डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुलांचे सहज आविष्कार आणि मुलांचे भावविश्व केंद्रस्थानी ठेवून या बालकुमार अंकाची मांडणी केली आहे, तो तुम्हांला आवडेल अशी आशा आहे.

 

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, देशात घडणाऱ्या घटनांची मुले दखल घेत आहेत. ती अस्वस्थ होत आहेत. आपल्या भाषेतून ती यावर भाष्य करू पाहात आहेत. मुलांची भाषा ही नादमय कवितेची, छोट्याशा लेखाची, कधी पत्राची तर कधी चित्राची आहे. त्यांच्या संवेदनशील मनाचा तो उत्स्फूर्त आविष्कार आहे.

ही चिमुरडी मुले मोठ्या माणसांच्या तथाकथित मोठेपणाला छेद देत, त्यावर प्रकाशझोत टाकत आहेत. ही मुले नक्कीच प्रातिनिधिक आहेत. घरात तारांगण करता यावं, परिसर स्वच्छतेचा वेगळेपणाने विचार व्हावा; शाळेतल्या कल्पक गंमतीजमती, या संदर्भातील लेख, मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही नव्याने कार्यप्रवण करतील अशी खात्री आहे.

कोड्यांचे वेगवेगळे प्रकार हा खास मुलांसाठीचा खजिना. ही कोडी सोडविण्यासाठी मुलांना मोठ्या माणसांचा सहभाग नको तर फक्त सहवास हवा आहे.

कु. अदिती आत्मसिद्ध ही इंग्रजी माध्यमात शिकणारी इयत्ता दुसरीतील मुलगी. गुजरात हिंसाचाराच्या बातम्या पाहून ती बेचैन झाली. अबोल झाली, ‘ही माणसं अशी का वागतात?’ या एकाच प्रश्नाने ती पछाडली होती... आणि.... आपल्या परीने तिने उत्तर शोधलं.... तेच आहे मुखपृष्ठ!

मुलांचे सहज आविष्कार आणि मुलांचे भावविश्व केंद्रस्थानी ठेवून या बालकुमार अंकाची मांडणी केली आहे, तो तुम्हांला आवडेल अशी आशा आहे.

- राजीव तांबे [अतिथि संपादक]

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके