डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1) नवीन वर्गणीदार करणे. २) जुन्या वर्गणीदारांचे नूतनीकरण. ३) छोट्या-मोठ्या जाहिराती मिळवणे. ४) व्यक्तिगत पातळीवर साधनाच्या अंकांची किरकोळ विक्री. ५) साधनाचे अंक मित्रमंडळींत वाचनासाठी वितरित करणे. ६) साधनातील काही लेखांचे सामुदायिक वाचन करणे.

युवक-युवतींसाठी आवाहन

‘स्त्री-मुक्ती विचाराकडे मी अशी बघते / असा बघतो.’ महिला दिनाच्या निमित्ताने साधनातर्फे प्रकाशित होणाऱ्या विशेषांकासाठी वरील विषयाबद्दल आपले विचार ३०० ते ५०० शब्दांत लिहून पाठवावेत. रोजच्या जगण्यात स्त्री-मुक्तीच्या विचाराचा संदर्भ तुमच्या मनात असतो  का? नव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व कशा पद्धतीने जोपासले जावे असे तुम्हांला वाटते? तुमची मते, तुमचा दृष्टिकोन जाणून घेणे आम्हांला महत्त्वाचे वाटते. पहिल्या पाच उत्कृष्ट लेखांना पुरस्कार दिले जातील. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत आपले लेखन पुढील पत्त्यावर पाठवावे : नंदिनी आत्मसिद्ध, सी/ ३, गुलमोहर, महापालिका वसाहत, रा. ग. महाजनी पथ, शिवडी, मुंबई ४०००1५.

समयदानी सहकारी हवे आहेत

साधनाचा प्रपंच हा हजार हातांनी ओढावयाचा जगन्नाथाचा रथ आहे. त्यासाठी आपल्याला आवड तर असणारच.  त्याबरोबरच सवड किती आहे याचाही अंदाज घ्या. तेवढ्या वेळेत पुढीलपैकी कोणते काम करावयाचे त्याचाही निर्णय घ्या आणि पत्र पाठवा. बाकी मागाल ती मदत देण्यास साधना हक्काने उभीच आहे. 1) नवीन वर्गणीदार करणे. २) जुन्या वर्गणीदारांचे नूतनीकरण. ३) छोट्या-मोठ्या जाहिराती मिळवणे. ४) व्यक्तिगत पातळीवर साधनाच्या अंकांची किरकोळ विक्री. ५) साधनाचे अंक मित्रमंडळींत वाचनासाठी वितरित करणे. ६) साधनातील काही लेखांचे सामुदायिक वाचन करणे. 
वरील स्वरूपाचे अन्य अनेक उपक्रम आपणांसही सुचू शकतील. आपणांकडे समयदान किती आहे याचा अंदाज आपणच घेऊ शकाल आणि त्या वेळेत काही जबाबदारी स्वीकारलेला मदतीचा हात पुढे कराल, असा विश्वास वाटतो.

संपादक
 

Tags: समयदान स्त्री-मुक्ती विचार आवाहन pay time woman liberation An appeal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके