परतण्यापूर्वी धावपळ करून लालजींना जहांगीरमधे जाऊन भेटून आलो. ती संधी चुकली असती तर जन्मभर शल्य उरी बोचत राहिले असते.
परतण्यापूर्वी धावपळ करून लालजींना जहांगीरमधे जाऊन भेटून आलो. ती संधी चुकली असती तर जन्मभर शल्य उरी बोचत राहिले असते.
पुण्यात 41-42 च्या दरम्यान, सेवादलाच्या पहिल्या शाखेची आम्ही माणसं त्यानंतरच्या मधल्या 17-18 वर्षांच्या काळात एकमेकांपासून दूर गेलो. साधा पत्रव्यवहारही नव्हता. सवड नव्हती आणि गरजही भासली नाही.
आणीबाणीच्या काळात तुरुंगाच्या भिंती असूनही ते जुने स्नेहबंध पुन्हा भरभक्कम झाले. अगदी नकळत.
मी आता सार्वजनिक कार्यांतून निवृत्त व्हावे, कारण प्रकृतीच्या दृष्टीने मी परस्वाधीन बनलो आहे, हा मला आणीबाणी संपल्यानंतर लालजींनी दिलेला सल्ला. मी तो फारसा जुमानला नाही. पण त्यामुळेच माझी व त्यांची सुमारे तीन तपानंतर का होईना पण भेट होऊ शकली. महाराष्ट्रातले माझ्यासारखे अनेक स्नेही लालजींच्या निधनाच्या वार्तेने हळहळले असतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या