डिजिटल अर्काईव्ह

.....

हे आइन्स्टीन
तु आहेस 
चैतन्यसृष्टीचा
आमच्या जगातील
एकमेव उपासक
तुझी दृष्टी 
आहे स्थिरावलेली
अंतिम सत्यावर
आहेच तुझी
आदृष्टला
स्पष्ट करणारी
प्रगड प्रज्ञा
ज्याने दिला
मानवी मनाला
सोहमचा साक्षात्कार

हे आइन्स्टीन
ही युद्धाची 
वेडी वादळे
आपटून गेली 
तुझ्या खिडकीवर
नाही हालली
तुझी ज्योत
आणि म्हणूनच
तिच्या धुरांचे
काळे काजल
डोळ्यात घालून
झाल्या दिश्या
धन्य! धन्य!

हे आइन्स्टीन
तुझ्या लेखणीतून
समाज पक्षिन 
घालते अंडी
विज्ञान विश्वाची
ती उबवण्यात
पाहिजे तिच्यात
सृजनशील संयम
जी उबवण्यत 
तिच्या पंखात 
पाहिजे उभ
मानवी प्रेमाची

हे आइन्स्टीन
तूच सांग
संशयी जगाला
अंतिम सत्य
त्याच्या प्रकशात
काल पुरुष
आकाश गंगेचा
घालून पट्टा
हुजऱ्या प्रमाणे
येईल पुकरित
अटल भविष्यहे आइन्स्टीन
कोण काय?
कुठे काय?
कधी किती?
का? असे
सात उमंघ
माझ्या मानेवर
सुर्य मालेची
जपमाळ घेऊन
अश्वत्था भोवती
प्रदक्षिणा घालणाऱ्या
गूढ महांता
बोल केव्हां
तूंच सांग
गाडशील यांना
विज्ञान-गणिताच्या
एकाच महावाक्यात

('मृद्गंध' या काव्यसंग्रहांतून)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विंदा करंदीकर ( 6 लेख )

जन्म : 23 ऑगस्ट 1918

(धालवल, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) मुंबई मेथील रामनारामण रूईमा महाविद्यालम व एस.आम.इ.एस. महाविद्यालमात इंग्रजीचे प्राध्मापक (1976 मध्मे निवृत्त). प्रमुख पुरस्कार / सन्मान : केंद्र सरकारच्मा शिक्षण मंत्रालमाची व एनसीइआरटीची चार पारितोषिके. महाराष्ट्र शासनाचे दहा पुरस्कार. सिनिमर फुलब्राईट पुरस्कार. सोविएत लँड नेहरू वाङ्‌मम पुरस्कार. कुमारन असत, कविराज कुसु ाग्रज, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार. महाराष्ट्र फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार, कोनार्क सन्मान. साहित्म अकादमी पुरस्कार.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी