डिजिटल अर्काईव्ह

या सर्वांच्या मुलाखती घेताना त्यांची व्यक्तिगत जडणघडण कशी झाली, त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन कसा आकाराला येत गेला, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर ते कसा दृष्टिक्षेप टाकतात आणि आजच्या समाजजीवनावर काय भाष्य करतात, ही चतुःसूत्री समोर ठेवलेली होती. आतापर्यंत निवडलेले सर्व युवा आयकॉन्स केवळ व्यक्तिगत संघर्ष व व्यक्तिगत यश या निकषांवर निवडलेले नाहीत, ज्यांच्या विचार-कार्यात मूल्यविवेक जागा राहिला असे हे युवा आहेत. ज्यांनी आपापल्या क्षेत्रांत कार्यरत राहून समाज बदलाच्या गतीला हातभार लावला असे हे युवा आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपापल्या क्षेत्राला नावीन्यपूर्ण व सर्जनशील असे काही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या युवांच्या मुलाखती वाचून आशावादाला नवी पालवी फुटते, ध्येयवाद मरगळ झटकतो, लढण्याची ऊर्मी प्रबळ होते.

मागील 78 वर्षे अखंड प्रकाशित होत असलेल्या साधना साप्ताहिकाचे, बालकुमार दिवाळी अंक गेली 18 वर्षे (2008 पासून) नियमितपणे प्रकाशित होत आहेत आणि युवा दिवाळी अंक गेली बारा वर्षे (2014 पासून) नियमितपणे प्रकाशित होत आहेत. हे दोन्ही अंक साधना साप्ताहिकाच्या मागील दीड तपातील सर्वाधिक लक्षवेधी राहिले आहेत. म्हणजे वाचकांच्या मनात कुतूहल, आकर्षण आणि प्रतीक्षा या तिन्ही निकषांवर हे अंक साधनाच्या अन्य अंकांच्या तुलनेत अग्रेसर राहिले आहेत. साधनाच्या पारंपरिक व अपारंपरिक वाचकांच्या दृष्टीनेही!

युवा अंक काढताना सुरुवातीची सहा वर्षे प्रामुख्याने विविध क्षेत्रांतील नामवंतांचे लहान-मोठे लेख होते. त्या लेखांमधून युवा वाचकांच्या मनाची क्षितिजे विस्तारतील आणि सामाजिक जाणीवा विकसित होतील असा प्रयत्न होता. नंतरची सहा वर्षे मात्र, आज 25 ते 35 वर्षे या वयोगटात असलेल्या युवा आयकॉन्सच्या दीर्घ मुलाखती या स्वरूपात अंक काढले आहेत. दर वर्षी पाच-सहा याप्रमाणे आतापर्यंतच्या सहा वर्षांत 32 मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. हे युवा आयकॉन्स विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. प्रशासन, उद्योग, शेती, शिक्षण, पत्रकारिता, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण, कला, साहित्य, क्रीडा, संगीत, सिनेमा इत्यादी. हे सर्व जण विविध समाजघटकांतून आलेले आहेत, विविध आर्थिक स्तरांतून आलेले आहेत, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत, विविध प्रदेशांतून आलेले आहेत. कमालीची अनुकूलता आणि कमालीची प्रतिकूलता अशा दोन टोकांवरून आलेले युवा आयकॉन्सही यात आहेत.

या सर्वांच्या मुलाखती घेताना त्यांची व्यक्तिगत जडणघडण कशी झाली, त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन कसा आकाराला येत गेला, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर ते कसा दृष्टिक्षेप टाकतात आणि आजच्या समाजजीवनावर काय भाष्य करतात, ही चतुःसूत्री समोर ठेवलेली होती. आतापर्यंत निवडलेले सर्व युवा आयकॉन्स केवळ व्यक्तिगत संघर्ष व व्यक्तिगत यश या निकषांवर निवडलेले नाहीत, ज्यांच्या विचार-कार्यात मूल्यविवेक जागा राहिला असे हे युवा आहेत. ज्यांनी आपापल्या क्षेत्रांत कार्यरत राहून समाज बदलाच्या गतीला हातभार लावला असे हे युवा आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपापल्या क्षेत्राला नावीन्यपूर्ण व सर्जनशील असे काही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या युवांच्या मुलाखती वाचून आशावादाला नवी पालवी फुटते, ध्येयवाद मरगळ झटकतो, लढण्याची ऊर्मी प्रबळ होते. कुठल्याही परिस्थितीत उसळी मारून या जगात याच जीवनात भरारी घेता येते असा विश्वास उत्पन्न होतो.

या अंकासाठी ज्यांनी मुलाखती घेतल्यात, ते पाचही तरुण मित्र सहकारी मागील पाचही वर्षांच्या युवा अंकांशी परिचित आहेत. या सर्वांनी यापूर्वी एक, दोन, तीन, चार अंकांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे हे पहिले वर्ष असे होते की, मुलाखती घेणाऱ्यांनाच मुलाखती कोणाच्या घ्याव्यात हा चॉईस दिलेला होता. त्याप्रमाणे, त्यांनी योग्य निवड केली आणि सर्व मुलाखती आशयसंपन्न व वाचनीय झाल्या आहेत. या पाचही युवा आयकॉन्सचे आपापले असे वेगळे वैशिष्ट्य आहेच, पण सर्वांमध्ये समान असे काही पक्के धागेही आहेत. म्हणजे सतत प्रवास करत राहणे, सतत शिकत राहणे आणि पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहणे ! युवा अंकातून आणखी वेगळे असे काय अपेक्षित असते?
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी