डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

2008 मध्ये घराला रंग द्यायचा प्रसंग आला तेव्हा एवढ्या पुस्तकांचा पसारा कुठे ठेवायचा, असा प्रश्न पडला. रंग देताना त्यांनी ठरवले, हा शेवटचा रंग. परत रंग द्यायचा नाही! कारण इतकी पुस्तके उंदीर, घुशी, पाली यांच्यापासून सांभाळत रंग देणे सोपे नाही. कोकणात पाऊस खूप येतो, त्यामुळे आतून भिंतींना ओल येते. त्याने रंगाचे पोपडे पडतात. मग रंग द्यावाच लागतो. पुस्तके सुरक्षित जागी हलवून रंग दिला, तरीही काही पुस्तके ओली झाली आणि पुस्तकांच्या विटा झाल्या. ‘हाउस ऑफ पेपर’ या कादंबरीची आठवण त्यांना यायची. पुस्तकाच्या वेडापायी पुरता देशोधडीला लागलेला एक ग्रंथवेडा समुद्रकिनाऱ्यावर पुस्तकांच्या विटा रचून घर बांधतो. मीही असाच ग्रंथसंग्रहाच्या व्यसनापायी ग्रंथांच्या भिंतीतच चिणला जाईल की काय, असे सतत वाटते.

आता पुस्तकांना प्रश्न पडेल

कुठे गेला सखा माझा

होतील सैर भैर

शोधत राहतील ते दोन डोळे

ते जपणारे दोन हात

जिवापाड प्रेम करणारा माणूस!

कायम पुस्तकाच्या गराड्यात राहणारा माणूस, एकाएकी न सांगता निघून जातो; तेव्हा काय होत असेल पुस्तकांची अवस्था? माणसाचे तरी बरे आहे. रडतील, श्रद्धांजली वाहतील, त्यांच्या कविता फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर टाकतील, शोकसभा घेतील. पण कोरोनामुळे त्या शोकसभापण होणार नाहीत. त्यातूनही सुवर्णमध्य काढून ऑनलाइन शोकसभा घेतील. पण त्या पुस्तकांचे काय? त्यांच्यासाठी मुंबई सोडून कोकणात पेणला घर घेतले. त्याला मपुस्तकालयफ म्हटले तरी चालेल. कारण घरात माणसे दोन आणि पुस्तकांची संख्या खूप!

असा हा मपुस्तकवेडा कवीफ, पुस्तक संग्राहक, अफाट क्षमता असलेला वाचक, मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्‌मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती, आणि आपले वाङ्‌मयवृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी साक्षमरीत्या सांभाळणारा संपादक, भाषेची उत्तम जाण असलेला अनुवादक, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता.

सतीश काळसेकर यांच्या कारकिर्दीत लोकवाङ्‌मय गृहातर्फे खूप पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यातील अनेक पुस्तकांना मानाचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नवोदित लेखक आणि कवीचे लिखाण राज्यभरात पोहोचवण्याची त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे पुस्तकांसारखाच माणसांचापण गराडा त्यांच्या भोवती असायचा. नवोदित कवी, कादंबरीकार काळसेकरांनी लोकवाङ्‌मय गृहाला जोडून दिले.

प्रत्येक माणूस आपली दोन वेळच्या अन्नाची भूक भागवण्यासाठी कष्ट करतो आणि आपले पोट भरतो. पण मनाच्या आणि बुद्धीच्या भुकेसाठी वाचनच लागते; अशा विचारांचे काळसेकर दिवसातला जास्तीतजास्त वेळ वाचनात घालवायचे. ते म्हणतात, ङ्गङ्घवाचत असताना दोन ग्रंथप्रेमी मित्रांची आठवण येते. एक म्हणजे शांताराम पारपिल्लेवार आणि दुसरे म्हणजे पद्माकर महाजन.फफ ही सर्व मंडळी ग्रंथसंग्रहाचे व्यसन असलेली, त्यामुळे अर्ध्या रात्रीपण वाचताना खूप छान ओळ आली की, काळसेकर लगेच आपल्या मित्रांशी बोलत आणि आपला आनंद वाटून घेत.

ते म्हणतात, ङ्गङ्घअशा या वाचनवेडात खूप वेळ निघून जायचा. मग  वाचताना मेंदूला आणि डोळ्यांना थकवा आला की पुस्तकांना कव्हर घालायचे.फफ यांची कव्हरंपण वैशिष्ट्यपूर्ण असायची. आर्ट पेपरवरची कॅलेंडर्स, पोस्टर्स, रेक्झिनसारख्या पारदर्शी प्लास्टिकचा उपयोग करून पुस्तकांना कव्हर घालण्याचा उपक्रम ते करायचे. पुस्तकाच्या कडांवर घडी नीट पडावी यासाठी, पाटा-वरवंटा, विश्वकोश असल्या भारदस्त वजनाच्या दाबाखाली आठवडाभर ठेवायचे- तेव्हा ते पुस्तक सुंदर सजायचे! ते पुस्तक जर शोधायची वेळ आली, तर त्याच्यावरच्या कव्हरच्या खुणाही त्यांच्या लक्षात असायच्या. अगदी आई आपल्या मुलाच्या जन्मखुणा लक्षात ठेवते तशी. असे जरी असले तरी ते त्यांच्या कवितेत म्हणतात- 

              

पुस्तके म्हणाल तर तुमची असतात 

पुस्तके म्हणाल तर दुःख देतात

पुस्तके म्हणाल तर आधार देतात

पण पुस्तके कधीही नसतात

स्थावर-जंगम  मालमत्तेसारखी

तुम्ही कसेही गेलात फरपटत

त्यांच्या डोळ्यांसमोर

किंवा त्यांच्या डोळ्यांआड

तरीही

पुस्तके भाकरीसाठी

विकता येत नाहीत!

ग्रंथांचे वाचन आपले आयुष्य समृद्ध करते. पण भाकरीसाठी नोकरी किंवा व्यवसाय करावाच लागतो! एक वेळ घेतलेले सोने विकून आपली गरज भागवता येते. पण घेतलेली पुस्तकं विकता येत नाही कितीही भूक लागली तरी! हे सत्य सतीश काळसेकर आपल्या कवितेतून सांगतात.

ग्रंथांच्या बरोबरीने अन्य माध्यमांतले वाचनही महत्त्वाचे असते. प्रत्येक कलामाध्यमाची स्वतःची अशी बलस्थाने असतात आणि मर्यादाही. वाचनाबरोबर अन्य कलामाध्यमांकडे आपण डोळसपणे पाहावे. संगीत,

शिल्प, चित्र, नाट्य, चित्रपट, नृत्य या कलांच्याही आस्वादाने आपण एक माणूस म्हणून अधिकाधिक श्रीमंत होत जातो.

त्या अर्थाने काळसेकर खूप श्रीमंत होते. मुंबईत होत असलेल्या आशियाई चित्रपट महोत्सवात त्यांची उपस्थिती असायची. म्हणजे आठ दिवसांत 22 चित्रपट पाहून व्हायचे. ते म्हणतात की, गेल्या तीस वर्षांत विविध चित्रपट मंडळे आणि साव्हिएत सांस्कृतिक केंद्र, नेहरू केंद्र, एन.सी.सी. अशा विविध संस्थांनी मला जगभराच्या जवळपास हजारेक तरी चित्रपटांचा प्रवास घडवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते आपल्या डायरीतून सांगतात-

‘‘जगात फक्त जगणे हेच ध्येय असेल, तर पशू आणि माणूस यांत फरक काय? मनुष्य सौंदर्याची साठवण करू शकतो! पशूला ते करता येत नाही.’’ हीच तर काळसेकर मनुष्य असल्याची भूमिका जीवनाच्या रंगमंचावर निभावत होते.

 सांगावं तर तेही आपणच आपल्याला

 की हा आपला प्रवास

सूचिपर्णी वृक्षांच्या सोबतीनं होता

आणि हिवाळी प्रदेशांना आपण

परके नाही आजही.

ही काळसेकर यांची कविता वाचताना आठवण येते, ती डहाकेंच्या मनात उचंबळून आलेल्या आठवणी, ते म्हणतात की, काळसेकराच्या हिंडण्याच्या छंदामुळे मलाही तीन वेळा हिमालयात जाण्याची संधी मिळाली!

‘‘.....या अशा छंदापायी हिंडून होते, पण वाचन राहून जाते. गेला काही काळ हा माझा वाचनासाठी ओल्या दुष्काळासारख्या चालला आहे. म्हणजे वाचनासाठी उदंड आहे आणि वाचायसाठी वेळच काढता येत नाही. आधी लेह-लडाख हा पहाडी आणि पठारी प्रदेशात जाण्याची तयारी, नंतर त्या दिवसांचा हँग ओव्हर. त्यात वाचन तर राहूनच जाते.’’हा सूर काळसेकरांचा आहे. एक हातात येते तर एक हातातून सुटते. असे तर होणारच!

‘‘ते काहीही असो, वाचनाचे आणि ग्रंथखरेदीचे अंगात विष भिनल्यासारखे जगतो आहे.’’ काळसेकर यांना त्यांच्या गावाच्या मोठ्या घरातल्या माळावरच्या एका लाकडी पेटीत नाथ माधव यांची ‘वीरधवल’ कादंबरी सापडली होती. नंतर घराच्या भिंतीतल्या फडताळात एक रजिस्टरच्या आकाराची वही सापडली होती. त्या वहीत वडिलांच्या सुरेख अक्षरांत काही लेखन केले होते. ते पुसटसे आठवते, कोकणातल्या देवाला गाऱ्हाणे घालतात, त्या धरतीचे त्यांचे स्वरचित गाऱ्हाणे होते. असा हा ग्रंथ संग्रहाचा, ग्रंथखरेदीचा, लेखनाचा किडा आधीच घरात कोणाला तरी डसला होता. ‘‘या आधीच्या पिढीतल्यांना डसलेल्या किड्याच्या विषाचा प्रादुर्भाव माझ्या बाबतीत जरा अधिकच झाला असावा.’’

                

 पुस्तके सहसा जात नाहीत रद्दीत

 पुस्तके रद्दीत विकावी

 हे, प्रेमपत्रांना दूर लोटावे

 तसे क्रूर वाटते

 पुस्तकांना वय

शहाण्यासारखे स्वीकारता येत नाही

अशी तरुण पुस्तक काळसेकर यांच्या सोबत कायम होती. पुस्तकांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. जागा बदलत असतील, पण साथ पक्की होती. कधी माळ्यावर, कधी पेटीत, तर कधी कपाटात. नंतर मात्र त्यांच्यासाठी, त्यांनी राहते गाव आणि घर बदलले. तयार केले एक ‘पुस्तकघर’, त्यांच्याविना आता ते पोरके झाले आहे.  काळसेकर यांच्या घरातील पुस्तकं आपसांत बोलत आहेत. ‘जरी आम्ही अनाथ झालो तरी दत्तक जाणार नाही. तुम्ही पुन्हा येण्याची आम्ही वाट बघू, सोबतीला आई आहे!’

काळसेकर म्हणतात, ‘‘एस.एस.सी. पास झालो, तेव्हा इंग्रजी अगदी काठावर 35 मार्कांनी पास झालो. कॉलेजच्या दिवसांतही इंग्रजी फारसे सुधारले नाही. नंतर मात्र चांगल्या मित्रांच्या सहवासामुळे इंग्रजी चांगले झाले.’’ की जॅव पॉल सार्त्र, अल्बेर कम्यु, जो जेने, सॅम्युअल बेकेट हे चर्चाविषय होते गेले आणि इंग्रजी वाचनाची गोडी लागली. मग जमेल तिथे मराठी, हिंदी अनुवाद सोबत घेऊन विशेषत: कवितेसाठी अनुवादांना सोबत घेऊनच बरट्रोल्ट ब्राख्त, ऑकतावेओ पाझ, रेईनर मारिया, पाब्लो नेरुदा, ऑर्थर रेम्बो असे वाचन ते करत गेले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या मआधुनिक कवितेला सात छेदफ आणि अनुवादांचा त्यांना वाचन करताना चांगलाच उपयोग झाला.

काळसेकर आपल्याला सल्ला देतात की, हे सर्व माझ्या बाबतीत घडले म्हणून तुम्हांलापण सांगतो; की इंग्रजीपासून जी वाचक मंडळी लांब पळत आहे त्यांनी असं करू नका. शब्दकोशांच्या मदतीने वाचायला सुरुवात करा, समजायला लागेल.

काळसेकर म्हणतात की, माझ्या उभारीच्या काळात मला अनेक चांगले मित्र भेटले. खूप वाचणारे, विचार करणारे, भाषेवर चांगली पकड असणारे, पुस्तकांचा संग्रह करणारे, आणि भोवतालावर प्रेम करणारे. त्यांनी काळसेकरांना दुर्मीळ पुस्तके पाठवली. कुठे मिळू शकतात याची शक्यता सांगितली आणि खूप दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह तयार होत गेला. ते म्हणतात, ‘‘माझ्या वाचनासाठी मदत करणाऱ्या अशा कितीतरी मित्रांचे, ग्रंथ विक्रेत्यांचे, ग्रंथ संग्राहकांचे ऋण मी माथ्यावर वागवत आहे.’’ देशविदेशांतली अनेक पुस्तके त्यांनी वाचली आणि ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’मध्ये जाऊन बसली. पुढे त्याला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारही लाभला. थोडक्यात मी काय वाचले हे वाचकांना सांगण्याचा त्यांना पुरस्कारही मिळाला! त्यांनी काय वाचले त्यातील सुंदर ओळी त्यांना लगेचच मित्रांना सांगायचा असायच्या. त्यांना झालेला आनंद ते त्यांच्याजवळ न ठेवता वाटून टाकायचे. त्याचे छापील उदाहरण म्हणजे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ ते अनेक मित्रांना सल्ला देत. ‘‘तुम्ही खूप वाचता, पण जर का तुम्ही काय वाचता हे कोणाला सांगत नसाल तर ते वाचन तुमच्यासोबत संपून जाईल. तर मित्रांनो, असे करू नका. तुम्ही काय वाचता ते तुम्ही लिहीत जा. अशा माझ्या सांगण्याने माझे काही मित्र लिहिते झाले आणि त्याचा मला मनस्वी आनंद झाला. अंगात एक वेळ फाटका सदरा असला तरी चालेल, पण हातात नेहमी नवे पुस्तक असावे! असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व आजही मी जोपासतो आहे.’’ असे काळसेकर म्हणतात.

पुस्तके कुजबुजतील आपसांतच

मग होईल गलका

नवीन पुस्तकं रडतील

राहूनच गेले आमचे त्यांच्या हातात जायचे

प्रेमळ स्पर्श, आंजारून, गोंजारून घ्यायचे

जुनी पुस्तके समाधानाने बोलतील

आम्हांला छान सहवास लाभला दोन हातांचा

प्रेमाने स्पर्श करत लाड करणाऱ्या हातांचा

‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ आम्ही मिरवून आलो

खूप छान प्रवास केला, शेकडो हातांतून,

वाचनालयातून साहित्य अकादमी पुरस्कार घेऊन आलो

आठवणींची चर्चा रंगत होती पानापानांची

आठवणींसाठी ठेवलेल्या काही खुणांची

पुस्तकाला घातलेल्या आर्ट पेपरच्या कव्हरची

अशी कल्पना माझ्या मनात आली. आपण जसे प्रेम करतो तसेच आपल्याला परत मिळते. पुस्तकांची काळजी कधी आई होऊन तर कधी वडील होऊन काळसेकर घेत; हे त्यांच्या लिखाणातून, अनेक प्रसंग वाचून आपल्या लक्षात येते.

2008 मध्ये घराला रंग द्यायचा प्रसंग आला तेव्हा एवढ्या पुस्तकांचा पसारा कुठे ठेवायचा, असा प्रश्न पडला. रंग देताना त्यांनी ठरवले, हा शेवटचा रंग. परत रंग द्यायचा नाही! कारण इतकी पुस्तके उंदीर, घुशी, पाली यांच्यापासून सांभाळत रंग देणे सोपे नाही. कोकणात पाऊस खूप येतो, त्यामुळे आतून भिंतींना ओल येते. त्याने रंगाचे पोपडे पडतात. मग रंग द्यावाच लागतो. पुस्तके सुरक्षित जागी हलवून रंग दिला, तरीही काही पुस्तके ओली झाली आणि पुस्तकांच्या विटा झाल्या. ‘हाउस ऑफ पेपर’ या कादंबरीची आठवण त्यांना यायची. पुस्तकाच्या वेडापायी पुरता देशोधडीला लागलेला एक ग्रंथवेडा समुद्रकिनाऱ्यावर पुस्तकांच्या विटा रचून घर बांधतो. मीही असाच ग्रंथसंग्रहाच्या व्यसनापायी ग्रंथांच्या भिंतीतच चिणला जाईल की काय, असे सतत वाटते.

पुस्तकं मिळवायची, वाचायची आणि लिहायचे, वाचकांपुढे व्यक्त होण्यासाठी आपले मवाङ्‌मयगृहफ नंतर मवाङ्‌मयवृत्तफ, मसाप्ताहिक साधनाफ यांच्या माध्यमातून पोहोचायचे. मवृत्तमानसच्याफ माध्यमातून काही काळ मअत्त दीप भवफ या सदराचे लेखन केले. असा हा प्रवास करणारा ग्रंथवेडा कवी पुढच्या प्रवासास निघून गेला. अचानक! न सांगता!! न सवरता!!!

नियती, दैव, नशीब, पूर्वजन्म, पुनर्जन्म, पाप-पुण्य अशांसारखे काही शब्दप्रयोग आधी वाणीतून नंतर लेखणीतून, मनातून आणि अखेरीस व्यवहारातून निदान स्वतःपुरते हद्दपार करता आले तर मला आनंद होईल! पण मग आयुष्यातल्या विविध प्रसंगांचे वर्णन कसे करावे, असाही प्रश्न उभा ठाकतो; असे ते म्हणायचे. पण मला वाटते- माणूस कितीही पुरोगामी असला तरी पुढच्या जन्माविषयी कधीतरी हळव्या क्षणी बोलतोच. तसं काळसेकर म्हणायचे, ‘‘मला ‘पुनर्जन्म’ असेलच तर भारतातील प्रत्येक राज्यासाठी प्रत्येकी एक जन्म हवा आहे.’’ लेखक आनंद विंगकर यांनी ही आठवण लोकसत्ताला सांगितली.

कोणाचे डोळे ओले होते तर कोणाचे आर्त

तुम्ही या फिरून आम्ही वाट बघतो

दत्तक नाही जायचे कोणालाच, आई आहे अजून.

पुस्तकांचा निर्णय ठाम झालाय!                     

 म्हणूनच तर माझ्या मनात आले की त्यांची पुस्तके त्यांची वाट बघतील, जन्मोजन्मी 'अभिसारिके'सारखी.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके