डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत

१९३७ मध्ये तत्कालीन मुंबई इलाख्यात काँग्रेसचे राज्य स्थापन झाले आणि मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी पंचाकाकांना संदेश पाठवला की, 'आता त्यांचे सरकार पंचाकाकांची जमीन व घर परत करायला तयार आहे.' 

महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी जी ऐतिहासिक अशी दांडीयात्रा केली, त्या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. त्यातील एक होते दांडीजवळच्या कराडी गावातले रहिवासी पंचाकाका पटेल. पंचाकाका हे अखेरपर्यंत महात्मा गांधींचे निष्ठावंत अनुयायी कसे राहिले त्याची कहाणी ऐकण्यासारखी आहे.

पंचाकाकांनी मीठाच्या सत्याग्रहात आणि महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घेतल्याची शिक्षा म्हणून ब्रिटिश सरकारने पंचाकाकांची जमीन व राहते घर जप्त केले, त्यांना तुरुंगात टाकले. त्यांच्या हातात बेड्या अडकवून त्यांना तुरुंगात नेताना पोलीस अधिकारी तुच्छतेने म्हणाला, 'बघा, काय मिळालं तुम्हाला या संकटात उडी घेतल्याबद्दल? तुमची तसूभरही जमीन राहिली नाही. आता तर तुमचं घरदेखील गेलं.' पंचाकाकांनी धीर न सोडता उत्तर दिले, 'तुम्ही पहातच रहाल. माझा भारत स्वतंत्र होईपर्यंत मी माझी मालमत्ता परत करा असं सरकारला सांगणार नाही.'

१९३७ मध्ये तत्कालीन मुंबई इलाख्यात काँग्रेसचे राज्य स्थापन झाले आणि मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी पंचाकाकांना संदेश पाठवला की, 'आता त्यांचे सरकार पंचाकाकांची जमीन व घर परत करायला तयार आहे.' पंचाकाकांचे उत्तर आले 'भारत स्वतंत्र होईपर्यंत मी आपली मालमत्ता परत न घेण्याची शपथ घेतली आहे आणि तो दिवस अद्याप उजाडलेला नाही.' 

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंचाकाकांना पुन्हा निरोप पाठवण्यात आला 'आता तुम्ही आपली जप्त झालेली मालमत्ता पुन्हा ताब्यात घ्यावी.' पंचाकाकांनी काय करावे? त्यांनी थेट महात्मा गांधींशी संपर्क साधला आणि विचारले, 'गांधीजी, आपल्याला असं वाटतं का की, आपण ज्याची अपेक्षा केली होती, ते स्वातंत्र्य आलं आहे?'

गांधीजींचे उत्तर आले, 'दुर्दैवाने नाही.'  आणि काय आश्चर्य. पंचाकाकांनी स्वतंत्र भारत सरकारला लिहिले, 'मला माझी मालमत्ता परत नकोय.'

Tags: मालमत्ता पंचाकाका पटेल दांडीयात्रा मिठाचा सत्याग्रह Property महात्मा गांधी Panchakaka Patel Dandi Yatra Salt Satyagraha Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके