डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून जगातील अनेक संस्थांनी अल्बर्ट आइन्स्टाईनची निवड केली. अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'टाइम' या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणाच्या बेळी आइन्स्टाईनच्या बरोबरीनेच गांधीजींचंही नाव आघाडीवर होतं. आइन्स्टाईनने 1905 साली सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांचे दय 26 वर्ष होतं आणि गांधीजींना 1895 साली सत्याग्रहाचं शास्त्र सापडलं, तेव्हा त्यांचही वय 26 वर्षच होतं.

गॅलिलिओ, न्यूटन आणि आइन्स्टाईन हे विज्ञानातील तीन मैलाचे दगड मानले जातात. 'सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून, पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे' असं सांगणारा गॅलिलिओ, गतिविषयक नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा न्यूटन आणि 'काल' ही चौथी मिती बहाल करून सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारा आईन्स्टाईन, या तिघांनीही मानवाच्या विचार करण्याच्या दिशेलाच कलाटणी दिली. न्यूटनच्या गतिविषयक नियमांतून स्पष्टीकरण मिळत नाही अशा विज्ञानातील समस्यांचं स्पष्टीकरण देणारा 'सापेक्षतावाद' किचकट गणिती प्रक्रिया व विज्ञानातील संकल्पनांमुळे सामान्य जनतेच्या आकलनाबाहेर राहिला, तरीही आइन्स्टाईनइतकी लोकप्रियता जगातील कोणत्याच शास्त्रज्ञाच्या वाट्याला आली नाही. अणुबाँबचा जनक, इस्रायलचं राष्ट्राध्यक्षपद नाकारणारा माणूस आणि E=mc' हे अणूतील उर्जेचं सूत्र, प्रकाशाचा वेग यांचा सापेक्षतावादाशी काहीतरी संबंध आहे. इतकी माहिती मात्र सर्वसामान्य माणसाला असतेच! भारतीय लोकांना आइन्स्टाईन त्याच्या अफलातून व्यक्तिमत्वामुळे आणि गांधीविषयीच्या त्याच्या विधानांमुळे अधिक जवळचा वाटला.

20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून जगातील अनेक संस्थांनी अल्बर्ट आइन्स्टाईनची निवड केली. अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'टाइम' या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणाच्या बेळी आइन्स्टाईनच्या बरोबरीनेच गांधीजींचंही नाव आघाडीवर होतं. आइन्स्टाईनने 1905 साली सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांचे दय 26 वर्ष होतं आणि गांधीजींना 1895 साली सत्याग्रहाचं शास्त्र सापडलं, तेव्हा त्यांचही वय 26 वर्षच होतं. सापेक्षतावाद हा 20च्या शतकातील सर्वांत महत्त्वाचा विज्ञानातील सिद्धांत तर 'सत्याग्रह' हा 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ सामाजिक शोध. गांधींनी God is Truth आणि truth is god अशी केलेली मांडणी आणि आइन्स्टाईनने 1 think, because I am आणि "am, because I think अशी केलेली मांडणी यातही कमालीचं साम्य होतं. शांती हे त्यांचं उद्दिष्ट होतं जागतिक आणि माणसं नम्र झाली पाहिजेत यासाठीच ते शेवटपर्यंत लढत होते. गांधींनी आयुष्यभर सत्याचे प्रयोग' केले आणि आइन्स्टाईनने 'सत्य निरपेक्ष असूच शकत नाही' हे अभ्यासकांच्या मनावर ठसवलं. गांधीजींना वाहिलेल्या श्रद्धांजलीत आइन्स्टाईनची वाक्ये होती, "योग्य मार्ग सापडला तर माणसात किती टोकाचा त्याग करण्याची क्षमता असते, हे गांधींनी दाखवून दिलं, कोणत्याही बाह्य बलापेक्षा माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असते, गांधींचं काम याचा पुरावा आहे. अशा प्रकारचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत."

पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या स्यापनेला 90 वर्षे पूर्ण झाली म्हणून महाविद्यालयाने 'नवती महोत्सवाचं' आयोजन केलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून सापेक्षतावादाची शताब्दी साजरी करण्यासाठी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद 8 ते 10 डिसेंबर या काळात भरवली होती. स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए. पेंडसे आणि उपप्राचार्य वही.एम.सोलापूरकर यांनी पुणे विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने ही राष्ट्रीय परिषद भरवली होती. सापेक्षतावादाचा इतर विद्याशाखांवर काय परिणाम झाला, यांवर चर्चा घडवून आणण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित केली होती. त्यामुळे भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र व गणितातील मार्गदर्शक या परिषदेत तर होतेच, पण इतिहास, तत्त्वज्ञान, वाङ्मय या विद्याशाखेतील तजा व्यक्तींनीही आपले निबंध वाचले. पूर्ण तीन दिवस चाललेल्या त्या परिषदेत जवळपास 80 अभ्यासकांनी भाग घेतला होता.

पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ.सुभाषचंद्र भेलके यांनी 'सापेक्षतावाद सिद्धांताध्या ज्ञानमीमांसीय निष्पत्ती' या शीर्षकाखालील निबंध त्या परिषदेत सादर केला. त्या निबंधाचा काही भाग डॉ.मेलके यांनी अनुवाद करून दिला आहे, "साधना च्या वाचकांसाठी...

Tags: नवती महोत्सव सर परशुरामभाऊ महाविद्यालय सापेक्षतावाद आइन्स्टाईन न्यूटन गॅलिलिओ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके