डिजिटल अर्काईव्ह

रेने डयूमाँ फ्रेंच विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करणारे शास्त्रज्ञ. अॅग्रॉनमी हा त्यांचा अभ्यासाचा विषय. अॅग्रॉनमी म्हणजे क्षेत्र व पिकाचे उत्पादन यांचा व भूमिव्यवस्थेचा विचार करणारे शास्त्र. या विषयातील त्यांचा अधिकार जाणून यूनो संघटनेने आपल्या याविषयीच्या सल्लागारांत त्यांना सन्मानाचे स्थान दिले. फ्रेंच शेतीसंबंधी त्यांनी फार सखोल विचार केला होता. यूनोचे सल्लागार म्हणून सर्व जगातील शेतीशी व भूमीशी त्यांचा संबंध आला. त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन व शेतीचे व्यवस्थापन याविषयी बारकाईने अभ्यास केला. ‘जगाची लोकसंख्या वाढत आहे, आणि दरडोई माणसाच्या वाटयाला येणारे अन्नधान्याचे प्रमाण घटत आहे.’ अशा निष्कर्षाला आले आणि व्यासांच्या व्याकुळतेने परिस्थितीचे गांभीर्य लोकांच्या मनावर ठसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

रेने डयूमाँ फ्रेंच विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करणारे शास्त्रज्ञ. अॅग्रॉनमी हा त्यांचा अभ्यासाचा विषय. अॅग्रॉनमी म्हणजे क्षेत्र व पिकाचे उत्पादन यांचा व भूमिव्यवस्थेचा विचार करणारे शास्त्र. या विषयातील त्यांचा अधिकार जाणून यूनो संघटनेने आपल्या याविषयीच्या सल्लागारांत त्यांना सन्मानाचे स्थान दिले. फ्रेंच शेतीसंबंधी त्यांनी फार सखोल विचार केला होता. यूनोचे सल्लागार म्हणून सर्व जगातील शेतीशी व भूमीशी त्यांचा संबंध आला. त्यांनी अन्नधान्याचे उत्पादन व शेतीचे व्यवस्थापन याविषयी बारकाईने अभ्यास केला. ‘जगाची लोकसंख्या वाढत आहे, आणि दरडोई माणसाच्या वाटयाला येणारे अन्नधान्याचे प्रमाण घटत आहे.’ अशा निष्कर्षाला आले आणि व्यासांच्या व्याकुळतेने परिस्थितीचे गांभीर्य लोकांच्या मनावर ठसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मानवी पुरुषार्थावर नितान्त विश्वास
माणसे डोळयांवर कातडे ओढून अगतिकपणे स्वस्थ बसलेली पाहून त्यांची बेचैनी वाढते. दोन्ही हात उभारून ते कोसळू पहाणाऱ्या संकटाची आगाही करतात. डोळयांवर कातडे ओढून घेतले एवढयाने संकट टळत नाही. नियतीने दिलेल्या आव्हानाचा मुकाबला माणसांनी जिद्दीने केला पाहिजे. संकट भीषण तर खरेच, परंतु त्याला तोंड देता येणारच नाही असे मात्र नव्हे, असे ते सांगत आहेत. डोळयांवर कातडे ओढून बसणारांत पौरस्त्य मंडळी आहेत, तशीच पाश्चिमात्य मंडळी आहेत. जुन्या जमान्याची अभिमानी मंडळी आहेत, तशी नव्या जगाचा जयजयकार करणारेही आहेत. अधिक धान्य पिकवण्याबाबत चालढकल करणारांना ते इशारा देतात. व्यक्तिगत स्वार्थ, अतिरिक्त हाव, गहन अज्ञान यांचा अडथळा उत्पादनवाढीत येऊ देणे म्हणजे आपल्याच हातांनी आपल्याच पायावर धोंडा पाहून घेण्यासारखे आहे, असे ते बजावीत आहेत. मानवी पुरुषार्थावर त्यांची नितांत श्रद्धा असल्याने महान संकटांना पुरुन माणूस उरेल असे त्यांना वाटते. त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, माणसाने पुरेसे धैर्य अंगी बाणले पाहिजे, आाणि निश्चयाने उभे राहिले पाहिजे. याच्याच जोडीला ज्ञान, साधने आणि संधीचाही लाभ त्याला झाला पाहिजे.

तीन जगे
पृथ्वीच्या पाठीवर तीन जगे अस्तिस्वात आहेत. अमेरिकेचे नेतृत्व मान्य करणारे आणि स्वातंत्र्याचे कैवारी म्हणून मिरवणारे एक जग आहे. रशियाच्या नेतृत्वाखाली वावरणारे आणि समतेचा उद्घोष करणारे आणखी एक दुसरे जग आहे. या दोन जागांच्या प्रभावक्षेत्राखाली पण त्यांच्या जोखडाखालून सुटू पाहणारे नेतृत्वहीन, दैन्य आणि दारिद्रय भोगणारे, विकासाची धडपड करणारे तिसरे जगही आहे. पहिल्या दोन पुढारलेल्या जगांनी जगातील अल्प लोकसंख्या सामावून घेतली असली तरी जगातील पाउण समृद्धी ते फस्त करीत आहेत ! याउलट तिसरे जग बहुसंख्य लोकांना सामावून घेणारे, पण समृद्धीचा अल्पसा वाटा वाटयाला येणारे आहे.

चीन आणि इस्राएल
ह्या तिसऱ्या जगातील फेरफटक्यात त्यांना असे आढळले की, शेतीचे उत्पन्न वाढवण्याचा अत्यंत कसोशीचा प्रयत्न निढळाचा घाम गाळून चीनच करत आहे. त्यासाठी त्यांनी फार मोठी किंमत मोजली आहे. या बाबतीत आणखी एका देशाचा त्यांनी असाच गौरवपूर्ण उल्लेख केला असून तो देश म्हणजे इस्राएल. इस्राएलने शेतीच्या क्षेत्रात जो पराक्रम केला त्यापासून मिळणारे धडे सर्वांच्या सर्वकाळ उपयोगी पडण्याइतके महत्त्वाचे आहेत असे त्यांचे मत बाहे. इस्राएलने शेतीबाबत अनेकविध प्रयोग केले आहेत. खासगी व्यक्तिगत मालकीपासून तो तहत सार्वजनिक मालकीच्या किबुत्सपर्यंत. परंतु पद्धत कोणतीही असो, तिथला शेतकरी व्यक्तिगतरीत्या उत्पादनवाढीचे आव्हान स्वीकारण्यासाठी सिद्ध आहे असे त्यांना ओळखले आणि त्यामुळे पद्धतींची विविधता त्यांच्या उत्पादनवाढीच्या आड येऊ शकली नाही. चीन आणि इस्राएल येथील शेतांत जी सुजाणता, चैतन्य आणि जिद्द आढळली ती रेने डयूमाँ यांना फार महत्वासची वाटते. जमीन हलकी, भारी- कशीही असो, संकटाची तलवार सतत मानेवर टांगती असो, संस्था, संघटना, परिस्थिती, प्रश्नांचा गुंता यांना तसे कमी महत्व आहे. माणसाने एकदा निश्चय केला, जिद्द बाळगली, तर सिद्धी त्याला गुंगारा देऊ शकणार नाही. मानवाचा विजय मग अटळ आहे. रेने डयूमाँ हे जगातील भीषण समस्यांनी विभीस्त झालेले नाहीत. निराशेने त्यांना घेरलेले नाही. ते आशावादी आहेत. माणसाने सुजाणपणे परिस्थितीचे आकलन करावे आणि मग संघटितपणे तिचा मुकाबला करण्याचा पवित्रा घ्यावा म्हणजे मानवाचा विजय अटळ आहे असे ते म्हणतात. 

माती जागवील तो भवितव्य घडवील
आपले जगभरचे अनुभव अथित करणारे, जवळपास अडीचशे पानांचे पुस्तक त्यांनी फ्रेंच भाषेत लिहिले. ‘लँड्स अलाइव्ह’ (जागती माती ) या नावाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. सोळा प्रकरणांत शेती व अन्नधान्य यांबाबतच्या परिस्थितीचा वास्तव आलेख त्यांनी रेखाटला आहे. भारतातही ते घेऊन गेले, आणि त्यासंबंधीचे आपले अनुभवही त्यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. भारताच्या भवितव्याची चिंता बाळगणाऱ्या सर्वांनी त्यांचे याबाबतचे विचार समजून घेण्यासारखे आहेत. त्यांच्या विवेचनातील महत्त्वाच्या भागाचा गोषवारा साधनेत देण्याचा विचार आहे. भारताची माती जो जागवील तोच या देशाचे भवितव्य घडवू शकेल असा त्यांच्या विवेचनाचा सामान्य निष्कर्ष आहे.मातीपासून ज्यांची फारकत झाली आहे त्यांचा दावा काहीही असला तरीही ते या भूमीचे नियंते नव्हेत. मातीशी ज्यांचा सहवास आहे, पण ज्यांचे हात स्वार्थाने भ्रष्ट झाले आहेत तेही भारताचे भाग्यविधान करू शकणार नाहीत. अन्नधान्याचा प्रश्न यापुढे इतका बिकट होणार आहे की एकेका राष्ट्राला तर त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावाच लागेल. पण जगाची म्हणूनही योजना क्रमप्राप्त होईल, असा त्यांचा निष्कर्ष आहे.

कागदपत्रांच्या चळती
भारतात डयूमाँ आले तेव्हा समाजविकास योजनांचा मोठा बोलबाला होता, आणि या योजनांनी अवमघा देश पादाक्रान्त करण्याच्या घोषणा दुमदुमत होत्या.यूनोच्या एका मंडळाला पाचारण करून समाजविकास योजनांचे मूल्यमापन करण्याला सांगण्यात आले होते. कागदपत्रांच्या चळती होत्या आणि तज्ज्ञांच्या स्वगताची जंगी तयारी झाली होती.आदरातिथ्यात भारताच्या ख्यातीला बट्टा लागू नये अशी दक्षता घेण्यात आली होती. तज्ज्ञांना प्रत्यक्ष विकास योजना गटात जाण्याचे कष्टसुद्धा घ्यावे लागू नयेत अशा पद्धतीने आखणी करण्यात आली होती! अभिप्रायांच्या वह्या सरसावून अधिकारी सिद्ध होते. कागदपत्रांवरून नजर फिरवून आणि शाही आदरातिथ्याने खूष होऊन गौरवाची चार अक्षरे वहीत लिहिली जातील अशी त्यांची खात्री होती. गावच्या पुढाऱ्यांना योग्य त्या पूर्वतयारीच्या सूचना गेल्या होत्या. योजनाबद्ध रीतीने सर्व सिद्धता करण्यात आली होती. तज्ज्ञांनी दिल्लीच्या परिसरातून सुरुवात करण्याचे ठरवले. नीलोखेडीच्या प्रशिक्षण केंद्राला भेट हा पहिला कार्यक्रम. केंद्राच्या सेवक वर्गाने सर्व गोष्टी फारच उत्तम प्रकारे चालल्याची ग्वाही दिली. आसपासच्या खेडोपाडयातून स्वागतासाठी भीड जमा करण्यात आली होती. पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. हार घालण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांची योजना केली होती. गावातल्या सधन माणसाकडे पुढारीपण होते. पंचायती त्यांच्या मुठीत असतात, ते मालक शेतकरी असतातच, पण काही त्यांचा धंदा असतो! हरिजन एका बाजूला मागे बसलेले होते. पंचायतीच्या कायद्याप्रमाणे दलिताला पंचायतीत सभासद म्हणून यावे लागते, पण ते समजूतदार असल्याने पंचायतीच्या सभांना हजर राहात नाहीत, कारण गाव-शिष्टाचार त्यांच्या चांगलेच अंगवळणी पडलेले असतात आणि सुसंस्कृतपणे कसे वागावे ह्याचे त्यांना भान असते !

अग्रक्रमाबाबत  गफलत
पंजाबमधल्या त्या खेड्याने अभिक्रम दाखवून अनेक गोष्टी केल्याचे स्पष्ट दिसत होते. पहिली गोष्ट म्हणजे भाजलेल्या विटांचे रस्ते! त्यामुळे नोकरशाहीला गावाची पाहणी करण्यासाठी वारंवार सुखाने येता येईल. पावसाळपात चिखल तुडवीत आता यायला नको. पण कपाशीचे पीक मात्र गरीबडे दिसत होते; कारण पाण्याचा निचरा करण्याची काही योजनाच नव्हती. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न करता कालवे काढून पाणीपुरवठा करणे म्हणजे जमिनी उपळण्याला वाव करून देणेच होय. डयूमाँनी चौकशी केली तेव्हा कळले की तीन वर्षांनी निचऱ्याची योजना हाती घेण्याचा बेत आहे. रस्ते मात्र सात वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते. डयूमाँ म्हणतात, “ही मोठी उत्तम व्यवस्था आहे! आधी लोकांचे जीवनमान उंचवायचे, नंतर सहा वर्षांनी उत्पादनवाढीचा विचार करायचा! पण मध्यंतरीच्या काळात  लोकसंख्या आणि उपभोगाची सवय वाढणार, आणि मग उत्पादन पुरणारसुद्धा नाही. मग उत्पादनवाढीसाठी उपलबद्ध होणारे परदेशी चलन चैनीच्या वस्तू उत्पादन करणारी यंत्रसामग्री आणण्यात उधळून टाकायचे ! सरकारने अर्धे आणि लोकांनी अर्धे खर्च करावे व त्यातून उभारणी करावी अशी योजना ड्यूमांनी लोकांची अर्धी रक्कम कशी आली, त्याची चौकशी केली पण उत्तर मिळाले नाही! सगळया गोष्टी ठीकठाक असल्याची अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली होती. डयूमाँ रागवून म्हणाले, “मी रिकामटेकडा म्हणून इथे आलेलो नाही. फ्रान्समध्ये मला करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत.” त्यांच्या रागाचा थोडा परिणाम होतो. मग ते स्वतःच नकाशा घेतात. भेटी द्यायची गावे निवडतात आणि पूर्वसूचना न देताच या गावात जाऊन थडकतात. या सर्वांचा एक फायदा होतो: ‘रस्त्यांची झाडझूड करण्याचा लोकांचा त्रास वाचतो. रस्त्याच्या कडेला अधिकाऱ्यांना स्वागतासाठी निष्कारण तिष्ठत राहावे लागत नाही, आणि हारतुरे त्यांना तयार करावे लागत नाहीत !!’

Tags: Punjab Lands Alive Istrail Russia America Land Agriculture Agronomy French Univercity Rene Dumas पंजाब ‘लँड्स अलाइव्ह’ इस्राएल रशिया अमेरिका भूमी शेती अॅग्रॉनमी फ्रेंच विद्यापीठ रेने डयूमाँ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके