डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

जयप्रभा स्मारिका

संपादक: डालचंद बोरदिया
जनता प्रिंटिंग प्रेस
गांधी बाजार, भीलवाडा, राजस्थान
रु.10.00 

अकरा ऑक्टोबर हा जयप्रकाशजींचा जन्मदिवस. दोन वर्षांपूर्वी जयप्रकाशजींच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त ठिकठिकाणी अमृतमहोत्सव साजरे झाले.

या वर्षी त्यांच्या 77 व्या जन्मदिवसानिमित्त एक स्मरणिका काढण्याचे मनसुबे चालू असतानाच चार दिवस आधी जयप्रकाशच्या निधनाची बातमी आली.

भीलवाड्याच्या श्री डालचंद बोरदिया यांच्या संपादकत्वाखाली ही स्मरणिका काहीशा विलंबाने प्रसिद्ध झाली. संपूर्ण क्रांतीच्या विविध आयामांविषयी श्री किशन पटनायक, आचार्य राममूर्ती, दादा धर्माधिकारी, कुमार प्रशांत, कुमार शुभमूर्ती, काशिनाथ त्रिवेदी, श्री बद्रीप्रसाद स्वामी, बाबूराव चंदावार, नरेंद्रभाई, इत्यादींचे मागवून घेतलेले तर खुद्द जयप्रकाशजींच्या प्रसिद्ध लिखाणातील काही भाग यांचे सुरेख संकलन केले आहे.

जयप्रकाशजींना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या मोजक्या कवितांचाही स्मरणिकेत अंतर्भाव केला आहे.
संघर्षवाहिनीच्या निरनिराळ्या उपक्रमात सहभागी झालेल्या जयप्रकाशांची काही बोलकी छायाचित्रेही आहेत.

अलविदा जयप्रकाश या एका कवनात राजकिशोर हा कवी सर्व तरुणांची भावना व्यक्त करून जातो.

कुछ करने का उन्माद 
घिरा जिनके मन में 
उनको तो बस उसका 
रहना भर काफी था

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके