अयोध्येतील राम मंदिराला मुस्लिम दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविणे हे कृत्य या अविचारात मोडते. या कृत्यातील स्फोटकता अणुब बपेक्षा काकणभर अधिकच असते. 'अणुबबही वापरू' ही आत्मघातकी ठिणगी दोन्ही देशांच्या मानसिकतेमध्ये पडते, ती या स्वरूपाच्या कृत्यामुळे. दुसऱ्या राष्ट्राला कायमचा धडा शिकवण्याची भाषा यामुळे दोन्ही राष्ट्रांची राखरांगोळी करणारा, आणि दोघांना एकाच वेळी पराभूत करणारा हा पर्यायदेखील दोन्ही राष्ट्रांतील शांतताप्रेमी जनतेवर लादला जातो. जगभरातले शस्त्रास्त्रांचे कारखानदार आणि रक्ताला चटावलेले त्यांचे दलाल यांचे अब्जावधी डॉलरच्या धंद्याचे मोठे हितसंबंध राष्ट्राराष्ट्रांतील शत्रुत्व वाढवण्यातच गुंतलेले असतात. त्यामुळे दहशतवादी कृत्यांना आर्थिक जागतिक परिमाणही लाभलेले असते. अशावेळी स्वाभाविकच जबाबदार वर्तनाची अपेक्षा राजकीय पक्ष व संस्थांच्याकडून असते.
उभ्या जगातील संदेशवहन, दळणवळण, अर्थकारण एकाच घटिताचा भाग बनले आहे बनते आहे. हाच नियम दहशती कृत्यांनाही लागू आहे. मानवी बॉम्ब वापरण्यापर्यंतच्या कोणत्याही थराला जाणाऱ्या दहशतवाद्यांचे जगभरचे हात एकमेकांशी गुंफलेले आहेत. त्यांना राष्ट्र, वंश, धर्म काही आड येत नाही. याच नाण्याची दुसरी बाजू अशी असावयास हवी की दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्यांचे हातही अधिक समंजस व समर्थपणे एकमेकांशी गुंफलेले हवेत. या अतिरेकी कृत्यांचा मुकाबला करण्याचे मार्ग आणि त्यामागची मनोभूमिकाही एकत्रपणे आखलेली, दूरदृष्टीने शहाणपणाची ठरणारी व समसंवादी हवी. आंतरराष्ट्रीय पातळीवरची गरज लंडन येथील बॉम्ब स्फोटाने स्पष्ट झाली. भारतात तर ती हरघडी जाणवत असते. येथील दहशतवादाला बहुतेक वेळा एक तीव्र धार्मिक 'खुन्नस' निर्माण करण्याचा पदर खुबीने जोडलेला असतो. कृत्य निंद्य असतेच पण ते कोठे कधी आणि कोणी केले, यामुळे त्या कृत्याच्या परिणामाची दाहकता सहस्रपटीने वाढते.
अयोध्येतील राम मंदिराला मुस्लिम दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविणे हे कृत्य या अविचारात मोडते. या कृत्यातील स्फोटकता अणुब बपेक्षा काकणभर अधिकच असते. 'अणुबबही वापरू' ही आत्मघातकी ठिणगी दोन्ही देशांच्या मानसिकतेमध्ये पडते, ती या स्वरूपाच्या कृत्यामुळे. दुसऱ्या राष्ट्राला कायमचा धडा शिकवण्याची भाषा यामुळे दोन्ही राष्ट्रांची राखरांगोळी करणारा, आणि दोघांना एकाच वेळी पराभूत करणारा हा पर्यायदेखील दोन्ही राष्ट्रांतील शांतताप्रेमी जनतेवर लादला जातो. जगभरातले शस्त्रास्त्रांचे कारखानदार आणि रक्ताला चटावलेले त्यांचे दलाल यांचे अब्जावधी डॉलरच्या धंद्याचे मोठे हितसंबंध राष्ट्राराष्ट्रांतील शत्रुत्व वाढवण्यातच गुंतलेले असतात. त्यामुळे दहशतवादी कृत्यांना आर्थिक जागतिक परिमाणही लाभलेले असते. अशावेळी स्वाभाविकच जबाबदार वर्तनाची अपेक्षा राजकीय पक्ष व संस्थांच्याकडून असते. बेलगाम बोलण्याला चटावलेली विश्व हिंदू परिषद आणि त्यांची भावंडे यांच्या तोगडिया आणि कंपनीकडून ही अपेक्षा बाळगता येत नाही हे खरे. परंतु जसवंतसिंह यासारखा भाजपचा जाणता नेता या हल्ल्याचे निमित्त करून केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हे हिंदू विचाराचे खच्चीकरण करणारे आहे, असे म्हणतो हे या स्वरूपाच्या प्रश्नाचे गांभीर्यच या मंडळींना समजत नाही, याचे द्योतक आहे. अक्षरधाम, रघुनाथ मंदिर, अमरनाथ यात्रा यांवर अडवाणी गृहमंत्री असताना झालेल्या हल्ल्याच्या वेळी अशी भूमिका घेतली गेली नव्हती याचा विसर त्यांना पडावयास नको होता. अर्थात ही गोष्टदेखील स्पष्ट करावयास हवी की मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचे हे गंभीर अपयश आहे.
उत्तर प्रदेशच्या पोलीसखात्याचे एक हजार व केंद्रीय सुरक्षा दलाचे 500 जवान भक्कम लोखंडी कठड्याच्या आत चार पदरी सुरक्षा कडी करून उभे आहेत. असे असताना चिनी बनावटीचे 17 हातबाब घेऊन 'सीता रसोई' या सुविख्यात वास्तूवर कब्जा करून अतिरेकी मोर्चेबांधणी करतात हे धक्कादायक आहे. या शस्त्रांचा वापर करून मंदिर उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा कट असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. अधिक जागरूक गुप्तचर व सुरक्षा यंत्रणा हेच या ढिसाळपणावरचे उत्तर आहे. मात्र तरीही ज्यांच्या गलथानपणातून हे घडले त्यांनाही योग्य शिक्षा मिळावयास हवी. या पलीकडे या घटनेला असलेल्या आणखी दोन पैलूंचाही विचार करावयास हवा. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय पेचप्रसंगाच्या वेळी शरद पवार नेमके परदेशी असतात हा योगायोग मानला जातो. याचप्रमाणे अक्षरधामवरील हल्ला योगायोगानेच अशा वेळेस झाला होता की ज्यावेळी संघ परिवार अडचणीत आला होता, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतातील निवडक ज्येष्ठ कार्यकर्ते सुरतेला यापुढची आपली दिशा कोणती 'नवी' की 'जुनी' याचा खल करावयास जमले असताना अयोध्या मंदिरावर हल्ला व्हावा हाही योगायोगच. पंतप्रधानांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करून देशात शांतता राखण्याचे आवाहन केले हे समंजस वर्तन झाले. परंतु तरीही हिंदुत्ववादी संघटनांनी 'भारत बंद 'पर्यंतचे आपले मनसुबे जमतील तसे आणि जमतील त्या ठिकाणी पुढे रेटलेच.
गेले काही महिने संघ परिवाराशी चाललेल्या संघर्षामुळे राजकारणात मागे पडलेला भाजप आणि विस्कळित बनलेला परिवार यांना हवा तसा विषय सापडला. कठोर हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही, हे उच्चरवाने सांगण्याची संधी मिळाली. अडवाणींना स्वतःची राजकीय पत सुधारून घेण्यासाठी 'अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहीलच' ही डरकाळी फोडण्यास अवसर मिळाला. 'भारत बंद'चा प्रतिसाद संमिश्र होता, एकूण भारताचा विचार करता कमी होता. बंदमुळे व्यवहार ठप्प होतात. हातावर पोट असलेले सर्वजण तेवढा दिवस उपाशी राहतात. उत्पादन थांबते, दंगेधोपे होऊन देशाच्या मालमत्तेचे नुकसान होते. देशाचे असे व्यापक नुकसान अवघे पाच अतिरेकी घडवून आणतात. असे बंद सर्वस्वी दहशतीवर पार पाडले जातात आणि त्याला राष्ट्रीय अस्मितेचे दर्शन म्हणून गोंजारले जाते. हे सारे वर्तन अतिरेक्यांना या देशात जे घडवून आणावयाचे आहे, तेच आहे; एवढी साधी समज अशी आवाहने करणाऱ्या व त्यासाठी आपले अनुयायी हिंसकपणे रस्त्यावर आणणाऱ्या नेत्यांना नसावी काय? देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी खरे तर हिंदु मुस्लिम तणाव कमी करावयास हवा.
पाकिस्तानातील तसेच भारतातील माथेफिरू धर्मवादी शक्तींना अलग पाडावयास हवे. दहशतवादी कृत्याचे उत्तर म्हणून देशव्यापी बंदचा अतिरेक करणे यामध्ये भडक आवाहन आहे. जनसामान्यांची संवेदनशीलता, शहाणपण बधिर व्हावे; दोन्ही देश तसेच भारतातील हिंदु मुस्लिम समाज एकमेकांपासून दूर जावेत हा क्षुद्र राजकीय स्वार्थ त्यामागे आहे. अतिरेकी माथेफिरू खरेच, पण या प्रश्नाचे आकलन तेवढ्याच माथेफिरूपणे करून घेऊन भारतीय उपखंडातील शांतता प्रक्रियाच धोक्यात आणू पाहणारेही त्यांचे भाऊबंदच शोभतात.
Tags: कॉंग्रेस भाजप प्रभू रामचंद्र मुस्लिम हिंदु महाराष्ट्र भारत लंडन दहशतवाद Congress BJP Prabhu Ramchandra Muslim Hindu Maharashtra India London Terrorism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या