डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीसाठी...

भारतीय जनता पक्ष, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी संघटना यांनी मालेगाव स्फोट प्रकरणातील तपास यंत्रणेवरच राजकीय लाभासाठी आगपाखड केली. आरोपींना न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर फुले उधळली. आरोपींचे उदात्तीकरण करताना ‘आपण देशाच्या घटनेचा अवमान करीत आहोत’ याचेही भान मा मंडळींना राहिले नाही. त्यावेळी निदान आरोपपत्र दाखल तरी व्हावयाचे होते. हिंदू राष्ट्र स्थापनेचा कट रचल्याच्या आरोपावरून यांच्यावर देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल झाल्यावर, प्रतिक्रिया काय हवी होती आणि काम होती! आरोपाची सत्या सत्यता, लावलेली कलमे योग्य की अयोग्य , गुन्ह्यांना शिक्षा कोणती हे सर्वविषय न्यायालयीन कक्षेतच येतात. कायद्याने योग्य ती कारवाई होणे हेच उचित व श्रेयस्कर आहे हे सामान्य माणसालाही समजते. अशावेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या आरोपपत्राबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘त्यांना देशद्रोही कसे काम ठरवता? शिवसेनाप्रमुख भारताला हिंदू राष्ट्र मानतात. आमचे राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच असताना असा कट रचण्याची गरजच काय?’ असे प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत. योगायोगाने याच वेळी बराक ओबामा आपली राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना केलेल्या भाषणात आग्रहपूर्वक सांगत होते, ‘आमचा देश ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, ज्यू आणि नास्तिक या सर्वांचा आहे.’ 

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. स्वाभाविकच ‘धर्म निरपेक्षता’ हा शब्द आता परवलीचा बनेल. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्म  निरपेक्षतेचा रखवालदार समजतो. या पक्षाचा गेल्या काही दशकांतला व्यवहार पाहता हे श्रेम त्या पक्षाला देता येणे अवघड आहे.मग अन्य काही पक्ष वा त्यांच्या आघाड्या स्वत:च्या कट्टर धर्म निरपेक्षतेची ग्वाही देत ‘आम्हीच खरे’ असा पुकारा करतात. या राजकीय रणधुमाळीत धर्म  निरपेक्षतेचा आशय जनमानसात रूजवणे आणि प्रशासकीय पातळीवर धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वाची खंबीर अंमलबजावणी करणे हे मात्र दूरच राहते. याची गरज अधोरेखित करणाऱ्या काही घटना अलीकडेच घडल्या , त्यापासून योग्य तो बोध घ्यावयास हवा.

भारतीय लष्करातील निलंबित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरयांच्या सह अकरा जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले. आरोपपत्रावरून हे स्पष्ट दिसते की, या दहशतवादी हिंदू गटाच्या कारवाया ही तात्कालिक प्रतिक्रियावजा घटना नसून व्यापक उद्दिष्टे समोर ठेवून केलेल्या सुनियोजित कारस्थानाचाच भाग आहेत. दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात या बाबी उघड झाल्या आहेत की, मालेगावप्रकरणातील आरोपींचे मनसुबे ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्याचे होते. आपल्या मोहिमेसाठी त्यांनी नेपाळमधील माओवाद्याशी संपर्क साधला होता. इस्रायलची मदत घेण्याची त्यांची इच्छा होती. ‘सशस्त्र आर्यवर्त’ या नावाने हिंदू राष्ट्र त्यांना निर्माण करावयाचे होते. या राष्ट्राचा ध्वज कसा असेल हेही त्यांनी ठरविले होते. भारताची घटना ही या मंडळींना अमान्य होती.

वैचारिक पातळीवर देशाच्या घटनेतील काही तत्त्वे मान्य नसणे, हा गुन्हा नाही. लोकशाही मार्गाने त्या बाबत बोलता मेते. प्रचार करता येतो. मात्र भारतीय संविधानाच्या पायाभूत मूल्यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने धर्म  निरपेक्षता हे तत्त्व भारतीय घटनेचा अंगभूत भाग असल्याची ग्वाही दिली आहे. ते संसदेलाही बदलता येणार नाही. यामुळे धर्माधिष्ठित राष्ट्र भारतात स्थापन करावयाचे तर सशस्त्र उठावच करावा लागेल. मालेगाव बाँबस्फोटातील आरोपीवरील आरोपपत्र असे सांगते की, ही मंडळी तेच करू पहात होती हे वाटते तेवढे पोरकट व हास्यास्पद नाही. गांभीर्याने नोंद घ्यावे असे आहे.

धर्म निरपेक्षतेच्या मूल्यांचे पोषण करण्याच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले आहे. धर्माच्या आधारावर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानला आपला देश एकसंध राखता आलेला नाही. देशातील लोकशाही सांभाळता आलेली नाही. इस्लामी दहशतवाद्यांना पोसण्यातही त्यांचा हातभार लागला आहे. सर्वच आघाड्यांवर पाकिस्तानची पिछेहाट झाली आहे. पण याच काळात भारताने जगात मानाचे स्थान मिळवले आहे. देश आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य लढ्यात भारतामध्ये ज्या मुल्यांची निर्मिती झाली आणि जी स्वातंत्र्योत्तर भारताने सांभाळली त्यांचा या उवलवाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे. विविध धर्म, जात, वंश, भाषा यांची सांस्कृतिक अस्मिता या देशाने सांभाळली, जोपासली, वाढवली. त्या सर्वांसोबत ‘भारतीय’ अशी अधिक व्यापक ओळख देशातील जनतेने स्वीकारावी हा प्रयत्न झाला. तो काही प्रमाणात यशस्वी झाला. अन्यथा भारत हा ‘देश’ म्हणून उभाच राहू शकला नसता. धर्म  निरपेक्षतेचा नेमका आशय काय? यावर भलेचर्चा होत राहील, पण उदारमतवादी, आधुनिक लोकशाहीच भारताला तारेल हा आता पर्यंतच्या वाटचालीतून मिळालेला धडा आपण मनोमन स्वीकारावयास पाहिजे. मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी नेमके याच पायाभूत गृहितकाला तडा देत आहेत. मात्र खरी चिंता त्या पुढची आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी संघटना यांनी मालेगाव स्फोट प्रकरणातील तपास यंत्रणेवरच राजकीय लाभासाठी आगपाखड केली. आरोपींना न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर फुले उधळली. आरोपींचे उदात्तीकरण करताना ‘आपण देशाच्या घटनेचा अवमान करीत आहोत’ याचेही भान मा मंडळींना राहिले नाही. त्यावेळी निदान आरोपपत्र दाखल तरी व्हावयाचे होते. हिंदू राष्ट्र स्थापनेचा कट रचल्याच्या आरोपावरून यांच्यावर देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल झाल्यावर, प्रतिक्रिया काय हवी होती आणि काम होती! आरोपाची सत्या सत्यता, लावलेली कलमे योग्य की अयोग्य , गुन्ह्यांना शिक्षा कोणती हे सर्वविषय न्यायालयीन कक्षेतच येतात. कायद्याने योग्य ती कारवाई होणे हेच उचित व श्रेयस्कर आहे हे सामान्य माणसालाही समजते. अशावेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या आरोपपत्राबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘त्यांना देशद्रोही कसे काम ठरवता? शिवसेनाप्रमुख भारताला हिंदू राष्ट्र मानतात. आमचे राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच असताना असा कट रचण्याची गरजच काय?’ असे प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत. योगायोगाने याच वेळी बराक ओबामा आपली राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना केलेल्या भाषणात आग्रहपूर्वक सांगत होते, ‘आमचा देश ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, ज्यू आणि नास्तिक या सर्वांचा आहे.’ अमेरिकेतील 90 टक्के जनता ख्रिस्ती आहे. मुस्लिम दहशतवाद्यांच्या अत्यंत भीषण हल्ल्याला अमेरिकेने तोंड दिले आहे. अशा पार्श्वभूमीवर ओबामांनी केलेले विधान आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीसाठी आवश्यक असलेला शहाणपणा दाखवते.

सारांश, धर्म निरपेक्षतेला केवळ संविधानाच्या आधारे आपण गृहीत धरून चाललो आहोत आणि लोकमानसात व राज्य कर्त्यांत त्याचा आग्रह क्षीण होत चालला आहे का, याचा गांभीर्याने व अंतर्मुख होऊन सर्वांनी विचार करावयास हवा.

राष्ट्रीय पातळीवरील ‘धर्म निरपेक्षता आयोगाची’ कल्पना साकार झाल्यास या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

Tags: लोकसभा निवडणुक संपादकीय नरेंद्र दाभोलकर धर्म निरपेक्षता आयोग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके