अ. भा. नाटपपरिषदेच्या 63 व्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून केलेल्या भाषणातील मननीय उतार
ज्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो आहे. त्या प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रथमतः विचारात घेणे हे मी प्रथमकर्तव्य समजतो. समाजजीवन आणि नाटक यांचा एकमेकांचा घनिष्ट संबंध आहे. समाजजीवनाचं प्रतिबिंब या नाटकात पडत असतं. बिंब आणि प्रतिबिंब म्हणजे जे संबंध तेच समाजजीवन आणि नाटक यांचे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामाजिक जीवनाच्या मागून नाटक हे अनुसरतं. जशी पतिव्रता पतीला अनुसरते, त्याच्याकडे लक्ष ठेऊन त्याच्या पाऊलवाटेने जात असते, तसे नाटक हे समाजाकडे लक्ष ठेऊन समाजचितन करीत आणि समाजाने जो जी प्रगती केली त्याचा मागोवा घेत घेत जात असतं. म्हणजेच समाजाचे गुणदोष घेत नाटक जात असतं, तेव्हा समाजपुरुषार्च नाटकामध्ये प्रतिबिंब आहे ही कल्पना ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये फार सुंदर तऱ्हेने सांगितली आहे. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी जगणपतीचे वर्णन केले आहे, त्यात त्यांनी नाटकाला फार सुंदर शब्द वापरला आहे.
देखा काव्य नाटका।
जे निर्धारिता सकौतुका।
त्यांची रणझुणती क्षुद्रटिका ।
अर्यध्वनि ।।
काव्यशास्त्र, नाटक जे आहे, ते म्हणजे गणपतीच्या पायातले नुपूर. क्षुद्र म्हणजे लहान. नाटक हे दृश्यकाव्य आहे.
पायीच्या नुपुरांच्या आवाजावरून माणसाच्या नृत्याचा ठेका, मागोवा कळत असतो. तसंच समाज-पुरुषाच्या पायोचा नुपूर म्हणजे नाटक हे आहे, की ज्यामुळे, समाज-पुरुषाचा ठेका कसा चाललाय? ताल कुणीकडे चाललाल? पाऊल कुणीकडे चाललंय, या सर्व गोष्टींचा अंदाज या नाटकामध्ये येतो. समाजाला-कदाचित योग्य ताल-लयीवर चाललेल नृत्य, नृत्याचं मर्म कदाचित कळत नसेल, पण चुकून वाकई पाऊल पडलं तर, तालाचा बेरंग झालेला चटकन कळतो. तेव्हा नाटक ही जी गोष्ट आहे, तिचा सामाजिक जीवनाशी घनिष्ट संबंध बाहे हे सर्वमान्य आहे. आनंद आणि सुख म्हणजे काय? आनंद किंवा सुख या शब्दापेक्षा मला 'समाधान' हा शब्द योग्य वाटतो. जीवनातील एखादी महान शोकांतिका-जंगली कबूतरांसारखी आम्ही पाहातो किंवा सूर्यास्तासारखी कलाकृती पाहातो तेव्हा आम्ही प्रेक्षक भारावलेले होऊनच बाहेर पडतो ना? त्यातही एक समाधानच असतं ना? जे नाटक आम्हाला, आमच्या जीवनातल्या सुख-दुःखाला स्पर्शने जातं, आम्हाला अंतर्मुख करतं, तेही आम्हाला विनोदी नाटकाइतकंच समाधान देऊन जातं. त्यातही एक समाधानच असतं ना?
मानवाने आपल्या जीवनामध्ये सुख-समाधान मिळवण्यासाठी खूप घडपड केली. सुखसमाधान मिळविण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत, जी जी इंद्रिये पाहिजेत ती ती त्याला परमेश्वरी कृपेने मिळाली आहेत, परंतु सौंदर्य टिपण्याची सर्व साधने जरी त्याच्याकडे असली, तरीसुद्धा स्वतःच्यामध्ये तो सौंदर्य घेऊ शकत नाही. कुठेतरी बाहेरच्या ठिकाणाहून सौंदर्य मिळेल का? आनंद मिळेल का? आणखीन सुख लाभेल का? यासाठी तो सारखा आसुसलेला असतो. या धडपडीतूनच त्याने अनेक शोध लावले. हवे वाटणारे सुख सुखासुखी येत नाही. त्याला प्रयत्नपूर्वक निर्धार करून अखेर त्याला सुख मानावं लागतं.
माणूस असाच प्रयत्न करीत असताना त्याला देवालयाचा शोध लागला. याच धडपडीतून त्याला नाटकाचाही शोध लागला. त्याला वाटलं, देवालयाकडून ही संपन्नता येईल का?
जीवन संघर्षाला लागणारी जी स्फूर्ती-जी कमी झालेली आहे, त्याला परत तेज यावं, चैतन्य यावं एवढ्याकरताच त्याची धडपड चाललेली बसते. किंबहुना जीवनातल्या सुख-दुःखावर कुंकर घालायची झाली, ते लपवायचं झालं, तर नाटकाचाच आधार घ्यावा लागतो हे मानवी जीवनामध्ये कळलं आणि त्यातूनच जीवननाटप उभं राहिलं.
तो परमेश्वर असा आहे की, ज्याच्यापाशी तुम्ही नतमस्तक होता. डोळे मिटून त्या परमेश्वराचा मी एक अंश आहे याची जाणीव करून घेता. एक अधिमान बाळगता. तेज त्याच्यामध्ये असल्याची खात्री करून घेता. हा प्रसाद तुम्ही घेता आणि मग म्हणता की, या देवळामध्ये जो नटलेला आहे, ज्याच्यासाठी हे मंदिर बांधलेलं बाहे त्यात मी पण एक अंश आहे. या अभिमान बाळगूनच तुम्ही देवळाबाहेर पडता.
ही मंदिरं आम्ही निर्माण केली. तो राम असो, कृष्ण असो, तो कालीमाता असो. ही देवतं आम्ही पूजली. त्या रूपातून आम्ही आमची वाट शोधली. जो श्रद्धाभाव आम्ही या देवतांवर ठेवला, त्यातला काही अंश मनात बाळगून आम्ही नाटकाला येतो. आम्ही काय सोसलं; आमचं जीवन कसं आहे? आमचं जीवन कसं असावं? हे आम्हाला नाटक सांगत! नाट्यमंदिराकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोण होता तो एक मंदिर म्हणूनच होता. नाटक सुरु होण्याआधी रंगमंचाची पूजा केली जाते. पडद्याला हार घातला जातो. कितवाही प्रयोग असो, त्या रंगमंचावर सारे कलावंत येऊन नतमस्तक होत असतात. ती रंगमंदिराची जाणीव आहे म्हणून.
विकृती ही सत्प्रवृत्ती व्हावी यासाठी धडपड करायचा या नाटकांनी प्रयत्न करावा. नाट्यमंदिरात स्वार्थ आणि मक्तेगिरी चालणार नाही. पावित्र्य आलं की, त्याच्या भोवती एक प्रकारची स्वार्थी मक्तेगिरी ओघानं येतेच. ही जगाची रीतच आहे. पण पावित्र्यांच्या ठिकाणी ही मक्तेगिरी असू नये ही सामान्य माणसाची प्रबळ इच्छा असते. ह्या मक्तेगिरीचा अतिरेक झाला तर, सामान्य माणसांची मने भडकून उठतीळ.
मला आवर्जून सांगायचं आहे की, नाटक हा खेळ असला तरी, समाजदर्पणासाठी उघडलेला तो पडदा आहे. समाजातल्या कुठल्याही चित्रणाला त्यात मज्जाव नाही. समाजामध्ये विकृती नसते असं मी म्हणत नाही-तो समाजातला व्यभिचार, ती विकृती हेही समाजदर्शनच असतं, पण कोणत्या अर्थानं ते तुम्ही दाखवता याचा विचार व्हायला हवा.
एक लक्षात ठेवा, जो समाज आहे तो तुम्ही समजता तेवढा भाबडा नाही. अडाणी नाही. तुमचा प्रेक्षक जागृत आहे. त्याच्या मनाला स्पर्श करील, त्याची सुखदुःखे जो सांगेल, त्याच्या जीवनाला जो विनोदाची फुकर पालील त्यातून तुमचं नाटक फुलेल.
आज सौभद्र नाटकाला शंभर वर्षे झाली. हे नाटक का टिकलं? पौराणिक विषय आहे म्हणून? हे नाटक गाण्यामुळे टिकलं का? याचा विचार कधी केलात का? हे नाटक नुसत्या गाण्यामुळे टिकलं नाही. नटांच्यामुळेही टिकलं नाही. या शंभर वर्षात असंख्य लोकांनी हे नाटक केलं, तरीही हे नाटक आम्हांला सदैव रिझवतच राहिलं. त्याचं कारण एकच आहे. सुभद्रा आणि अर्जुन यांच्या रूपानं पहिला प्रेमभाव नाट्य सृष्टीवरती या नाटकाने मांडला. प्रेमविवाहाची कल्पना या नाटकाने दिली, म्हणून हे नाटक चिरतरुण राहिले...
नाटककार, कलाकार, दिग्दर्शक व ठेकेदार, या चार खांबांवर नाटक उभे राहते...
पूर्वीच्या नाट्यसंस्था आणि आजच्या नाट्यसंस्था याचा विचार येणं अटळ आहे. बालगंधर्व कंपनी, दीनानाथ मंगेशकर, शंकरराव सरनाईक अशी अनेक नाव आज आठवतात. त्या वेळी त्यांनी उभ्या केलेल्या नाटच संस्था ह्या नाट्य संस्था नव्हत्या. ती नाट्य कुटुंबे होती. कालपरत्वे ती भावना आज राहिली नाही.
जसे नाटकाचे हे चार खांब बाहेत, तशीच नाट्य मंदिरासमोर एक दीपमाळ झगमगत असते. ती त्या नाट्य मंदिराची जागा दाखवत असते. नाट्यक्षेत्रामध्ये आम्ही तिला जाहिरात म्हणतो. पूर्वीच्या काळी बालगंधर्व कंपनी, केशवराव भोसले कंपनी, शंकरराव सरनाईकांची कंपनी एवढी नावे जाहिरातील पुरेशी होत असत. पण आज हया दीपमाळांच्या ज्योती कोणत्या प्रकाशात झगमग-सात याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. प्रेक्षकाला आकर्षित करणारी जर कुठली गोष्ट असेल, तर ती जाहिरात. ह्या जाहिरातबाजीचा नमुना सर्वच ठिकाणी इतका पसरला आहे को, कुठला संबंध कुठं लावावा हेच कळेनासं होतं दीपमाळेच्या ऐवजी भणभणता पलिता तुम्ही पेटवू लागलात तर दिवाळी ऐवजी शिमग्याची आठवण येऊ लागते. कलेच्या नावाखाली समाजाच्या भावना अशा तऱ्हेने चेतवून, आपली पोळी भाजून घेणाऱ्या अशा लोकांना रंगमंदिरापासून चार हात लांब ठेवण्याची पाळी आली आहे.
नाट्याचे दोन प्रकार:प्रायोगिक व्यावसायिक. नाटक, तमाशा, कॅबरे हे तिन्ही प्रकार जरी रंगमंचावर अवतरले असले तरी, नाटक कॅबरे यापेक्षा तमाशा भिन्न प्रकृतीचा आहे. तमाशामध्ये शंगारिक लावण्या असतील, शृंगाराला पोषक संवाद असतील, पण हे सर्व घडत असता, तमाशाच्या रंगमंचावर कधीही कुठल्या स्त्रीची वेषभूषा डळत नाही. ते आपली मर्यादा ओलांडत नाही. कॅबरे हा कॅबरे म्हणूनच चालला पाहिजे. आणि नाटकाने रंगमंदिराचं आपलं नातं जपलं पाहिजे. हा माझा अट्टाहास आहे....
आमच्या रीतिरिवाजाला, संस्काराला न पोसणारी किंवा आदर्श न दाखवणारी नाटके तुम्ही दाखवू इच्छित असाल तर ती नाटके, त्या कलाकृती आमच्या पचनी पडणार नाहीत
[उर्वरित अंश पुढील अंकी]
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या