डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्कट, भव्य तितुके घ्यावे - साने गुरुजी भवन आणि दलित

आम्ही समाजवादी, 'संघटित मजुरांची हुकूमशाही' असे मार्क्सप्रणीत ध्येय मानीत होतो. इथे ज्याला काही गमवावयाचे नाही, असे प्रोलिटरिएट दलित व मागास है आहेत. त्यांच्यापाशी जमीन नाही; आहेत ते श्रम. त्यांची हुकूमशाही यावी, हे तर स्वप्न आहे. परंतु ते वास्तवात यावे कसे? डॉ. बाबासाहेबही समाजमानस बदलावयास हवे असे प्रतिपादन करत. परंतु दंडुका किंवा कायदा हे त्याचे साधन नव्हे, तर प्रबोधनानेच हे शक्य आहे. प्रबोधन, विधायक काम आणि संपर्य या त्रयींची आठवण ठेवावयास हवी, असे एस. एम. नी आग्रहाने सांगितले. 

‘साने गुरुजी भवन'चा पायाभरणी समारंभ अकरा तारखेला हडपसर येथे संपन्न झाला. एक वाचनालय आणि मोठे सभागृह असलेले भवन, असे याचे रूप होईल. आमदार विठ्ठलराव तुपे यांच्या नेतृत्वाखाली सेवा दलातल्या कार्यकर्त्यांनी योजिलेला हा प्रकल्प. अध्यक्ष होते एस. एम. जोशी. आरंभी त्यांना एक चिठ्ठी मिळाली : ‘‘ही जमीन दलितांची; त्यांना इनाम मिळालेली. भवनला ती देणे अन्यायाचे नव्हे काम, याचाही विचार व्हावा.’’ समारंभानंतर सिद्धार्थ युवक मंडळाने अशा अर्थाचे एक निवेदनही दिले.भाई वैद्यांनी आपल्या भाषणात याचा खुलासा केला. जमीन इनामी होती; वतने रद्द झाल्यानंतर मालकी सरकारकडे गेली. दलितांनी तिच्यावर हक्कही प्रस्थापित केला नाही. आता ती साने गुरुजी भवनाला मिळाली आहे, यामध्ये अनुचित काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

एस. एम. नी आपली शंका आणि तक्रार बोलून दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रथम आभार मानले. भाई वैद्यांनी वस्तुस्थितीचे मुद्दे सांगितलेच होते. एस. एम. नी ‘रीडिंग बिटविन द लाइन्स' पद्धतीने निषेधकर्त्यांच्या दु:खाची उकल केली. 'कायदेशीर मालकी कोणाचीही असू द्या.' ते म्हणाले, ‘‘दलितांचा नैतिक हक्कही आपण मान्य करू. परंतु कायद्यापलीकडे जाऊन काही विचार करावयास हवा. ‘साने गुरुजी भवन' या जागेचा वापर कसा करणार आहे, ते पाहायला हवे.’’ असे सांगताना एस. एम. नी तिचे एक जणू बौद्धिकच घेतले-बौद्धिक,कसले, 'हार्दिक'च ते! बौद्धिके रुक्ष असतात. हार्दिक हृद्य. थेट हृदयापर्यंत जातात. ज्ञानाचे महान उपासक डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी वाचनालयाचे खरे तर स्वागत करावयास हवे,’’ असे एस. एम. म्हणाले. म. फुले, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, आदी विभूतींनी दलितांवरील अन्यायाला वाचा फुटावी यासाठी जीवन वेचले. साने गुरुजींनी तर पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण करून प्राणही पणाला लावले. त्यांनी समोर ठेवलेले समता, बंधुभावाचे लक्ष्य गाठणे, हा फार दूरचा पल्ला आहे. त्यासाठी सवर्णांच्याही प्रबोधनाची आवश्यकता मोठी आहे. आम्ही समाजवादी, 'संघटित मजुरांची हुकूमशाही' असे मार्क्सप्रणीत ध्येय मानीत होतो. इथे ज्याला काही गमवावयाचे नाही, असे प्रोलिटरिएट दलित व मागास है आहेत. त्यांच्यापाशी जमीन नाही; आहेत ते श्रम. त्यांची हुकूमशाही यावी, हे तर स्वप्न आहे. परंतु ते वास्तवात यावे कसे? डॉ. बाबासाहेबही समाजमानस बदलावयास हवे असे प्रतिपादन करत. परंतु दंडुका किंवा कायदा हे त्याचे साधन नव्हे, तर प्रबोधनानेच हे शक्य आहे. प्रबोधन, विधायक काम आणि संपर्य या त्रयींची आठवण ठेवावयास हवी, असे एस. एम. नी आग्रहाने सांगितले. ‘‘दलित रागावतात, आदळआपट करतात, त्याबद्दल मला राग येत नाही.’’ एस. एम. असे म्हणाले, तेव्हा थेट रवीन्द्रनाथांच्या वचनाची आठवण झाली. ‘‘देशातील हे पददलित बांधवा! तुझे पाय दारिद्र्यात इतके खोल रुतले आहेत की तुला वंदन करण्यास मी कितीही वाकलो, तरी तुझा पदस्पर्श होतच नाही!’’ 

बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पाच्या जागेबद्दलही अशीच चळवळ झाली होती. बाबांना इजा करण्याच्या प्रयत्नापर्यंत त्या वेळी वातावरण तापले होते. एक मात्र उत्कटपणे वाटते. दलित बांधवांनी तरी थोडी पारख का करू नये? रामकृष्ण परमहंसांच्या एका गोष्टीचा उल्लेख येथे करावासा वाटतो! एकदा नदीकाठी ते बसले असताना पाण्याच्या प्रवाहातून एक जीव वाहत जाताना त्यांना दिसला. साधूच ते. रामकृष्ण कळवळले, आणि त्यांनी त्याला तळहाती घेऊन काठावर सोडण्याचा प्रयत्न केला. तोच स्वभावधर्माप्रमाणे त्याने नांगी मारली, आणि मघाशी त्याच्या वेदनेने कळवळलेले रामकृष्ण आता दुःखाने कळवळले आणि विंचू पुन्हा पाण्यात पडला! इच्छा एवढीच आहे की दलित बांधवांनीही  उत्कट भव्य ते घ्यावे! उगाच विरोधासाठी विरोध नसावा!

Tags: पुणे साने गुरुजी भवन वेचक वेधक pune sane guruji bhavan piercer weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके