डिजिटल अर्काईव्ह

डॉ. दाभोलकरांची व्याख्याने ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध

हा कार्यक्रम उधळून लावणार, अशी कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे पूर्ण पोलीस बंदोबस्तात हे शूटिंग पार पडले. या डीव्हीडीचे एडिटिंग करून प्रकाशन करण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा झाली, पण प्रकाशनाचा कार्यक्रम व्हायच्या आधीच त्यांची हत्या झाली. आता या डीव्हीडीचा प्रकाशन समारंभ बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर आणि डॉ.शैला दाभोलकर उपस्थित राहणार आहेत.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याला 20 फेब्रुवारी रोजी सहा महिने झाले. डॉक्टरांच्या अचानक झालेल्या हत्येमुळे दोन मुख्य प्रश्न निर्माण झाले. पहिला म्हणजे- त्यांची हत्या कोणी केली? आणि दुसरा- आता त्यांच्यानंतर पुढे काय? यातला पहिला प्रश्न हा पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून सोडवीत आहेत आणि त्यातील प्रगती आपल्याला माहीत आहे. दुसरा प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो. डॉक्टर गेल्यानंतर दात नसलेला का होईना, पण कायदा झाला आणि आत्तापर्यंत जवळपास 40 केसेसची नोंदही झाली ही स्वागतार्ह बाब आहे. पण हा फक्त तात्पुरता विषय न राहता, त्यासाठी कायम स्वरूपाचा लढा देण्याची गरज आहे, विचार-प्रसाराची आणि प्रबोधनाची गरज आहे. 2010 मधील कोल्हापुरातील साधना साहित्य संमेलनात डॉक्टरांशी चर्चा झाली आणि असे ठरले की, डॉक्टरांची व्याख्याने ऑडिओ सीडीच्या माध्यमातून रेकॉर्ड करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावीत. त्यानुसार सलग आठ दिवसांत त्यांची 10 व्याख्याने स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली.

यामध्ये वैद्यानिक दृष्टिकोन, फलज्योतिष, भूत-भानामती, मनाचे आजार, देवी अंगात येणे, बुवाबाजी, देव-धर्म-नीती, विवेकवाद अशा विषयांवरीलव्याख्याने आहेत. ती ऑडिओ सीडी पुढे प्रकाशित झाली आणि 2000 पेक्षा जास्त सीडीज अगदी थोड्याच काळात संपल्या. त्याच्या प्रकाशनाच्या वेळी डॉक्टरांशी अजून एका कल्पनेबाबत चर्चा झाली, ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. म्हणून मग अंनिसला नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी करून त्यांची उत्तरे स्वतः डॉक्टरांनी द्यावीत. त्याची चित्रफीत तयार करून, ती मोठ्या प्रमाणात वितरित करावी, सर्वदूर पोहोचवावी. त्यासाठी 8 एप्रिल 2013 रोजी पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात काही लोकांना निमंत्रित करून 26 प्रश्न डॉक्टरांना विनोद शिरसाठ यांनी विचारले आणि त्याप्रमाणे त्याची चित्रफीत तयार केली. त्याचवेळी विविध बाबा-बुवा जे चमत्काराचे प्रयोग करून लोकांना फसवतात, त्यांचे प्रात्यक्षिक शहाजी भोसले यांनी करून दाखविले आणि त्याचेही चित्रीकरण करण्यात आले.

हा कार्यक्रम उधळून लावणार, अशी कुणकुण पोलिसांना लागल्यामुळे पूर्ण पोलीस बंदोबस्तात हे शूटिंग पार पडले. या डीव्हीडीचे एडिटिंग करून प्रकाशन करण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा झाली, पण प्रकाशनाचा कार्यक्रम व्हायच्या आधीच त्यांची हत्या झाली. आता या डीव्हीडीचा प्रकाशन समारंभ बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर आणि डॉ.शैला दाभोलकर उपस्थित राहणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक गोष्ट मात्र वेळेत झाली- ती म्हणजे, डॉक्टरांचे विचार ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून जतन करता आले. माणूस मारता येतो, पण विचार मारता येत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज शरीररूपी डॉक्टर दाभोलकर नसले तरी विचाररूपी डॉक्टर आपल्यामध्ये आहेतच. ते घरोघरी पोहोचावेत आणि त्यांच्या विचारांतून अनेक लहान-मोठे कार्यकर्ते तयार व्हावेत यासाठी या सीडीज खूप मोलाच्या ठरणार आहेत. तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची, आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकजागर गेली 25 वर्षे अखंडितपणे सर्वदूर पोहोचविला. लोकांना मंत्रमुग्ध करणारी त्यांची भाषणे आणि प्रश्नांची चपखल उत्तरे समाजमनाला भिडल्याशिवाय राहणार नाहीत.

या डीव्हीडीचे मुख्य वितरक : साधना मिडिया सेंटर
431 शनिवार पेठ, पुणे 411030
फोन : 020-24459635

Tags: साधना मिडिया सेंटर सीडीज व्हिडिओ ऑडीओ अंधश्रद्धा निर्मुलन समिती डॉ. नरेंद्र दाभोलकर Sadhna Media Centar CD Video Audio Andhshrdha Nirmulan Samiti Dr.Narendr Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी