महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात चंद्राताईंनी काम केले आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेने ग्रामराज्य ट्रस्ट ही संस्था सुरू झाली. आता अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून नवीन रचना करण्याचा काळ आला आहे' असे सांगून विनोबांनी. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने देशापुढील प्रश्नांची उत्तरे शोधावीत, असे म्हटले.
चंद्राताई किर्लोस्कर या रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्र सेवादलाच्या निष्ठावान कार्यकरत्त्या. 1947 च्या सातारा येथील सेवादल मेळाव्यानंतर सेवादलाचा स्त्रीविभाग अनुताई लिमये यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढू लागला. त्या वेळी अनुताईच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये चंद्राताई होत्या. दादा शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या चंद्राताईंना विधायक कामाची पहिल्यापासूनच आवड होती. गांधीजींच्या व साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वांचा आणि विचारांचा चंद्राताईच्या मनावर खोल संस्कार झाला होता. त्यामुळे सेवादलाचे काम करीत असतानाच देवरुखचे मातृमंदिर तसेच लांजा व राजापूर परिसरातील जानकीबाई शेटये, तेंडुलकर कुमुदताई रेगे आदींच्या विधायक उपक्रमांतही चंद्राताई सहभागी होत होत्या. साने गुरुजी सेवापथकात उत्साहाने काम करणाऱ्या चंद्राताईंना आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात समाजपरिवर्तनाचे एक अपूर्व सामर्थ्य आहे असे वाटले आणि त्या भूदान आंदोलनात सामील झाल्या.
विनोबाजींच्या महाराष्ट्रातील पदयात्रेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पदयात्रेचे संयोजन व व्यवस्था यांची मोठी जबाबदारी चंद्राताईनी पार पाडली विधायक काम चालू असताना चंद्राताई राजकीय परिस्थितीबद्दलही जागरूक असत. 1972 नंतर बिहार आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून जयप्रकाशजींनी 'लोकसमिती’ ची योजना देशासमोर मांडली, आणि अनेक विचारवंतांना एकत्र आणले. महाराष्ट्रात या विचारवंतांच्या कार्यास पूरक काम करून लोकसमिती ही कल्पना जनमानसात रुजवण्यासाठी ज्यांना हिरीरीने काम केले त्यांच्यात चंद्राताई अग्रभागी होत्या. त्याच सुमारास विनोबांनी मांडलेल्या आचार्यकुल या कल्पनेच्या आधारे महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात चंद्राताईंनी काम केले आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेने ग्रामराज्य ट्रस्ट ही संस्था सुरू झाली. आता अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून नवीन रचना करण्याचा काळ आला आहे' असे सांगून विनोबांनी. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वयंप्रेरणेने देशापुढील प्रश्नांची उत्तरे शोधावीत, असे म्हटले.
चंद्राताई या अशाच एक स्वयंप्रा्त कार्यकर्त्या त्यांना या प्रयोगाबद्दल साहजिकच आकर्षण वाटले आणि त्यांनी या संस्थेला आकार देण्याचे योजले. याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी सर्वोदय अध्ययन केंद्र सुरू केले. अध्ययनाची सोय आणि विविध प्रयोग करण्यास मोकळीक ही या संस्थेची वैशिष्ट्ये राहिली पाहिजेत, याकडे चंद्राताईनी कटाक्षाने लक्ष दिले आणि उरुकी येथे हे काम लवकरच आकार घेऊ लागले. ग्रामराज्य ट्रस्टला अनेक मान्यवरांचे सहाय्य लाभले आणि त्यामुळे चंद्राताईना ट्रस्टमार्फत अनेक कामे सुरू करता आली. शंभर स्त्रियांना काम देण्याचा एक प्रकल्प त्यांनी आखला आहे आणि शेतीमध्येही त्यांचे विविध प्रयोग चालू आहेत. संस्थेचा आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि चोख असावा याबद्दल चंद्राताई अतिशय दक्ष असतात.
चंद्रताई किर्लोस्कर यांनी विविध विधायक कामे करतानाच वाचन, मनन ज्याप्रमाणे चालू ठेवले त्याचप्रमाणे ज्या वेळी त्यांची प्रकृती त्यांना साथ देत होती त्या वेळी देशातील महत्त्वाच्या घटना जेथे घडत होत्या तेथे प्रत्यक्ष जाऊन, राहून त्या प्रयोगांचे वैशिष्ट्य समजावून घेतले चंबळच्या घाटीलील डाकट्या समर्पणाच्या घटनेचे, त्यांनी त्या भागात सहा महिने प्रवास करून आणि अनेक डाकूच्या भेटी घेऊन या प्रश्नाचे सखोल अध्ययन केले. अनुभवावर आधारित 'शापित चंबळ, उ:शापित पुत्र' हे जवळजवळ 400 पानांचे पुस्तक त्यांनी लिहिले. या अभिनव पुस्तकाला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. चंद्राताईंनी विद्यार्थ्यासाठी जयप्रकाशजींचे एक अभिनय चरित्रही लिहिले.
गेली काही वर्षे चंद्राताईंची प्रकृती बरी नाही आणि आता तर ती फारच खालावली आहे. असे असूनही त्यांच्या मनाचा उत्साह मात्र पूर्ववत् टिकून आहे. मुंबईच्या साने गुरुजी आरोग्य मंदिर या संस्थेतर्फे साने गुरुजींच्या पुण्यतिथीस त्यांना 'साने गुरुजी स्मृती पुरस्कार' देण्यात येणार आहे. चंद्राताई किर्लोस्कर यांच्या आयुष्यभरच्या ध्येयवादी वाटचालीचा हा यथोचित गौरव आहे. चंद्राताई किर्लोस्कर यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना अक्षय लाभो आणि त्यांची ध्येवस्वप्ने साकार होवोत हीच शुभेच्छा.
Tags: विनोबा साने गुरुजी रत्नागिरी चंद्राताई किर्लोस्कर ग.प्र.प्रधान Vinoba Sane Guruji Ratnagiri Chandratai Kirloskar G.P. Pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या