डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कृषी क्षेत्रात मराठवाड्यातील अनुशेष व तो दूर करण्यासाठी उपाय

मराठवाड्यातील कोणताही जिल्हा प्रथम क्रमांकावर एकंदर वर्गनिहाय कृषी उत्पादनात नाही. याचा अर्थ असा होतो की, मराठवाड्याच्या उत्पादनात बराच मोठा अनुशेष आहे. याची कारणमीमांसा केली असता असे दिसते की, खतांचा वापर, पाणीनियोजन व वापर यांमधील गैरव्यवस्थापन तसेच शेती व्यवस्थापन, कृषकांची मानसिकता, अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे उत्पादनात होणारा बदल व वाढ मंद गतीची आहे.

मराठवाड्याचे भौगोलिक क्षेत्र 64.813 लक्ष हेक्टर असून त्यातील वहित क्षेत्रफळ 47.75 लक्ष हेक्टर आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत हे यहित क्षेत्र 26.6 टक्के एवढे आहे. महाराष्ट्राचा उद्योगधंद्यात पहिला क्रमांक आहे, पण कृषी उत्पादनात मात्र खालून दुसरा वा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे दर हेक्टरी कृषी उत्पादन कमी आहे. त्याची स्थिती तक्ता 1 मधील

मराठवाडा आणि महाराष्ट्रातील प्रतिहेक्टर उत्पादकता
उत्पादन प्रतिहेक्टर किलोग्रॅम
तक्ता क्र.1

 

मराठवाडा

महाराष्ट्र

महत्तम उत्पादक जिल्हा

1996-97

97-98

(97)

अन्नधान्य

977

1058

2182 (सिंधुदुर्ग)

तेलबिया

662

891

3738 (कोल्हापूर)

कापूस

149

173

483 (पुणे)

ऊस

65408

80986

97092 (सांगली)

 

आकडेवारीवरून दिसून येईल. तुलनात्मक उत्पादनावरून असे दिसते की 1996-97 पर्यंत 1960-61च्या तुलनेने उत्पादनात दर हेक्टरी वाढ दिसते. मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादनवाढ झाली. पण ती भारताच्या तुलनेत कमी आहे. मराठवाड्यातील कोणताही जिल्हा प्रथम क्रमांकावर एकंदर वर्गनिहाय कृषी उत्पादनात नाही. पीकनिहाय फक्त सूर्यफुलाचे दर हेक्टरी उत्पादन मराठवाड्यात जास्त आहे. याचा अर्थ असा होतो की, मराठवाड्याच्या उत्पादनात बराच मोठा अनुशेष आहे. याची कारणमीमांसा केली असता असे दिसते की, खतांचा वापर, पाणीनियोजन व वापर यामधील गैरव्यवस्थापन तसेच शेती व्यवस्थापन, कृषकांची मानसिकता, अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे उत्पादनात होणारा बदल व वाढ मंद गतीची आहे.

सिंचन:- जलस्रोत निर्मिती झाली. त्यात असे दिसते की, मराठवाड्यातील सिंचित क्षेत्र 14.3 टक्के आहे, असे लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेवरून दिसते. यात प्रवाही तसेच विहिरी व इतर स्रोत समाविष्ट केले आहेत. ( तक्ता क्र. 2) महाराष्ट्राच्या तुलनेत टक्केवारी कमी आहे. सिंचित शेती कशा पद्धतीने केली जाते, त्यातील व्यवस्थापन कसे आहे, या बाबी कृषिउत्पादनात महत्त्वाच्या ठरतात. त्याचा परिणाम हेक्टरी उत्पादनात अनेक ठिकाणी दृष्टीस येतो. ह्या सर्व घटकांची चर्चा पुढे केली आहे. सिंचनाच्या नवीन पद्धतीचा वापर, पाण्याची बचत करणे, ते काटकसरीने वापरणे, जमिनी क्षारपड होणार नाहीत याची काळजी घेणे, हे महत्त्वाचे अनुशेष आहेत. पाणी वापर होतो पण कोणत्या प्रतीचे जल सिंचनासाठी उपलब्ध आहे याची काळजी घेतली जात नाही. भारी काळ्या जमिनीतील सिंचन व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे. भरपूर पाणी दिले म्हणजे पीक उत्पादनात वाढ होते अशी मानसिकता आजही दिसते. भारी जमिनीत पाणी वापर मोजून, माफक मानामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पीक व झाड हे पाण्याला प्रतिसाद देते. पाण्याचा ताण दूर करण्यासाठी जलसिंचन

                    विभागवार जलस्त्रोत सिंचित क्षेत्र (00हे) (1994-95)

                  तक्ता क्रं. 2

स्त्रोत

उर्वरित महाराष्ट्र

मराठवाडा

विदर्भ

एकूण

प्रवाह

सिंचन

4777

(46.95)%

1974

(19.40)%

3423

(33.65)%

10174

विहिरीखाली सिंचन

10646

(60.48)

4859

(27.61)

2096

(11.91)

17601

(100)

एकूण

सिंचित क्षेत्र

15423

(55.53)

6833

(24.60)

5519

(19.87)

27775

(100)

सिंचित

क्षेत्र टक्केवारी

17.10

14.30

13.00

15.40

आवश्यक आहे. पण ते अती झाले तर प्राणवायूची जमिनीत तात्पुरती उणीव निर्माण करते. त्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नाही म्हणून वाढीव भरघोस पीक उत्पादनासाठी भूमी व जल व्यवस्थापन अनुकूल पद्धतीने झाले पाहिजे. सिंचनात रानबांधणी योग्य पद्धतीने राबविणे अत्यंत आवश्यक आहे. हा अनुशेष दूर करणे जरुरीचे आहे. यासाठी लोकप्रबोधन, प्रशिक्षण, नवीन सिंचनपद्धती जसे ठिबक सिंचन वा तुषार यांचा वापर, यासाठी लागणारा निधी, त्यासाठी पतपुरवठा, उत्कृष्ट संच पुरवठा, वापर करण्याचे कौशल्य शिकविणे, हा सर्व अनुशेष आहे. खूप ठिकाणी ठिबक संच पुरविले ते गुंडाळून ठेवलेले दिसतात. कारण ते व्यवस्थित साफ करणे, त्याचा योग्य पिकासाठी वापर करणे, एकच संच अनेक पिकांसाठी वापरता येण्याचे कौशल्य याचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. जमीन पाणी किती साठवू शकते, पिकांच्या अनुकूल सिंचनाची मात्रा किती, पाणी पावसातील अंतर कमीजास्त असणे, अशी व्यवस्था बसविणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ ऊस व केळी पिकांना पाण्याची मात्रा हेक्टरी 1000 घनमीटर प्रत्येक पाळीस दिली जाते. पण केळीकरिता पाण्यामधील अंतर 6-7 दिवसांचे तर उसाकरिता 15-20 दिवस असे असते. यात केळीला पाणी गरजेपेक्षा फार जास्त दिले जाते. कारण केळीची मुळे फक्त 60 से.मी. खोल असतात त्यामुळे 60 से.मी. खोलीखालील पाणी वाया जाते. म्हणून पिकाच्या मुळाची खोली सिंचन व्यवस्थापनात आवश्यक आहे. ही माहिती शेतकऱ्यांनी आत्मसात करणे जरुरीचे आहे. तरच आपण पीक उत्पादनात भरघोस वाढ करू शकू. मराठवाड्यातील ऊसउत्पादन कमी का? याचे उत्तरदेखील व्यवस्थापनात दडले आहे.
जलसंधारण :- मराठवाड्यात एकूण जलसंधारणाचे काम उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने कमी झाले. (तक्ता क्र. 3) त्याशिवाय पाणलोट क्षेत्रविकास देखील अजून बऱ्याच मोठया क्षेत्रावर होणे आवश्यक आहे.पाणलोटाचे मार्च 1998 अखेरपर्यंत 11,53.535 हेक्टर क्षेत्रावर काम केले. 43,92,298 हेक्टर क्षेत्र अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी लागणारा निधी 2196.4 कोटी रुपये आजच्या निकषाप्रमाणे आहे. सिंवनक्षेत्र टक्केवारी कमी आहे. मराठवाड्यात पावसाची अनिश्चितता मोठी आहे. एकूण दहा वर्षांपैकी 4 वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. तो तीव्रतेने एक आठवड्यात पडतो तर नंतर खंड पडतो. पावसाची गती, त्याची तीव्रता यांतदेखील फार मोठी दोलायमानता आहे. जून 1991 मध्ये औरंगाबादला 400 मि.मी. पाऊस झाला. एकूण पाऊस 650 मि.मी. झाला आणि अवर्षण प्रवणता जाणवली. अद्यापही या अनिश्चिततेच्या व्यवस्थापनाची तयारी झाली नाही. त्यासाठी पाणलोट क्षेत्रविकास अत्यंत आवश्यक आहे. त्यातील अनुशेष भरणे प्राथमिकतेने करावे म्हणजे जमिनीची सुपीकता टिकविणे, भूजलसाठा पुनर्भरणामुळे वाढविणे, धूप कमी होणे हे सर्व एकात्मिक पद्धतीने साध्य होऊन उत्पादनात वाढ होईल. पावसावर नियंत्रण ठेवता येत नाही. पण उपलब्ध पाणी व त्यांचे नियोजन करणे शक्य आहे. तांत्रिक माहिती संशोधनाने उपलब्ध आहे पण त्याच्या वापरातील अनुशेष फार मोठा आहे. हा अनुशेष पूर्ण करणे प्राथमिकतेने आवश्यक आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्ता मोठ्या प्रमाणात समाविष्ट असते. गायराने, पड़ीक जमीन, नाले, त्यावरील टेकडया, त्यावरील माया, वनराई, झाडे, जंगल गवत, कुरणे यांकडे कोणाचेही लक्ष नसते. नया-नाल्यांमधील वाळू खणणे व त्याचे दुष्परिणाम या बाबींकडे लक्ष दिले जात नाही. ही सामूहिक बाब समाजाने प्रयत्नपूर्वक सोडविणे आवश्यक आहे. यात शेतकरी, कामकरी, ग्रामस्थ, शिक्षणसंस्था, ग्रामपंचायती या सर्वांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. या लोकसहभागाचा अनुशेष आकडेवारीत मोजता न येणारा आहे पण तो महत्त्वाचा आहे. यावरील जालीम औषध हे सामाजिक मानसिकतेचे परिवर्तन हे आहे. या प्रक्रियेविषयी कार्यक्रम राबविणे व त्याला लागणारी यंत्रणा निर्माण करणे हा जलसंधारण योजनेतील एक मोठा अनुशेष आहे. यासाठी निधी खर्च झाला म्हणजे विकास झाला व उत्पादनात 

मराठवाडा विभागात जिल्हानिहाय विविध बाबी खाली असलेल्या क्षेत्राची माहिती (क्षेत्र-हेक्टर,रुपये-लाखात)

                                               तक्ता क्रं. 3

  • क. जिल्हा

भौगोलिक क्षेत्र-हेक्टर

वनविभागाचे व बिगरशेती खालील क्षेत्र हेक्टर

सिंचनाखालील क्षेत्र हेक्टर

पाणलोट उपलब्ध विहितीस अयोग्य

विकासाची कामे घेण्यासाठी क्षेत्र (हेक्टर) एकूण कामाचे क्षेत्र एकूण

मार्च ९८ अखेर झालेले

क्षेत्र (हे.)

शिल्लक उपलब्ध हेक्टर

उपलब्ध क्षेत्रासाठी लागणारा निधी

योग्य

एकूण

औरंगाबाद

52000

99000

45000

812000

857000

95108

761892

38095

जालना

20000

15000

26000

712000

738000

95181

642819

32141

बीड

21500

689000

41600

985000

1026600

153942

872658

43633

लातूर

13900

31782

33500

626801

660301

62793

597508

29875

उस्मानाबाद

14300

30640

26100

677438

703538

413628

289910

14496

नांदेड

120300

217538

93000

543026

636026

212739

423287

21164

परभणी

75700

92625

55300

869568

924868

120144

804724

40236

मराठवाडा विभाग एकूण

317700

555485

320500

5225833

5546333

1153535

4392798

219640

 

वाढ झाली असे होत नाही. या प्रक्रियेचे मोजमाप वेगळे आहे. प्रथम हा अनुशेष भरण्याचा कार्यक्रम ठरवला पाहिजे. परस्पर विश्वास निर्माण करणे जरूर आहे. ग्रामपंचायतीला प्राधान्य द्यावे असे घटना सांगते पण शासकीय अधिकाऱ्यांना याबद्दल विश्वास नाही. याच ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व राज्यशासनात दिसते. पण शासनावर विश्वास ठेवतोच ना! लोकशाहीची ही किंमत आहे ती मोजून सर्वांना एकत्रित काम करणे आवश्यक आहे. शेती उत्पादन वाढीतील व जलसंधारण कामातील अन्योन्य संबंध रूक्षात घेता हे कृतिशील कार्यक्रम राबविले गेले तर अनुशेष सातत्याने भरता येईल.

खते : सेंद्रीय व रासायनिक :- कृषीमधील अनुशेष काढताना पिकांसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा वापर लक्षात घेणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करताना नत्र, स्फुरद व पालाश यांचा वापर रासायनिक खतांद्वारे किती होतो ही आकडेवारी दिली जाते. तीन विकास मंडळांनी कृषी अनुशेषांचा अभ्यास केला. त्यांची आकडेवारी तक्ता 4 मध्ये दिली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत रासायनिक खतांचा वापर मराठवाड्यात कमी आहे. त्यात वाढ व्हावी असा निष्कर्ष विकास मंडळांनी काढला. सातत्याने कृषी उत्पादनातील वाढीसाठी फक्त रासायनिक खतांचा वापर तेवढा उपयुक्त नाही. सेंद्रिय खते, जसे शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खते, जैविक खते, जसे अॅझो, रायझो, मायकोराईझा, नत्र स्थिरीकरण करणारे पीक व त्याचा वापर हिरवळीची खते, पेंडी जसे निम, करंज, सरकी, एरंड यांचा वापर किती होतो, सर्व क्षेत्राला त्याची गरज किती आहे; उपलब्ध किती आहे व उणीव कशी भरून काढावी याची आकडेवारी नियोजनात कोठेही दिसत नाही. कृषी उत्पादनात सर्व शिफारशी सेंद्रिय खतांच्या वापरासहित आहेत पण नियोजन मात्र केले जात नाही. मराठवाड्यातील लागवड झालेले क्षेत्र साधारण 48 लक्ष हेक्टर म्हटले तर सरासरीने 240 लक्ष टन शेणखत वा त्या मालामध्ये इतर सेंद्रीय पदार्थांचा वापर व्हावा. यामध्ये दरवर्षी 5 ते 10 टन हेक्टरी खत लागणार नाही; कारण त्यातील 50-60 टक्के पहिल्या वर्षी, 30 टक्के

तक्ता क्र.4 

 

नत्र, स्फुरद, पालाश यांच्या संयुक्त वाटीचे प्रमाण

 

                संयुक्त वाढीच्या प्रमाणाची टक्केवारी

क्र. जिल्हा      नत्र    स्फुरद   पालाश  (न+स्फु+पा)

औरंगाबाद    9.74     9.77      6.5      9.22

जालना  

 बीड       7.73     6.27    3.11      6.42

 लातूर     6.54   6.98    3.74      5.95          उस्मानाबाद    

नांदेड    13.13     14.71     11.08   13.17

परभणी   8.66     6.72     6.73      8.65

महाराष्ट्र   9.23     9.02     7.09     8.17

दुसऱ्या वर्षी व उर्वरित तिसऱ्या हंगामात वापरले जाते. अशा पद्धतीने हिशोब व नियोजन व्हायला पाहिजे. उणीव भरून काढण्याचे मार्ग, जसे कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीचे खत यांची निर्मिती कशी व किती प्रमाणात करता येईल व त्यासाठी लागणारे भांडवल व निधी उपलब्धी, या सर्वांचे एकत्रित नियोजन दिसत नाही. हा तर फार मोठा अनुशेष आहे.

पीक रचनेत बदल :- मराठवाड्यातील पीकरचना जर आपण खोलात जाऊन विचार केला तर एक गोष्ट निश्चित लक्षात येते ती म्हणजे त्यात तृणधान्य व तेलबियाणे यांचा समावेश आहे. तुणधान्यामध्ये रब्बी, ज्वारीखाली लक्षणीय क्षेत्र म्हणजे 10.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण उत्पादन मात्र फार कमी आहे. तसेच कापूस व ऊस या पिकांचे उत्पादन कमी आहे. उसाचे क्षेत्र काही भागात सीमित करणे आवश्यक आहे. हे उत्पादन सहज 100 टनांपर्यंत बाढविता पेईल. यात खते व अन्नद्रव्य यांचा समतोल वापर, पाणी योग्य, पद्धतीने देणे, अनुकूल रानबांधणी करणे- जसे एकडोळा पद्धतीस लागणारी बांधणी, त्याचबरोबर निचरा चांगला असावा याची सोय या बाबींचा आचार व वापर झाला पाहिजे. नवीन पिकांचे वाण अंतर्भूत करणे गरजेचे आहे. सध्या बियाणे विश्वसनीय मिळत नाही म्हणून ओरड आहे. बियांची चाचणी पर्जन्याधारित पिकासाठी होणे आवश्यक आहे. एकाच पिकांच्या काही वाणांच्या उगवणीसाठी पाणी कमी लागते तर काहींना जमिनीत जास्त ओलावा लागतो. अशावेळी कमी ओलावा असताना ज्यांची गरज ओलावा (क्रिटिकल हैड्रेशन मर्यादा) जास्त. ते बी उगवत नाही. झाडांची दरहेक्टरी संख्या कमी होते व उत्पादनात घट होते हे अद्यापसुद्धा अंमलात येत नाही. विरोधाभासाचे उदाहरण म्हणजे जालना शहरात अनेक बियाणे कंपन्या आहेत. पण जालन्याचे कृषिउत्पादन सर्वांत कमी आहे.

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर :- कीड व रोग नियंत्रण. रोपे सुदृढ कशी होतील, यांकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. त्याचा मूलमंत्र हा अनुकूल अन्नद्रव्य पुरविण्यात आहे. त्याचबरोबर जमिनीची निगा राखणे, जसे मृदा घट्ट होऊ न देणे. हे सर्व संतुलित खतांच्या मात्रांमुळे होऊ शकते. म्हणून सेंद्रीय खतांचा वापर गरजेचा आहे. पण त्याकडे ते मिळत नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते. मृदा तपासणी करून खतांची मात्रा ठरविणे आवश्यक आहे. फेरपालट व बेवाड ही पीकरचनेतील महत्वाची बाब आहे. खरीप व रब्बी हंगामात सारखे भातपीक (सिंचनाखाली) घेतल्याने परत खरिपातील भातशेतीस किडीचा उपद्रव वाढतो व उत्पादन घटते. कपाशीनंतर कपाशी घेतली जाते. किडीचा प्रादुर्भाव कापूस पिकावर मोठा दिसतो. अनेक रासायनिक कीटकनाशके वापरली जातात. तिच्याचा परिणाम कीड कमी होण्याऐवजी ती वाढताना दिसते कारण त्यात प्रतिबंधक शक्ती निर्माण होते. त्यामुळे जैविक कीड व बुरशीनाशके वापरणे महत्त्वाचे ठरते. या बाबतीत मोठा अनुशेष आहे. एकात्मिक कीडप्रतिबंधक पद्धतीत ट्रायकोग्रामा व इतर जैविके किती लागतील याचा ताळमेळ दिसत नाही. या माहितीच्या विस्तार शिक्षणात मोठा अनुशेष आहे. अनुशेष आर्थिक, वैचारिक, भावनात्मक, सामाजिक गतिमानता असा आहे. त्याचे उपाय योजणे आवश्यक आहे.
 

Tags: Agro Product Seeds Planting Irrigation Crop Compost Manure Organic Fertilezers Fertilizers Water conservation कृषी उत्पादन बियाणे लागवड सिंचन पीक कंपोस्ट खत सेंद्रिय खते खते जलसंधारण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके