डिजिटल अर्काईव्ह

माझा देश स्वतंत्र आहे 
या देशात अनीतीला मुक्त स्वातंत्र्य आहे 
पाहिजे तेथे ती जाऊ शकते 
मंत्रीसुद्धा तिला अडवीत नाहीत 

माझ्या देशात सुबत्ता आहे, समृद्धी आहे, संपत्ती आहे
सुबत्ता गरिबीची 
समृद्धी बेकारांची
संपत्ती लाचलुचपतीची
माझा देश!
या देशाचा मला अभिमान आहे
भारतीय संस्कृतीचा पुरातन दीप जिथे तेवतो
अहा तो माझा देश!
अजंठा-वेरुळांचा देश
माउंट अबूचा देश
मिनाक्षीच्या गोपुरांचा देश
मला प्रिय आहे- 
ठिकाणी माझा जन्म झाला
या ठिकाणी मी वाढलो.... 
पळवून नेलेल्या फळांमुळे वांझोटे झालेले वृक्ष
माझ्या देशात आहेत
क्षणाक्षणाला तत्त्वे विकणारे नेते
माझ्या देशात आहेत
माझ्या देशात पुढाऱ्यांची किंमत
पक्षांतराबरोबरच बदलत असते.....
या देशात कामगारांचे हक सुरक्षित आहेत
मेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आम्ही
पाचशे रुपयांची मदत करतो
आमच्या कामगारांच्या बायका नवरा मेला म्हणजे 
या पाचशे रुपयांशी संसार करतात 
सरकारचे कुंकू लावून
आमच्या देशात अनेकांना 
विनाकारण जेलमध्ये डांबले जाते 
त्यांच्या चतकोर भाकरीची व्यवस्था करण्यास 
आमचे सरकार विसरत नाही 
माझा देश स्वतंत्र आहे 
या देशात अनीतीला मुक्त स्वातंत्र्य आहे 
पाहिजे तेथे ती जाऊ शकते 
मंत्रीसुद्धा तिला अडवीत नाहीत 
माझा देश सुवर्णाची खाण आहे 
रोज कित्येक जाकिटे भरभरून 
आयात केले जाते सुवर्ण कोणत्याही 
मोठ्या बंदरावर बोटीतून.....
असा माझा देश!
मला या देशाचा अभिमान आहे! 
तुम्हांला या देशाचा अभिमान आहे! 
आपणा सर्वांना या देशाचा अभिमान आहे!
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके