डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते सरकारतर्फे; परंतु शास्त्रीजींची पुण्यतिथी असते त्या दिवशीचे सर्व कार्यक्रम खाजगीरित्या त्यांच्या कुटुंबियांतर्फे पार पाडले जातात, कार्यक्रमांची निमंत्रणे कुटुंबियांतर्फे पाठवली जातात. असे असले तरी या कार्यक्रमांना इंदिरा गांधी, स्वतः राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असे तिघेजण न चुकता हजर राहत. इंदिरा गांधी दिल्लीत नसत तेव्हा आवर्जून शास्त्री कुटुंबियांना विशेष संदेश धाडीत. राजीव गांधी आल्यापासून सगळेच चित्र आता बदलले आहे.

1986 साली लाल बहादूर शास्त्रींच्या पुण्यतिथीच्या दिवशी विजयघाटावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला दोनच सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राजीव गांधी त्या वेळी दिल्लीत होते, परंतु ऑटो एक्स्पो हे, नव्या मोटरीचे प्रदर्शन पाहायला गेल्यामुळे ते श्रद्धांजली वाहायला जाऊ शकले नव्हते. यंदा शास्त्रीजींच्या 22 व्या पुण्यतिथीलादेखील असाच प्रसंग घडला. अकरा जानेवारीला राजीव गांधी दिल्लीत होते. 6 जानेवारीला त्यांनी शास्त्रीजींच्या घरी निरोप पाठवून आपण विजय घाटावर सकाळी येणार असल्याचे कळवले होते. दिल्ली पोलिसांना आणि सिक्युरिटी फोर्सला त्यांच्या भेटीची संभाव्य वेळ सकाळी 8.45 ते 1.45 अशी कळवलेली होती. त्या वेळात सामान्य जनतेला विजय घाटावर प्रवेश बंद केलेला होता, पण पावणेअकरा नंतर] पोलिस बंदोबस्त काढून घेण्यात आला, राजीव गांधी येणार नाहीत असे जाहीर केले गेले. 

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते सरकारतर्फे; परंतु शास्त्रीजींची पुण्यतिथी असते त्या दिवशीचे सर्व कार्यक्रम खाजगीरित्या त्यांच्या कुटुंबियांतर्फे पार पाडले जातात, कार्यक्रमांची निमंत्रणे कुटुंबियांतर्फे पाठवली जातात. असे असले तरी या कार्यक्रमांना इंदिरा गांधी, स्वतः राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असे तिघेजण न चुकता हजर राहत. इंदिरा गांधी दिल्लीत नसत तेव्हा आवर्जून शास्त्री कुटुंबियांना विशेष संदेश धाडीत. राजीव गांधी आल्यापासून सगळेच चित्र आता बदलले आहे.

शास्त्री कुटुंबियांनी विजयघाटाच्या दुरवस्थेबद्दल गृहमंत्री आणि पंतप्रधानांना वारंवार पत्रे पाठवून देखील त्यांची दखल घेतली जात नाही असे चित्र दिसते. कारण विजय घाटावर शास्त्रीजींच्या समाधीजवळची जागा सीआरपीसीच्या कॅम्पसाठी दिलेली आहे. त्यामुळे आसपासच्या सर्व जागेचा वापर लघुशंका व नैसर्गिक विधींसाठी केला जातो. माजी पंतप्रधान केवळ नेहरू घराण्यातले नाहीत म्हणून ही अक्षम्य हेळसांड होते असे समजायचे की काय ?

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एका नियतकालिकाने वाचकांचा सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण या विषयावर घेतलेला कौल मनोरंजक ठरू शकेल. या नियतकालिकाने घेतलेल्या सर्वेनुसार भारताच्या आजी- माजी पंतप्रधानांना खालीलप्रमाणे वाचकांनी आपली पसंती दर्शवली.

लाल बहादुर शास्त्री – 31 टक्के

पंडित जवाहरलाल नेहरू – 28 टक्के

इंदिरा गांधी- 27 टक्के

राजीव गांधी – 7 टक्के.

मोरारजी देसाई आणि चरणसिंग यांना सर्वात कमी मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी (किंवा टक्केटोणपे ) जाहीर काली नाही.

*****

अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष केनेडी यांचा बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा खून झाला तेव्हा दोन अमेरिकन नभोवाणी व टीव्हीवरचे कार्यक्रम थांबवले गेले होते. त्या जनतेचेदेखील केनेडींवर अपार प्रेम होते. तासांनी सर्व कार्यक्रम पूर्ववत सुरू केले. आपल्याकडे मात्र गफारखान यांच्या निधनानंतर सरकारने पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला. पंतप्रधान व कुटुंबीय पेशावरला ताबडतोब रवाना झाले. दरम्यान भारत व वेस्टइंडीज यांच्यातला एक दिवसीय क्रिकेट सामना रद्द न होता पूर्वनियोजित वेळेवरच खेळला गेला. अंदमान-निकोबार बेटांना राष्ट्रपतींची भेट व्यवस्थित पार पडली आणि त्या भेटीचे चित्रण टीव्हीने रोजच्या बातमीपत्रांतसादर केले. टीव्हीवर गफारखानांना श्रद्धांजली वाहताना देवेन बिरेंद्रनाथ यांनी गफारखान हे भारतीय सरकार गांधीजींच्या मार्गापासून दूर गेल्यामुळे व्यथित होत असत, याचा उल्लेख केल्यावर त्यांची श्रद्धांजली सेन्सॉर करण्यात आली.

*****

एआयसीसीच्या तीन चिटणीसांपकी एक, श्री. राम रतन राम यांचा हा ताजा किस्सा. राम रतन राम हे सहा वर्षाचे असताना वडिलांबरोबर म. गांधी, सुभाषचंद्र बोस, जगजीवन राम  इ. च्या सहवासात आले. त्या वेळी त्यांचा आवाज छान होता. काँग्रेसच्या मेळ्यामध्ये ते पदे वगैरे गात, वडिलांनी त्यांना बाबूजींच्या चरणी अर्पण केले. पुढे यथावकाश राम रतन राम यांनी आमदारक्या खासदारक्या मिळवल्या. 1977 सालचा अपवाद सोडला तर एकाही निवडणुकीत पराभव पाहिला नाही. ते हे महाशय ए आय सी सीचे सेक्रेटरी झाल्यावर काही दिवसांपूर्वी मॉस्कोला सहज म्हणून गेले. जाताना त्यांनी इंदौरहून राजीवजींना फोन लावला, पण फोन लागला तरी फोनवर राजीव गांधी आले नाहीत. म्हणून त्यांनी सोनिया गांधीना बोलावले. तब्बल वीस मिनिटे फोन 'होल्डऑन' केल्यावर सोनिया गांधी आल्या. राम रतन राम यानी त्यांना सांगितले की 'मी एआयसीसीचा अध्यक्ष. मॉस्कोला चाललोय, तुमचा रशियन नेत्यांना काही निरोप असला तर सांगा’, सोनिया गांधीनी एक अक्षर न बोलता फोन बंद केला. मॉस्कोला पोचल्यावर राम रतन राम यांनी खरी गंमत केली. गोर्बाचेव्ह यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी 'मी आमच्या पक्षाचा सेक्रेटरी आहे. तुमच्या पक्षाचे सेक्रेटरी गोर्बाचेव्ह यांना बोलवा' असे सांगितले. दुभाषाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नंतर - नंतर काय? वाटाण्याच्या अक्षता!  (किंवा ब्रम्हपदी नाचण्यासाठी लागणारे चणे!)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके