डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ललित ग्रंथ पुरस्कार : रिबोट
मुंबईतल्या गिरणगावातल्या जीवनाचे, त्याच्या पडझडीचे चित्रण जी.के. ऐनापुरेयांच्या अनेक कथांधून फार अस्सलपणे आले आहे, पण ‘रिबोट’ कादंबरीत पडझडीच्या आरंभकाळातली कहाणी, त्यातील पात्रांच्या जगण्यातून अतिशय विदारक स्वरूपात पुढे आली आहे. ‘रिबोट’ म्हणजे कॅरमच्या खेळातला रिबाऊंड. जगण्याच्या खेळात अशी रिबाऊंड होत दुर्गतीला लागलेली माणसं आणि या सगळ्यांचा सामूहिक चेहरा म्हणून वाताहतीला लागलेलं गिरणगाव, याचं अत्यंत अस्वस्थ करणारं चित्रण या कादंबरीत आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोलीभाषा आणि मुंबईतील संकरित भाषा यांच्या अनोख्या मिलाफातून या लेखनाची भाषा घडली आहे. कादंबरीच्या कलामूल्यांना धक्का न लावता तिची सामाजिक-आर्थिक- राजकीय अर्थपूर्णता टिकवण्यात ऐनापुरे यशस्वी झाले आहेत. 

A novelist is essentist s person who covers distance through his patience showly, like a ant. A novelist impresses us not by his demonic and romantic vision, but by his patience. - Orhan pamuk

स्वत:च्या जगातील मूलभूत माणुसकीचा संघर्ष ज्याला जेवढा कळेल व माणुसकीच्या अनुभूतीतून संवादी व विरोधी अनुभवांची, वाचकाला अनुभवता येईल अशी संघटना ज्याला करता येईल तोच लेखक थोर यात शंका नाही. - शरच्चंद्र मुक्तिबोध

1. स्वगत तपासण्याचे काम किंवा जाणीव तुच्यावर स्वतंत्रपणे जगण्याची वेळ आल्यावरच शक्य आहे. ही गत अवस्था किंवा स्थिती ह्या अर्थाशी समांतर ठेवता येईल. अवस्था किंवा स्थिती ही जडवादाच्या विवरातून आयात होते. स्वगत ध्यानात न घेणारा कोणताही प्राणी चैतन्यवादाकडे आपोआपच खसकतो. चैतन्यवादी झाल्यावर तुच्या सर्व अवस्था किंवा स्थिती तुच्या अस्तिकतेवर अवलंबून राहतात. आस्तिकता धर्माच्या आचरणात तुम्हाला खेचून घेते. ह्याचा तोटा असा की, तुचे विचार करणं मर्यादित होत जातं. त्यामुळे चैतन्यमय होणं हा विचार करण्याच्या (स्वतंत्र) प्रक्रियेतला मोठा अडथळा ठरावा. चैतन्य नसणारा माणूसच वर्तानावर ठाम प्रतिक्रिया देऊ शकतो. भूतकाळाचा आढावा समग्रपणे सांभाळू शकतो. चैतन्यवादी नसणे ही लिहिणाऱ्याची, विचार करणाऱ्याची महत्त्वाची खूण मानता येईल.

2. वाचनाचे संस्कार वाचन करणाऱ्यावर हमखास होतातच, पण आपण काय वाचतो?... हा प्रश्न आपण काय खातो? ह्या अर्थाने पाहता येईल. माझ्यासारख्या कायमस्वरूपी शिकणाऱ्याला दुसरे काहीच काम नसल्यामुळे वाचन ही गोष्ट महत्त्वाची वाटली. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातील अफाट ग्रंथसंग्रह, गिरणगावातील दोन-तीन वाचनालये, कामगार कल्याण केंद्राचे वाचनालय, भारतमाता सिनेासमोरील दोन-तीन दुकाने; फोर्ट चर्चगेट परिसरातील असलीच दुकाने असा खास एरिया आपल्यासाठीच तयार झाला होता की काय असे आजही वाटते. आल्बेर कामूच्या एका पुस्तकासाठी स्टॅर्लिंग टॉकीजच्या मागे असलेल्या पुस्तकाच्या दुकानात प्रवेश करताना तिथल्या वातावरणामुळे आपल्या राहणीमानाची पहिल्यांदाच जाणीव झाली. आपण मुंबईत आहोत का? हा प्रश्न त्यानंतर कायमचाच मानगुटीवर बसलेला असायचा. पुढे हे ॠशपशींळल लेवश सारखं डोक्यात घट्ट बसलं. ह्याचा विस्तार व्हायला नव्वदचे दशक मला पार करावे लागले; हा विस्तार होण्याचा काळ मला तेश्रलरपळल र्शीीिींळेप सारखा वाटतो. वर्षाला फक्त इंचभर किंवा त्यापेक्षा कमी अंतर पुढे सरकण्याचे. ह्या वाचनाचा उपयोग काय होत असावा?... हा प्रश्न एका विद्यापीठात मला व्याख्यानाला बोलाविल्यावर निकालातच निघाला. त्याच वेळी माझे वाचन एका टोकावर आले होते. माझ्यासमोरचा पेच होता तो गौतम बुद्ध की मार्क्स असा. अनेकदा विचार केल्यावर हे दोघेही माझ्यासाठी एकरेषीय झाले. दु:ख आणि शोषण ह्या गोष्टी लिहिणाऱ्याने, विचार करणाऱ्याने, अव्याहतपणे चिंतनशील बोलणाऱ्याने ध्यानात ठेवूनच आपला सांस्कृतिक व्यवहार उरकावा; असे माझे मत बनत चालले आहे; ते पुढेागे ठाम होईलच.

3. विचार, विस्तार आणि स्वतंत्र आयुष्य जगणं ह्या गोष्टी उहरीसशव/ऊळीलहरीसशव अशा अर्थाने पाहता येतील. विचार विस्ताराचे स्वतंत्र जगण्यासाठी खर्च होणे; हे महत्त्वाचे असे कार्य आहे. त्यातून जगण्याला आकार देण्याचा, कोरण्याचा प्रयत्न होतो. हा प्रयत्न रोजचा स्वाध्याय सोडविण्याचा जो

 वाचनाचा उपयोग काय होत असावा?... हा प्रश्न एका विद्यापीठात मला व्याख्यानाला बोलाविल्यावर निकालातच निघाला. त्याच वेळी माझे वाचन एका टोकावर आले होते. माझ्यासमोरचा पेच होता तो गौतम बुद्ध की मार्क्स असा. अनेकदा विचार केल्यावर हे दोघेही माझ्यासाठी एकरेषीय झाले. दु:ख आणि शोषण ह्या गोष्टी लिहिणाऱ्याने, विचार करणाऱ्याने, अव्याहतपणे चिंतनशील बोलणाऱ्याने ध्यानात ठेवूनच आपला सांस्कृतिक व्यवहार उरकावा; असे माझे मत बनत चालले आहे; ते पुढेागे ठाम होईलच.

विकार आहे त्याच्यासारखाच आहे. विचार विस्ताराचे ऊर्जारूप कुटुंब व्यवस्थेसाठी, समाजासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाणी खर्ची पडल्यावर अनुभवाचे स्वतंत्र बेट जन्माला येते. ह्या बेटाला खास असे खाजगीपण असते. अनुभवाच्या बेटाच्या जन्माची आणि त्याच्या खाजगीपणाची चाहूल लागल्यावर स्वत:ला सजीव समजणाऱ्या व्यक्तीने हा सगळा प्रवाह समूहाच्या अंतरंगात घुसवून पुन्हा आपल्या स्वत्वासह वेगळा काढला पाहिजे. त्यातून आपसूकच एक भूमिका तयार होते. विचार-विस्ताराच्या भूमिकेत कायापालट (चशींरोीहिेीळी) होणे ही वयात येण्याची खूण समजावी.

4. माझ्या बाबतीतला विचार-विस्ताराचा काळ इतका हळुवारपणे सरकत असल्याची जाणीव होण्याची कारणे अनेक सांगता येतील. त्यातील पहिलं कारण लक्ष वेधून घेण्याचे किंवा हुशारी दाखविण्याचे. प्रसारमाध्यमांशी संबंधित राहून आपली हुशारी दाखविणारी माणसेच श्रेष्ठ; असे म्हणताना तर्काची अगदी खाजगी पातळी ही आपल्याला भिरकावून द्यावी लागते. प्रसारमाध्यमांच्या जवळ न जाणे आणि विचार विस्तार भूमिगत ठेवल्यामुळे ‘ग्रामीण’ आणि ‘दलित’ अशा दोन्ही बाजू माझ्यासाठी उपऱ्या ठरल्या. त्याचा परिणाम खास करून बाजूला पडण्यात झाला. हे बाजूला पडणे जिव्हारी लागण्याइतपत थोर असले तरी काही काळाने ते सत्त्वाच्या जवळ जाणारे वाटले. पुढे हे सत्त्वाच्या जवळ जाण्याने भान लेखनाच्या मुळाशी येत राहिले. ह्यामुळे वेगळ्या दृष्टीच्या पट्‌ट्यात यावे लागले. आपण लिहिणारे आणि मानवतेचा घोष करणारे आहोत. हे नैतिक आत्मभान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची ऊर्जा अंगात आली. विचार-विस्ताराच्या भूमिकेत कायापालट होणे; आणि भूमिकेतून सूचक आत्मभान येणे; हे लिहिणाऱ्याचे दोन वेगवेगळे कप्पे; ते दिसायलाच हवेत हा अट्टाहास लिहिणाऱ्याने आपल्या कागदी कामात (पेपर वर्क) झिरपू द्यायला हवा. ह्यानंतरच लिहिणाऱ्याचे कसब आणि त्याची क्रियात्मकता आपल्यासमोर येईल. येथे क्रियात्मकता अधिक महत्त्वाची. जागतिकीकरणाच्या रेट्यात क्रियात्मकता अग्रस्थानी असल्यावरच किंवा ठेवल्यावर आपल्याला मानवता टिकवता येईल. आपल्या सजीवपणाचे टिकणेही त्यातच आहे. फक्त कसबाला अग्रक्रम दिल्यास आपले काय होईल?... सांगणे कठीणच आहे.

5. लिहायला सुरुवात केली त्या वेळी लेखक असणे किंवा होणे ही गोष्ट तितकी कठीण वाटली नव्हती. आता ती तशी झाली आहे. पुन्हा लोकशाही हा भ्र आहे; अशी जाणीव पुन्हा पुन्हा होत राहिल्यावर आपले वर्तन आणि लिहिणे हे अधिक गुंतागुंतीचे आणि आतून किडवून टाकणारे बनत चालले आहे.

6. लिहिणाऱ्या सगळ्यांना वर्तानात असेच वाटत असेल काय?

Tags: महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार2011 जी. के. ऐनापुरे बुद्ध आणि मार्क्स रिबोट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके