रमाणे सदा दूरस्थ पूर्णतेचा ध्यास घ्यावा. हा त्यांचा स्वभाव होता. अंकाचे बाह्य रूप, छपाई, मजकुराची सजावट, मजुकराचा अटकर आटोपशीरपणा, नवनवीन विचारांना स्थान मिळण्याचा अट्टाहास; मोठ्या जिद्दीने रावसाहेब या सर्व गोष्टींचा विचार करीत व इतरांना विचार करायला लावत. यदुनाथ धत्ते, सदानंद वर्दे, दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर अशा तरुण सहकाऱ्यांची रावसाहेबांना साधसंगत लाभली होती. आपल्या दिलखुलास वृत्तीने रावसाहेबांनी सर्वांना आपलेसे केले होते साधना आता खपत असे कमी; पण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचारमंथनात बिनीवर असणाऱ्या शक्तींपैकी ती एक प्रमुख शक्ती झाली होती. होती.

समाजवादाची वाट
समाजवाद हा शब्द आत्म्याच्याच तोडीचा निर्गुण-निराकार आहे. तो आहे आणि नाहीही. त्याचा ज्याला जसा वाटेल तसा अर्थ लावला तरी त्याला कोणाची हरकत नसते. पूर्वी कुणाला या शब्दाचे भय वाटत असेल, आता नाही. भारतातील आजचा हा सर्वात लाडका शब्द आहे. हा शब्द उच्चारून कुणाचे काही बंधन पडत नाही. कुठले पुस्तक प्रमाण नाही. कुठला आचार प्रमाण नाही, कसला जाच म्हणून नाही. पण गेल्या दोन-तीन वर्षांत समाजवाद ही एक येणारी वस्तू किंवा गोष्ट आहे, असे मात्र आमच्या जनतेला वाटते आहे. आणणारे सांगताहेत की, 'पाहा तो येत आहे, आम्ही तो आणीत आहोत. ही पहा त्यांच्या गळ्यात बांधलेली पंधराकलमी साखळी इत्यादी.' अशा त-हेने समाजवादाचे अगदी समाजवादी धिंडवडे निघत आहेत. आधीच आमच्या भारतात सर्वांना अवतारकल्पना फार प्रिय. त्यामुळे समाजवाद ही आपसूक अवतरणारी गोष्ट आहे, असे लोकांना खरोखरच वाटते, त्यासाठी आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायची जरुरी नाही. लोडाला टेकल्या टेकल्या सर्व काम होईल. काही किंमत द्यायला नको. आहे ही व्यवस्था न मोडता सगळे काही व्हावे, असे आम्हाला मनापासून वाटते.

सरकार समाजवाद आणील, असे मानणाऱ्यांना काय म्हणावे? लोकांचा, कल्याणकारी राज्य आणि समाजवाद यात घोटाळा झालेला दिसतो. आमच्या गावाला दवाखाना आला, शाळा आली, रस्ता झाला म्हणजे समाजवाद आला. कसली आलीय न्याय प्रस्थापना? आम्ही म्हणू तो न्याय. महाराने वेशीबाहेरच राहिले पाहिजे. स्त्रियांना हक्कबिक काही नाही. पायातली वहाण पायात. आता तर काय निवडणुका. ही तर समाजवादाची लढाई. भलतीच हातघाईची. लढाईला लागतो पैसा. भांडवलदारांनो, जमीनदारांनो; पैसा द्या पैसा. आम्हाला समाजवादाची लढाई लढायचीय. दाम करी काम, मते द्या मते, पैशाला दोन मते. काय राव, काय एवढी खळखळ? आम्ही एवढं युद्ध जिंकलं तरी पुन्हा प्रश्न आहेच. काय, गरिबी हटावचं काय झालं? अहो राव, जरा सुधारून घ्या. गरिबी हटावचा जमाना गेला. आता नुसते स्वावलंबन काम करा. याम गाळा. शेतकयांनो कष्ट करा, तुम्हांला मालाला भाव बांधून नाही देणार. कामकन्यांनो, काम करा, संप करू नका. पगारवाढीचं नंतर बघू. बोल मजुरा, हल्लाबोल; बोल हमाला, हल्लाबोल. आम्ही तुझ्यासाठी असुरक्षित कामगार कायदा केलाय ना, फक्त लागू करायचा राहिलाय.

पाच-पंचवीस वर्षांत करू तुझे काम. अशी कामं कुठं घाईनं होत असतात होय? आम्ही काय जमीनदारांना घाबरतोय? अहो जमीनदार, जादा बटवट करू नका. असा एक वटहुकूम काढू की तुमची सगळी जमीन सरकारी होईल बरं, बरं. घाबरू नका एवढे. उ:शाप देतो. वटहुकूम काढताना तुमचा सल्ला घेईन, शेवटी तुम्हीसुद्धा जनताच आहात. तुमचीही सोय पाह्यलीच पाहिजे. समाजवाद! लोकहो तो आपल्यातून यावा लागतो. आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या कल्पना कितीही प्रिय असल्या तरी त्या टाकाव्या लागतात. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडा द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या शर्टाची इस्त्री खराब झाली, जीवन जरा ढवळले तरी ते सोसावे लागते. एवढं पुरं नसतं. स्वतःला न्याय मिळविण्याबरोबर दुसऱ्यांना, विशेषत: समाजातल्या दुबळ्या घटकांना न्याय देण्यासाठी स्वत: लढा उभारून, त्यांना न्याय मिळून द्यावा लागतो. समाजवाद हा फार दाहक शब्द, कुणाला कुठून येऊन भिडेल, स्वतःपर्यंत ते लोण कधी येऊन पोहोचेल, ते सांगता यायचे नाही. ते माप, तो टेप अंग अंग मोजील, मापील. त्याला तयार राहिलं पाहिजे, अगदी क्रांतिकारकांनीसुद्धा तेव्हा जपून. तो येतो आहे. या अंकात लोकशाही समाजवादी चळवळीच्या दिशेने विचार करणारे लेख छापले आहेत. लेखकांनी अल्पावधीतच लिहून दिले, त्याबद्दल धन्यवाद.
- अनिल अवचट
(संपादकीय प्रजासत्ताकदिन विशेषांक : 1972)

--------------------------------------

ध्रुवाचे यांत्रिक
सदानंद वर्दे

आर्र रोडवरच्या एका खपरेल मकाणात साधना मुद्रणालय सुरू झाले. पहिला अंक इंडिया प्रिटिंग ग्रेसमध्ये देकरांनी पाहून दिला होता. मौजेच्या विष्णुपंत भागवताचे बळही पाठटीशी उभे होते. पण लवकरच स्वतःच्या छापखान्यात साधना छापली जाऊ लागली. अण्णासाहेब सहसबुद्धे यांचे मार्गदर्शन आणि एसेम जोशी, डॉ.मंडलिक प्रभृतींचे सक्रिय सहकार्य पहिल्यापासून होतेच. श्री. श्रीरंग वरेरकर या कलासक्त तरुण सहकार्याने तर निरलस आणि डोळस सेवेची कमाल केली होती. मुख्य संपादकांपासून सगळेच मान आणि मांडी मोडून काम करायचे. संपादकीय लिखाण माळ्यावर बसून होई तर घड्या घालून अंक टपालात पाठवायची व्यवस्था फूटपाथवर! सेवादलाची किती तरी मुले हे काम आपलेच समजून विनामुल्य करीत. वामन, प्रभाक्र, दळवी, इचापे, पानसाडे, नानजीभाई या साधनाच्या अज्ञात सेवेकऱ्यांची याद साधनाकारांना आजही येते. आचार्य आवडेकर, आचार्य भागवत, नानासाहेब गोरे, मधु लिमये, एस.एम.जोशी, बंडू गोरे, मुइनुदीन हारीस यांचे विचार-प्रवर्तक लेख साधना त येत; पण त्यांच्याभोवती महिरप असे ती धडपडणान्या मुलाच्या पहिल्यावहिल्या चाचपडत लिहिलेल्या लेखांची आणि कसा कोण जाणे, प्रत्येक पानाला साने गुरुजींच्या शुद्ध भावनेचा गंध येई.

जावडेकरांनी आणि रावसाहेबांनी साधनाचा कायापालट केला खरे म्हणजे हे अपरिहार्यही होते. गुरुजीचे बळ वेगळे आणि नव्या संपादकांचे वेगळे. 'बळ ज्याचे त्यास ते बुलबुलांनी गरुडझेप घेऊ नये, आणि गरुडाने गळा शिणवू संपादक म्हणजे जुन्या भूमिकेची बतावणी करणारे नट नव्हते. समर्थ संपादक आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या पत्रावर उमटवणार. हे ज्यांना समजले नाही त्यांना नव्या साधने त साने गुरुजी दिसेनात. ते हिरमुस लागले. आपल्याकडे असे फार होते. माणूस आणि त्याचा मोठेपणा ही जड़ चिरेबंद वस्तु असे आपण मानतो. सत्य असत्यासी मनकले ग्वाही' ही साने गुरुजींची निष्ठा; पण ती गतिमान तर असली पाहिजे ना? ज्याला 'साधना' चालवायची असेल. त्याने अशी गतिमान सत्यनिष्ठा बाणवून, आपल्या पिंडधर्मानुसार, मनोबुद्धीशी प्रतारणा न करता, उत्कट भावबलाने समाजहितैक दृष्टीने, निर्भयतेने, न्यायाचा कैपक्ष घ्यावा, दलितांना सहानुभूती द्यावी, अन्यायाचा प्रखर प्रतिकार करावा. समाजाची विवेकशीलता वाढवावी, समाजाचे जीवन निकोप आणि समृद्ध होईल अशी धडपड करावी हे साने गुरुजींच्या शिकवणुकीचे सार आहे. ते ग्रहण केल्यानंतर, दर वेळी त्यांचे अनुकरण करणे, त्यांच्या पोध्यांचा शास्त्राधार पाहणे असल्या आंधळ्या भक्तीची गरजच नाही. हे ज्यांना पटले नाही, भावले नाही, ते रुसले, रागावले. 

'साने गुरुजींची 'साधना' त्यांच्याबरोबर संपली' या रावसाहेबांच्या विधानातले मर्म पुष्कळांनी ओळखलेच नाही. नव्या अमदानीत साधनाचा वैचारिक दर्जा सतत वाढत राहिला. रावसाहेब तसे खाष्ट होते: अल्पसंतोष त्यांना माहीत नव्हता. प्रत्येक लेखाची आणि प्रत्येक अंकाची निर्भीड छाननी करावी, स्वयंतुष्ट अहंमन्यता कधीच धारण करू नये, एखाद्या सदा असंतुष्ट कलावंताप्रमाणे सदा दूरस्थ पूर्णतेचा ध्यास घ्यावा. हा त्यांचा स्वभाव होता. अंकाचे बाह्य रूप, छपाई, मजकुराची सजावट, मजुकराचा अटकर आटोपशीरपणा, नवनवीन विचारांना स्थान मिळण्याचा अट्टाहास; मोठ्या जिद्दीने रावसाहेब या सर्व गोष्टींचा विचार करीत व इतरांना विचार करायला लावत. यदुनाथ धत्ते, सदानंद वर्दे, दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर अशा तरुण सहकाऱ्यांची रावसाहेबांना साधसंगत लाभली होती. आपल्या दिलखुलास वृत्तीने रावसाहेबांनी सर्वांना आपलेसे केले होते साधना आता खपत असे कमी; पण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचारमंथनात बिनीवर असणाऱ्या शक्तींपैकी ती एक प्रमुख शक्ती झाली होती. होती. वरेरकर, आंबे, वडके इत्यादी खप्या कार्यकल्यांनी प्रेस आणि प्रकाशनाची खातीही चांगलीच बळकट केली

सुबक मुद्रण, निर्दोष संहिता आणि आकर्षक रचना यांसाठी साधना मुद्रणालयाची ख्याती झाली. विविध आणि उत्कृष्ट प्रकाशनांनी साऱ्या मराठी मुलखात नाव मिळवले. पण वाढत्या महागाईच्या रेट्याखाली टिकाव धरणे मुष्किल होऊ लागले. साधनावर प्रेम करणारी किती तरी माणसे सुचेल त्या मार्गाने मदत करीत होती. उदार देणग्याही मिळत होत्या, पण प्रपंच सावरत नव्हता. 1955 मध्ये कारभार गुंडाळण्याचा विचार बलवत्तर होत होता. पण कार्यकर्ते हिमत हरले नव्हते. राजधानी मुंबई सोडून मुक्काम पुणे शहर येथे प्रपंच न्यावा असा त्यांनी बेत केला. पुनश्च हरिः ॐ हा धैर्यमंत्र जपत माणसे कामाला लागली, हरिभाऊ गद्रे यांनी व्यवस्थापनाची अवजड जबाबदारी आपल्या समर्थ बाहंनी उचलली. वसंत शिरोळकर, प्रभाकर सिद्ध, श्रीरंग साबडे यांनी मेहनतीला कधी नाही म्हटले नाही, प्रकाशन आणि छापखाना यांचे काम वाढवण्याची कसोशी सुरू झाली. साप्ताहिकही नवे नवे उपक्रम हाती घेऊ लागले. स्थलांतर करतेवेळी निर्माण झालेला आर्थिक बोजा साधनाच्या मित्रानी उचलला. पुढेही 1961 साली पानशेतचे चौथे पानियत साधनाची पुरी वाताहतच व्हायची, पण जनतेच्या हस्ते औदायाचा वर्षाव होऊन साधना जगली, वाचली. डॉ.नारायण डोळे, श्री.शंकर सारडा, प्र.ग.प्र. प्रधान, देवीदास बागूल, राजा मंगळवेढेकर, सरिता पदकी,

गोपाळ शहा अशा तरुण तडफदार मित्रांना, साप्ताहिकाच्या यशस्वी संचालनाचे बरेच श्रेय दिले पाहिजे. 'कुमार अक' हे साधनेच्या उपक्रमशीलतेचे एक सुंदर उदाहरण आहे. हा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या सास्कृतिक जीवनातले एक आकर्षक दालन आहे. यात यशवंत चौधरी सारख्या कलावंतांची मोठी कामगिरी आहे. प्रतिवर्षी साधना दिवालके तर नव्या नव्या रूपात निधतोच, पण त्याशिवाय पंचवार्षिक योजना, गोवा, संयुक्त महाराष्ष्ट्र, झोपडपट्ट्यांची सम युवकांचे मनोगत, लोकशाही समाजवादाची वाटचाल, शिक्षणशुद्धी, दलित जीवनाचा प्रश्न. अशा विशिष्ट विषयान वाहिलेले खास अंक, आणि रावसाहेब पटवर्धन, नाथ पै, आवाबेन यांसारख्या व्यक्तीच्या स्मृत्यर्थ काढलेले विशेषांक म्हणजे साधनेची आगळी लेणीच आहेत. 'आंतरभारती' विचाराचा प्रसार हे साधनाचे जन्मापासूनचे व्रत आहे, आणि त्यावरची निष्ठा दिवसमानानंतर कमी व्हायच्याऐवजी वाढतेच आहे. त्याशिवाय मुस्लिम सत्यशोधक मंडळ. जातिनिर्मूलन संस्था, एक गाव; एक पाणवठा आंदोलन, बालबोध-पीठ, ध्येयशील रुग्णालये आणि विद्यालये निर्माण करण्याचे प्रयत्न, राष्ट्र सेवादल व युक्रांदसारख्या युवक चळवळी; भूदान, श्रम सहकार असे साधनेच्या प्रेमाचे विषय पाहिले तर गेल्या पंचवीस वर्षांतील समाजहिताच्या प्रत्येक आंदोलनाशी साधनेचा किती घनिष्ट संबंध आला आहे ते सहज स्पष्ट होईल. 

पूज्य विनोबा, आचार्य दादा धर्माधिकारी यांसारख्या थोरांचे आशीर्वाद साधनेला लाभले. बाबा आमटे, हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर यांसारखे नवविचारप्रेरित आणि नवविचारप्रेरक मित्र मिळाले. बाबा आढाव. अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांसारख्या प्रामाणिक संतप्त तरुणांनी साथ-संगत दिली. साधनेला साहाय्य करणाऱ्या समर्थ मंडळींची नुसती नावनिशी द्यायची तरी एक विशेषांक काढावा लागेल. याचा अर्थ एवढाच की, पंचवीस वर्षांच्या वाटचालीनंतर साने गुरुजींची 'साधना' महाराष्ट्राची झाली आहे. निदान महाराष्ट्रातील धडपडणाऱ्या मुलांची ती गतिशील आघाडी आहे. पंथापेक्षा प्रवृत्ती जगवणे साधनेला मोलाचे वाटे. ती व्यापक अर्थाने समाजवादी विचारांची आहे, विवेकशील लोकशाहीची पुरस्कर्ती आहे, आणि अन्यायाविरुद्ध प्राणपणाने ठाण मांडणारी आहे. या दृष्टीने आजच्या महाराष्ट्रात 'साधना हे एक शक्तिस्थान आहे असे नम्रपणे आम्ही नमूद करू इच्छितो. पंचवीस वर्षांच्या प्रवासानंतर थोड्या आत्मगौरवाने बोलल्याबद्दल वाचकांनी क्षमा केली पाहिजे. खरे म्हणजे आमच्या उणिवाही अगणित आहेत. त्यांची खंत आम्हाला खूप वाटते. देशात आणि जगात चालणाऱ्या महत्त्वपूर्ण आंदोलनांशी जसा आणि जेवढा संबंध जोडायला हवा होता तेवढा जोड़ता आला नाही. 

मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जित्या मनाच्या तरुणांचे एकमेव मुखपत्र ही पदवी साध्य करण्याच्या प्रयत्नात आम्ही अपुरे पडलो. तर मग आमची मिजास तरी कसली? मिजास एवढीच की, ध्येयांशी असलेली बांधिलकी कधी सोडली नाही, विसरलो नाही; आणि साने गुरुजींनी अपेक्षिलेल्या कसोटीला उतरण्याचा मनोभावे प्रयत्न केला. मराठी साप्ताहिके फार अल्पायुषी ठरतात. त्यातून साधनेला मोठ्या भांडवलाचा पाठिंबा नाही. तिच्या पाठीराख्यांची संख्या तशी लहानच आहे. आपल्या लोकजीवनातील भिन्नभिन्न प्रवाहांचे रूप पाहिले तर साधनेच्या विचारांशी सहमत होणारा प्रवाह खूप छोटा आहे, अल्पसंख्य पण जिद्दीच्या लोकांचा हा परिवार आहे; 'माडिये जातीचा मज भेटो कोणी' असा ध्यास घेऊन धडपडत राहणे, आणि फुले-आगरकरांच्या, गांधी-विनोबांच्या, साने गुरुजींच्या स्वप्नांचा आशय साकार करण्यासाठी आपल्या कुवतीनुसार काम करीत राहणे हे साधनेच्या अस्तित्वाचे अधिष्ठान आहे. पंचविसाव्या कोसाच्या खुणेपाशी साधना उभी आहे; पण तिच्या नजरेपुढे असणारी मंझिल अजून दूर आहे. पल्ला लांबचा आहे. वाट वहिवाटीची नाही. चढण तेढी आहे. उदार महाराष्ट्राने पंचविसाव्या कोसापाशी साधनेच्या पाठीवर मायेने हात ठेवावा. अंग थरथरून येईल आणि ध्रुवाचे यात्रिक आपल्या वाटेवर चालत राहतील.
- सदानंद वर्दे
(साधना : रौप्य महोत्सवी वर्षारंभ अंक, 1973)

------------------------------------------

अंधाराला उजळून टाकू या
शरद सतू हा सामान्यतः रमणीय असतो. पण शरदातली अमावास्याही काही कमी रमणीय नसते. दाच्या अमावास्येला एक अधिकच दारुण काळीकभिन्न छटा आहे. मन कातर करणारी, साशंक करणारी, जीवनावर सर्वत्र ह्या अमावास्येचे काळे सावट पडल्यासारखे दिसते आहे. काळाकभिन्न अंधार जणू जे जे तेजस्वी, जे जे आभा देणारे, त्याला त्याला गिळायला टपला आहे. बाटते. ह्या अंधाराविरुद्ध गगनभेदी आक्रोश करावा. पण ते अवघे गगनच अंधाराने व्यापल्यासारग्खे झाले आहे. असा आक्रोश करायचे सोडून आपल्या हाती जी मेणबत्ती, पणती, सलाई, जे काही असेल ते चेतविणे. व्यासाप्रमाणे हाही आक्रोश वाया जाईल का? त्यांच्याप्रमाणेच 'ऐकतो कोण?' असे म्हणायची का पाळी येणार आहे? पण 'अंधार अंधार म्हणून आक्रोश करण्यात अर्थ नसतो. ज्या आक्रोशाने काही तो घनदाट अंधकार चिरला जात नाही. आक्रोश हा काही अंधार भेदण्याचा कार्यक्रम असू शकत नाही. असा घनदाट अंधार भेदण्याचा एकच उपाय असतो, आणि तो म्हणजे 'अंधार अंधार आणि एकातून अनेक हा तर सृष्टीचा क्रमच आहे. एका दीपाने दुसरा दीप प्रज्वलित होऊ शकतो. आणि अशी घरोघरी लागलेली दीपमालिका अवघा गहिरा अंधार चिरून टाकते.. यंदाची दिवाळी हाच संदेश घेऊन आली आहे.

दिवाळी म्हणजे भय आणि भ्रम नाहीसा करण्याचा एक मंगल सण. यंदा भय आणि भ्रम यांचे जीवघेणे साम्राज्य भेदण्याची विशेषच आवश्यकता निर्माण झाली आहे. आपण आपली मेणबत्ती, पणती पेटवू या. पेटवता पणतीवर पणती जळतील ज्योती त्या नच गणती लाख लाख हृदयांतिल अवघ्या घालवु अंधारास प्रत्येकाने आपापली मेणबत्ती, पणती, सलाई पेटवली तर त्यामुळे उजळून निघणार नाही असा मुजोर अंधार जगात अजून तरी अस्तित्वातच नाही. आपण सर्वजण आपापले दीप पेटवून दाटलेल्या अंधाराला उजळून टाकू या. या दिवाळीचा हाच संदेश आहे. साधनाच्या ह्या दिवाळी अंकाचे संयोजन याच रीतीने करायचा प्रयत्न आहे. आज सर्वजण परस्परांच्या सुख-दुःखांच्या संवेदनांना पारखे केलो गेलो आहोत. आंतरभारती कथासंपुट हे ह्या जीवघेण्या लादलेल्या संवेदनशीलतेला भेदण्यासाठी टाकलेले एक पाऊलच आहे. आणि अंकातील दुसरा वैचारिक विभाग फॅसिझम अपेक्षित अशा सर्व निमंत्रितांची साथ काही मिळाली नाही. पण त्या विभागात जे साहित्य एकत्र केले आहे, तेदेखील आजच्या भीषण अंधाराला एक चिरा देऊ शकेल अशी आशा वाटते.
- यदुनाथ थत्ते
(संपादकीय : दिवाळी अंक 1975)

-----------------------------------------------

साधना साप्ताहिकाला या अंकाबरोबर 50 वर्षे पूर्ण होत आहेत. साने गुरुजींनी निर्माण केलेल्या ध्येयवादाची ही अखंड वाटचाल आहे. गुरुजींचा सगळ्यात जास्त भरवसा ज्यांच्यावर होता, त्या तरुणाईचा वेध घेणारा विशेषांक या निमित्ताने प्रसिद्ध करणे म्हणूनच आम्हांला औचित्यपूर्ण वाटले. साधना आणि तरुण यांचे अतूट नाते आहे. तरुणांच्या अनेक चळवळींना 'साधना'त हक्काचे, मानाचे पान सदैव होते आणि आहे. तरुणांच्या विविध प्रश्नांवर 'साधना'त अनेक लेख गेल्या अर्धशतकात आले आहेत, विशेषांकही निघाले आहेत, तरीही हा विषयच असा आहे की त्याचे तारुण्य अक्षयच असणार. साधनच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षणाची व ऐतिहासिक कालखंडाची आठवण अशा वेळी होणे अपरिहार्यच. 'साधना'च्या 15 ऑगस्ट 1948 च्या पहिल्या अंकात गुरुजींनी जे मनोगत अग्रलेखाच्या जागी प्रसिद्ध केले ते जसेच्या तसे देत आहोत. ऐतिहासिक क्षणाचा हा दस्तऐवज आहे. आणखी एक सोनेरी कालखंड आहे 1975 ते 1977 चा. या कालखंडात देशावर लादलेल्या आणीबाणीशी ज्या निष्ठेने व कर्तृत्वाने साधनाने झुंज दिली तो कालखंड, ती सगळी हकीकत आजही रोमांचकारी वाटेल आणि विचारप्रवृत्तही करेल. 'साधना'ची आजवरची वाटचाल ही असंख्य सुहृदांच्या भरभक्कम पाठिंब्यावर येथवर आली. यापुढे ही हार्दिकता विस्तारत जाईल, अधिक सक्रिय होईल असा विश्वास वाटतो.
- नरेंद्र दाभोलकर
(साधना :वर्षारंभ अंक 1998

Tags: अनिल अवचट नरहर कुरुंदकर हमीद दलवाई बाबा आमटे नरेंद्र दाभोलकर यदुनाथ थत्ते सदानंद वर्दे मुइनुदीन हारीस बंडू गोरे एस.एम.जोशी मधु लिमये नानासाहेब गोरे आचार्य भागवत आचार्य आवडेकर Sadanand Varde Muinuddin Haris Bandu Gore SM Joshi Madhu Limaye Nanasaheb Gore Acharya Bhagwat Acharya Phodekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके